सतीशच्या गृहमंत्र्यांकडून मशिनच्या ‘टार्गेट’चे ओझे ‘अहो, आपल्याला पैसे मोजण्याचे मशिन विकत घ्या ना.’ स्वातीचं हे बोलणं ऐकून सतीशला धक्काच बसला. ‘काऽऽय ! अगं तुटपुंज्या पगारात भागवताना माझ्या नाकीनऊ येतात आणि पैसे मोजण्यासाठी मशिन कशाला हवंय?’ सतीशने म्हटलं. ‘उगाचंच माझ्या मैत्रिणी तुम्हाला ‘एसटीडी’ म्हणत नाहीत? एकदम आऊटडेटेट. जगात काय चाललंय, याची तुम्हाला अजिबात माहिती नसते. आता श्रीमंती मोजण्याचे नवीन परिमाण आलंय. पूर्वी बंगला, मोटार, जमीन, बॅंकेत शिल्लक असं काही असलं की ते लोकांच्या नजरेत भरायचं आणि त्यावरून श्रीमंती ठरवली जायची. मात्र, आता घराच्या दर्शनी भागात पैसे मोजण्याचं मशिन ठेवलं, की लोकांना आपली श्रीमंती कळते. काल मी थोरातबाईंच्या घरी गेले होते, त्यावेळी त्यांचे पैसे मोजण्याचे मशिन बघून, मला त्यांच्या भाग्याचा एकदम हेवा वाटलं. किती कमी कालावधीत त्यांना हे सोन्याचे दिवस आलेत. आपणही असे मशिन घेतलेच पाहिजे.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘पण आपल्याला या मशिनचा काय फायदा होणार आहे’? सतीशने विचारले. ‘दरवेळी फायद्या- तोट्याचा विचार करू नका. कधीतरी आपल्या प्रेस्टीजचा विचार करा. आपण त्यातून आर्थिक उत्पन्नही मिळवू शकतो. काहीजण रस्त्यावर वजनकाटा ठेवून, पैसे कमावतात की नाही. आपणही पैसे मोजण्याचे मशिन घेऊन, बॅंकेबाहेर बसायचे. कोणाला पैसे भरायचे असतील किंवा काढायचे असतील तर आपण ते पैसे मशिनने मोजू शकतो.’ स्वातीच्या या बोलण्यावर सतीशने फक्त मान डोलावली.  ‘आपली ऐपत नाही तर किमान ओळखीतील लोकांच्या स्कॉर्पिओ, मर्सिडीज अशा महागड्या गाड्या तुम्हाला वापरायला काय होतं? मी तर आधीच दहा- बारा बनावट नंबरप्लेट घेऊनही ठेवल्यात. त्याचा काही उपयोग करणार आहात की नाही? माझ्या मैत्रिणी बघा. बाजारात एखादी फॅशन आली, की लगेचच अंमलबजावणी सुरू. तुम्ही मात्र पाषाणयुगातच जगा.’ स्वातीनं सतीशलं झापलं. त्यानंतर सतीशने मित्राला फोन केला. ‘आशिष, आमच्या ‘गृहमंत्र्यांना’ पैसे मोजण्याचे मशिन विकत घ्यायचंय. कोठे मिळेल रे’? मात्र, हे वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच स्वातीने रुद्रावतार धारण केला. ‘गृहमंत्री कोणाला म्हणताय? मी तुम्हाला कधी धुण्या- भांड्याचे तरी टार्गेट दिलंय का? संसाराचं आख्खं ‘वाझे’ मी एकटी उचलतेय.’’ नंतर स्वातीने जीभ चावून मला ‘वाझे’ ऐवजी ‘ओझे’ म्हणायचंय, असा खुलासा केला.  ‘अगं, बायकोला गृहमंत्री म्हणायची आपल्याकडे रिवाज आहे. त्यानुसार मी बोललो.’ सतीशच्या या बोलण्यावर स्वाती काही ऐकायला तयार नव्हती. मात्र, तुम्ही संसारातील शिस्त मोडली आहे. त्यामुळे तुम्हाला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. आजपासून तुम्ही महिनाभरासाठी गावाला जायचं. शेतीची सगळी कामं करायची. नंतरच इकडं यायचं.’’ स्वातीच्या या बोलण्यावर सतीशचे धाबे दणाणले.  ‘अगं किरकोळ चुकीसाठी एवढी शिक्षा? मला माफ कर.’ काकुळतीला येत सतीशने म्हटले. ‘चुकीला माफी नाही. आजच चंबुगबाळं उचलायचं.’ स्वातीनं इशारा दिला. त्यावर नाराज होत सतीशने सासू- सासऱ्यांना आठ पानी ईमेल करायचा ठरवलं. ‘त्यात तुमची मुलगी मला कसा त्रास देते, घरकामाचं मला कसं टार्गेट देते? तसेच सारखी भुणभुण कशी लावते?’ असा लेटरबॉम्ब टाकायचं ठरवलं. तत्पूर्वी त्याने सोंडेकर या साडूंना फोन करून, ‘मी असं असं पत्र लिहीत असून, तुमचा मला पाठिंबा आहे ना’ ? अशी विचारणा केली. त्यावर ‘‘तुम्ही काळजी करू नका. मी सगळं मॅनेज करतो.’’  असं सोंडेकरांनी म्हटलं. साडूंचा असा दिलासा मिळाल्यानंतर सतीशचा जीव भांड्यात पडला. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, March 22, 2021

