आंबा, काजूवरील अवलंबत्व बदलणारा प्रयोग  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - आंबा, काजू या मोजक्‍या पिकांवर अवलंबून न राहता कोकणातील स्थानिक आणि दुर्लक्षित वनस्पती लागवडीतून अर्थकारणाला बळ मिळु शकते. त्यामुळे या वनस्पतीची कलमे तयार करून त्या त्या भागातच त्यांची लागवड करण्याचा फळ संशोधन आणि लुपिनचा उपक्रम भविष्यात कोकणातील दुसऱ्या हरितक्रांती नांदी ठरेल, असे मत आज मान्यवरांनी येथे व्यक्त केले.  लुपिन फाऊंडेशन आणि प्रादेशिक फळसंशोधन केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक जांभुळ, स्थानिक पपई, सुरंगी, वावडिंग, त्रिफळ आणि कडीकोकम या दुर्लक्षित वनौषधीची कलमे तयार करून त्याचे संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला विविध संस्था सहकार्य करीत आहे. सध्या स्थानिक पपई, सुरंगी आणि जांभुळ तीन प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्या अनुषंगाने डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या उपस्थितीत या विषयावर गटचर्चेचे आयोजन फळसंशोधन केंद्राच्या हापुस सभागृहात करण्यात आले होते.  यावेळी फळसंशोधन केंद्राचे डॉ. पराग हळदणकर, डॉ. बी. एन. सावंत, लुपिनचे योगेश प्रभु, डॉ. विजय देसाई, डॉ. एम. एस. गव्हाणकर, डॉ. मोहन दळवी, डॉ. मंगल कदम आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील दुर्लक्षित वनौषधी वनस्पतीचे संर्वधन आणि तयार केलेल्या कलमांचे त्या त्या भागात लागवड केल्यास अनेक शेतकऱ्यांचा आर्थीक विकास होईल, अशी संकल्पना लुपिनच्या माध्यामातून मांडण्यात आली. या संकल्पनेच्या अनुषंगाने लुपिन आणि फळसंशोधन केंद्रांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. संर्वधन आणि संशोधनासाठी निवड केलेल्या दुर्लक्षित वनस्पतीवर गेली दोन- तीन वर्षे फळसंशोधन केंद्राचे संशोधक अहोरात्र काम करीत आहेत. या वनस्पतीची कलमे बनविण्याचे साहित्य जगात कुठेही उपलब्ध नसल्यामुळे एक मोठे आव्हान आमच्यासमोर होते. एक एक टप्पा पार करीत हा प्रवास सुरू आहे; परंतु प्रचंड चिकाटीने या विषयावर संशोधन सुरू असुन त्यात यश येत असुन अनेक शेतकऱ्यांना लागवडीसाठी तयार केलेली कलम रोपे दिल्याचे मत डॉ. हळदणकर यांनी व्यक्त केले.    बाजारपेठ मिळविणे सोपे  कोणत्या फळा, फुलात कोणते घटक आहेत. याचा शोध या प्रकल्पाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. एकाच भागात लागवड असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळविणे सोपे होणार आहे. एवढेच नव्हे तर त्या त्या भागात प्रकिया उद्योग उभे राहू शकतील, अशी मते देखील मान्यवरांनी व्यक्त केली.  प्रत्येकाने आपल्या दारात जरी काही झाडे लावली तरी त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला या झाडांपासुन आर्थीक हातभार लागेल. ही शाश्‍वत विकासाची सुरूवात आहे. या प्रकियेत सर्वांनी सहभागी व्हावे. हा प्रकल्प कोकणातील दुसऱ्या हरितक्रांतीची सुरूवात ठरू शकेल.  - योगेश प्रभू, लुपिन  ज्या भागात जी वनस्पती आहे त्याच भागात त्या वनस्पतीचे कलम लागवड करण्यात येईल, ही संकल्पना योग्य आहे. ज्या वातावरणात जे पीक येते तिथे त्याची लागवड केली तर फायद्याचे ठरते. टप्प्याटप्प्याने हा उपक्रम अतिशय नियोजनबद्ध राबविण्यात येईल.  - डॉ. संजय सावंत, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ, दापोली  पपई लागवड  * 18 हजार कलम रोप निर्मितीचे उद्दिष्ट  * 23 एकर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे धोरण  * 1 कोटी 80 लाखांची उलाढाल अपेक्षित  निश्‍चित गावे -  * वेंगुर्ले ः तुळस, होडावडे, वजराठ, मातोंड  * सावंतवाडी ः सांगेली, कारीवडे, माडखोल, तळवडे.  *दोडामार्ग ः आडाळी, सासोली, मणेरी, मोरगाव.  सुरंगी सागवड  *आतापर्यंत 3 हजार रोपे पुरविण्यात आली  * पुढील वर्षात आणखी दहा हजार रोपांचे उद्दीष्ट  * प्रति 1 झाड दोन किलो उत्पादन  * 52 लाखांची उलाढाल अपेक्षित  निश्‍चित गावे  आसोली, टाक, सोन्सुरे, कोलगाव, नेमळे  जांभुळ लागवड  - 15 हजार लागवडीचे उद्दीष्ट  निश्‍चित गावे  - आंब्रड, कुंदे, पोखरण, कडावल, निरूखे, सावंतवाडी, कोलगाव, कालेली, माणगाव  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

