Bihar Election 2020 : भल्याभल्यांना टक्कर देताहेत 'या' चार महिला उमेदवार! Bihar Election 2020 : यंदा बिहार निवडणुकीत नेत्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या मुलींनीही मैदान गाजवण्यास सुरवात केली आहे. सर्वसाधारणपणे राजकारणाच्या मैदानात आधी मुलांना संधी देणाऱ्या नेत्यांनी यंदा मात्र मुलींना संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह, जेडीयूचे दिनेश सिंह आणि विनोद चौधरी यांच्या मुली निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.  या निवडणुकीत पटनाच्या बंकीपूर मतदारसंघातून पुष्पम प्रिया चौधरी, तारापूर विधानसभा मतदारसंघातून दिव्या प्रकाश, गायघाट मतदारसंघातून कोमल सिंह आणि जमुई मतदारसंघातून श्रेयसी सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे. दिग्गज नेत्यांच्या या मुलींकडे संपूर्ण बिहारची नजर आहे. - राजकारण सोडेन पण भाजपसोबत जाणार नाही; मायावतींचे स्पष्टीकरण​ कोमल सिंहचे वडील नितीश यांचे निकटवर्ती तर आई एलजेपीची खासदार एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या कोमल सिंह गायघाट मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत. २७ वर्षीय कोमल जेडीयूच्या महेश्वर यादव यांना टक्कर देणार आहे.  कोमलचे वडील दिनेश सिंह हे नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जातात, पण त्यांनी आपल्या मुलीसाठी अजूनपर्यंत प्रचार सुरू केला नाही. तर आई वीणा देवी या एलजेपीच्या खासदार आहेत. वीणा देवी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीच्या रघुवंश प्रसाद सिंह यांना पराभूत केले होते.  - राज्यसभेत 10 उमेदवार बिनविरोध; भाजपची 8 जागांवर बाजी​ श्रेयसी सिंह जमुईमध्ये कमळ फुलवणार? बिहारच्या राजकारणातील दिग्गज दिवंगत नेते दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी सिंह राजकीय वातावरणातच लहानाची मोठी झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी २९ वर्षीय श्रेयसी जमुई मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. २८ ऑक्टोबरला जमुईमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. श्रेयसीचे वडील आणि आई पुतुल देवी दोघेही खासदार राहिले आहेत. श्रेयसी अपक्ष उमेदवार अजय प्रताप सिंह आणि आरजेडीच्या विजय प्रकाश यांना आव्हान देत आहे.  दिव्या प्रकाशही निवडणुकीच्या रिंगणात माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव यांची मुलगी दिव्या प्रकाश या निवडणुकीत पहिल्यांदाच तारापूर विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावत आहे. २८ वर्षीय दिव्या विवाहित असून आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. दिव्याची एक बहीण सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. तारापूर विधानसभा मतदारसंघातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दिव्या जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांना टक्कर देत आहे. - केंद्राने राज्यांना दिला सहा हजार कोटींचा 'जीएसटी'चा दुसरा हप्ता​  पुष्पमच्या एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ जेडीयू नेते आणि विधान परिषदेचे सदस्य विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरीच्या राजकारणातील एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. मूळच्या दरभंगा येथील असलेल्या पुष्पमने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. पुष्पम प्लूरल्स पार्टीची संस्थापक अध्यक्ष आहे. बांकीपूरमधून निवडणूक लढवणाऱ्या पुष्पमपुढे तगडे आव्हान आहे. भाजप नेते नितीन नवीन आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव्ह सिन्हा यांचा सामना करावा लागणार आहे. - देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

Bihar Election 2020 : भल्याभल्यांना टक्कर देताहेत 'या' चार महिला उमेदवार! Bihar Election 2020 : यंदा बिहार निवडणुकीत नेत्यांच्या मुलांबरोबर त्यांच्या मुलींनीही मैदान गाजवण्यास सुरवात केली आहे. सर्वसाधारणपणे राजकारणाच्या मैदानात आधी मुलांना संधी देणाऱ्या नेत्यांनी यंदा मात्र मुलींना संधी दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह, जेडीयूचे दिनेश सिंह आणि विनोद चौधरी यांच्या मुली निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.  या निवडणुकीत पटनाच्या बंकीपूर मतदारसंघातून पुष्पम प्रिया चौधरी, तारापूर विधानसभा मतदारसंघातून दिव्या प्रकाश, गायघाट मतदारसंघातून कोमल सिंह आणि जमुई मतदारसंघातून श्रेयसी सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे. दिग्गज नेत्यांच्या या मुलींकडे संपूर्ण बिहारची नजर आहे. - राजकारण सोडेन पण भाजपसोबत जाणार नाही; मायावतींचे स्पष्टीकरण​ कोमल सिंहचे वडील नितीश यांचे निकटवर्ती तर आई एलजेपीची खासदार एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या कोमल सिंह गायघाट मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत. २७ वर्षीय कोमल जेडीयूच्या महेश्वर यादव यांना टक्कर देणार आहे.  कोमलचे वडील दिनेश सिंह हे नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जातात, पण त्यांनी आपल्या मुलीसाठी अजूनपर्यंत प्रचार सुरू केला नाही. तर आई वीणा देवी या एलजेपीच्या खासदार आहेत. वीणा देवी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडीच्या रघुवंश प्रसाद सिंह यांना पराभूत केले होते.  - राज्यसभेत 10 उमेदवार बिनविरोध; भाजपची 8 जागांवर बाजी​ श्रेयसी सिंह जमुईमध्ये कमळ फुलवणार? बिहारच्या राजकारणातील दिग्गज दिवंगत नेते दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी सिंह राजकीय वातावरणातच लहानाची मोठी झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी २९ वर्षीय श्रेयसी जमुई मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. २८ ऑक्टोबरला जमुईमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. श्रेयसीचे वडील आणि आई पुतुल देवी दोघेही खासदार राहिले आहेत. श्रेयसी अपक्ष उमेदवार अजय प्रताप सिंह आणि आरजेडीच्या विजय प्रकाश यांना आव्हान देत आहे.  दिव्या प्रकाशही निवडणुकीच्या रिंगणात माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव यांची मुलगी दिव्या प्रकाश या निवडणुकीत पहिल्यांदाच तारापूर विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावत आहे. २८ वर्षीय दिव्या विवाहित असून आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. दिव्याची एक बहीण सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. तारापूर विधानसभा मतदारसंघातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दिव्या जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांना टक्कर देत आहे. - केंद्राने राज्यांना दिला सहा हजार कोटींचा 'जीएसटी'चा दुसरा हप्ता​  पुष्पमच्या एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ जेडीयू नेते आणि विधान परिषदेचे सदस्य विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरीच्या राजकारणातील एन्ट्रीने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. मूळच्या दरभंगा येथील असलेल्या पुष्पमने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. पुष्पम प्लूरल्स पार्टीची संस्थापक अध्यक्ष आहे. बांकीपूरमधून निवडणूक लढवणाऱ्या पुष्पमपुढे तगडे आव्हान आहे. भाजप नेते नितीन नवीन आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव्ह सिन्हा यांचा सामना करावा लागणार आहे. - देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38iKcDx

No comments:

Post a Comment