कणकवलीत लवकरच "टीडीआर' प्रणाली कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरात लवकरच "टीडीआर' प्रणाली (विकास हक्कांचे हस्तांतरण) लागू होणार आहे. यात रस्ते व इतर विकासकामांसाठी जागा देणाऱ्या जमीन मालकांना शहराच्या अन्य भागात बांधकाम करण्यासाठी वाढीव एफएसआय दिला जाणार आहे. याबाबतचा ठराव आजच्या नगरपंचायत सभेत मंजूर करण्यात आला. याशिवाय शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्‍त करण्याबाबतचाही ठराव सभेत घेण्यात आला. येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, कविता राणे, ऍड.विराज भोसले आदींसह नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.  राज्याने सर्वच नगरपालिका, नगरपंचायतींच्या क्षेत्रात "टीडीआर' लागू केला आहे. येथील नगरपंचायतीकडे टीडीआर कार्यान्वित करण्याची यंत्रणा नसल्याने त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आजच्या नगरपंचायत सभेत टीडीआरसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून तज्ज्ञ कर्मचारीवर्ग, अद्ययावत संगणक दालन, सातबारा, फेरफार, दस्त आदींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. पुढील तीन ते चार महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित होईल आणि शहरातील बांधकामांना "टीडीआर' लागू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली.  शहर विकास आराखड्यामध्ये अनेक भागांतून रस्ते नियोजित आहेत; मात्र या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी निधी नसल्याने सर्वच रस्ते व इतर विकासकामे मार्गी लावताना अडचणी निर्माण होत आहेत. "टीडीआर' लागू झाल्यानंतर रस्ता किंवा इतर विकास कामात जेवढी जागा जाईल, तेवढा "टीडीआर' त्या जमीन मालकाला शहराच्या अन्य प्रभागात मिळणार आहे. या प्रक्रियेमुळे जमीन मालकांचे नुकसान होणार नाही आणि नगरपंचायतीलाही विकासकामे करताना अडचणी येणार नाहीत, असे उपनगराध्यक्ष हर्णे म्हणाले.  शहराच्या विकास आराखड्याची मुदत यंदा संपत आहे. त्यामुळे नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासन पातळीवर नव्या एजन्सीची नियुक्‍ती करावी, असा ठराव नगरपंचायत सभेत झाला. वर्षभरापूर्वीही असाच ठराव नगरपंचायत सभेत झाला होता; मात्र कोरोनामुळे शासनाला शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्‍त करण्याला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आजच्या नगरपंचायत सभेत पुन्हा शासन पातळीवर एजन्सी नियुक्‍त करण्याचा ठराव घेण्यात आला.  कचरा प्रकल्पासाठी जादा जागा  शहरातील मुडेश्‍वर मैदानापासून काही अंतरावर नगरपंचायतीचे डंपिंग ग्राउंड आहे. तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आणखी जागेची आवश्‍यकता भासणार आहे. त्याअनुषंगाने डंपिंग ग्राउंड परिसरातील आवश्‍यक ती जागा स्थानिक जमिन मालकांशी वाटाघाटी करून खरेदी करण्याचा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.    शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3ची जागा भालचंद्र आश्रम संस्थानला वर्ग करणे आणि संस्थानच्या अन्य जागेत शाळेचे स्थलांतर करण्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती, जमिन मालक, पालकसंघ, भालचंद्र महाराज संस्थान आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करून आणि सहमतीने घेणार आहोत.  - समीर नलावडे, नगराध्यक्ष, कणकवली   संपादन - राहुल पाटील     Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 24, 2021

कणकवलीत लवकरच "टीडीआर' प्रणाली कणकवली (सिंधुदुर्ग) - शहरात लवकरच "टीडीआर' प्रणाली (विकास हक्कांचे हस्तांतरण) लागू होणार आहे. यात रस्ते व इतर विकासकामांसाठी जागा देणाऱ्या जमीन मालकांना शहराच्या अन्य भागात बांधकाम करण्यासाठी वाढीव एफएसआय दिला जाणार आहे. याबाबतचा ठराव आजच्या नगरपंचायत सभेत मंजूर करण्यात आला. याशिवाय शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्‍त करण्याबाबतचाही ठराव सभेत घेण्यात आला. येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, कविता राणे, ऍड.विराज भोसले आदींसह नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.  राज्याने सर्वच नगरपालिका, नगरपंचायतींच्या क्षेत्रात "टीडीआर' लागू केला आहे. येथील नगरपंचायतीकडे टीडीआर कार्यान्वित करण्याची यंत्रणा नसल्याने त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आजच्या नगरपंचायत सभेत टीडीआरसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून तज्ज्ञ कर्मचारीवर्ग, अद्ययावत संगणक दालन, सातबारा, फेरफार, दस्त आदींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. पुढील तीन ते चार महिन्यांत ही यंत्रणा कार्यान्वित होईल आणि शहरातील बांधकामांना "टीडीआर' लागू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली.  शहर विकास आराखड्यामध्ये अनेक भागांतून रस्ते नियोजित आहेत; मात्र या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी निधी नसल्याने सर्वच रस्ते व इतर विकासकामे मार्गी लावताना अडचणी निर्माण होत आहेत. "टीडीआर' लागू झाल्यानंतर रस्ता किंवा इतर विकास कामात जेवढी जागा जाईल, तेवढा "टीडीआर' त्या जमीन मालकाला शहराच्या अन्य प्रभागात मिळणार आहे. या प्रक्रियेमुळे जमीन मालकांचे नुकसान होणार नाही आणि नगरपंचायतीलाही विकासकामे करताना अडचणी येणार नाहीत, असे उपनगराध्यक्ष हर्णे म्हणाले.  शहराच्या विकास आराखड्याची मुदत यंदा संपत आहे. त्यामुळे नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासन पातळीवर नव्या एजन्सीची नियुक्‍ती करावी, असा ठराव नगरपंचायत सभेत झाला. वर्षभरापूर्वीही असाच ठराव नगरपंचायत सभेत झाला होता; मात्र कोरोनामुळे शासनाला शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्‍त करण्याला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आजच्या नगरपंचायत सभेत पुन्हा शासन पातळीवर एजन्सी नियुक्‍त करण्याचा ठराव घेण्यात आला.  कचरा प्रकल्पासाठी जादा जागा  शहरातील मुडेश्‍वर मैदानापासून काही अंतरावर नगरपंचायतीचे डंपिंग ग्राउंड आहे. तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आणखी जागेची आवश्‍यकता भासणार आहे. त्याअनुषंगाने डंपिंग ग्राउंड परिसरातील आवश्‍यक ती जागा स्थानिक जमिन मालकांशी वाटाघाटी करून खरेदी करण्याचा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.    शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3ची जागा भालचंद्र आश्रम संस्थानला वर्ग करणे आणि संस्थानच्या अन्य जागेत शाळेचे स्थलांतर करण्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती, जमिन मालक, पालकसंघ, भालचंद्र महाराज संस्थान आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करून आणि सहमतीने घेणार आहोत.  - समीर नलावडे, नगराध्यक्ष, कणकवली   संपादन - राहुल पाटील     Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3vUASyN

No comments:

Post a Comment