साम्यवादी पोपट आणि सरकारवादी देशप्रेमी भारत आणि चीनमध्ये इंटरनेट एकाच वर्षी सुरू झालं. दोन्ही देशांमध्ये इंटरनेट समान वेगानं विस्तारलं. अवघ्या दोन दशकांमध्ये इंटरनेट आणि त्यावर आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म दोन्ही देशांच्या समाजकारण, अर्थकारण, शिक्षण आणि रोजच्या व्यवहारांचा कणा बनलं.  चीन साम्यवादी विचारसरणीचा देश आहे. तिथं लोकांनी कसा विचार करायचा, हे ठरवलं जातं. भारत लोकशाही देश आहे. इथं विचार करायला शिकवलं जातं. इंटरनेटचा प्रभाव वाढत गेला, तसा चिनी राज्यकर्त्यांना लोकांच्या विचारांवर अधिकाधिक निर्बंधांची गरज भासू लागली. ती गरज १९९८च्या लिन हे नावाच्या कार्यकर्त्याला तुरूंगात पाठवल्यापासून सुरू झाली. लिन हे यांनी चीनमधील तीस हजार ई-मेल अॅड्रेस अमेरिकेतील लोकशाहीवादी नियतकालिकाला पाठवले होते. साम्यवादी चीनच्या दृष्टीने हा देशद्रोह होता. त्यानंतरच्या दोन वर्षांत फँग बिनशिंग नावाच्या तंत्रज्ञाने आणलेली ‘ग्रेट फायरवॉल’ चिनी इंटरनेटमध्ये उभी राहू लागली. गूगल, फेसबूक, ट्विटर अशा वेबसाइट या फायरवॉलमुळं चिनी नागरीकांपासून दूर ठेवता आल्या. त्याला पर्यायी ‘देशी’ वेबसाइट चिनी तंत्रज्ञांनी बनविल्या. अन्य वेबसाइट उपलब्धच नसल्यानं गुगल, फेसबुक, ट्विटरसारख्यच; पण ‘चिनी’ वेबसाइट हे चीनचं इंटरनेट बनलं. या चिनी वेबसाइट प्रत्येक वापरकर्त्याच्या डिजिटल पाऊलखुणा सरकार दरबारी सादर करण्याचा प्रशस्त मार्ग बनला. आजचे चिनी इंटरनेट सरकारी हत्यार आहे. तिथला सोशल मीडिया हा सरकारी धोरणांनुसार व्यक्त होण्याचं माध्यम आहे. गेली दोन दशके लोकांनी कसा विचार करावा, हे कुणीतरी ठरवून ते लादलं गेलं.  हेही वाचा : फुकट खोली;अदृश्य भाडं ! आपण भले कितीही टिका-टिप्पणी करत असू, तरीही भारतातले सारेच इंटरनेट आणि साराच सोशल मीडिया सरकारी बाहुले नाही. तिथं विरोध व्यक्त करण्याची जागा जरूर उपलब्ध आहे. जागेवर आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांवर मात करण्याची क्षमताही भारतीय वापरकर्त्यांकडं आहे. मात्र, रिहाना, ग्रेटा थनबर्ग आणि मीना हॅरिस यांनी भारतातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल ट्विट केल्यानंतर आपल्या सेलेब्रिटींनी दिलेली प्रतिक्रिया सरकारी छापाची होती आणि ही धोक्याची घंटा आहे. मोकळ्या इंटरनेटकडून, सर्व विचारधारांच्या सोशल मीडियाकडून आपण सरकारी मीडियाकडं प्रवास स्वतःहूनच करतो आहोत का, हा प्रश्न वापरकर्ता म्हणून स्वतःलाच विचारायला हवा. चिनी उद्योगांनी, कलाकारांनी त्यांच्या देशातल्या सरकारचे गुणगाण गायले, तर ते साम्यवादी पोपट आणि आपल्या देशातल्या उद्योजकांनी-कलाकारांनी केलं, तर ते देशप्रेमी असे होत नसते. साम्यवादी पोपट आणि सरकारवादी देशप्रेमी यांच्यात तत्त्वतः फरक काहीच नसतो, इतका धडा रिहाना-ग्रेटा आणि नंतरच्या प्रतिक्रियांमधून आपण घेतला तरी पुरेसा आहे. टिवटिवाट : ‘बर्नी’ आजोबा ! Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 10, 2021

