हिंस्र प्राण्यांचा करा तातडीने बंदोबस्त ! सभापती पोतदार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वाळूज (सोलापूर) : येथील दहा वर्षांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या हिंस्र वन्यप्राण्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन सभापती रत्नमाला पोतदार यांनी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक वनविभाग, सोलापूर तसेच पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांना निवेदन दिले आहे. वाळूज (ता. मोहोळ) येथील मुलावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वाळूज परिसरातील आठ - दहा गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मंगळवारी (ता. 26) सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान वाळूजच्या उत्तरेला असलेल्या खरात वस्तीवरील अनिकेत अमोल खरात (वय 10) याच्यावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून प्राण्यांच्या पायांचे ठसे घेतले  आहेत. परंतु हा प्राणी कोणता आहे हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. या घटनेमुळे वाळूज, देगाव, मनगोळी, भैरववाडी (ता. मोहोळ) तसेच बुद्रूकवाडी, धानोरे, मानेगाव (ता. माढा), भागाईवाडी, साखरेवाडी, शेरेवाडी (ता. उ. सोलापूर), मुंगशी, तडवळे (ता. बार्शी) या परिसरात घबराटीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.  शेतकरी व त्यांचे कुटुंबीय शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतीची सर्व कामे ठप्प आहेत.  या भागात ऊसतोडणी चालू होती, मात्र या घटनेमुळे ऊसतोड मजुरांच्या शेळ्या असल्याने ते लोक घाबरून टोळ्या घेऊन निघून गेल्याने ऊसतोड बंद पडली आहे. दुग्धोत्पादन घेणारे शेतकरी सायंकाळी व रात्रीच्या वेळी वस्तीवर वास्तव्यास जात नाहीत. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरे, वासरे वैरणीविना व संरक्षणाविना एकाच  जागी बांधून आहेत. पाण्याविना व वैरणीविना त्यांचे हाल होत आहेत. कांदा पीक काढणीच्या अवस्थेत असून कांदा काढणी, कापणी ठप्प झाल्याने काढून टाकलेले कांदे नासत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सध्या ज्वारीचे पीक हुरड्यात तर कुठे भेडे झाले आहे. भीतीमुळे शेतकरी, रोजगारी महिला, पुरुष व सालगडी पिकास पाणी देण्यास जात नाहीत. त्यामुळे या पिकांचे नुकसान होऊन त्यात घट होण्याची शक्‍यता आहे.  हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे वरील गावांच्या शिवारात भीतीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांचा शेतातील वावर कमी झाला आहे. त्याचा फार मोठा आर्थिक फटका या भागातील शेतकऱ्यांना व सामान्य माणसांना बसत आहे. अनिकेत खरात या मुलावर हल्ला करणाऱ्या प्राण्याचा शोध घेऊन तातडीने त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय लोकांच्या मनातील भीती कमी होणार नाही व जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. तरी या प्राण्याचा तातडीने बंदोबस्त करावा व जनतेच्या मनातील भीती दूर करावी. तसेच अनिकेत खरात याच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

हिंस्र प्राण्यांचा करा तातडीने बंदोबस्त ! सभापती पोतदार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वाळूज (सोलापूर) : येथील दहा वर्षांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या हिंस्र वन्यप्राण्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन सभापती रत्नमाला पोतदार यांनी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक वनविभाग, सोलापूर तसेच पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांना निवेदन दिले आहे. वाळूज (ता. मोहोळ) येथील मुलावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे वाळूज परिसरातील आठ - दहा गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मंगळवारी (ता. 26) सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान वाळूजच्या उत्तरेला असलेल्या खरात वस्तीवरील अनिकेत अमोल खरात (वय 10) याच्यावर हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून प्राण्यांच्या पायांचे ठसे घेतले  आहेत. परंतु हा प्राणी कोणता आहे हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही. या घटनेमुळे वाळूज, देगाव, मनगोळी, भैरववाडी (ता. मोहोळ) तसेच बुद्रूकवाडी, धानोरे, मानेगाव (ता. माढा), भागाईवाडी, साखरेवाडी, शेरेवाडी (ता. उ. सोलापूर), मुंगशी, तडवळे (ता. बार्शी) या परिसरात घबराटीचे व भीतीचे वातावरण पसरले आहे.  शेतकरी व त्यांचे कुटुंबीय शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतीची सर्व कामे ठप्प आहेत.  या भागात ऊसतोडणी चालू होती, मात्र या घटनेमुळे ऊसतोड मजुरांच्या शेळ्या असल्याने ते लोक घाबरून टोळ्या घेऊन निघून गेल्याने ऊसतोड बंद पडली आहे. दुग्धोत्पादन घेणारे शेतकरी सायंकाळी व रात्रीच्या वेळी वस्तीवर वास्तव्यास जात नाहीत. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाई, गुरे, वासरे वैरणीविना व संरक्षणाविना एकाच  जागी बांधून आहेत. पाण्याविना व वैरणीविना त्यांचे हाल होत आहेत. कांदा पीक काढणीच्या अवस्थेत असून कांदा काढणी, कापणी ठप्प झाल्याने काढून टाकलेले कांदे नासत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सध्या ज्वारीचे पीक हुरड्यात तर कुठे भेडे झाले आहे. भीतीमुळे शेतकरी, रोजगारी महिला, पुरुष व सालगडी पिकास पाणी देण्यास जात नाहीत. त्यामुळे या पिकांचे नुकसान होऊन त्यात घट होण्याची शक्‍यता आहे.  हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे वरील गावांच्या शिवारात भीतीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांचा शेतातील वावर कमी झाला आहे. त्याचा फार मोठा आर्थिक फटका या भागातील शेतकऱ्यांना व सामान्य माणसांना बसत आहे. अनिकेत खरात या मुलावर हल्ला करणाऱ्या प्राण्याचा शोध घेऊन तातडीने त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय लोकांच्या मनातील भीती कमी होणार नाही व जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. तरी या प्राण्याचा तातडीने बंदोबस्त करावा व जनतेच्या मनातील भीती दूर करावी. तसेच अनिकेत खरात याच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.  संपादन : श्रीनिवास दुध्याल Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/36o0IA5

No comments:

Post a Comment