आपल्या पुढ्यात काय आहे ? मनुष्यप्राण्याला न पाहिलेल्या गोष्टींची नेहमीच भीती वाटली आहे. मानवाला आपल्या शरीराच्या मर्यादेची जाणीव असल्यानं, म्हणजे जिथे ताकद, वेग, नजर, श्रवणशक्ती, दीर्घायुष्य यामध्ये प्राणी आपल्यापेक्षा वरचढ आहेत, तिथं मानवानं विचार करण्यासाठी आपल्या सुपीक आणि विकसित मेंदूचा आधार घेतला. यातूनच अदृश्‍य शक्तींना आवाहन करण्याची गरज भासू लागली. मात्र त्यांना आवाहन करण्यासाठी त्यांचे मनामध्ये कल्पनाचित्र तयार करणं आवश्‍यक होतं. यातूनच आपण वेगवेगळ्या देवांची निर्मिती केली आणि त्याच्याभोवती कथा गुंफल्या गेल्या. भारत, चीन, ग्रीक, रोम आणि इस्लामिक जगतात परग्रहावरील दूत, देवदूत, परी, भुतांच्या गोष्टींचा प्रभाव वाढला. ज्योतिषशास्त्राकडे व्यापक अर्थानं पाहायचं, तर हा मानवी मनाचा आकाशात घेतलेला शोध आहे. रात्रीच्या लखलखत्या आकाशात विविध प्रकारचे ताकासमूह ठरावीक आणि आखीव मार्गांवरून हालचाल करत असल्याने, विविध लोकांनी विविध मानवी व्यवहारांवर प्रभाव टाकणाऱ्या या अवकाशस्थ घडामोडींभोवती कथा रचल्या. आधुनिक युगात ज्योतिषशास्त्राला बाजारात असलेल्या एखाद्या उत्पादनाप्रमाणे सादर केले गेले. ज्योतिषशास्त्राची ही लोकप्रियता वर्तमानपत्रांतून नियमितपणे प्रसिद्ध होणाऱ्या दैनंदिन भविष्याच्या स्तंभातून समजू शकते. एवढेच नाही, तर दूरचित्रवाहिन्यांना देखील मॉर्निंग स्लॉट ‘आपला दिवस कसा असेल’, यासाठी राखून ठेवावा लागला. २०२० मध्ये अचानक उद्‍भवलेल्या कोरोना साथीमुळं जगाचं चक्र अचानक थांबले. आताही जगरहाटीत व्यत्यय असून, धास्ती कायम आहे. या महासाथीचा अंदाज कोणीही वर्तविला नव्हता. परंतु ही साथ कधी थांबणार आहे, हे जर कोणी सांगत असेल तर ती खरोखरच भुरळ पाडणारी गोष्ट ठरू शकते. घडामोडी प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्याबाबत आधीच कळू शकते का? - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भविष्य का जाणून घेतले पाहिजे? एका ग्रीक कथेनुसार, ॲथेना देवीला अनावधानानं अंघोळ करताना पाहिल्यानं देवीनं साधुवृत्तीच्या टायरेसियसला दृष्टिहीन करून टाकले. त्यांच्या शिष्यांनी विनंती केल्यानंतर ॲथेनानं टायरेसिसला पुन्हा दृष्टी देण्याऐवजी त्याला भविष्यात डोकावण्याची शक्ती दिली. मात्र टायरेसिसला हे वरदान नंतर शाप वाटू लागले. कारण भविष्य बदलता येत नसल्यानं त्याचा काय उपयोग, असे त्याला वाटू लागले. त्यामुळे भविष्य बदलण्यासाठी नव्हे, तर ते जाणून त्याला सामोरे जाण्याची कल्पना पुढे आली. समकालीन लेबनिज-अमेरिकी लेखक नसीम निकोलस तालेब याने अनिश्‍चितेवर प्रचंड लिखाण केले आहे. सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘फूल्ड बाय रँडमनेस’ (२००१) पासून सुरुवात करत त्यांनी ‘द ब्लॅक स्वॅन’ (२००७), ‘द बेड ऑफ प्रोक्रस्ट्‌स’ (२०१०), ‘अँटिफ्रजाईल’ (२०१२) आणि ‘स्कीन इन द गेम’ (२०१८) अशी पुस्तके लिहिली. जग हे मूलत: अनिश्‍चित आहे आणि कोणत्याही उद्योगामध्ये