अवघ्या 20 महिन्यांच्या चिमुकलीने दिलं 5 जणांना नवं आयुष्य नवी दिल्ली - दिल्लीतील एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा घरात पडल्याने मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतरही तिच्यामुळे 5 जणांना नवीन आयुष्य मिळालं. दिल्लीतील रोहिणी भागातील अवघ्या 20 महिन्यांच्या धनिष्ठा नावाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर ती सर्वात कमी वयाची कॅडेवर डोनर बनली आहे. मरणोत्तर पाच रुग्णांना तिने अवयव देऊन नवं आयुष्य दिलं.  धनिष्ठाचे हृदय, लिव्हर, दोन्ही किडण्या आणि दोन्ही कॉर्निया सर गंगाराम रुग्णालयाकडे सोपवण्यात आले. त्यांच्याकडून ते पाच रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आलं. 8 जानेवारीला सायंकाळी धनिष्ठा तिच्या घरी खेळत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्यामुळे धनिष्ठा बेशुद्ध झाल्यानं तिला सर गंगाराम रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी धनिष्ठावर उपचाराचे प्रयत्न केले मात्र तिला वाचवणं शक्य झालं नाही. 11 जानेवारीला धनिष्ठा ब्रेन डेड झाल्याचं घोषित करण्यात आलं. तिच्या मेंदुशिवाय इतर सर्व अवयव काम करत होते.  हे वाचा - अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई चिमुकलीच्या अशा अवस्थेमुळे कुटुंबाला धक्का बसला. मात्र अशाही परिस्थितीत तिच्या आई वडिलांनी अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. मुलीचे वडिल आशीष यांनी सांगितलं की, आम्ही रुग्णालयात असताना अनेक असे रुग्ण पाहिजे ज्यांना अवयवांची गरज होती. आम्ही आमच्या मुलीला गमावलं पण विचार केला की तिचे अवयव दान केल्यानं तिचे फक्त अवयवच जिवंत राहतील असं नाही तर रुग्णांचा जीव वाचवण्यासही मदत होईल. सर गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर डीएस राणा यांनी सांगितलं की, कुटुंबाने केलेलं हे काम कौतुकास्पद आहे आणि इतरांनी यातुन प्रेरणा घ्यायला हवी.   हे वाचा - Army Day: भारतीय मेजरनं बनवलं जगातील पहिलं यूनिवर्सल बुलेटप्रूफ 'शक्ती' जॅकेट भारतात अवयदानाचे प्रमाण मात्र कमी आहे. 0.26 प्रति मिलियन इतक्या दराने भारतात अवयव दान होते. अवयवांच्या कमतरतेमुळे दरवर्षी सरासरी पाच लाख भारतीयांचा मृत्यू होतो. कोरोनामुळे अवयव दानाचे प्रमाण घटले आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

अवघ्या 20 महिन्यांच्या चिमुकलीने दिलं 5 जणांना नवं आयुष्य नवी दिल्ली - दिल्लीतील एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा घरात पडल्याने मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतरही तिच्यामुळे 5 जणांना नवीन आयुष्य मिळालं. दिल्लीतील रोहिणी भागातील अवघ्या 20 महिन्यांच्या धनिष्ठा नावाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर ती सर्वात कमी वयाची कॅडेवर डोनर बनली आहे. मरणोत्तर पाच रुग्णांना तिने अवयव देऊन नवं आयुष्य दिलं.  धनिष्ठाचे हृदय, लिव्हर, दोन्ही किडण्या आणि दोन्ही कॉर्निया सर गंगाराम रुग्णालयाकडे सोपवण्यात आले. त्यांच्याकडून ते पाच रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आलं. 8 जानेवारीला सायंकाळी धनिष्ठा तिच्या घरी खेळत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्यामुळे धनिष्ठा बेशुद्ध झाल्यानं तिला सर गंगाराम रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी धनिष्ठावर उपचाराचे प्रयत्न केले मात्र तिला वाचवणं शक्य झालं नाही. 11 जानेवारीला धनिष्ठा ब्रेन डेड झाल्याचं घोषित करण्यात आलं. तिच्या मेंदुशिवाय इतर सर्व अवयव काम करत होते.  हे वाचा - अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई चिमुकलीच्या अशा अवस्थेमुळे कुटुंबाला धक्का बसला. मात्र अशाही परिस्थितीत तिच्या आई वडिलांनी अवयव दान करण्याची इच्छा व्यक्त केली. मुलीचे वडिल आशीष यांनी सांगितलं की, आम्ही रुग्णालयात असताना अनेक असे रुग्ण पाहिजे ज्यांना अवयवांची गरज होती. आम्ही आमच्या मुलीला गमावलं पण विचार केला की तिचे अवयव दान केल्यानं तिचे फक्त अवयवच जिवंत राहतील असं नाही तर रुग्णांचा जीव वाचवण्यासही मदत होईल. सर गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर डीएस राणा यांनी सांगितलं की, कुटुंबाने केलेलं हे काम कौतुकास्पद आहे आणि इतरांनी यातुन प्रेरणा घ्यायला हवी.   हे वाचा - Army Day: भारतीय मेजरनं बनवलं जगातील पहिलं यूनिवर्सल बुलेटप्रूफ 'शक्ती' जॅकेट भारतात अवयदानाचे प्रमाण मात्र कमी आहे. 0.26 प्रति मिलियन इतक्या दराने भारतात अवयव दान होते. अवयवांच्या कमतरतेमुळे दरवर्षी सरासरी पाच लाख भारतीयांचा मृत्यू होतो. कोरोनामुळे अवयव दानाचे प्रमाण घटले आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/39wvOWZ

No comments:

Post a Comment