कर्तव्यकठोर अधिकारी, सहृदय माणूस कॅप्टन मोहनसिंह बायस यांचे नुकतेच वयाच्या ९९व्या वर्षी  निधन झाले. कुटुंबवत्सल आणि कर्तव्यनिष्ठ माणूस म्हणून ते परिचित होते. त्यांच्या नातवाने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कॅप्टन मोहनसिंह बायस यांनी आपल्या सेवेची सुरुवात लष्करी जीवनातून केली. ‘रॉयल आर्मी ऑफ कोल्हापूर’ महाराजांच्या ‘राजाराम रायफल’मध्ये ते लष्करी अधिकारी म्हणून दाखल झाले. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती शहाजी महाराज यांचे ते ‘एडीसी’देखील होते. ब्रिटिश अमलाच्या या काळात कर्तृत्ववान अधिकाऱ्यांना जबाबदारीच्या पदावर नेमले जाई व त्याप्रकारे त्यांची निवडही केली जाई. त्या वेळी अफगाण सीमेवर असलेल्या ‘लॅंडी कोताल’ या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या शांतिसेना काम करीत होत्या, त्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. बंडखोर पख्तून कबिलेवाल्यांना नियंत्रणात ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते. तिथल्या डोंगरात भटकणे आणि चुकार पक्ष्यांची शिकार करणे, हा त्यांचा छंद होता. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कॅप्टन बायस अधिकारी म्हणून जितके कर्तबगार होते, तितकेच माणूस म्हणून हळव्या मनाचे होते. मीरा देव ही त्यांची पत्नी. तिच्या आठवणीने ते इतके व्याकुळ होत की, अखेर लष्करी परवानगी नसतानाही त्यांनी मीरा देव यांना आपल्या लष्करी तळावर बोलवून घेतले होते. त्यांच्या वरिष्ठांशी त्यांचे यामुळे खटकेही उडाले. पण, नंतर जवळच्याच एका घरात संसार थाटून हे दाम्पत्य एकत्र राहू लागले. मीरा आणि मोहन यांची जोडी वयाच्या १८व्या वर्षीच जुळली होती. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वडील नारायणसिंह देव कोल्हापूरचे प्रसिद्ध वकील होते. मोहनसिंहांनी त्यांच्याकडे जाऊन सरळ मीरेशी लग्नाची मागणी घातली आणि हे लग्न जमले. स्वातंत्र्यानंतर देशातील विविध संस्थाने देशात विलीन झाली. कोल्हापूर संस्थानाच्या विलिनीकरणातल्या वाटाघाटींत मोहनसिंह बायस यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. शेवटच्या टप्प्यात जी संस्थाने विलीन झाली, त्यात कोल्हापूर होते. छत्रपतींनी बडोदा संस्थान विलीन होईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला होता. पुढे सरदार पटेल आणि व्ही. पी. मेनन यांना भेटण्यासाठी मोहनसिंह छत्रपती शहाजी राजेंसोबत गेले होते. सरदार पटेलांनी बडोदा महाराजांनी सहा महिन्यांपूर्वीच बडोदा संस्थान विलिनीकरणाच्या अटी मान्य केल्या असल्याचे कागद त्यांना दाखविले. सरदार पटेलांनी अखेर छत्रपतींना विलिनीकरणासाठी राजी केले, ही आठवण आजोबा सांगत. पटेलांबरोबर खासगी बैठक संपवून जेव्हा छत्रपती बाहेर आले, तेव्हा त्यांनी आजोबांना मिठी मारली आणि म्हणाले, ‘आपले कोल्हापूर गेले.’ आजोबा निसर्गाचे चांगले अभ्यासक होते. शिकार हा त्यावेळचा सहज प्रकार होता. एकदा विख्यात शिकारी आणि निसर्ग अभ्यासक जिम कॉर्बेट यांच्याबरोबर ते जंगलात फिरत होते. फिरता फिरता ते एका ठिकाणी बसले. कॉर्बेट त्यांना म्हणाले, ‘तू अजगराच्या वेटोळ्यावर बसला आहेस.’ प्रक्षुब्ध जमावाचे नियंत्रण दुसऱ्या महायुद्धानंतर ‘कोल्हापूर रायफल्स’ विसर्जित करण्यात आली. त्यानंतर मोहनसिंह यांनी राज्य पोलिस दलात काम करण्याचा निर्णय घेतला. डहाणू, सोलापूर, धुळे, अलिबाग या आजच्या शासकीय जिल्ह्यात त्यांनी भरपूर काम केले. ‘एसीपी’ म्हणून नागपूरमधील त्यांचा सेवाकाळ लक्षणीय होता. जांबुवंतराव धोटे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी ज्याप्रकारे नियंत्रणात आणले, त्यामुळे त्यांचे नाव गाजले. पोलिसांच्या गोळीबारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. घाटने यांनी त्यांच्याविषयी केलेली टिप्पणी लक्षात घेण्यासारखी आहे. मोहनसिंह यांनी केलेल्या कारवाईच्या वेळी काही लोकांचा बळी गेलेला असला, तरी एक लाख लोकांचा हा जमाव नियंत्रणात आला. तो नियंत्रणात आला नसता, तर सारे नागपूर शहर हिंसक