संधी करिअरच्या... : दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका तांत्रिक शिक्षणात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे अभियांत्रिकी पदविका. आज महाराष्ट्रातील जवळपास चारशे संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवला जातो, ज्यामध्ये एक लाखाहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल यांसारख्या पारंपरिक शाखा आहेतच, पण काही तंत्रनिकेतनमध्ये लेदर टेक्नॉलॉजी, प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, मेटॅलर्जी, मायनिंग अशा हटके शाखाही उपलब्ध आहेत. कोणत्या तंत्रनिकेतनमध्ये किती व कोणत्या शाखांमध्ये जागा आहेत येथपासून प्रवेशप्रक्रियेपर्यंतची सर्व अद्ययावत माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असते. दहावीच्या निकालानंतर या अभियांत्रिकी पदविकांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू होते. यासंबंधीची जाहिरात वर्तमानपत्रांत. तसेच डीटीईच्या संकेतस्थळावर प्रकाशित होते. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अभियांत्रिकी डिप्लोमानंतर (पदविका) अभियांत्रिकी डिग्रीचा पर्याय जसा उपलब्ध होतो. तसाच बीबीए , बीसीएसारख्या कोर्सेसना प्रवेश मिळू शकतो. अभियांत्रिकी डिप्लोमानंतर अभियांत्रिकी डिग्री प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे, ती म्हणजे डिग्री अभियांत्रिकी प्रवेशासाठी चांगल्या महाविद्यालयात (म्हणजे ज्या महाविद्यालयांमध्ये भरपूर कंपन्या कॅंपस प्लेसमेंटसाठी येतात ) प्रवेश मिळवण्यासाठी डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात किमान ८५ टक्क्यांवर गुण मिळवणे अत्यावश्यक आहे. कारण बारावीनंतर डिग्री अभियांत्रिकी प्रवेशासाठी जितक्या जागा उपलब्ध आहेत, त्याच्या फक्त १० टक्के  जागा डिप्लोमा अभियांत्रिकीमधून डिग्री अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवताना उपलब्ध असतात. संधी करिअरच्या... : झेपणारी शाखा निवडा... दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी/बारावी इंग्रजी माध्यमातून शिकणे अवघड जाते आणि ते अकरावी/बारावीचा अभ्यास इंग्रजी माध्यमातून करताना दडपणाखाली येतात. त्यांना डिप्लोमा अभियांत्रिकी तीन वर्षांचा कोर्स असल्याने इंग्रजी माध्यमाशी जुळवून घेणे सोपे जाते. ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमानंतर नोकरी मिळवण्यात रस आहे त्यांनाही दहावीनंतर डिप्लोमाला प्रवेश घेणे फायदेशीर ठरते. अभियांत्रिकी डिप्लोमानंतर खासगी आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी आहेतच, शिवाय संरक्षण दले, रेल्वे, आरटीओ, ‘भेल’, बीएसएनएल, महावितरण अशा सरकारी/निमसरकारी आस्थापनांमध्येही उपलब्ध होतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 2, 2021

संधी करिअरच्या... : दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका तांत्रिक शिक्षणात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे अभियांत्रिकी पदविका. आज महाराष्ट्रातील जवळपास चारशे संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवला जातो, ज्यामध्ये एक लाखाहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल यांसारख्या पारंपरिक शाखा आहेतच, पण काही तंत्रनिकेतनमध्ये लेदर टेक्नॉलॉजी, प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, मेटॅलर्जी, मायनिंग अशा हटके शाखाही उपलब्ध आहेत. कोणत्या तंत्रनिकेतनमध्ये किती व कोणत्या शाखांमध्ये जागा आहेत येथपासून प्रवेशप्रक्रियेपर्यंतची सर्व अद्ययावत माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असते. दहावीच्या निकालानंतर या अभियांत्रिकी पदविकांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू होते. यासंबंधीची जाहिरात वर्तमानपत्रांत. तसेच डीटीईच्या संकेतस्थळावर प्रकाशित होते. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अभियांत्रिकी डिप्लोमानंतर (पदविका) अभियांत्रिकी डिग्रीचा पर्याय जसा उपलब्ध होतो. तसाच बीबीए , बीसीएसारख्या कोर्सेसना प्रवेश मिळू शकतो. अभियांत्रिकी डिप्लोमानंतर अभियांत्रिकी डिग्री प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे, ती म्हणजे डिग्री अभियांत्रिकी प्रवेशासाठी चांगल्या महाविद्यालयात (म्हणजे ज्या महाविद्यालयांमध्ये भरपूर कंपन्या कॅंपस प्लेसमेंटसाठी येतात ) प्रवेश मिळवण्यासाठी डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात किमान ८५ टक्क्यांवर गुण मिळवणे अत्यावश्यक आहे. कारण बारावीनंतर डिग्री अभियांत्रिकी प्रवेशासाठी जितक्या जागा उपलब्ध आहेत, त्याच्या फक्त १० टक्के  जागा डिप्लोमा अभियांत्रिकीमधून डिग्री अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवताना उपलब्ध असतात. संधी करिअरच्या... : झेपणारी शाखा निवडा... दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी/बारावी इंग्रजी माध्यमातून शिकणे अवघड जाते आणि ते अकरावी/बारावीचा अभ्यास इंग्रजी माध्यमातून करताना दडपणाखाली येतात. त्यांना डिप्लोमा अभियांत्रिकी तीन वर्षांचा कोर्स असल्याने इंग्रजी माध्यमाशी जुळवून घेणे सोपे जाते. ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमानंतर नोकरी मिळवण्यात रस आहे त्यांनाही दहावीनंतर डिप्लोमाला प्रवेश घेणे फायदेशीर ठरते. अभियांत्रिकी डिप्लोमानंतर खासगी आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी आहेतच, शिवाय संरक्षण दले, रेल्वे, आरटीओ, ‘भेल’, बीएसएनएल, महावितरण अशा सरकारी/निमसरकारी आस्थापनांमध्येही उपलब्ध होतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3tiGrpw

No comments:

Post a Comment