पंढरपूर तालुक्‍यात महा आवास योजनेतील घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात ! मार्चअखेर पूर्ण होतील मंजूर घरकुले पंढरपूर (सोलापूर) : ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना हक्काचे व पक्के घर मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महा आवास योजनेचे काम सुरू आहे. या योजने अंतर्गत गतवर्षी तालुक्‍यात 1 हजार 465 लाभार्थींना घरकुले मंजूर झाली आहेत. या कामासाठी 17 कोटी 58 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मंजूर कामांपैकी 80 टक्के घरांची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. येत्या मार्च अखेर उर्वरित सर्व घरकुलांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.  श्री. घोडके यांनी मंगळवारी (ता. 9) तुंगत (ता. पंढरपूर) येथे सुरू असलेल्या मनी पवार यांच्या घरकुल कामाची पाहणी केली. त्यानंतर तालुक्‍यातील इतर गावांतील घरकुलांच्या कामांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.  ग्रामीण भागातील गरजू व गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी महा आवास योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये पंचायत समितीला 2 हजार 803 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 465 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित 1 हजार 338 कामे जागेअभावी रखडली आहेत.  मंजूर कामांपैकी आतापर्यंत सुमारे 80 टक्के कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या मार्च अखेर तालुक्‍यातील सर्व मंजूर घरकुलांची कामे पूर्ण होतील, असेही श्री. घोडके यांनी सांगितले.  या वेळी घरकुल विभागाचे वरिष्ठ सहाय्यक डी. एम. लवटे, ग्रामसेवक श्री. चेंडगे, मसा रणदिवे आदी उपस्थित होते.  गेली अनेक वर्षे झोपडीत राहात होते. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळाले. पंचायत समितीचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीने मला वेळेवर अनुदानाची रक्कम प्राप्त करून दिल्यामुळे माझे घर पूर्ण झाले आहे. अनेक वर्षांनंतर माझ्या हक्काचे स्वप्र पूर्ण झाले.  - मीना पवार,  लाभार्थी, तुंगत, ता. पंढरपूर  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, February 9, 2021

पंढरपूर तालुक्‍यात महा आवास योजनेतील घरकुलांची कामे अंतिम टप्प्यात ! मार्चअखेर पूर्ण होतील मंजूर घरकुले पंढरपूर (सोलापूर) : ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना हक्काचे व पक्के घर मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महा आवास योजनेचे काम सुरू आहे. या योजने अंतर्गत गतवर्षी तालुक्‍यात 1 हजार 465 लाभार्थींना घरकुले मंजूर झाली आहेत. या कामासाठी 17 कोटी 58 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मंजूर कामांपैकी 80 टक्के घरांची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. येत्या मार्च अखेर उर्वरित सर्व घरकुलांची कामे पूर्ण होतील, अशी माहिती पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.  श्री. घोडके यांनी मंगळवारी (ता. 9) तुंगत (ता. पंढरपूर) येथे सुरू असलेल्या मनी पवार यांच्या घरकुल कामाची पाहणी केली. त्यानंतर तालुक्‍यातील इतर गावांतील घरकुलांच्या कामांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.  ग्रामीण भागातील गरजू व गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी महा आवास योजने अंतर्गत घरकुल बांधकामासाठी प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये पंचायत समितीला 2 हजार 803 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 465 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित 1 हजार 338 कामे जागेअभावी रखडली आहेत.  मंजूर कामांपैकी आतापर्यंत सुमारे 80 टक्के कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या मार्च अखेर तालुक्‍यातील सर्व मंजूर घरकुलांची कामे पूर्ण होतील, असेही श्री. घोडके यांनी सांगितले.  या वेळी घरकुल विभागाचे वरिष्ठ सहाय्यक डी. एम. लवटे, ग्रामसेवक श्री. चेंडगे, मसा रणदिवे आदी उपस्थित होते.  गेली अनेक वर्षे झोपडीत राहात होते. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळाले. पंचायत समितीचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीने मला वेळेवर अनुदानाची रक्कम प्राप्त करून दिल्यामुळे माझे घर पूर्ण झाले आहे. अनेक वर्षांनंतर माझ्या हक्काचे स्वप्र पूर्ण झाले.  - मीना पवार,  लाभार्थी, तुंगत, ता. पंढरपूर  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NdDuWA

No comments:

Post a Comment