तरुणाईचा निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गाशी एकरूप होणारा पर्यटनाचा ट्रेंड पुणे - एखाद्या धरणाच्या- तलावाच्या कडेला किंवा जंगलातील मोकळ्या माळावर तंबू ठोकायचा... शेजारी शेकोटी पेटवायची... वाऱ्याच्या गार झुळका अंगावर घेत मस्त गप्पांचा फड जमवायचा... आकाशातील चांदण्या मोजत रात्र जागवायची... भल्या सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने उठायचे आणि डोंगराच्या सुळक्यावर जाणारी एखादी पायवाट तुडवायची... निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गाशी एकरूप होणारा पर्यटनाचा हा ट्रेंड जिल्ह्याच्या पश्चिम भागात रुजताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गडकोटांच्या भटकंतीमधून तरुणाईची निसर्गाशी आणि ऐतिहासिक स्थळांशी नाळ जोडली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागातील डोंगररांगा, धरणे, लेण्यांकडे तरुणाई आकषत होत आहे. त्यातून अनेक भटके पाठीला सॅक लटकावून रानवाटा तुटवडतात. दुर्मिळ वनस्पती, वेली, फुले, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करण्यासाठी जंगलात भटकतात.  कायद्याच बोला; दंड भरल्यावर पुणे पोलिसांनी काढला 'अ‍ॅम्बुलन्स'चा जॅमर या भटक्यांच्या निसर्गवेडाने मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, पुरंदर या भागात लेक कॅंपिंग, टेंट कॅंपिंग वाढत आहे. त्यामधून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. तसेच, आडवाटेवरील ट्रेकसाठी वाटाड्यांची मागणी वाढली आहे. रानातली पाना-फुलांची व प्राणी-पक्षांची सखोल माहिती असणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. चुलीवरील गावरान पद्धतीच्या जेवणाची लज्जत चाखण्यासाठीही खवय्ये गावांची वाट पकडत आहेत. पर्यटनाच्या या नव्या बदलामधून रोजगार आणि निसर्ग यांची चांगली सांगड घातली जात आहे.  पुणे : वरवंडमध्ये चार दिवसात २२ जणांना करोनाची बाधा कॅंपिंगमध्ये मिळणाऱ्या सुविधा चुलीवरील गावरान पद्धतीचे जेवण तंबूमध्ये राहण्याची सोय जंगल भ्रमंतीत रानमेव्याचा आस्वाद या सुविधा मिळाव्यात स्थानिकांनी पर्यटकांसोबत जंगलात काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन. प्राणी, पक्षी, झाडे, फुले, गवत यांची शास्त्रीय व सखोल माहिती देणाऱ्यांना प्रशिक्षण. जंगलभ्रमंतीसाठी वाटा निश्चित करून द्याव्यात. पर्यटकांसाठी जागोजागी पॅगोडे, पायऱ्या, पिण्यासाठी पाण्याची सोय. रॉक क्लायबिंग, व्हॅली क्रॉसिंग अशा प्रकारच्या साहसी खेळांची सोय. स्थानिक तरुणांचे गट तयार करून त्यांना पर्यटनातून रोजगार संधी. पर्यटकांनी काय करावे? पर्यटकांनी निसर्गाचा मैत्रीपूर्ण आस्वाद घ्यावा. वाटाड्यांनी सांगितलेल्या रस्त्याचा वापर करावा. जंगलात प्राणी-पक्षी आणि स्थानिकांना त्रास होईल, असे वर्तन करू नये. सहकारनगरमध्ये कामानंतर खड्डे जैसे थे; खोदाईमुळे नागरिक हैराण या ठिकाणांना पसंती १) मावळ तालुक्यातील पवना धरण परिसर २) मुळशी, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, डिंभे, कासारसाई व चासकमान धरण परिसर ३) ताम्हिणी व भीमाशंकर अभयारण्य परिसर  ४) अंधारबन, सावळ्या घाट, नाणेघाट, देवकुंड, जुन्नर परिसर पर्यटकांचा तंबूमध्ये राहण्याकडे कल दिसत आहे. पूर्वी सकाळी फिरायला जायचे आणि संध्याकाळी परत घरी जायचे, अशी पुणेकर पर्यटकांची पद्धत होती. परंतु, आता पर्यटक रात्री निसर्गात मुक्काम करायला पसंती देत आहेत. डोंगरदऱ्यात भटकून निसर्ग समजून घेत आहे. शासनाने आमच्यासारख्या तरुणांना या नव्या बदलासाठी मार्गदर्शन करावे व पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात.  - दीपक मरगळे व देविदास झोरे, मुळशीतील तरुण  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 25, 2021

