सांगलीत पोलिसांची कोणतीही हप्तेखोरी चालू देणार नाही सांगली : ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांची कोणतीही हप्तेखोरी मी असेपर्यंत चालू देणार नाही. पोलिसांविषयी तक्रारी असतील तर थेट माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी आज पत्रकार परिषदेत केले.  प्रशिक्षणार्थी अधीक्षक श्री. झा यांनी 26 ऑक्‍टोबरला सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. दहा दिवसांच्या कालावधीत ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील कामकाजाची माहिती घेतली. तेव्हा काही पोलिस अवैध धंदे किंवा इतर कारणासाठी हप्ते स्वीकारत असल्याच्या तक्रारी श्री. झा यांच्याकडे आल्या. याचा संदर्भ घेत श्री. झा म्हणाले, ""ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पोलिसपाटलांची नुकतीच बैठक घेतली. त्यांना कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.  काही पोलिस हप्ते घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांना कोणीही पैसे देऊ नये, असे माझे आवाहन आहे. पोलिसांना त्यांच्या कामाबाबत समाधानकारक पगार मिळतो. अवैध धंदे रोखण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेतले तर पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन बनते. वास्तविक, सर्वच पोलिस खराब नाहीत. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा सुधारायची आहे. जर पोलिस हप्ते मागत असतील किंवा कायदेशीर कामासाठी पैसे मागत असतील तर माझ्याकडे थेट तक्रार करा. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.''  झा म्हणाले, ""पोलिस ठाण्यातील कामकाज सुधारण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. वास्तविक, किरकोळ कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. तसेच, पोलिसांनी त्यांची जबाबदारी वेळेत पार पाडली पाहिजे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत, त्यासाठी पगार मिळतो, याची जाणीव ठेवली पाहिजे. ग्रामीण पोलिस ठाण्याचा कार्यभार जोपर्यंत माझ्याकडे आहे, तोपर्यंत पोलिसांविषयी तक्रार आल्यास थेट कारवाई केली जाईल. नागरिकांनीही पोलिसांविषयी तक्रार करताना घाबरू नये, मी त्यांच्या पाठीशी ठाम राहीन. भविष्यात पोलिस म्हणून मी कोठेही असलो तरी तक्रारदारांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.''   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 6, 2020

सांगलीत पोलिसांची कोणतीही हप्तेखोरी चालू देणार नाही सांगली : ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पोलिसांची कोणतीही हप्तेखोरी मी असेपर्यंत चालू देणार नाही. पोलिसांविषयी तक्रारी असतील तर थेट माझ्याशी संपर्क साधा, असे आवाहन सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी आज पत्रकार परिषदेत केले.  प्रशिक्षणार्थी अधीक्षक श्री. झा यांनी 26 ऑक्‍टोबरला सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. दहा दिवसांच्या कालावधीत ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील कामकाजाची माहिती घेतली. तेव्हा काही पोलिस अवैध धंदे किंवा इतर कारणासाठी हप्ते स्वीकारत असल्याच्या तक्रारी श्री. झा यांच्याकडे आल्या. याचा संदर्भ घेत श्री. झा म्हणाले, ""ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पोलिसपाटलांची नुकतीच बैठक घेतली. त्यांना कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.  काही पोलिस हप्ते घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांना कोणीही पैसे देऊ नये, असे माझे आवाहन आहे. पोलिसांना त्यांच्या कामाबाबत समाधानकारक पगार मिळतो. अवैध धंदे रोखण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेतले तर पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन बनते. वास्तविक, सर्वच पोलिस खराब नाहीत. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा सुधारायची आहे. जर पोलिस हप्ते मागत असतील किंवा कायदेशीर कामासाठी पैसे मागत असतील तर माझ्याकडे थेट तक्रार करा. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.''  झा म्हणाले, ""पोलिस ठाण्यातील कामकाज सुधारण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. वास्तविक, किरकोळ कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. तसेच, पोलिसांनी त्यांची जबाबदारी वेळेत पार पाडली पाहिजे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत, त्यासाठी पगार मिळतो, याची जाणीव ठेवली पाहिजे. ग्रामीण पोलिस ठाण्याचा कार्यभार जोपर्यंत माझ्याकडे आहे, तोपर्यंत पोलिसांविषयी तक्रार आल्यास थेट कारवाई केली जाईल. नागरिकांनीही पोलिसांविषयी तक्रार करताना घाबरू नये, मी त्यांच्या पाठीशी ठाम राहीन. भविष्यात पोलिस म्हणून मी कोठेही असलो तरी तक्रारदारांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.''   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2U30wzG

No comments:

Post a Comment