हत्तींचा मुक्‍त संचार डोकेदुखीचा  साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - जंगल आणि बागायतीत अनिर्बंधपणे वावरणाऱ्या हत्तींच्या कळपाचा मुक्त वावर आता हमरस्त्यावर देखील सुरू आहे. दोडामार्ग-कोल्हापूर मार्गावरील घाटीवडे येथे रस्ता पार करणाऱ्या तीन हत्तींचा कळप स्थानिक ग्रामस्थांच्या गाडीसमोर आला आणि एकच गोंधळ उडाला. सोमवारी (ता. 1) रात्री 8.40 च्या सुमारास त्यांना तो कळप दिसला. त्यात एक हत्ती आणि दोन पिल्लांचा समावेश होता.  हेवाळे-घाटीवडे येथील सचिन आणि दत्ताराम देसाई सोमवारी रात्री घरी जात असताना साधारणपणे 8.40 च्या सुमारास तीन हत्तींचा एक कळप त्यांच्या गाडीसमोर आला. त्यांनी घाबरून गाडी थांबवली आणि त्याही परिस्थितीत त्या कळपाचे छायाचित्रही टिपले. असे असले तरी हत्तींच्या अनिर्बंध वावरामुळे तिलारी खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे.  स्थानिक शेतकऱ्यांची हत्तींकडून अपरिमित हानी होत आहे. शेतकरी आंदोलन, उपोषण करत आहेत; पण शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक गावकरी आता आमचे प्राण गेल्यावरच शासनाला जाग येणार का? असा सवाल करत आहेत.  दोन मादी हत्तींचा वावर  त्या छायाचित्रात एक हत्ती (मादी असावी) व दोन पिल्ले दिसताहेत. दोन्ही समवयस्क वाटत आहेत. मादी हत्ती एका वेळेला एकाच पिल्लाला जन्म देत असल्याने आणखी एक मादी त्या परिसरात असण्याची शक्‍यता आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 2, 2021

हत्तींचा मुक्‍त संचार डोकेदुखीचा  साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - जंगल आणि बागायतीत अनिर्बंधपणे वावरणाऱ्या हत्तींच्या कळपाचा मुक्त वावर आता हमरस्त्यावर देखील सुरू आहे. दोडामार्ग-कोल्हापूर मार्गावरील घाटीवडे येथे रस्ता पार करणाऱ्या तीन हत्तींचा कळप स्थानिक ग्रामस्थांच्या गाडीसमोर आला आणि एकच गोंधळ उडाला. सोमवारी (ता. 1) रात्री 8.40 च्या सुमारास त्यांना तो कळप दिसला. त्यात एक हत्ती आणि दोन पिल्लांचा समावेश होता.  हेवाळे-घाटीवडे येथील सचिन आणि दत्ताराम देसाई सोमवारी रात्री घरी जात असताना साधारणपणे 8.40 च्या सुमारास तीन हत्तींचा एक कळप त्यांच्या गाडीसमोर आला. त्यांनी घाबरून गाडी थांबवली आणि त्याही परिस्थितीत त्या कळपाचे छायाचित्रही टिपले. असे असले तरी हत्तींच्या अनिर्बंध वावरामुळे तिलारी खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे.  स्थानिक शेतकऱ्यांची हत्तींकडून अपरिमित हानी होत आहे. शेतकरी आंदोलन, उपोषण करत आहेत; पण शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक गावकरी आता आमचे प्राण गेल्यावरच शासनाला जाग येणार का? असा सवाल करत आहेत.  दोन मादी हत्तींचा वावर  त्या छायाचित्रात एक हत्ती (मादी असावी) व दोन पिल्ले दिसताहेत. दोन्ही समवयस्क वाटत आहेत. मादी हत्ती एका वेळेला एकाच पिल्लाला जन्म देत असल्याने आणखी एक मादी त्या परिसरात असण्याची शक्‍यता आहे.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rgtCKr

No comments:

Post a Comment