यशाच्या मार्गावर येणारा धोका हा नैसर्गिक असून, तो जीवनाचा एक भागच आहे, हा त्याच्या लेखनाचा मध्यवर्ती गाभा होता. म्हणूनच आपण जोखीम कशी हाताळू शकतो, यावर लक्ष केंद्रित करायला हवे. ‘इंटलेक्च्युअल येट इडियट’ (आयवायआय) ही संकल्पना नसीम निकोलस तालेब यांनी त्यांच्या याच नावानं लिहिलेल्या एका लेखात मांडली असून, त्यामध्ये अल्प वैचारिक, पण प्राचीन काळापासून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांशी, म्हणजे - १) आपण काय करावे? २) आपण काय खावे? ३) कसे बोलावे? ४) कसा विचार करावा? आणि ५) कोणाला मत द्यावे? यांची ओळख करून दिली आहे. ते खूप कमी लोकांचे प्रतिनिधित्व करत असले तरी बहुतांश जणांवर व्यापक प्रभाव टाकतात. कारण त्यांचा थेट परिणाम सरकारी धोरणावर होतो.  जुन्या काळात ‘ओरॅकल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाण्या व्यक्ती देवाची इच्छा जाणून घेण्यासाठीचा आणि भविष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी दैवी माहिती मिळविण्याचा एक मार्ग समजला जात असत. डेल्फी येथील अपोलो देवाच्या मंदिरातील पुजारीण ही सर्वांत गाजलेली ओरॅकल होती. हे ठिकाण ओम्फॅलोस किंवा जगाची नाभी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मारकाचे ठिकाण होते. अनेक छोट्या-मोठ्या व्यक्ती तिथे तिला प्रश्‍न विचारण्यासाठी जात असत. एकदा लिडियाचा म्हणजेच सध्याच्या नैर्ऋत्य तुर्कस्तानचा राजा क्रोएसस हा तेथे गेला आणि त्याने शेजारील देशाबरोबर युद्ध करावे की नाही याबाबत ओरॅकलकडे विचारणा केली. ‘तुम्ही गेलात तर एका महान राज्याचा विनाश होईल’ असे उत्तर त्याला मिळाले. ‘म्हणजे आपल्या शत्रूचे..’ असा अर्थ क्रोएससने लावला, प्रत्यक्षात तो इशारा त्याच्याच राज्यासाठी असल्याचे दिसून आले. १८४३ मध्ये अमेरिकी धर्मगुरू विल्यम मिलर यांनी भविष्य वर्तवले, की २१ मार्चला येशू ख्रिस्त हे जगाला निर्मळ करण्यासाठी परत येतील. त्या दिवशी आणि त्यानंतरच्या अनेक वर्षांतही काहीच घडले नाही. परंतु धर्मभ्रष्ट आणि पापी लोकांच्या पुनरुत्थानासाठी दैवी आत्म्याने पुन्हा अवतार घेण्याची आवश्‍यकता आहे, अशी श्रद्धा निर्माण झाली. तारखांना नव्हे दिवसाला, घटनेला नव्हे प्रक्रियेला आणि साध्याला नव्हे, तर त्याकडे नेणाऱ्या प्रवासाला महत्त्व असते. त्यामुळे नेते मंडळींनो आणि देशवासीयांनो, कृपया भविष्यात काय, याबाबत विचारू नका. वर्तमानाकडे लक्ष द्या. काय आवश्‍यक आहे, याकडे लक्ष द्या आणि सर्व काही ठीक होईल. आणि जरी असे झाले नाही, तरी पुढेही अनेक चांगले मार्ग आहेत आणि आपण निश्‍चितच दुसऱ्या दिवशी एक अधिक चांगली व्यक्ती म्हणून विकसित होऊ. अधिक चांगला मानव होणे- हाच योग्य मार्ग आहे आणि हेच भवितव्य आहे. (सदराचे लेखक वैज्ञानिक आणि विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत. ) (अनुवाद : अरविंद रेणापूरकर) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 20, 2021

