देवबागमध्ये आगीत घर भस्मसात  मालवण (सिंधुदुर्ग) - देवबाग डिंगेवाडी येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. यात घरातील सर्व साहित्य, तसेच मासेमारीचे साहित्य जळाल्याने सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत एका सिलिंडरचाही स्फोट झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली.  याबाबतची माहिती अशी- देवबाग डिंगेवाडी येथील विद्युत खांबावर शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी झुजे फर्नांडिस यांच्या घराच्या बाजूला असलेल्या झोपडीवर पडली. यात झोपडीने पेट घेतला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग भडकली आणि फर्नांडिस यांच्या घराला लागली. यावेळी घरात झुजे फर्नांडिस यांच्यासह पत्नी गिलेरीन, मुलगा संतान, चुलत भावाची पत्नी व तिची लहान मुलगी होती. आग लागल्याचे दिसताच हे सर्वजण घराबाहेर पडले. यावेळी लगतच्या नीलेश सामंत यांनी घरावरील धुराचा लोळ पाहून सहकार्यासाठी आरडाओरड केली. घरातील मंडळींना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यावेळी वाळू आणि पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.  सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग भडकली आणि फर्नांडिस यांचे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य, मासेमारीच्या जाळ्या, रोख रक्कम, दागिने, कागदपत्रे जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण बनले होते. मालवण पालिकेचा अग्निशमन बंब उपलब्ध नसल्याने कुडाळ येथून अग्निशमन बंबास पाचारण केले, मात्र आगीच्या भडक्‍यात सर्व जळून खाक झाले.  आग लागल्याची माहिती मिळताच सरपंच जान्हवी खोबरेकर, तमास फर्नांडिस, फिलसू फर्नांडिस, नादार तुळसकर, रमेश कद्रेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर, नागेश चोपडेकर, निहिता गावकर, लोविड फर्नांडिस, समीक्षा खोबरेकर, पोलिस पाटील भानुदास येरागी यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.  शॉर्टसर्किटने झोपडीस आग लागल्यानंतर ही आग झुजे फर्नांडिस यांच्या घरास लागली. यात घरातील एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराच्या भिंतींना तडे गेले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या आगीत फर्नांडिस कुटुंबीयांचे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत सर्व साहित्य जळाल्याने फर्नांडिस कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान कुडाळ येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.  कुटुंबीयांना आर्थिक मदत  फर्नांडिस कुटुंबीयांचा सुकी मासळी विक्रीचा व्यवसाय आहे. आगीत त्यांची सुकी मासळी, अन्य साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीची मदत म्हणून 15 हजार रुपये, तर शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. घटनास्थळी पोलिस, पोलिसपाटील, तलाठी, महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.. संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, March 21, 2021

देवबागमध्ये आगीत घर भस्मसात  मालवण (सिंधुदुर्ग) - देवबाग डिंगेवाडी येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले. यात घरातील सर्व साहित्य, तसेच मासेमारीचे साहित्य जळाल्याने सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत एका सिलिंडरचाही स्फोट झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली.  याबाबतची माहिती अशी- देवबाग डिंगेवाडी येथील विद्युत खांबावर शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी झुजे फर्नांडिस यांच्या घराच्या बाजूला असलेल्या झोपडीवर पडली. यात झोपडीने पेट घेतला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग भडकली आणि फर्नांडिस यांच्या घराला लागली. यावेळी घरात झुजे फर्नांडिस यांच्यासह पत्नी गिलेरीन, मुलगा संतान, चुलत भावाची पत्नी व तिची लहान मुलगी होती. आग लागल्याचे दिसताच हे सर्वजण घराबाहेर पडले. यावेळी लगतच्या नीलेश सामंत यांनी घरावरील धुराचा लोळ पाहून सहकार्यासाठी आरडाओरड केली. घरातील मंडळींना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यावेळी वाळू आणि पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.  सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आग भडकली आणि फर्नांडिस यांचे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य, मासेमारीच्या जाळ्या, रोख रक्कम, दागिने, कागदपत्रे जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण बनले होते. मालवण पालिकेचा अग्निशमन बंब उपलब्ध नसल्याने कुडाळ येथून अग्निशमन बंबास पाचारण केले, मात्र आगीच्या भडक्‍यात सर्व जळून खाक झाले.  आग लागल्याची माहिती मिळताच सरपंच जान्हवी खोबरेकर, तमास फर्नांडिस, फिलसू फर्नांडिस, नादार तुळसकर, रमेश कद्रेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर, नागेश चोपडेकर, निहिता गावकर, लोविड फर्नांडिस, समीक्षा खोबरेकर, पोलिस पाटील भानुदास येरागी यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.  शॉर्टसर्किटने झोपडीस आग लागल्यानंतर ही आग झुजे फर्नांडिस यांच्या घरास लागली. यात घरातील एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराच्या भिंतींना तडे गेले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या आगीत फर्नांडिस कुटुंबीयांचे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत सर्व साहित्य जळाल्याने फर्नांडिस कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान कुडाळ येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.  कुटुंबीयांना आर्थिक मदत  फर्नांडिस कुटुंबीयांचा सुकी मासळी विक्रीचा व्यवसाय आहे. आगीत त्यांची सुकी मासळी, अन्य साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीची मदत म्हणून 15 हजार रुपये, तर शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. घटनास्थळी पोलिस, पोलिसपाटील, तलाठी, महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.. संपादन - राहुल पाटील   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/311HoWt

No comments:

Post a Comment