पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या आवळल्या मुसक्‍या पुणे - कधी संघटितपणे, तर कधी छोट्या-छोट्या टोळ्या बनवून शहराच्या वेगवेगळ्या भागात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या किंवा गुन्हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एक, दोन नव्हे तर तब्बल २५४ भाई, दादांवर पोलिसांनी गेल्या पाच महिन्यात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका), गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा कायदा (एमपीडीए), तडीपार अशा प्रकारची कारवाई करीत पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांना सुरुंग लावला आहे. जुन्या टोळ्यांबरोबरच पाच नव्या टोळ्या शोधून काढत, त्यांना तुरुंगाची हवा खाण्यास पाठविल्याची सद्यःस्थिती आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कारागृहातून सुटलेला सराईत गुंड गजा मारणे याच्या शक्तीप्रदर्शनानंतर पुणे पोलिसांवर नागरिकांबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही टीका करीत नाराजी व्यक्त केली होती. शहरातील शांततेला बाधा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी संघटित टोळ्या व गुन्हेगारी टोळ्यांना अटकाव करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून, गजा मारणेच्या टोळीच्या मुसक्‍या आवळण्यास सुरवात केली होती. सातारा पोलिसांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी गजा मारणेस अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची रवानगी कारागृहात केली. पुणे शहरात आज २३४२ नवे रुग्ण; ३३ रुग्णांचा मृत्यू  दरम्यान, घायवळ टोळीचा प्रमुख नीलेश घायवळ यालाही अटक करून त्याला कारागृहात स्थानबद्ध केले. मोहोळ टोळीच्या शरद मोहोळलाही काही महिन्यांसाठी शहरातून हद्दपार केले. आंदेकर टोळीलाही हादरा देत त्यांच्यावरही कायद्याचा बडगा उगारला. पोलिसांनी १६ टोळ्यांमधील १६१ हून अधिक गुन्हेगारांवर बडगा उगारत त्यांच्यावर ‘मोका’ अंतर्गत कारवाई केली.  कोरोना रुग्ण वाढीचा धोका; कोविड केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती सातत्याने शोधमोहीम काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात दहशत निर्माण करून, नागरिकांना मारहाण, शिवीगाळ, वाहनांची तोडफोड असे गुन्हे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. अशा १५ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करून, त्यांना कारागृहात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान, पोलिसांकडून सातत्याने शोधमोहिम राबवून, सराईत गुन्हेगार, तडीपार गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यांच्यावरही कारवाई करण्याबरोबरच शांतता भंग करणाऱ्या ७८ जणांवर तडीपार आदेशानुसार कारवाई करून, त्यांना काही वर्षांसाठी शहर व जिल्ह्याबाहेर पाठविण्याचे काम पोलिसांनी केले.  राज्यात कोरोना लसीचे डोस खरंच पडून आहेत?; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये संघटित टोळ्या, नव्या टोळ्यांच्या मुसक्‍या आवळण्याबरोबरच अन्य गुन्हे करणाऱ्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही, त्यादृष्टीने भविष्यातही गुन्हेगारांविरुद्धची पोलिसांची कारवाई सुरूच राहील. - अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/396M2qi - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 22, 2021

पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या आवळल्या मुसक्‍या पुणे - कधी संघटितपणे, तर कधी छोट्या-छोट्या टोळ्या बनवून शहराच्या वेगवेगळ्या भागात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या किंवा गुन्हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या एक, दोन नव्हे तर तब्बल २५४ भाई, दादांवर पोलिसांनी गेल्या पाच महिन्यात कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका), गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा कायदा (एमपीडीए), तडीपार अशा प्रकारची कारवाई करीत पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांना सुरुंग लावला आहे. जुन्या टोळ्यांबरोबरच पाच नव्या टोळ्या शोधून काढत, त्यांना तुरुंगाची हवा खाण्यास पाठविल्याची सद्यःस्थिती आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कारागृहातून सुटलेला सराईत गुंड गजा मारणे याच्या शक्तीप्रदर्शनानंतर पुणे पोलिसांवर नागरिकांबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही टीका करीत नाराजी व्यक्त केली होती. शहरातील शांततेला बाधा निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी संघटित टोळ्या व गुन्हेगारी टोळ्यांना अटकाव करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून, गजा मारणेच्या टोळीच्या मुसक्‍या आवळण्यास सुरवात केली होती. सातारा पोलिसांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी गजा मारणेस अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची रवानगी कारागृहात केली. पुणे शहरात आज २३४२ नवे रुग्ण; ३३ रुग्णांचा मृत्यू  दरम्यान, घायवळ टोळीचा प्रमुख नीलेश घायवळ यालाही अटक करून त्याला कारागृहात स्थानबद्ध केले. मोहोळ टोळीच्या शरद मोहोळलाही काही महिन्यांसाठी शहरातून हद्दपार केले. आंदेकर टोळीलाही हादरा देत त्यांच्यावरही कायद्याचा बडगा उगारला. पोलिसांनी १६ टोळ्यांमधील १६१ हून अधिक गुन्हेगारांवर बडगा उगारत त्यांच्यावर ‘मोका’ अंतर्गत कारवाई केली.  कोरोना रुग्ण वाढीचा धोका; कोविड केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती सातत्याने शोधमोहीम काही महिन्यांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात दहशत निर्माण करून, नागरिकांना मारहाण, शिवीगाळ, वाहनांची तोडफोड असे गुन्हे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. अशा १५ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करून, त्यांना कारागृहात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान, पोलिसांकडून सातत्याने शोधमोहिम राबवून, सराईत गुन्हेगार, तडीपार गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यांच्यावरही कारवाई करण्याबरोबरच शांतता भंग करणाऱ्या ७८ जणांवर तडीपार आदेशानुसार कारवाई करून, त्यांना काही वर्षांसाठी शहर व जिल्ह्याबाहेर पाठविण्याचे काम पोलिसांनी केले.  राज्यात कोरोना लसीचे डोस खरंच पडून आहेत?; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये संघटित टोळ्या, नव्या टोळ्यांच्या मुसक्‍या आवळण्याबरोबरच अन्य गुन्हे करणाऱ्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही, त्यादृष्टीने भविष्यातही गुन्हेगारांविरुद्धची पोलिसांची कारवाई सुरूच राहील. - अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे)  Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/396M2qi


via Tajya news Feeds https://ift.tt/396LS2a

No comments:

Post a Comment