विद्यापीठाचा ५२ कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प सादर पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२१-२२ या वर्षाचा ५९३ कोटी ५४ लाख १५ हजाराचा अर्थसंकल्प ऑनलाइन अधिसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात तब्बल ५२ कोटी रुपयांची तूट असून, खर्चाला लगाम लावण्याचे व उत्पन्न वाढविण्याचे आव्हान असल्याने नव्या योजनांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाइन अधिसभा झाली. त्यामध्ये व्यवस्थापन समिती सदस्य राजेश पांडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यास सदस्यांनी मान्यता दिली असून,  सदस्यांच्या कपात सूचना व त्यावरील चर्चेसाठी कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर पुढील महिन्यात प्रत्यक्ष सभेचे आयोजन केले जाणार आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आॅनलाइन अर्थसंकल्प मांडावा लागला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अर्थसंकल्पात नव्या खर्चिक योजना व नवे बांधकामे यास ब्रेक लावण्यात आला आहे. तसेच खर्चामध्ये कपात करून आहे ती कामे, व योजना सुरू ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाच्या ठेवी गेल्या चार वर्षात १८० कोट रुपयांनी कमी झाल्या असून, यंदा ३२५ कोटी रुपये शिल्लक आहेत. या ठेवी मधून विद्यापीठाच्या देखभालीसाठी सुमारे ३० कोटी, विद्यापीठ फंडातून वेतनासाठी ६० कोटी आणि प्रशासकीय कामासाठी सुमारे ३० कोटी असा १२० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यामध्ये सुमारे ४० हजार विद्यार्थी लाभार्थी असतील. पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण कमवा व शिका योजनेसाठी 6 कोटी अर्थसंकल्पात कमवा व शिका योजनेसाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यंदा महाविद्यालयांसाठी तीन कोटींऐवजी ४ कोटी रुपये तर, विद्यापीठातील विभागांसाठी ३ ऐवजी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना निधी कमी मिळत असल्याची टीका केली जात होती. त्यामुळे यंदा तरतूद एक कोटीने वाढवली आहे. असे येणार उत्पन्न वेतन-राज्य सरकार अनुदानित : १३० कोटी ३४ लाख प्रशासकीय सर्वसाधारण विभाग : १०४ कोटी ३ लाख परीक्षा विभाग : १३६ कोटी ५८ लाख विद्यापीठातील शैक्षणिक विभाग : ४१ कोटी ४७ लाख विद्यापीठ प्रकाशने : १४ लाख ५० हजार विद्यार्थ्यांसाठी सेवा : १२ कोटी ७१ लाख स्वयंनिर्वाही अभ्यासक्रम व योजना : १३ कोटी १० लाख स्वतंत्र प्रकल्प व योजना : ८८ कोटी ३१ लाख Video:जिना कोसळला, घरात अडकलेल्या आजींची नाट्यमय सुटका असा होणार खर्च वेतन-राज्य सरकार अनुदानित : १३० कोटी ३४ लाख वेतन- विनाअनुदानित : ५५ कोटी ३० लाख प्रशासकीय विभाग : २१ कोटी ४६ लाख विद्यार्थी विषयक सेवा व सुविधा : १९६ कोटी ४५ लाख शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम : ५ कोटी ३५ लाख पायाभूत सेवा विभाग : ५१ कोटी ५ लाख इमारत बांधकामे, सुविधा, सुधारणा : ४५ कोटी २५ लाख स्वतंत्र प्रकल्प व योजना : ८८ कोटी ३१ लाख ठळक वैशिष्ट्ये - विद्यापीठ परिसरात फिरणाऱ्यांसाठी एसपीपीयू आॅक्सिपार्क योजना - मुख्य इमारतीसाठी एसपीपीयू हेरिटेज वॉक योजना - हत्ती तलाव येथे नक्षत्र उद्यानासाठी ५० लाख - आदिवीस विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणासाठी ४० लाख - देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीस ७५ वर्ष पूर्ण होणार असल्याने ७५ कार्यक्रम घेणार - विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांकडून निधी उभारणार पुण्यात पाठोपाठ बारामतीत पसरतोय कोरोना विद्यापीठाच्या जमा व खर्चाचा ताळमेळ घालून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, यामध्ये नवे बांधकाम, योजनांवर खर्च केला जाणार नाही. विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेच्या निधीत कपात करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पावर पुढील महिन्यात सविस्तर चर्चा होईल.’’ - राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 20, 2021