तरुणाईचा निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गाशी एकरूप होणारा पर्यटनाचा ट्रेंड पुणे - एखाद्या धरणाच्या- तलावाच्या कडेला किंवा जंगलातील मोकळ्या माळावर तंबू ठोकायचा... शेजारी शेकोटी पेटवायची... वाऱ्याच्या गार झुळका अंगावर घेत मस्त गप्पांचा फड जमवायचा... आकाशातील चांदण्या मोजत रात्र जागवायची... भल्या सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने उठायचे आणि डोंगराच्या सुळक्यावर जाणारी एखादी पायवाट तुडवायची... निसर्गाच्या सहवासात राहून निसर्गाशी एकरूप होणारा पर्यटनाचा हा ट्रेंड जिल्ह्याच्या पश्चिम भागात रुजताना दिसत आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गडकोटांच्या भटकंतीमधून तरुणाईची निसर्गाशी आणि ऐतिहासिक स्थळांशी नाळ जोडली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागातील डोंगररांगा, धरणे, लेण्यांकडे तरुणाई आकषत होत आहे. त्यातून अनेक भटके पाठीला सॅक लटकावून रानवाटा तुटवडतात. दुर्मिळ वनस्पती, वेली, फुले, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करण्यासाठी जंगलात भटकतात.  कायद्याच बोला; दंड भरल्यावर पुणे पोलिसांनी काढला 'अ‍ॅम्बुलन्स'चा जॅमर या भटक्यांच्या निसर्गवेडाने मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, पुरंदर या भागात लेक कॅंपिंग, टेंट कॅंपिंग वाढत आहे. त्यामधून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. तसेच, आडवाटेवरील ट्रेकसाठी वाटाड्यांची मागणी वाढली आहे. रानातली पाना-फुलांची व प्राणी-पक्षांची सखोल माहिती असणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. चुलीवरील गावरान पद्धतीच्या जेवणाची लज्जत चाखण्यासाठीही खवय्ये गावांची वाट पकडत आहेत. पर्यटनाच्या या नव्या बदलामधून रोजगार आणि निसर्ग यांची चांगली सांगड घातली जात आहे.  पुणे : वरवंडमध्ये चार दिवसात २२ जणांना करोनाची बाधा कॅंपिंगमध्ये मिळणाऱ्या सुविधा चुलीवरील गावरान पद्धतीचे जेवण तंबूमध्ये राहण्याची सोय जंगल भ्रमंतीत रानमेव्याचा आस्वाद या सुविधा मिळाव्यात स्थानिकांनी पर्यटकांसोबत जंगलात काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन. प्राणी, पक्षी, झाडे, फुले, गवत यांची शास्त्रीय व सखोल माहिती देणाऱ्यांना प्रशिक्षण. जंगलभ्रमंतीसाठी वाटा निश्चित करून द्याव्यात. पर्यटकांसाठी जागोजागी पॅगोडे, पायऱ्या, पिण्यासाठी पाण्याची सोय. रॉक क्लायबिंग, व्हॅली क्रॉसिंग अशा प्रकारच्या साहसी खेळांची सोय. स्थानिक तरुणांचे गट तयार करून त्यांना पर्यटनातून रोजगार संधी. पर्यटकांनी काय करावे? पर्यटकांनी निसर्गाचा मैत्रीपूर्ण आस्वाद घ्यावा. वाटाड्यांनी सांगितलेल्या रस्त्याचा वापर करावा. जंगलात प्राणी-पक्षी आणि स्थानिकांना त्रास होईल, असे वर्तन करू नये. सहकारनगरमध्ये कामानंतर खड्डे जैसे थे; खोदाईमुळे नागरिक हैराण या ठिकाणांना पसंती १) मावळ तालुक्यातील पवना धरण परिसर २) मुळशी, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, डिंभे, कासारसाई व चासकमान धरण परिसर ३) ताम्हिणी व भीमाशंकर अभयारण्य परिसर  ४) अंधारबन, सावळ्या घाट, नाणेघाट, देवकुंड, जुन्नर परिसर पर्यटकांचा तंबूमध्ये राहण्याकडे कल दिसत आहे. पूर्वी सकाळी फिरायला जायचे आणि संध्याकाळी परत घरी जायचे, अशी पुणेकर पर्यटकांची पद्धत होती. परंतु, आता पर्यटक रात्री निसर्गात मुक्काम करायला पसंती देत आहेत. डोंगरदऱ्यात भटकून निसर्ग समजून घेत आहे. शासनाने आमच्यासारख्या तरुणांना या नव्या बदलासाठी मार्गदर्शन करावे व पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यात.  - दीपक मरगळे व देविदास झोरे, मुळशीतील तरुण  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2Px8zFP

No comments:

Post a Comment