तासगाव तालुक्‍यात शेती, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली  तासगाव : तासगाव तालुक्‍यात यावर्षी झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसाने तालुक्‍यातील सर्व तलाव ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे चित्र समाधानकारक आहे. प्रमुख तलावांबरोबर गावोगावचे छोटे गावतलावही भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.  तासगाव तालुक्‍यात पावसाची ओरड कायमची आहे. यावर्षी वरूणराजाची कृपा चांगलीच झाली. यंदाचा तरी पिण्याच्या आणि शेतीपाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. ग्रामीण भागात असेच चित्र आहे. पावसाळ्याच्या झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र पाणी पाणी झाले. द्राक्षशेती आणि खरीप पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. तरी उन्हाळ्यातील पाणी टंचाईची समस्या मात्र पूर्ण मिटली आहे. तालुक्‍यातील सर्वात मोठा सिद्धेवाडी आणि लोढे तलाव तर यावर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून भरून वाहत होते. तालुक्‍यातील सर्व लघु पाटबंधारे तलाव सध्या शंभर टक्के भरून वाहत आहेत. म्हैसाळ योजनेवरील मणेराजुरी येथील कोड्याच्या माळावरील तलाव, गव्हाण, कवठे एकंदसह अनेक गाव तलाव आणि ओढे भरून वाहत आहेत. रब्बीला त्याचा फायदा होणार आहे.  तालुक्‍यातून वाहणाऱ्या येरळा व अग्रणी या नद्यांना यावर्षी दोन वेळा पूर आल्याचे दुर्मिळ चित्र पहायला मिळाले. एकूणच यंदा तरी तालुक्‍यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही हे नक्की.      संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 5, 2020

तासगाव तालुक्‍यात शेती, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली  तासगाव : तासगाव तालुक्‍यात यावर्षी झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसाने तालुक्‍यातील सर्व तलाव ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे चित्र समाधानकारक आहे. प्रमुख तलावांबरोबर गावोगावचे छोटे गावतलावही भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.  तासगाव तालुक्‍यात पावसाची ओरड कायमची आहे. यावर्षी वरूणराजाची कृपा चांगलीच झाली. यंदाचा तरी पिण्याच्या आणि शेतीपाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. ग्रामीण भागात असेच चित्र आहे. पावसाळ्याच्या झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र पाणी पाणी झाले. द्राक्षशेती आणि खरीप पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. तरी उन्हाळ्यातील पाणी टंचाईची समस्या मात्र पूर्ण मिटली आहे. तालुक्‍यातील सर्वात मोठा सिद्धेवाडी आणि लोढे तलाव तर यावर्षी ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून भरून वाहत होते. तालुक्‍यातील सर्व लघु पाटबंधारे तलाव सध्या शंभर टक्के भरून वाहत आहेत. म्हैसाळ योजनेवरील मणेराजुरी येथील कोड्याच्या माळावरील तलाव, गव्हाण, कवठे एकंदसह अनेक गाव तलाव आणि ओढे भरून वाहत आहेत. रब्बीला त्याचा फायदा होणार आहे.  तालुक्‍यातून वाहणाऱ्या येरळा व अग्रणी या नद्यांना यावर्षी दोन वेळा पूर आल्याचे दुर्मिळ चित्र पहायला मिळाले. एकूणच यंदा तरी तालुक्‍यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही हे नक्की.      संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/356L1xf

No comments:

Post a Comment