आंबा, काजूवरील अवलंबत्व बदलणारा प्रयोग  वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - आंबा, काजू या मोजक्‍या पिकांवर अवलंबून न राहता कोकणातील स्थानिक आणि दुर्लक्षित वनस्पती लागवडीतून अर्थकारणाला बळ मिळु शकते. त्यामुळे या वनस्पतीची कलमे तयार करून त्या त्या भागातच त्यांची लागवड करण्याचा फळ संशोधन आणि लुपिनचा उपक्रम भविष्यात कोकणातील दुसऱ्या हरितक्रांती नांदी ठरेल, असे मत आज मान्यवरांनी येथे व्यक्त केले.  लुपिन फाऊंडेशन आणि प्रादेशिक फळसंशोधन केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक जांभुळ, स्थानिक पपई, सुरंगी, वावडिंग, त्रिफळ आणि कडीकोकम या दुर्लक्षित वनौषधीची कलमे तयार करून त्याचे संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला विविध संस्था सहकार्य करीत आहे. सध्या स्थानिक पपई, सुरंगी आणि जांभुळ तीन प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्या अनुषंगाने डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या उपस्थितीत या विषयावर गटचर्चेचे आयोजन फळसंशोधन केंद्राच्या हापुस सभागृहात करण्यात आले होते.  यावेळी फळसंशोधन केंद्राचे डॉ. पराग हळदणकर, डॉ. बी. एन. सावंत, लुपिनचे योगेश प्रभु, डॉ. विजय देसाई, डॉ. एम. एस. गव्हाणकर, डॉ. मोहन दळवी, डॉ. मंगल कदम आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील दुर्लक्षित वनौषधी वनस्पतीचे संर्वधन आणि तयार केलेल्या कलमांचे त्या त्या भागात लागवड केल्यास अनेक शेतकऱ्यांचा आर्थीक विकास होईल, अशी संकल्पना लुपिनच्या माध्यामातून मांडण्यात आली. या संकल्पनेच्या अनुषंगाने लुपिन आणि फळसंशोधन केंद्रांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. संर्वधन आणि संशोधनासाठी निवड केलेल्या दुर्लक्षित वनस्पतीवर गेली दोन- तीन वर्षे फळसंशोधन केंद्राचे संशोधक अहोरात्र काम करीत आहेत. या वनस्पतीची कलमे बनविण्याचे साहित्य जगात कुठेही उपलब्ध नसल्यामुळे एक मोठे आव्हान आमच्यासमोर होते. एक एक टप्पा पार करीत हा प्रवास सुरू आहे; परंतु प्रचंड चिकाटीने या विषयावर संशोधन सुरू असुन त्यात यश येत असुन अनेक शेतकऱ्यांना लागवडीसाठी तयार केलेली कलम रोपे दिल्याचे मत डॉ. हळदणकर यांनी व्यक्त केले.    बाजारपेठ मिळविणे सोपे  कोणत्या फळा, फुलात कोणते घटक आहेत. याचा शोध या प्रकल्पाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. एकाच भागात लागवड असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळविणे सोपे होणार आहे. एवढेच नव्हे तर त्या त्या भागात प्रकिया उद्योग उभे राहू शकतील, अशी मते देखील मान्यवरांनी व्यक्त केली.  प्रत्येकाने आपल्या दारात जरी काही झाडे लावली तरी त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला या झाडांपासुन आर्थीक हातभार लागेल. ही शाश्‍वत विकासाची सुरूवात आहे. या प्रकियेत सर्वांनी सहभागी व्हावे. हा प्रकल्प कोकणातील दुसऱ्या हरितक्रांतीची सुरूवात ठरू शकेल.  - योगेश प्रभू, लुपिन  ज्या भागात जी वनस्पती आहे त्याच भागात त्या वनस्पतीचे कलम लागवड करण्यात येईल, ही संकल्पना योग्य आहे. ज्या वातावरणात जे पीक येते तिथे त्याची लागवड केली तर फायद्याचे ठरते. टप्प्याटप्प्याने हा उपक्रम अतिशय नियोजनबद्ध राबविण्यात येईल.  - डॉ. संजय सावंत, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ, दापोली  पपई लागवड  * 18 हजार कलम रोप निर्मितीचे उद्दिष्ट  * 23 एकर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे धोरण  * 1 कोटी 80 लाखांची उलाढाल अपेक्षित  निश्‍चित गावे -  * वेंगुर्ले ः तुळस, होडावडे, वजराठ, मातोंड  * सावंतवाडी ः सांगेली, कारीवडे, माडखोल, तळवडे.  *दोडामार्ग ः आडाळी, सासोली, मणेरी, मोरगाव.  सुरंगी सागवड  *आतापर्यंत 3 हजार रोपे पुरविण्यात आली  * पुढील वर्षात आणखी दहा हजार रोपांचे उद्दीष्ट  * प्रति 1 झाड दोन किलो उत्पादन  * 52 लाखांची उलाढाल अपेक्षित  निश्‍चित गावे  आसोली, टाक, सोन्सुरे, कोलगाव, नेमळे  जांभुळ लागवड  - 15 हजार लागवडीचे उद्दीष्ट  निश्‍चित गावे  - आंब्रड, कुंदे, पोखरण, कडावल, निरूखे, सावंतवाडी, कोलगाव, कालेली, माणगाव  Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3c6lebK

No comments:

Post a Comment