सतीशच्या गृहमंत्र्यांकडून मशिनच्या ‘टार्गेट’चे ओझे ‘अहो, आपल्याला पैसे मोजण्याचे मशिन विकत घ्या ना.’ स्वातीचं हे बोलणं ऐकून सतीशला धक्काच बसला. ‘काऽऽय ! अगं तुटपुंज्या पगारात भागवताना माझ्या नाकीनऊ येतात आणि पैसे मोजण्यासाठी मशिन कशाला हवंय?’ सतीशने म्हटलं. ‘उगाचंच माझ्या मैत्रिणी तुम्हाला ‘एसटीडी’ म्हणत नाहीत? एकदम आऊटडेटेट. जगात काय चाललंय, याची तुम्हाला अजिबात माहिती नसते. आता श्रीमंती मोजण्याचे नवीन परिमाण आलंय. पूर्वी बंगला, मोटार, जमीन, बॅंकेत शिल्लक असं काही असलं की ते लोकांच्या नजरेत भरायचं आणि त्यावरून श्रीमंती ठरवली जायची. मात्र, आता घराच्या दर्शनी भागात पैसे मोजण्याचं मशिन ठेवलं, की लोकांना आपली श्रीमंती कळते. काल मी थोरातबाईंच्या घरी गेले होते, त्यावेळी त्यांचे पैसे मोजण्याचे मशिन बघून, मला त्यांच्या भाग्याचा एकदम हेवा वाटलं. किती कमी कालावधीत त्यांना हे सोन्याचे दिवस आलेत. आपणही असे मशिन घेतलेच पाहिजे.’ - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘पण आपल्याला या मशिनचा काय फायदा होणार आहे’? सतीशने विचारले. ‘दरवेळी फायद्या- तोट्याचा विचार करू नका. कधीतरी आपल्या प्रेस्टीजचा विचार करा. आपण त्यातून आर्थिक उत्पन्नही मिळवू शकतो. काहीजण रस्त्यावर वजनकाटा ठेवून, पैसे कमावतात की नाही. आपणही पैसे मोजण्याचे मशिन घेऊन, बॅंकेबाहेर बसायचे. कोणाला पैसे भरायचे असतील किंवा काढायचे असतील तर आपण ते पैसे मशिनने मोजू शकतो.’ स्वातीच्या या बोलण्यावर सतीशने फक्त मान डोलावली.  ‘आपली ऐपत नाही तर किमान ओळखीतील लोकांच्या स्कॉर्पिओ, मर्सिडीज अशा महागड्या गाड्या तुम्हाला वापरायला काय होतं? मी तर आधीच दहा- बारा बनावट नंबरप्लेट घेऊनही ठेवल्यात. त्याचा काही उपयोग करणार आहात की नाही? माझ्या मैत्रिणी बघा. बाजारात एखादी फॅशन आली, की लगेचच अंमलबजावणी सुरू. तुम्ही मात्र पाषाणयुगातच जगा.’ स्वातीनं सतीशलं झापलं. त्यानंतर सतीशने मित्राला फोन केला. ‘आशिष, आमच्या ‘गृहमंत्र्यांना’ पैसे मोजण्याचे मशिन विकत घ्यायचंय. कोठे मिळेल रे’? मात्र, हे वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच स्वातीने रुद्रावतार धारण केला. ‘गृहमंत्री कोणाला म्हणताय? मी तुम्हाला कधी धुण्या- भांड्याचे तरी टार्गेट दिलंय का? संसाराचं आख्खं ‘वाझे’ मी एकटी उचलतेय.’’ नंतर स्वातीने जीभ चावून मला ‘वाझे’ ऐवजी ‘ओझे’ म्हणायचंय, असा खुलासा केला.  ‘अगं, बायकोला गृहमंत्री म्हणायची आपल्याकडे रिवाज आहे. त्यानुसार मी बोललो.’ सतीशच्या या बोलण्यावर स्वाती काही ऐकायला तयार नव्हती. मात्र, तुम्ही संसारातील शिस्त मोडली आहे. त्यामुळे तुम्हाला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. आजपासून तुम्ही महिनाभरासाठी गावाला जायचं. शेतीची सगळी कामं करायची. नंतरच इकडं यायचं.’’ स्वातीच्या या बोलण्यावर सतीशचे धाबे दणाणले.  ‘अगं किरकोळ चुकीसाठी एवढी शिक्षा? मला माफ कर.’ काकुळतीला येत सतीशने म्हटले. ‘चुकीला माफी नाही. आजच चंबुगबाळं उचलायचं.’ स्वातीनं इशारा दिला. त्यावर नाराज होत सतीशने सासू- सासऱ्यांना आठ पानी ईमेल करायचा ठरवलं. ‘त्यात तुमची मुलगी मला कसा त्रास देते, घरकामाचं मला कसं टार्गेट देते? तसेच सारखी भुणभुण कशी लावते?’ असा लेटरबॉम्ब टाकायचं ठरवलं. तत्पूर्वी त्याने सोंडेकर या साडूंना फोन करून, ‘मी असं असं पत्र लिहीत असून, तुमचा मला पाठिंबा आहे ना’ ? अशी विचारणा केली. त्यावर ‘‘तुम्ही काळजी करू नका. मी सगळं मॅनेज करतो.’’  असं सोंडेकरांनी म्हटलं. साडूंचा असा दिलासा मिळाल्यानंतर सतीशचा जीव भांड्यात पडला. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tMCZmE

No comments:

Post a Comment