साम्यवादी पोपट आणि सरकारवादी देशप्रेमी भारत आणि चीनमध्ये इंटरनेट एकाच वर्षी सुरू झालं. दोन्ही देशांमध्ये इंटरनेट समान वेगानं विस्तारलं. अवघ्या दोन दशकांमध्ये इंटरनेट आणि त्यावर आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म दोन्ही देशांच्या समाजकारण, अर्थकारण, शिक्षण आणि रोजच्या व्यवहारांचा कणा बनलं.  चीन साम्यवादी विचारसरणीचा देश आहे. तिथं लोकांनी कसा विचार करायचा, हे ठरवलं जातं. भारत लोकशाही देश आहे. इथं विचार करायला शिकवलं जातं. इंटरनेटचा प्रभाव वाढत गेला, तसा चिनी राज्यकर्त्यांना लोकांच्या विचारांवर अधिकाधिक निर्बंधांची गरज भासू लागली. ती गरज १९९८च्या लिन हे नावाच्या कार्यकर्त्याला तुरूंगात पाठवल्यापासून सुरू झाली. लिन हे यांनी चीनमधील तीस हजार ई-मेल अॅड्रेस अमेरिकेतील लोकशाहीवादी नियतकालिकाला पाठवले होते. साम्यवादी चीनच्या दृष्टीने हा देशद्रोह होता. त्यानंतरच्या दोन वर्षांत फँग बिनशिंग नावाच्या तंत्रज्ञाने आणलेली ‘ग्रेट फायरवॉल’ चिनी इंटरनेटमध्ये उभी राहू लागली. गूगल, फेसबूक, ट्विटर अशा वेबसाइट या फायरवॉलमुळं चिनी नागरीकांपासून दूर ठेवता आल्या. त्याला पर्यायी ‘देशी’ वेबसाइट चिनी तंत्रज्ञांनी बनविल्या. अन्य वेबसाइट उपलब्धच नसल्यानं गुगल, फेसबुक, ट्विटरसारख्यच; पण ‘चिनी’ वेबसाइट हे चीनचं इंटरनेट बनलं. या चिनी वेबसाइट प्रत्येक वापरकर्त्याच्या डिजिटल पाऊलखुणा सरकार दरबारी सादर करण्याचा प्रशस्त मार्ग बनला. आजचे चिनी इंटरनेट सरकारी हत्यार आहे. तिथला सोशल मीडिया हा सरकारी धोरणांनुसार व्यक्त होण्याचं माध्यम आहे. गेली दोन दशके लोकांनी कसा विचार करावा, हे कुणीतरी ठरवून ते लादलं गेलं.  हेही वाचा : फुकट खोली;अदृश्य भाडं ! आपण भले कितीही टिका-टिप्पणी करत असू, तरीही भारतातले सारेच इंटरनेट आणि साराच सोशल मीडिया सरकारी बाहुले नाही. तिथं विरोध व्यक्त करण्याची जागा जरूर उपलब्ध आहे. जागेवर आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांवर मात करण्याची क्षमताही भारतीय वापरकर्त्यांकडं आहे. मात्र, रिहाना, ग्रेटा थनबर्ग आणि मीना हॅरिस यांनी भारतातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल ट्विट केल्यानंतर आपल्या सेलेब्रिटींनी दिलेली प्रतिक्रिया सरकारी छापाची होती आणि ही धोक्याची घंटा आहे. मोकळ्या इंटरनेटकडून, सर्व विचारधारांच्या सोशल मीडियाकडून आपण सरकारी मीडियाकडं प्रवास स्वतःहूनच करतो आहोत का, हा प्रश्न वापरकर्ता म्हणून स्वतःलाच विचारायला हवा. चिनी उद्योगांनी, कलाकारांनी त्यांच्या देशातल्या सरकारचे गुणगाण गायले, तर ते साम्यवादी पोपट आणि आपल्या देशातल्या उद्योजकांनी-कलाकारांनी केलं, तर ते देशप्रेमी असे होत नसते. साम्यवादी पोपट आणि सरकारवादी देशप्रेमी यांच्यात तत्त्वतः फरक काहीच नसतो, इतका धडा रिहाना-ग्रेटा आणि नंतरच्या प्रतिक्रियांमधून आपण घेतला तरी पुरेसा आहे. टिवटिवाट : ‘बर्नी’ आजोबा ! Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3paaf4c

No comments:

Post a Comment