पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पुणे पोलिसांनी पाठविला महिला आयोगाकडे आजपर्यंतचा तपास अहवाल पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना पत्र पाठविल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेत, या घटनेचा आणि आत्तापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मंगळवारी (ता.१६) महिला आयोगाला पाठविला. याबरोबरच अहवालाची एक प्रत पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनाही पाठविली असल्याची माहिती पोलिस सहआयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली. या अहवालामध्ये काय पाठविण्यात आले आहे, याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.  - IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' पूजा चव्हाण हिने दहा दिवसांपूर्वी वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये महाआघाडीतील एका मंत्र्याचे नाव जोडले गेल्याने त्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकीय आरोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान, काही व्यक्तींनी संबंधीत प्रकरणाबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्‌विटरद्वारे कळवून त्यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी स्वतः लक्ष घालत पुणे पोलिसांना या प्रकरणाचा आत्तापर्यंत काय तपास केला, याबाबतचा चौकशी अहवाल तत्काळ पाठविण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते. - गुंड गजा मारणेसह 9 जणांना कोथरुड पोलिसांकडून अटक; 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल​ याबरोबरच राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनीही पोलिसांना याप्रकरणी तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रेखा शर्मा यांनी या प्रकरणी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांना 13 फेब्रुवारी रोजी पत्र व्यवहार केला होता. त्यांच्या पत्र व्यवहारानंतर आजवर काय तपास करण्यात आला याचा अहवाल महिला आयोगाला मंगळवारी पाठविण्यात आल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले. संबंधित तपास अहवालामध्ये पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत नेमका काय तपास केला आहे, याबाबत मात्र कमालीची गोपनीयता बाळगली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 16, 2021

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पुणे पोलिसांनी पाठविला महिला आयोगाकडे आजपर्यंतचा तपास अहवाल पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना पत्र पाठविल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेत, या घटनेचा आणि आत्तापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मंगळवारी (ता.१६) महिला आयोगाला पाठविला. याबरोबरच अहवालाची एक प्रत पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनाही पाठविली असल्याची माहिती पोलिस सहआयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली. या अहवालामध्ये काय पाठविण्यात आले आहे, याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे.  - IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास' पूजा चव्हाण हिने दहा दिवसांपूर्वी वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये महाआघाडीतील एका मंत्र्याचे नाव जोडले गेल्याने त्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकीय आरोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान, काही व्यक्तींनी संबंधीत प्रकरणाबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्‌विटरद्वारे कळवून त्यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी स्वतः लक्ष घालत पुणे पोलिसांना या प्रकरणाचा आत्तापर्यंत काय तपास केला, याबाबतचा चौकशी अहवाल तत्काळ पाठविण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते. - गुंड गजा मारणेसह 9 जणांना कोथरुड पोलिसांकडून अटक; 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल​ याबरोबरच राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनीही पोलिसांना याप्रकरणी तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. रेखा शर्मा यांनी या प्रकरणी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांना 13 फेब्रुवारी रोजी पत्र व्यवहार केला होता. त्यांच्या पत्र व्यवहारानंतर आजवर काय तपास करण्यात आला याचा अहवाल महिला आयोगाला मंगळवारी पाठविण्यात आल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले. संबंधित तपास अहवालामध्ये पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत नेमका काय तपास केला आहे, याबाबत मात्र कमालीची गोपनीयता बाळगली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ptUGVn

No comments:

Post a Comment