विद्यापीठाचा ५२ कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प सादर पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२१-२२ या वर्षाचा ५९३ कोटी ५४ लाख १५ हजाराचा अर्थसंकल्प ऑनलाइन अधिसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात तब्बल ५२ कोटी रुपयांची तूट असून, खर्चाला लगाम लावण्याचे व उत्पन्न वाढविण्याचे आव्हान असल्याने नव्या योजनांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाइन अधिसभा झाली. त्यामध्ये व्यवस्थापन समिती सदस्य राजेश पांडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यास सदस्यांनी मान्यता दिली असून,  सदस्यांच्या कपात सूचना व त्यावरील चर्चेसाठी कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर पुढील महिन्यात प्रत्यक्ष सभेचे आयोजन केले जाणार आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आॅनलाइन अर्थसंकल्प मांडावा लागला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा अर्थसंकल्पात नव्या खर्चिक योजना व नवे बांधकामे यास ब्रेक लावण्यात आला आहे. तसेच खर्चामध्ये कपात करून आहे ती कामे, व योजना सुरू ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. पुणे विद्यापीठाच्या ठेवी गेल्या चार वर्षात १८० कोट रुपयांनी कमी झाल्या असून, यंदा ३२५ कोटी रुपये शिल्लक आहेत. या ठेवी मधून विद्यापीठाच्या देखभालीसाठी सुमारे ३० कोटी, विद्यापीठ फंडातून वेतनासाठी ६० कोटी आणि प्रशासकीय कामासाठी सुमारे ३० कोटी असा १२० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यामध्ये सुमारे ४० हजार विद्यार्थी लाभार्थी असतील. पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण कमवा व शिका योजनेसाठी 6 कोटी अर्थसंकल्पात कमवा व शिका योजनेसाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यंदा महाविद्यालयांसाठी तीन कोटींऐवजी ४ कोटी रुपये तर, विद्यापीठातील विभागांसाठी ३ ऐवजी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना निधी कमी मिळत असल्याची टीका केली जात होती. त्यामुळे यंदा तरतूद एक कोटीने वाढवली आहे. असे येणार उत्पन्न वेतन-राज्य सरकार अनुदानित : १३० कोटी ३४ लाख प्रशासकीय सर्वसाधारण विभाग : १०४ कोटी ३ लाख परीक्षा विभाग : १३६ कोटी ५८ लाख विद्यापीठातील शैक्षणिक विभाग : ४१ कोटी ४७ लाख विद्यापीठ प्रकाशने : १४ लाख ५० हजार विद्यार्थ्यांसाठी सेवा : १२ कोटी ७१ लाख स्वयंनिर्वाही अभ्यासक्रम व योजना : १३ कोटी १० लाख स्वतंत्र प्रकल्प व योजना : ८८ कोटी ३१ लाख Video:जिना कोसळला, घरात अडकलेल्या आजींची नाट्यमय सुटका असा होणार खर्च वेतन-राज्य सरकार अनुदानित : १३० कोटी ३४ लाख वेतन- विनाअनुदानित : ५५ कोटी ३० लाख प्रशासकीय विभाग : २१ कोटी ४६ लाख विद्यार्थी विषयक सेवा व सुविधा : १९६ कोटी ४५ लाख शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम : ५ कोटी ३५ लाख पायाभूत सेवा विभाग : ५१ कोटी ५ लाख इमारत बांधकामे, सुविधा, सुधारणा : ४५ कोटी २५ लाख स्वतंत्र प्रकल्प व योजना : ८८ कोटी ३१ लाख ठळक वैशिष्ट्ये - विद्यापीठ परिसरात फिरणाऱ्यांसाठी एसपीपीयू आॅक्सिपार्क योजना - मुख्य इमारतीसाठी एसपीपीयू हेरिटेज वॉक योजना - हत्ती तलाव येथे नक्षत्र उद्यानासाठी ५० लाख - आदिवीस विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षणासाठी ४० लाख - देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीस ७५ वर्ष पूर्ण होणार असल्याने ७५ कार्यक्रम घेणार - विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांकडून निधी उभारणार पुण्यात पाठोपाठ बारामतीत पसरतोय कोरोना विद्यापीठाच्या जमा व खर्चाचा ताळमेळ घालून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, यामध्ये नवे बांधकाम, योजनांवर खर्च केला जाणार नाही. विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेच्या निधीत कपात करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पावर पुढील महिन्यात सविस्तर चर्चा होईल.’’ - राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/391ulsm

No comments:

Post a Comment