कारवायांना बळी पडले असते आणि कितीतरी निरपराध लोक मारले गेले असते. या कर्तव्यदक्षतेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  सर्वांत आवडती जागा... आजोबा जितके कर्तव्यकठोर होते, तितकेच कुटुंबवत्सल. आमच्या भल्यामोठ्या एकत्र कुटुंबाच्या ते केंद्रस्थानी होते. आमचे आजोळ ही जगातील सर्वात आवडती जागा होती. आमच्या सगळ्यांच्या आठवणी आजोबांचे घर आणि आजीने केलेल्या उत्तमोत्तम महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये दडलेल्या आहेत. पोलिस दलातून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतरही, ते कितीतरी काळ पोलिस प्रशासनातील अडचणींवर मात करण्यासाठी नव्या अधिकाऱ्यांना सल्ला देत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बिबटे, वाघ आणि हत्ती यांच्याबरोबरच्या त्यांच्या आठवणी त्यांनी ‘दांडेलीची वाघीण’ नावाच्या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या पश्‍चात निवृत्त सनदी अधिकारी पीएम बायस, मीना आणि मंगल या दोन मुली, असा परिवार आहे. या दोघींनीही वायुदलातील अधिकाऱ्यांशी लग्न केले. ते प्रेमळ आजोबा तर होतेच; पण मी सनदी अधिकारी व्हावे, यासाठी माझी प्रेरणा आणि माझे ‘रोल मॉडेल’ही होते. ‘पंतप्रधानांचे रक्षण करतो आहे’ तरुण पोलिस अधिकारी म्हणून मोहनसिंह  तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या सुरक्षादलाचे प्रमुखही होते. ‘रिडर्स डायजेस्ट’मध्ये त्यांची एक आठवण प्रकाशित झाली आहे. एकदा गर्दी नेहरूंच्या खूप जवळ आली. मोहनसिंहांनी सौम्य लाठीमार करून गर्दीला दूर केले. यावर नेहरू खूप चिडले. त्यांनी धावत येऊन ती लाठी ताब्यात घेतली आणि मोहनसिंहांना म्हटले की, ‘तुम्ही लोकांशी असे वागू शकत नाही.’ यावर मोहनसिंहांनी तत्काळ उत्तर दिले की, ‘पोलिसांच्या कर्तव्यानुसार माझ्या पंतप्रधानांचे रक्षण करीत आहे.’ पंडित नेहरूंनी त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 3, 2020

कर्तव्यकठोर अधिकारी, सहृदय माणूस कॅप्टन मोहनसिंह बायस यांचे नुकतेच वयाच्या ९९व्या वर्षी  निधन झाले. कुटुंबवत्सल आणि कर्तव्यनिष्ठ माणूस म्हणून ते परिचित होते. त्यांच्या नातवाने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कॅप्टन मोहनसिंह बायस यांनी आपल्या सेवेची सुरुवात लष्करी जीवनातून केली. ‘रॉयल आर्मी ऑफ कोल्हापूर’ महाराजांच्या ‘राजाराम रायफल’मध्ये ते लष्करी अधिकारी म्हणून दाखल झाले. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती शहाजी महाराज यांचे ते ‘एडीसी’देखील होते. ब्रिटिश अमलाच्या या काळात कर्तृत्ववान अधिकाऱ्यांना जबाबदारीच्या पदावर नेमले जाई व त्याप्रकारे त्यांची निवडही केली जाई. त्या वेळी अफगाण सीमेवर असलेल्या ‘लॅंडी कोताल’ या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या शांतिसेना काम करीत होत्या, त्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. बंडखोर पख्तून कबिलेवाल्यांना नियंत्रणात ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते. तिथल्या डोंगरात भटकणे आणि चुकार पक्ष्यांची शिकार करणे, हा त्यांचा छंद होता. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कॅप्टन बायस अधिकारी म्हणून जितके कर्तबगार होते, तितकेच माणूस म्हणून हळव्या मनाचे होते. मीरा देव ही त्यांची पत्नी. तिच्या आठवणीने ते इतके व्याकुळ होत की, अखेर लष्करी परवानगी नसतानाही त्यांनी मीरा देव यांना आपल्या लष्करी तळावर बोलवून घेतले होते. त्यांच्या वरिष्ठांशी त्यांचे यामुळे खटकेही उडाले. पण, नंतर जवळच्याच एका घरात संसार थाटून हे दाम्पत्य एकत्र राहू लागले. मीरा आणि मोहन यांची जोडी वयाच्या १८व्या वर्षीच जुळली होती. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वडील नारायणसिंह देव कोल्हापूरचे प्रसिद्ध वकील होते. मोहनसिंहांनी त्यांच्याकडे जाऊन सरळ मीरेशी लग्नाची मागणी घातली आणि हे लग्न जमले. स्वातंत्र्यानंतर देशातील विविध संस्थाने देशात विलीन झाली. कोल्हापूर संस्थानाच्या विलिनीकरणातल्या वाटाघाटींत मोहनसिंह बायस यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. शेवटच्या टप्प्यात जी संस्थाने विलीन झाली, त्यात कोल्हापूर होते. छत्रपतींनी बडोदा संस्थान विलीन होईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला होता. पुढे सरदार पटेल आणि व्ही. पी. मेनन यांना भेटण्यासाठी मोहनसिंह छत्रपती शहाजी राजेंसोबत गेले होते. सरदार पटेलांनी बडोदा महाराजांनी सहा महिन्यांपूर्वीच बडोदा संस्थान विलिनीकरणाच्या अटी मान्य केल्या असल्याचे कागद त्यांना दाखविले. सरदार पटेलांनी अखेर छत्रपतींना विलिनीकरणासाठी राजी केले, ही आठवण आजोबा सांगत. पटेलांबरोबर खासगी बैठक संपवून जेव्हा छत्रपती बाहेर आले, तेव्हा त्यांनी आजोबांना मिठी मारली आणि म्हणाले, ‘आपले कोल्हापूर गेले.’ आजोबा निसर्गाचे चांगले अभ्यासक होते. शिकार हा त्यावेळचा सहज प्रकार होता. एकदा विख्यात शिकारी आणि निसर्ग अभ्यासक जिम कॉर्बेट यांच्याबरोबर ते जंगलात फिरत होते. फिरता फिरता ते एका ठिकाणी बसले. कॉर्बेट त्यांना म्हणाले, ‘तू अजगराच्या वेटोळ्यावर बसला आहेस.’ प्रक्षुब्ध जमावाचे नियंत्रण दुसऱ्या महायुद्धानंतर ‘कोल्हापूर रायफल्स’ विसर्जित करण्यात आली. त्यानंतर मोहनसिंह यांनी राज्य पोलिस दलात काम करण्याचा निर्णय घेतला. डहाणू, सोलापूर, धुळे, अलिबाग या आजच्या शासकीय जिल्ह्यात त्यांनी भरपूर काम केले. ‘एसीपी’ म्हणून नागपूरमधील त्यांचा सेवाकाळ लक्षणीय होता. जांबुवंतराव धोटे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी ज्याप्रकारे नियंत्रणात आणले, त्यामुळे त्यांचे नाव गाजले. पोलिसांच्या गोळीबारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली. त्यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. घाटने यांनी त्यांच्याविषयी केलेली टिप्पणी लक्षात घेण्यासारखी आहे. मोहनसिंह यांनी केलेल्या कारवाईच्या वेळी काही लोकांचा बळी गेलेला असला, तरी एक लाख लोकांचा हा जमाव नियंत्रणात आला. तो नियंत्रणात आला नसता, तर सारे नागपूर शहर हिंसक कारवायांना बळी पडले असते आणि कितीतरी निरपराध लोक मारले गेले असते. या कर्तव्यदक्षतेसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  सर्वांत आवडती जागा... आजोबा जितके कर्तव्यकठोर होते, तितकेच कुटुंबवत्सल. आमच्या भल्यामोठ्या एकत्र कुटुंबाच्या ते केंद्रस्थानी होते. आमचे आजोळ ही जगातील सर्वात आवडती जागा होती. आमच्या सगळ्यांच्या आठवणी आजोबांचे घर आणि आजीने केलेल्या उत्तमोत्तम महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये दडलेल्या आहेत. पोलिस दलातून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतरही, ते कितीतरी काळ पोलिस प्रशासनातील अडचणींवर मात करण्यासाठी नव्या अधिकाऱ्यांना सल्ला देत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बिबटे, वाघ आणि हत्ती यांच्याबरोबरच्या त्यांच्या आठवणी त्यांनी ‘दांडेलीची वाघीण’ नावाच्या पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या पश्‍चात निवृत्त सनदी अधिकारी पीएम बायस, मीना आणि मंगल या दोन मुली, असा परिवार आहे. या दोघींनीही वायुदलातील अधिकाऱ्यांशी लग्न केले. ते प्रेमळ आजोबा तर होतेच; पण मी सनदी अधिकारी व्हावे, यासाठी माझी प्रेरणा आणि माझे ‘रोल मॉडेल’ही होते. ‘पंतप्रधानांचे रक्षण करतो आहे’ तरुण पोलिस अधिकारी म्हणून मोहनसिंह  तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या सुरक्षादलाचे प्रमुखही होते. ‘रिडर्स डायजेस्ट’मध्ये त्यांची एक आठवण प्रकाशित झाली आहे. एकदा गर्दी नेहरूंच्या खूप जवळ आली. मोहनसिंहांनी सौम्य लाठीमार करून गर्दीला दूर केले. यावर नेहरू खूप चिडले. त्यांनी धावत येऊन ती लाठी ताब्यात घेतली आणि मोहनसिंहांना म्हटले की, ‘तुम्ही लोकांशी असे वागू शकत नाही.’ यावर मोहनसिंहांनी तत्काळ उत्तर दिले की, ‘पोलिसांच्या कर्तव्यानुसार माझ्या पंतप्रधानांचे रक्षण करीत आहे.’ पंडित नेहरूंनी त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mT8t79

No comments:

Post a Comment