‘एनएमएमएस’ परीक्षेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल; कधी होणार पहा पिंपरी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) यावर्षी १४ मार्चला घेण्यात येणार होती. त्यातही बदल करत २१ मार्च २०२१चा मुहूर्त काढला. मात्र, ही परीक्षा पुन्हा एकदा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. परिषदेने तूर्तास परीक्षेची सुधारित तारीख ६ एप्रिल जाहीर केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. आठवीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. राज्यातील आठ हजार ३१२ शाळांमधून ९७ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार होती, पण ऐनवेळी २१ मार्चपर्यंत परीक्षा पुढे ढकलली. आता पुन्हा एकदा ही परीक्षा राज्यसेवा पूर्व परीक्षेमुळे एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसणार असून, परीक्षाच उशिरा झाल्याने यंदाही निकाल उशिरा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा असा असेल अभ्यासक्रम बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी, अशा दोन विषयांचा समावेश असून पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीमध्ये कार्यकारणभाव, विश्‍लेषण, संकलन आदी संकल्पनांवर, तर दुसरा पेपर हा अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास यांचा समावेश आहे. प्रत्येक पेपर हा ९० गुणांचा असून, यात पात्रता गुण ४० टक्के मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२ टक्के असा निकष आहे. संबंधित परीक्षेचा निकाल पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेमार्फत सांगण्यात आले. इंद्रायणी नदीतून वाळूउपसा; १३ वाळूमाफियांना ठोकल्या बेड्या, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा विविध केंद्रावर २१ मार्चला होत आहे. म्हणून ही एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे. - तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 20, 2021

‘एनएमएमएस’ परीक्षेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल; कधी होणार पहा पिंपरी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) यावर्षी १४ मार्चला घेण्यात येणार होती. त्यातही बदल करत २१ मार्च २०२१चा मुहूर्त काढला. मात्र, ही परीक्षा पुन्हा एकदा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. परिषदेने तूर्तास परीक्षेची सुधारित तारीख ६ एप्रिल जाहीर केली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाते. आठवीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. राज्यातील आठ हजार ३१२ शाळांमधून ९७ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार होती, पण ऐनवेळी २१ मार्चपर्यंत परीक्षा पुढे ढकलली. आता पुन्हा एकदा ही परीक्षा राज्यसेवा पूर्व परीक्षेमुळे एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसणार असून, परीक्षाच उशिरा झाल्याने यंदाही निकाल उशिरा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा असा असेल अभ्यासक्रम बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी, अशा दोन विषयांचा समावेश असून पहिल्या पेपरमध्ये मानसशास्त्रीय चाचणीमध्ये कार्यकारणभाव, विश्‍लेषण, संकलन आदी संकल्पनांवर, तर दुसरा पेपर हा अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, इतिहास यांचा समावेश आहे. प्रत्येक पेपर हा ९० गुणांचा असून, यात पात्रता गुण ४० टक्के मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२ टक्के असा निकष आहे. संबंधित परीक्षेचा निकाल पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेमार्फत सांगण्यात आले. इंद्रायणी नदीतून वाळूउपसा; १३ वाळूमाफियांना ठोकल्या बेड्या, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूचनेनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा विविध केंद्रावर २१ मार्चला होत आहे. म्हणून ही एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे. - तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3lBp2F9

No comments:

Post a Comment