कोरोनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; ट्रम्प यांची धक्कादायक विधाने जगजाहीर वॉशिंग्टन - कोरोना हा अत्यंत घातक व संसर्गजन्य रोग असल्याचे ट्रम्प यांना माहीत होते, पण तरी कोरोना हा सर्दी-पडशासारखा सामान्य आजार असल्याचे ते मुद्दाम जाहीरपणे सांगत राहिले. त्याचप्रमाणे उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या भेटीत त्यांच्या काकांची हत्या कशी केली, याबाबतचा घटनाक्रमच कथन केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ही सर्व धक्कादायक माहिती अमेरिकेचे पत्रकार बॉब वुडवर्ड यांच्या ‘रेज’ या पुस्तकात प्रसिद्ध केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वुडवर्ड यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या १८ मुलाखती डिसेंबर ते जुलै या दरम्यान घेतल्या. वुडवर्ड हे वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाचे सहयोगी संपादक आहेत. अमेरिकेचे शोध पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पुस्तकात ट्रम्प यांच्याबद्दल नवी माहिती दिली आहे. कोरोनाव्हायरस, उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन, वांशिक अशांतता आणि अमेरिकेचे नवे गूढ शस्त्र ज्याबद्दल अन्य जग अनभिज्ञ आहे, असा ट्रम्प यांचा दावा आहे, अशा अनेक विषयांवरील ट्रम्प यांचे विचार, मते व वक्त्यव्ये यात आहेत. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा देशाला खूश ठेवणे माझी जबाबदारी  कोरोना हा अत्यंत भयानक रोग आहे, हे माहीत असतानाही ट्रम्‍प यांनी त्याला फार महत्त्व दिले नाही आणि जनतेला त्यांनी सावध केले नाही, ही बाब ‘रेज’ या पुस्तकातून उघड झाल्यावर पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना याबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. त्या वेळी असे केल्याची कबुली देत ट्रम्प म्हणाले की, मी माझ्या देशावर प्रेम करतो. देशवासीयांनी भीतीखाली जगावे, असे मला वाटत नाही. मी भीतीदायक वातावरण निर्माण करू इच्छित नव्हतो. हा प्रश्‍न बॉब वुडवर्ड यांनी किंवा अन्य कोणी विचारला असता तरी माझे उत्तर हेच आहे. किम हे अत्यंत हुशार नेते ट्रम्प म्हणाले होते की, जोंग उन यांची २०१८ मध्ये सिंगापूर येथे प्रथम भेट झाली तेव्हा मी खूप प्रभावित झालो होतो. किम हे अत्यंत हुशार नेते असल्याचे तेव्हा लक्षात आले. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या काकाची हत्या कशी केली यांची बारीकसारिक माहिती मला दिली, असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. उत्तर कोरिया त्यांचा अण्वस्त्रांचा कार्यक्रम कधीही थांबविणार नाही, गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती ट्रम्‍प यांनी खोडून काढली होती. उत्तर कोरियाचा प्रश्‍न कसा हाताळायचा हे ‘सीआयए’ समजत नसल्याचे ते म्हणाले होते. वांशिकतावाद श्‍वेतवर्णीय व्यक्ती या नात्याने कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकांचा संताप आणि दुःख  जाणून घेण्याची जबाबदारी आहे, असे वाटते का असा सवाल वुडवर्ड यांनी गेल्या महिन्यात ट्रम्प यांना केला होता. त्या वेळी ‘मला असे काही वाटत नाही,’ असे उत्तर ट्रम्प यांनी दिले होते. असमानता आणि भेदभावाचा सामना कृष्णवर्णीय लोक अनेक वर्षांपासून करीत आहे, यावर वुडवर्ड यांनी भर दिला असता कोरोना साथीपूर्वी कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकांमधील बेरोजगारीचा दर कमी कसा झाला याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधल्याचे पुस्तकात म्हटले आहे. अमेरिकेत वर्णद्वेषी व्यवस्था आहे, असे वाटते का, यावर ट्रम्प म्हणाले होते की, हे सर्वत्र असते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 12, 2020

कोरोनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; ट्रम्प यांची धक्कादायक विधाने जगजाहीर वॉशिंग्टन - कोरोना हा अत्यंत घातक व संसर्गजन्य रोग असल्याचे ट्रम्प यांना माहीत होते, पण तरी कोरोना हा सर्दी-पडशासारखा सामान्य आजार असल्याचे ते मुद्दाम जाहीरपणे सांगत राहिले. त्याचप्रमाणे उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या भेटीत त्यांच्या काकांची हत्या कशी केली, याबाबतचा घटनाक्रमच कथन केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ही सर्व धक्कादायक माहिती अमेरिकेचे पत्रकार बॉब वुडवर्ड यांच्या ‘रेज’ या पुस्तकात प्रसिद्ध केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वुडवर्ड यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या १८ मुलाखती डिसेंबर ते जुलै या दरम्यान घेतल्या. वुडवर्ड हे वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाचे सहयोगी संपादक आहेत. अमेरिकेचे शोध पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी पुस्तकात ट्रम्प यांच्याबद्दल नवी माहिती दिली आहे. कोरोनाव्हायरस, उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन, वांशिक अशांतता आणि अमेरिकेचे नवे गूढ शस्त्र ज्याबद्दल अन्य जग अनभिज्ञ आहे, असा ट्रम्प यांचा दावा आहे, अशा अनेक विषयांवरील ट्रम्प यांचे विचार, मते व वक्त्यव्ये यात आहेत. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा देशाला खूश ठेवणे माझी जबाबदारी  कोरोना हा अत्यंत भयानक रोग आहे, हे माहीत असतानाही ट्रम्‍प यांनी त्याला फार महत्त्व दिले नाही आणि जनतेला त्यांनी सावध केले नाही, ही बाब ‘रेज’ या पुस्तकातून उघड झाल्यावर पत्रकार परिषदेत ट्रम्प यांना याबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. त्या वेळी असे केल्याची कबुली देत ट्रम्प म्हणाले की, मी माझ्या देशावर प्रेम करतो. देशवासीयांनी भीतीखाली जगावे, असे मला वाटत नाही. मी भीतीदायक वातावरण निर्माण करू इच्छित नव्हतो. हा प्रश्‍न बॉब वुडवर्ड यांनी किंवा अन्य कोणी विचारला असता तरी माझे उत्तर हेच आहे. किम हे अत्यंत हुशार नेते ट्रम्प म्हणाले होते की, जोंग उन यांची २०१८ मध्ये सिंगापूर येथे प्रथम भेट झाली तेव्हा मी खूप प्रभावित झालो होतो. किम हे अत्यंत हुशार नेते असल्याचे तेव्हा लक्षात आले. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या काकाची हत्या कशी केली यांची बारीकसारिक माहिती मला दिली, असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. उत्तर कोरिया त्यांचा अण्वस्त्रांचा कार्यक्रम कधीही थांबविणार नाही, गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती ट्रम्‍प यांनी खोडून काढली होती. उत्तर कोरियाचा प्रश्‍न कसा हाताळायचा हे ‘सीआयए’ समजत नसल्याचे ते म्हणाले होते. वांशिकतावाद श्‍वेतवर्णीय व्यक्ती या नात्याने कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकांचा संताप आणि दुःख  जाणून घेण्याची जबाबदारी आहे, असे वाटते का असा सवाल वुडवर्ड यांनी गेल्या महिन्यात ट्रम्प यांना केला होता. त्या वेळी ‘मला असे काही वाटत नाही,’ असे उत्तर ट्रम्प यांनी दिले होते. असमानता आणि भेदभावाचा सामना कृष्णवर्णीय लोक अनेक वर्षांपासून करीत आहे, यावर वुडवर्ड यांनी भर दिला असता कोरोना साथीपूर्वी कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकांमधील बेरोजगारीचा दर कमी कसा झाला याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधल्याचे पुस्तकात म्हटले आहे. अमेरिकेत वर्णद्वेषी व्यवस्था आहे, असे वाटते का, यावर ट्रम्प म्हणाले होते की, हे सर्वत्र असते.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ir9Ho7

No comments:

Post a Comment