आपल्या पुढ्यात काय आहे ? मनुष्यप्राण्याला न पाहिलेल्या गोष्टींची नेहमीच भीती वाटली आहे. मानवाला आपल्या शरीराच्या मर्यादेची जाणीव असल्यानं, म्हणजे जिथे ताकद, वेग, नजर, श्रवणशक्ती, दीर्घायुष्य यामध्ये प्राणी आपल्यापेक्षा वरचढ आहेत, तिथं मानवानं विचार करण्यासाठी आपल्या सुपीक आणि विकसित मेंदूचा आधार घेतला. यातूनच अदृश्‍य शक्तींना आवाहन करण्याची गरज भासू लागली. मात्र त्यांना आवाहन करण्यासाठी त्यांचे मनामध्ये कल्पनाचित्र तयार करणं आवश्‍यक होतं. यातूनच आपण वेगवेगळ्या देवांची निर्मिती केली आणि त्याच्याभोवती कथा गुंफल्या गेल्या. भारत, चीन, ग्रीक, रोम आणि इस्लामिक जगतात परग्रहावरील दूत, देवदूत, परी, भुतांच्या गोष्टींचा प्रभाव वाढला. ज्योतिषशास्त्राकडे व्यापक अर्थानं पाहायचं, तर हा मानवी मनाचा आकाशात घेतलेला शोध आहे. रात्रीच्या लखलखत्या आकाशात विविध प्रकारचे ताकासमूह ठरावीक आणि आखीव मार्गांवरून हालचाल करत असल्याने, विविध लोकांनी विविध मानवी व्यवहारांवर प्रभाव टाकणाऱ्या या अवकाशस्थ घडामोडींभोवती कथा रचल्या. आधुनिक युगात ज्योतिषशास्त्राला बाजारात असलेल्या एखाद्या उत्पादनाप्रमाणे सादर केले गेले. ज्योतिषशास्त्राची ही लोकप्रियता वर्तमानपत्रांतून नियमितपणे प्रसिद्ध होणाऱ्या दैनंदिन भविष्याच्या स्तंभातून समजू शकते. एवढेच नाही, तर दूरचित्रवाहिन्यांना देखील मॉर्निंग स्लॉट ‘आपला दिवस कसा असेल’, यासाठी राखून ठेवावा लागला. २०२० मध्ये अचानक उद्‍भवलेल्या कोरोना साथीमुळं जगाचं चक्र अचानक थांबले. आताही जगरहाटीत व्यत्यय असून, धास्ती कायम आहे. या महासाथीचा अंदाज कोणीही वर्तविला नव्हता. परंतु ही साथ कधी थांबणार आहे, हे जर कोणी सांगत असेल तर ती खरोखरच भुरळ पाडणारी गोष्ट ठरू शकते. घडामोडी प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्याबाबत आधीच कळू शकते का? - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भविष्य का जाणून घेतले पाहिजे? एका ग्रीक कथेनुसार, ॲथेना देवीला अनावधानानं अंघोळ करताना पाहिल्यानं देवीनं साधुवृत्तीच्या टायरेसियसला दृष्टिहीन करून टाकले. त्यांच्या शिष्यांनी विनंती केल्यानंतर ॲथेनानं टायरेसिसला पुन्हा दृष्टी देण्याऐवजी त्याला भविष्यात डोकावण्याची शक्ती दिली. मात्र टायरेसिसला हे वरदान नंतर शाप वाटू लागले. कारण भविष्य बदलता येत नसल्यानं त्याचा काय उपयोग, असे त्याला वाटू लागले. त्यामुळे भविष्य बदलण्यासाठी नव्हे, तर ते जाणून त्याला सामोरे जाण्याची कल्पना पुढे आली. समकालीन लेबनिज-अमेरिकी लेखक नसीम निकोलस तालेब याने अनिश्‍चितेवर प्रचंड लिखाण केले आहे. सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.  ‘फूल्ड बाय रँडमनेस’ (२००१) पासून सुरुवात करत त्यांनी ‘द ब्लॅक स्वॅन’ (२००७), ‘द बेड ऑफ प्रोक्रस्ट्‌स’ (२०१०), ‘अँटिफ्रजाईल’ (२०१२) आणि ‘स्कीन इन द गेम’ (२०१८) अशी पुस्तके लिहिली. जग हे मूलत: अनिश्‍चित आहे आणि कोणत्याही उद्योगामध्ये यशाच्या मार्गावर येणारा धोका हा नैसर्गिक असून, तो जीवनाचा एक भागच आहे, हा त्याच्या लेखनाचा मध्यवर्ती गाभा होता. म्हणूनच आपण जोखीम कशी हाताळू शकतो, यावर लक्ष केंद्रित करायला हवे. ‘इंटलेक्च्युअल येट इडियट’ (आयवायआय) ही संकल्पना नसीम निकोलस तालेब यांनी त्यांच्या याच नावानं लिहिलेल्या एका लेखात मांडली असून, त्यामध्ये अल्प वैचारिक, पण प्राचीन काळापासून विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांशी, म्हणजे - १) आपण काय करावे? २) आपण काय खावे? ३) कसे बोलावे? ४) कसा विचार करावा? आणि ५) कोणाला मत द्यावे? यांची ओळख करून दिली आहे. ते खूप कमी लोकांचे प्रतिनिधित्व करत असले तरी बहुतांश जणांवर व्यापक प्रभाव टाकतात. कारण त्यांचा थेट परिणाम सरकारी धोरणावर होतो.  जुन्या काळात ‘ओरॅकल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाण्या व्यक्ती देवाची इच्छा जाणून घेण्यासाठीचा आणि भविष्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी दैवी माहिती मिळविण्याचा एक मार्ग समजला जात असत. डेल्फी येथील अपोलो देवाच्या मंदिरातील पुजारीण ही सर्वांत गाजलेली ओरॅकल होती. हे ठिकाण ओम्फॅलोस किंवा जगाची नाभी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मारकाचे ठिकाण होते. अनेक छोट्या-मोठ्या व्यक्ती तिथे तिला प्रश्‍न विचारण्यासाठी जात असत. एकदा लिडियाचा म्हणजेच सध्याच्या नैर्ऋत्य तुर्कस्तानचा राजा क्रोएसस हा तेथे गेला आणि त्याने शेजारील देशाबरोबर युद्ध करावे की नाही याबाबत ओरॅकलकडे विचारणा केली. ‘तुम्ही गेलात तर एका महान राज्याचा विनाश होईल’ असे उत्तर त्याला मिळाले. ‘म्हणजे आपल्या शत्रूचे..’ असा अर्थ क्रोएससने लावला, प्रत्यक्षात तो इशारा त्याच्याच राज्यासाठी असल्याचे दिसून आले. १८४३ मध्ये अमेरिकी धर्मगुरू विल्यम मिलर यांनी भविष्य वर्तवले, की २१ मार्चला येशू ख्रिस्त हे जगाला निर्मळ करण्यासाठी परत येतील. त्या दिवशी आणि त्यानंतरच्या अनेक वर्षांतही काहीच घडले नाही. परंतु धर्मभ्रष्ट आणि पापी लोकांच्या पुनरुत्थानासाठी दैवी आत्म्याने पुन्हा अवतार घेण्याची आवश्‍यकता आहे, अशी श्रद्धा निर्माण झाली. तारखांना नव्हे दिवसाला, घटनेला नव्हे प्रक्रियेला आणि साध्याला नव्हे, तर त्याकडे नेणाऱ्या प्रवासाला महत्त्व असते. त्यामुळे नेते मंडळींनो आणि देशवासीयांनो, कृपया भविष्यात काय, याबाबत विचारू नका. वर्तमानाकडे लक्ष द्या. काय आवश्‍यक आहे, याकडे लक्ष द्या आणि सर्व काही ठीक होईल. आणि जरी असे झाले नाही, तरी पुढेही अनेक चांगले मार्ग आहेत आणि आपण निश्‍चितच दुसऱ्या दिवशी एक अधिक चांगली व्यक्ती म्हणून विकसित होऊ. अधिक चांगला मानव होणे- हाच योग्य मार्ग आहे आणि हेच भवितव्य आहे. (सदराचे लेखक वैज्ञानिक आणि विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत. ) (अनुवाद : अरविंद रेणापूरकर) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cNLWVM

No comments:

Post a Comment