वेल्डिंगच्या ठिणगीने बागायतीला आग बांदा (सिंधुदुर्ग) - मडुरा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या पॅनेल वेल्डिंगच्या आगीची ठिणगी लगतच असलेल्या आंबा, काजू बागायतीत पडल्याने मडुरा-काजरमळी भागातील सुमारे दहा एकरातील काजू, आंबा, सागवान, आईन, किनळ, जांभूळ, आकाशी आदी झाडे जळून शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली; परंतु दुपारची वेळ असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.  मडुरा साईबाबा मंदिरा जवळून गेलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर पॅलेट वेल्डींगचे काम सुरू आहे. ऐन हंगामात लागलेल्या आगीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कोकण रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हिरावून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी मडुरा पोलिस पाटील नितीन नाईक यांच्यासमोरच कोरेचे प्रमोद माजगावकर यांना केला. याच ठिकाणी गेली सहा ते सात वर्षे आग लागत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.  आगीच्या पडलेल्या ठिणगीमुळे रेल्वे मार्गाला लागूनच असलेल्या आंबा व काजू बागायती जळून खाक झाल्यात. यामध्ये शेतकरी जगन्नाथ परब, ज्ञानेश परब, नीलेश महाले आदी शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काजू कलमे 50, आंबा 10 तसेच सागवान, जांभूळ, अकेशी, आईन अशी झाडे जळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मडुरा पोलिस पाटील नितीन नाईक यांनी कोकण रेल्वेचे अधिकारी प्रमोद माजगावकर यांना बोलावले असता ते उशिराने घटनास्थळी दाखल झाल्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर रेल्वे अधिकारी देऊ शकले नाहीत.  शेतकरी आले पटरीवर  झालेले नुकसान पाहून ज्या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू त्याठिकाणी शेतकऱ्यांनी जात अधिकाऱ्यांना जाब विचारला. थेट पटरीवर आलेले शेतकरी पाहून अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, February 8, 2021

वेल्डिंगच्या ठिणगीने बागायतीला आग बांदा (सिंधुदुर्ग) - मडुरा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या पॅनेल वेल्डिंगच्या आगीची ठिणगी लगतच असलेल्या आंबा, काजू बागायतीत पडल्याने मडुरा-काजरमळी भागातील सुमारे दहा एकरातील काजू, आंबा, सागवान, आईन, किनळ, जांभूळ, आकाशी आदी झाडे जळून शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली; परंतु दुपारची वेळ असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.  मडुरा साईबाबा मंदिरा जवळून गेलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर पॅलेट वेल्डींगचे काम सुरू आहे. ऐन हंगामात लागलेल्या आगीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कोकण रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हिरावून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी मडुरा पोलिस पाटील नितीन नाईक यांच्यासमोरच कोरेचे प्रमोद माजगावकर यांना केला. याच ठिकाणी गेली सहा ते सात वर्षे आग लागत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.  आगीच्या पडलेल्या ठिणगीमुळे रेल्वे मार्गाला लागूनच असलेल्या आंबा व काजू बागायती जळून खाक झाल्यात. यामध्ये शेतकरी जगन्नाथ परब, ज्ञानेश परब, नीलेश महाले आदी शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काजू कलमे 50, आंबा 10 तसेच सागवान, जांभूळ, अकेशी, आईन अशी झाडे जळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मडुरा पोलिस पाटील नितीन नाईक यांनी कोकण रेल्वेचे अधिकारी प्रमोद माजगावकर यांना बोलावले असता ते उशिराने घटनास्थळी दाखल झाल्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांच्या एकाही प्रश्नाचे समर्पक उत्तर रेल्वे अधिकारी देऊ शकले नाहीत.  शेतकरी आले पटरीवर  झालेले नुकसान पाहून ज्या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू त्याठिकाणी शेतकऱ्यांनी जात अधिकाऱ्यांना जाब विचारला. थेट पटरीवर आलेले शेतकरी पाहून अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3cUGDFC

No comments:

Post a Comment