सिंधुदुर्गात मंदीतही दिवाळी तेजाची झळाळी  कणकवली (सिंधुदुर्ग) - गेले काही दिवस मंदीने गारठलेल्या बाजारपेठा दिवाळी सणाच्या तेजाने झळाळल्या आहेत. आकाश कंदील, दिवाळी फराळ, विद्युत रोषणाई, कपडे, मोबाईल, टी.व्ही., फ्रीज, सुवर्णपेढ्या, किराणा साहित्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली आहे. कोरोनाची धास्ती संपल्याने सोशल डिस्टन्सचा विषय हद्दपार झाला आहे. मास्क वापरण्याची खबरदारी मात्र ग्राहकांकडून घेतली जात आहे.  कोरोना महामारी असली तर संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळालेला बोनस, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अग्रीम, ऍडव्हान्स पगार तसेच भातकापणीची आटोपलेली कामे यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांसह नोकरदार वर्गाकडून गेले चार दिवस बाजारपेठांत विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. तर आज बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दीने उच्चांक गाठला होता. त्यामुळे मार्च महिन्यापासून मंदीच्या वातावरणात झाकोळल्या गेलेल्या जिल्ह्यातील बाजारपेठांना पुन्हा ऊर्जितावस्था आल्याचे चित्र आहे. 2020 या वर्षातील एप्रिल-मे महिन्यातील मिरगसंधीचा बाजार, त्यानंतरचा गणेशोत्सव बाजार कोरोनामुळे कोलमडला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिवाळी सणाचे वेध लागले होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे. यात कपड्यांच्या दुकानांमध्ये चिमुकल्यांसह मोठ्यांचीही दाटी आहे. तर तयार पोहे, चिवडा व इतर गोडधोड पदार्थ खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी आहे. चिनी कंपन्यांच्या मोबाईल वरील बहिष्कार हवेत विरला असून विविध चिनी कंपन्यांच्या मोबाईलची विक्री जोरात आहे. तयार करंज्या, चकल्या, लाडू आदींच्या विक्रीसाठी बचतगटांनीही बाजारपेठांमध्ये स्टॉल लावले असून त्याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याखेरीज लॉकडाउन रोजगार संधी शोधू पाहणाऱ्या तरुणांनी तयार केलेल्या पारंपरिक आकाश कंदिलांनाही ग्राहकांनी पसंती दिल्याचे चित्र बाजारपेठांत आहे.  मंदी दूर होण्याची अपेक्षा  कोरोना महामारी, त्यात बंद पडलेल्या अनेक कंपन्या, घटलेली क्रयशक्‍ती, बंद असलेला चिरे-वाळू व्यवसाय यामुळे बांधकाम आणि वाहतूक क्षेत्रावर मंदीचे सावट आहे. तर मार्च महिन्यात आलेल्या कोरोनामुळे लग्न आणि त्यावर आधारित असणारे सर्व व्यवसाय देखील गेले आठ महिने ठप्प आहेत. आता दिवाळी सणानंतर लग्न सराईसह बांधकाम, वाहतूक क्षेत्रावरील मंदीचे संकट दूर होईल अशी अपेक्षा विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांतून व्यक्‍त झाली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 13, 2020

सिंधुदुर्गात मंदीतही दिवाळी तेजाची झळाळी  कणकवली (सिंधुदुर्ग) - गेले काही दिवस मंदीने गारठलेल्या बाजारपेठा दिवाळी सणाच्या तेजाने झळाळल्या आहेत. आकाश कंदील, दिवाळी फराळ, विद्युत रोषणाई, कपडे, मोबाईल, टी.व्ही., फ्रीज, सुवर्णपेढ्या, किराणा साहित्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली आहे. कोरोनाची धास्ती संपल्याने सोशल डिस्टन्सचा विषय हद्दपार झाला आहे. मास्क वापरण्याची खबरदारी मात्र ग्राहकांकडून घेतली जात आहे.  कोरोना महामारी असली तर संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळालेला बोनस, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अग्रीम, ऍडव्हान्स पगार तसेच भातकापणीची आटोपलेली कामे यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांसह नोकरदार वर्गाकडून गेले चार दिवस बाजारपेठांत विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. तर आज बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दीने उच्चांक गाठला होता. त्यामुळे मार्च महिन्यापासून मंदीच्या वातावरणात झाकोळल्या गेलेल्या जिल्ह्यातील बाजारपेठांना पुन्हा ऊर्जितावस्था आल्याचे चित्र आहे. 2020 या वर्षातील एप्रिल-मे महिन्यातील मिरगसंधीचा बाजार, त्यानंतरचा गणेशोत्सव बाजार कोरोनामुळे कोलमडला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिवाळी सणाचे वेध लागले होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे. यात कपड्यांच्या दुकानांमध्ये चिमुकल्यांसह मोठ्यांचीही दाटी आहे. तर तयार पोहे, चिवडा व इतर गोडधोड पदार्थ खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी आहे. चिनी कंपन्यांच्या मोबाईल वरील बहिष्कार हवेत विरला असून विविध चिनी कंपन्यांच्या मोबाईलची विक्री जोरात आहे. तयार करंज्या, चकल्या, लाडू आदींच्या विक्रीसाठी बचतगटांनीही बाजारपेठांमध्ये स्टॉल लावले असून त्याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. याखेरीज लॉकडाउन रोजगार संधी शोधू पाहणाऱ्या तरुणांनी तयार केलेल्या पारंपरिक आकाश कंदिलांनाही ग्राहकांनी पसंती दिल्याचे चित्र बाजारपेठांत आहे.  मंदी दूर होण्याची अपेक्षा  कोरोना महामारी, त्यात बंद पडलेल्या अनेक कंपन्या, घटलेली क्रयशक्‍ती, बंद असलेला चिरे-वाळू व्यवसाय यामुळे बांधकाम आणि वाहतूक क्षेत्रावर मंदीचे सावट आहे. तर मार्च महिन्यात आलेल्या कोरोनामुळे लग्न आणि त्यावर आधारित असणारे सर्व व्यवसाय देखील गेले आठ महिने ठप्प आहेत. आता दिवाळी सणानंतर लग्न सराईसह बांधकाम, वाहतूक क्षेत्रावरील मंदीचे संकट दूर होईल अशी अपेक्षा विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांतून व्यक्‍त झाली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nsctf7

No comments:

Post a Comment