देवगड बाजारपेठ गजबजली  देवगड (सिंधुदुर्ग) - दीपावली सणाच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजारपेठ सजली आहे. विविध आकार आणि रंगातील आकाश कंदील तसेच पणत्या विक्रीस आल्या आहेत. विद्युत रोषणाईची दुकानेही गजबजली होती.  दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. या सणाच्या निमित्ताने विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघेल अशी रोषणाई केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे सुरूवातीपासून उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले. अनेकांच्या हाताला काम नाही अशी अवस्था लॉकडाउन काळात होती. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. व्यवसाय होण्याच्या आशेने व्यावसायिकांनी आपल्या साहित्याची मांडणी दुकानात केली आहे. विविध रोषणाईचे साहित्य, आकाशकंदील तसेच सजावटीचे साहित्य विक्रीस ठेवण्यात आहे. खरेदीदारांकडूनही त्याला पसंती मिळत आहे. विविध रंगातील पणत्या, रांगोळीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाचे भय असले तरी व्यवसायाच्या दृष्टीने आवश्‍यक काळजी घेत व्यवसाय सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने विविध साहित्य खरेदी करण्याकडे स्थानिकांचा कल होता. स्थानिकांबरोबरच बाहेरील व्यापारीही येथे दाखल झाले होते. त्यामुळे शहरात त्यांनी थाटलेल्या दुकानामध्येही खरेदीसाठी गर्दी होताना दिसत होती. झेंडुंची फुले विक्रीस होती. उद्या अभ्यंगस्थान असल्याने सुगंधी साहित्य खरेदी, कपडे तसेच भांडी खरेदीसाठी गर्दी होताना दिसत होती. उटणे, अगरबंत्ती, साबण विक्रेत्यांकडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत होती. तसेच फराळ खरेदी, मिठाई खरेदीसाठीही नागरिकांची पसंती दिसत होती. अलिकडे विविध व्यापामुळे अनेकांचा तयार फराळ खरेदी करण्याकडे कल असतो. त्यामुळे अशा व्यावसायिकांचीही मोठी उलाढाल सुरू होती.  राजकीय व्यक्ती गेल्या कोठे?  कोणत्याही निवडणूका समोर असल्यावर राजकीय नेतेमंडळींकडून नागरिकांना उटणे, साबण तसेच मिठाईचे वाटप होते. गावागावात कार्यकर्ते याचे वाटप करून संभाव्य उमेदवाराची छबी घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही अपवाद वगळता यंदा कोणी याची जाग घेतली नसल्याचे चित्र होते. जनतेला यंदा राजकीय नेतेमंडळीच्या शुभेच्छा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी म्हणणारी राजकीय मंडळी यंदा कोठे गेली असा सर्वसामान्यांना प्रश्‍न आहे. निवडणूका नसल्याने सर्वच पातळीवर शांतता असल्याचे दिसते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 13, 2020

देवगड बाजारपेठ गजबजली  देवगड (सिंधुदुर्ग) - दीपावली सणाच्या पार्श्‍वभूमीवर येथील बाजारपेठ सजली आहे. विविध आकार आणि रंगातील आकाश कंदील तसेच पणत्या विक्रीस आल्या आहेत. विद्युत रोषणाईची दुकानेही गजबजली होती.  दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. या सणाच्या निमित्ताने विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघेल अशी रोषणाई केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे सुरूवातीपासून उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले. अनेकांच्या हाताला काम नाही अशी अवस्था लॉकडाउन काळात होती. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. व्यवसाय होण्याच्या आशेने व्यावसायिकांनी आपल्या साहित्याची मांडणी दुकानात केली आहे. विविध रोषणाईचे साहित्य, आकाशकंदील तसेच सजावटीचे साहित्य विक्रीस ठेवण्यात आहे. खरेदीदारांकडूनही त्याला पसंती मिळत आहे. विविध रंगातील पणत्या, रांगोळीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाचे भय असले तरी व्यवसायाच्या दृष्टीने आवश्‍यक काळजी घेत व्यवसाय सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने विविध साहित्य खरेदी करण्याकडे स्थानिकांचा कल होता. स्थानिकांबरोबरच बाहेरील व्यापारीही येथे दाखल झाले होते. त्यामुळे शहरात त्यांनी थाटलेल्या दुकानामध्येही खरेदीसाठी गर्दी होताना दिसत होती. झेंडुंची फुले विक्रीस होती. उद्या अभ्यंगस्थान असल्याने सुगंधी साहित्य खरेदी, कपडे तसेच भांडी खरेदीसाठी गर्दी होताना दिसत होती. उटणे, अगरबंत्ती, साबण विक्रेत्यांकडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत होती. तसेच फराळ खरेदी, मिठाई खरेदीसाठीही नागरिकांची पसंती दिसत होती. अलिकडे विविध व्यापामुळे अनेकांचा तयार फराळ खरेदी करण्याकडे कल असतो. त्यामुळे अशा व्यावसायिकांचीही मोठी उलाढाल सुरू होती.  राजकीय व्यक्ती गेल्या कोठे?  कोणत्याही निवडणूका समोर असल्यावर राजकीय नेतेमंडळींकडून नागरिकांना उटणे, साबण तसेच मिठाईचे वाटप होते. गावागावात कार्यकर्ते याचे वाटप करून संभाव्य उमेदवाराची छबी घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही अपवाद वगळता यंदा कोणी याची जाग घेतली नसल्याचे चित्र होते. जनतेला यंदा राजकीय नेतेमंडळीच्या शुभेच्छा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी म्हणणारी राजकीय मंडळी यंदा कोठे गेली असा सर्वसामान्यांना प्रश्‍न आहे. निवडणूका नसल्याने सर्वच पातळीवर शांतता असल्याचे दिसते.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Usqgpy

No comments:

Post a Comment