राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार  : नारायण राणे ओरोस (सिंधुदुर्ग)-  "कोणी निंदा, कोणी वंदा, भ्रष्टाचार करणे हाच आमचा एकमेव धंदा' अशी स्थिती आघाडी सरकारची आहे. राज्यात सध्या कुंपणच शेत खात आहे. पुरावे देवूनही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेत नाहीत. सचिन वाझेवर कारवाई करीत नाही, असा आरोप करत राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून यापूर्वी आपण राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची केलेली मागणी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहोत. उद्या (ता.24) आपण राज्यसभेत अधिवेशनाला उपस्थित राहून ही मागणी लावून धरणार असल्याचे भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी येथे सांगितले.  पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राणे बोलत होते. ते म्हणाले, ""सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे आहेत. वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी रश्‍मी शुक्‍ला यांनी बदली प्रकरणात कोणी किती पैसे मागितले ? कशासाठी व कोणासाठी मागितले ? याचे रेकॉर्डिंग पुराव्यासहित मुख्यमंत्री ठाकरे यांना सादर केले आहे. तरीही मुख्यमंत्री ठाकरे कारवाई करीत नाहीत. हे तीन पक्षांचे सरकार राज्यातील गोरगरीब जनतेची लूट करीत आहे.''  ते म्हणाले, ""मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेखी पत्र पाठवत गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले, असल्याचे सांगत असताना मुख्यमंत्री ठाकरे गप्प आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यावेळी देशमुख कोरोना बाधित असल्याचे सांगत राजीनामा घेणार नसल्याचे सांगत आहेत. पवार हे वरिष्ठ नेते असतानाही त्यांनी केलेला बचाव हास्यास्पद आहे. कारण त्या कालावधीत देशमुख कुठे कुठे फिरले त्याचे पुरावे समोर आले आहेत. एका खून प्रकरणात निलंबित असलेल्या वाझेंकडे एवढी संपत्ती आली कुठून? त्याला गोरगरीब व्यक्तीचे खून करण्याची सुपारी कोणत्या आंतरराष्ट्रीय गुंडाने दिली होती, याचा शोध लागणे आवश्‍यक असताना तोच वाझे मुख्यमंत्री ठाकरे यांचा सल्लागार आहे. गळ्यातील ताईत बनला आहे. त्याला आयुक्तांपेक्षा जास्त पॉवर मिळाली आहे.''  कोरोना नियंत्रणात सरकार अपयशी  राणे म्हणाले, की ""राज्यात एका बाजूला कोरोना वाढतोय. देशात झालेल्या मृत्युतील 50 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. कोरोना नियंत्रण व उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या स्थितीत महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दीष्ट एका साध्या पोलिस अधिकाऱ्याला देत आहेत. यांच्याकडे दुष्काळ निवारण करणे, शेती नुकसानी देणे यासाठी पैसे नाहीत; मात्र स्वतःसाठी पैसे उभे करीत आहेत. ही बाब राज्यासाठी निंदनीय आहे. त्यामुळे आपण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची पुन्हा मागणी करणार आहोत.''    संपादन -राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, March 23, 2021

राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार  : नारायण राणे ओरोस (सिंधुदुर्ग)-  "कोणी निंदा, कोणी वंदा, भ्रष्टाचार करणे हाच आमचा एकमेव धंदा' अशी स्थिती आघाडी सरकारची आहे. राज्यात सध्या कुंपणच शेत खात आहे. पुरावे देवूनही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेत नाहीत. सचिन वाझेवर कारवाई करीत नाही, असा आरोप करत राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून यापूर्वी आपण राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची केलेली मागणी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार आहोत. उद्या (ता.24) आपण राज्यसभेत अधिवेशनाला उपस्थित राहून ही मागणी लावून धरणार असल्याचे भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी येथे सांगितले.  पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राणे बोलत होते. ते म्हणाले, ""सचिन वाझे विरोधात भक्कम पुरावे आहेत. वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी रश्‍मी शुक्‍ला यांनी बदली प्रकरणात कोणी किती पैसे मागितले ? कशासाठी व कोणासाठी मागितले ? याचे रेकॉर्डिंग पुराव्यासहित मुख्यमंत्री ठाकरे यांना सादर केले आहे. तरीही मुख्यमंत्री ठाकरे कारवाई करीत नाहीत. हे तीन पक्षांचे सरकार राज्यातील गोरगरीब जनतेची लूट करीत आहे.''  ते म्हणाले, ""मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेखी पत्र पाठवत गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले, असल्याचे सांगत असताना मुख्यमंत्री ठाकरे गप्प आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यावेळी देशमुख कोरोना बाधित असल्याचे सांगत राजीनामा घेणार नसल्याचे सांगत आहेत. पवार हे वरिष्ठ नेते असतानाही त्यांनी केलेला बचाव हास्यास्पद आहे. कारण त्या कालावधीत देशमुख कुठे कुठे फिरले त्याचे पुरावे समोर आले आहेत. एका खून प्रकरणात निलंबित असलेल्या वाझेंकडे एवढी संपत्ती आली कुठून? त्याला गोरगरीब व्यक्तीचे खून करण्याची सुपारी कोणत्या आंतरराष्ट्रीय गुंडाने दिली होती, याचा शोध लागणे आवश्‍यक असताना तोच वाझे मुख्यमंत्री ठाकरे यांचा सल्लागार आहे. गळ्यातील ताईत बनला आहे. त्याला आयुक्तांपेक्षा जास्त पॉवर मिळाली आहे.''  कोरोना नियंत्रणात सरकार अपयशी  राणे म्हणाले, की ""राज्यात एका बाजूला कोरोना वाढतोय. देशात झालेल्या मृत्युतील 50 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. कोरोना नियंत्रण व उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या स्थितीत महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दीष्ट एका साध्या पोलिस अधिकाऱ्याला देत आहेत. यांच्याकडे दुष्काळ निवारण करणे, शेती नुकसानी देणे यासाठी पैसे नाहीत; मात्र स्वतःसाठी पैसे उभे करीत आहेत. ही बाब राज्यासाठी निंदनीय आहे. त्यामुळे आपण राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची पुन्हा मागणी करणार आहोत.''    संपादन -राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3d5VQ5r

No comments:

Post a Comment