वैभववाडीच्या विकासात राणे अपयशी ः रावराणे वैभववाडी (सिंधुदुर्ग) - नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात आमदार नीतेश राणे पूर्णतः अपयशी ठरले. त्यामुळे भाजपच्या सहा नगरसेवकांनी विकास प्रक्रियेत सामील होण्याच्या उद्देशानेच शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी येथे केला.  भाजपच्या सहा नगरसेवकांनी काल (ता. 9) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे आज वैभववाडीत आगमन झाले. या वेळी शिवसेनेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर शिवसेना संपर्क कार्यालय ते आदिष्टीमंदिर अशी भव्य रॅली काढण्यात आली. या वेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, मंगेश लोके, गीतेश कडू, संदेश पटेल, हर्षद गावडे, राजू राठोड, अंबाजी हुंबे, संभाजी रावराणे, रमेश तावडे, प्रदीप रावराणे, रणजित तावडे, रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संतोष पवार, दीपक गजोबार, दीपा गजोबार, स्वप्निल ईस्वलकर, स्वप्नील धुरी आदी उपस्थित होते.  रावराणे म्हणाले, ""आमदार राणेंच्या नेतृत्वाखाली या नगरपंचायतीचा कारभार सुरू होता; परंतु नगरसेवकांना अपेक्षित विकास आमदार करू शकले नाहीत. शहराच्या विकासाला ते गती देऊ शकले नाही. विकासाऐवजी त्यांनी स्टंट करण्यावरच अधिक लक्ष दिले. त्यामुळे शहरातील पायाभूत विकास बाजूला राहिला. त्यांनी सेल्फी पॉंईट, औषध आपल्या दारी, मोफत वायफाय सेवा या उपक्रमाचा फज्जा कसा उडाला. त्यांनी सुरू केलेला एकही उपक्रम तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू राहिलेला नाही. त्यांच्या याच कार्यपद्धतीला कंटाळून नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारी मागीतलेली नाही तर शहराकरीता नळ-पाणीपुरवठा योजना मागीतली असून त्यासाठी 14 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी देण्याचे मान्य केले आहे. पालकमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार विनायक राऊत पुढील आठ ते दहा दिवसात वैभववाडीत येऊन यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील. प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांना शिवसेना बळ देणार आहे. विकसित शहर बनविण्यासाठी आवश्‍यक सर्व पाठबळ त्यांना दिले जाणार आहे.''  आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमच्यावर टिका करीत आहेत; परंतु मागचा नगराध्यक्ष आम्हीच बसविला होता. ज्यावेळी आमची गरज होती त्यावेळी चांगले होतो, आता गरज नाही त्यावेळी वाईट झालो; परंतु येणारा काळच कोण वाईट आणि कोण चांगले हे ठरविल.  - रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष, वाभवे वैभववाडी नगरपंचायत.    शहराचा विकास हेच ध्येय आहे आणि यापुढेही राहणार आहे. शहराचा विकास होत नसेल तर आपल्याकडे असलेल्या पदांना कोणतीही किंमत राहत नाही. त्यामुळे शहराचा विकास व्हावा याच हेतुने आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे; परंतु शिवसेनेत गेल्यानंतर गेले ते कावळे असे कुणी म्हणत असेल तर भविष्यात कोण कावळे आणि कोण मावळे हे आम्ही दाखवून देऊ.''  - संतोष पवार, नगरसेवक, वाभवे वैभववाडी नगरपंचायत.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 10, 2021

वैभववाडीच्या विकासात राणे अपयशी ः रावराणे वैभववाडी (सिंधुदुर्ग) - नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात आमदार नीतेश राणे पूर्णतः अपयशी ठरले. त्यामुळे भाजपच्या सहा नगरसेवकांनी विकास प्रक्रियेत सामील होण्याच्या उद्देशानेच शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी येथे केला.  भाजपच्या सहा नगरसेवकांनी काल (ता. 9) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे आज वैभववाडीत आगमन झाले. या वेळी शिवसेनेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर शिवसेना संपर्क कार्यालय ते आदिष्टीमंदिर अशी भव्य रॅली काढण्यात आली. या वेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, मंगेश लोके, गीतेश कडू, संदेश पटेल, हर्षद गावडे, राजू राठोड, अंबाजी हुंबे, संभाजी रावराणे, रमेश तावडे, प्रदीप रावराणे, रणजित तावडे, रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संतोष पवार, दीपक गजोबार, दीपा गजोबार, स्वप्निल ईस्वलकर, स्वप्नील धुरी आदी उपस्थित होते.  रावराणे म्हणाले, ""आमदार राणेंच्या नेतृत्वाखाली या नगरपंचायतीचा कारभार सुरू होता; परंतु नगरसेवकांना अपेक्षित विकास आमदार करू शकले नाहीत. शहराच्या विकासाला ते गती देऊ शकले नाही. विकासाऐवजी त्यांनी स्टंट करण्यावरच अधिक लक्ष दिले. त्यामुळे शहरातील पायाभूत विकास बाजूला राहिला. त्यांनी सेल्फी पॉंईट, औषध आपल्या दारी, मोफत वायफाय सेवा या उपक्रमाचा फज्जा कसा उडाला. त्यांनी सुरू केलेला एकही उपक्रम तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू राहिलेला नाही. त्यांच्या याच कार्यपद्धतीला कंटाळून नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी उमेदवारी मागीतलेली नाही तर शहराकरीता नळ-पाणीपुरवठा योजना मागीतली असून त्यासाठी 14 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी देण्याचे मान्य केले आहे. पालकमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार विनायक राऊत पुढील आठ ते दहा दिवसात वैभववाडीत येऊन यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील. प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांना शिवसेना बळ देणार आहे. विकसित शहर बनविण्यासाठी आवश्‍यक सर्व पाठबळ त्यांना दिले जाणार आहे.''  आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमच्यावर टिका करीत आहेत; परंतु मागचा नगराध्यक्ष आम्हीच बसविला होता. ज्यावेळी आमची गरज होती त्यावेळी चांगले होतो, आता गरज नाही त्यावेळी वाईट झालो; परंतु येणारा काळच कोण वाईट आणि कोण चांगले हे ठरविल.  - रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष, वाभवे वैभववाडी नगरपंचायत.    शहराचा विकास हेच ध्येय आहे आणि यापुढेही राहणार आहे. शहराचा विकास होत नसेल तर आपल्याकडे असलेल्या पदांना कोणतीही किंमत राहत नाही. त्यामुळे शहराचा विकास व्हावा याच हेतुने आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे; परंतु शिवसेनेत गेल्यानंतर गेले ते कावळे असे कुणी म्हणत असेल तर भविष्यात कोण कावळे आणि कोण मावळे हे आम्ही दाखवून देऊ.''  - संतोष पवार, नगरसेवक, वाभवे वैभववाडी नगरपंचायत.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2OgqcsX

No comments:

Post a Comment