अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल खचले, आता दुरुस्तीकडे लक्ष  लेंगरे : अतिवृष्टीमुळे परिसरातील सार्वजनिक मालमत्तेसह शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र, ओढ्यावरील खचलेला रस्ता, उखडलेले रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची परिस्थिती आजही तशीच आहे. शासनाने त्यांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद केली. मात्र, या कामांचे ऑडिट होऊन कामाला प्रत्यक्ष सुरवात कधी होणार, याकडे सामान्य लोकांचे लक्ष लागले आहे.  प्रमुख रस्त्यांची आधीच दयनीय अवस्था बनली होती. त्यात अतिवृष्टीची भर पडल्याने रस्त्यावरून वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. मादळमुठी- लेंगरे, मादळमुठी- देविखिंडी, वेजेगाव- लेंगरे, साळशिंगे- विटा या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले असून, काही ओढ्यावरील पूल खचून खड्डे पडले आहेत. यासाठी शासनाकडून भरीव तरतूद करण्यात आली. परंतु, संबंधित विभागाकडून आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामे सुरू करण्यास बराच कालावधी लागणार आहे.   या सगळ्यात वाहनधारकांचे हाल सुरू आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ लागले. परिसरातील या रस्त्यांवर मोठी वर्दळ असते. मादळमुठी-लेंगरे रस्त्यावरील ओढापात्रावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. अतिवृष्टीमुळे ओढापात्रावरील पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पूल व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 5, 2020

अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल खचले, आता दुरुस्तीकडे लक्ष  लेंगरे : अतिवृष्टीमुळे परिसरातील सार्वजनिक मालमत्तेसह शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र, ओढ्यावरील खचलेला रस्ता, उखडलेले रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची परिस्थिती आजही तशीच आहे. शासनाने त्यांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद केली. मात्र, या कामांचे ऑडिट होऊन कामाला प्रत्यक्ष सुरवात कधी होणार, याकडे सामान्य लोकांचे लक्ष लागले आहे.  प्रमुख रस्त्यांची आधीच दयनीय अवस्था बनली होती. त्यात अतिवृष्टीची भर पडल्याने रस्त्यावरून वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. मादळमुठी- लेंगरे, मादळमुठी- देविखिंडी, वेजेगाव- लेंगरे, साळशिंगे- विटा या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले असून, काही ओढ्यावरील पूल खचून खड्डे पडले आहेत. यासाठी शासनाकडून भरीव तरतूद करण्यात आली. परंतु, संबंधित विभागाकडून आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामे सुरू करण्यास बराच कालावधी लागणार आहे.   या सगळ्यात वाहनधारकांचे हाल सुरू आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ लागले. परिसरातील या रस्त्यांवर मोठी वर्दळ असते. मादळमुठी-लेंगरे रस्त्यावरील ओढापात्रावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. अतिवृष्टीमुळे ओढापात्रावरील पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पूल व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3k3uu0U

No comments:

Post a Comment