पाळंदेबाईंमुळे विद्येच्या माहेरघरातील विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहात पौड - अँड्रॉईड मोबाईल, नेटवर्कच्या सुविधेअभावी मुळशी तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कवाडे बंद आहेत. तथापि पुण्यातील अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षिका वीणा पाळंदे यांच्या पुढाकाराने मांदेडे (ता. मुळशी) येथील विद्यार्थ्यांना टॅब मिळाले आहेत. गेल्या दहा वर्षापासून या गावाशी माणूसकीची नाळ जुळलेल्या पाळंदे यांनी आई, सासू, निवृत्त मुख्याध्यापक आणि मित्र परिवाराकडून टॅब मिळविले. विद्येच्या माहेरघरात ज्ञानदान करणाऱ्या पाळंदेबाईंच्या मदतीमुळे दुर्गम मांदेड्यातील विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनामुळे सध्या शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे. शहरात बहुतांश पालकांनी मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतू मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागात मोबाईल किंवा नेटवर्क सुविधा उपलब्ध त्यामुळे बहुतांश मुलांना गुरूविना ऑफलाईन अभ्यास करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रीयन क्रिकेटरने बनवली देशातली पहिली 'कार्गो सायकल'; वाचा या अफलातून सायकलविषयी मांदेडे माले खोऱ्यात डोंगराच्या कुशीत वसलेले गाव. भात आणि आंब्याच्या उत्पन्नावर येथील बळीराजा कुटूंबाची वर्षभराची गुजराण करतो. यावर्षी कोरोना आणि बदलत्या हवामानामुळे आंबाही हातचा गेला आणि भाताचेही नुकसान झाले. कसाबसा संसाराचा गाडा हाकणारा घरचा मालक आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेशा सुविधा देण्यास असमर्थ आहे. त्यात येथे नेटवर्कही मिळत नाही. - विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष​ वीणा पाळंदे या गेली दहा वर्षापासून प्राज फांऊडेशन तसेच स्वतःच्या खर्चातून या गावच्या विकासासाठी धडपडत आहेत. येथील शाळांना त्यांनी आतापर्यंत लाखो रूपयांचे साहित्य दिले आहे. प्राजच्या माध्यमातून प्रत्येक घरात शौचालय बांधून त्यांनी हे गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त केले आहे. त्यामुळे त्यांची या गावाशी एक माणूसकीची नाळ जुळली आहे. शहरात ऑनलाईन शिक्षण चालू आहे, परंतू माझ्या मांदेड्यातील मुले काय करतात हे पाहण्यासाठी त्या गावात आल्या. येथील मुख्याध्यापिका वंदना राठोड यांच्याशी चर्चा केली. जवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना टॅब मिळवून देण्याचा त्यांनी संकल्प केला. बारामतीतील डॉक्टर म्हणताहेत, ...तर कोविड केअर सेंटर बंद करणार त्यांची आई नीला जोशी, सासूबाई अनुराधा पाळंदे, अभिनवच्या निवृत्त मुख्याध्यापिका वंदना भगत, अभियंते मुकूल लाटकर, अमोद झांबरे यांच्याकडून टॅब मिळविले. त्यात पहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर टाकले. हे सर्व टॅब त्यांनी शाळेत आणून दिले. यावेळी गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, केंद्रप्रमुख अविनाश टेमघरे, सरपंच अरूणा वीर, उपसरपंच संजय वीर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश वीर, सदस्य काशिनाथ वीर, दत्तात्रेय वीर, मुख्याध्यापिका वंदना राठोड, रेखा वाळूंज, अमोल काळे, मंगेश खामकर आदि उपस्थित होते. माणिक बांगर (गटशिक्षणाधिकारी, मुळशी) - शहरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या पाळंदे बाईंनी मांदेड्याच्या मुलांची घालमेल हेरली. आपल्या नातेवाईक आणि स्नेह्यांकडून टॅब मिळवून या मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांच्यामुळे शक्य झाले. त्यांचे हे दातृत्व प्रशंसनीय असून त्याचा आदर्श इतरांनी घेतला पाहीजे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 12, 2020

पाळंदेबाईंमुळे विद्येच्या माहेरघरातील विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहात पौड - अँड्रॉईड मोबाईल, नेटवर्कच्या सुविधेअभावी मुळशी तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कवाडे बंद आहेत. तथापि पुण्यातील अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षिका वीणा पाळंदे यांच्या पुढाकाराने मांदेडे (ता. मुळशी) येथील विद्यार्थ्यांना टॅब मिळाले आहेत. गेल्या दहा वर्षापासून या गावाशी माणूसकीची नाळ जुळलेल्या पाळंदे यांनी आई, सासू, निवृत्त मुख्याध्यापक आणि मित्र परिवाराकडून टॅब मिळविले. विद्येच्या माहेरघरात ज्ञानदान करणाऱ्या पाळंदेबाईंच्या मदतीमुळे दुर्गम मांदेड्यातील विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनामुळे सध्या शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहू लागले आहे. शहरात बहुतांश पालकांनी मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतू मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागात मोबाईल किंवा नेटवर्क सुविधा उपलब्ध त्यामुळे बहुतांश मुलांना गुरूविना ऑफलाईन अभ्यास करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रीयन क्रिकेटरने बनवली देशातली पहिली 'कार्गो सायकल'; वाचा या अफलातून सायकलविषयी मांदेडे माले खोऱ्यात डोंगराच्या कुशीत वसलेले गाव. भात आणि आंब्याच्या उत्पन्नावर येथील बळीराजा कुटूंबाची वर्षभराची गुजराण करतो. यावर्षी कोरोना आणि बदलत्या हवामानामुळे आंबाही हातचा गेला आणि भाताचेही नुकसान झाले. कसाबसा संसाराचा गाडा हाकणारा घरचा मालक आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेशा सुविधा देण्यास असमर्थ आहे. त्यात येथे नेटवर्कही मिळत नाही. - विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष​ वीणा पाळंदे या गेली दहा वर्षापासून प्राज फांऊडेशन तसेच स्वतःच्या खर्चातून या गावच्या विकासासाठी धडपडत आहेत. येथील शाळांना त्यांनी आतापर्यंत लाखो रूपयांचे साहित्य दिले आहे. प्राजच्या माध्यमातून प्रत्येक घरात शौचालय बांधून त्यांनी हे गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त केले आहे. त्यामुळे त्यांची या गावाशी एक माणूसकीची नाळ जुळली आहे. शहरात ऑनलाईन शिक्षण चालू आहे, परंतू माझ्या मांदेड्यातील मुले काय करतात हे पाहण्यासाठी त्या गावात आल्या. येथील मुख्याध्यापिका वंदना राठोड यांच्याशी चर्चा केली. जवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना टॅब मिळवून देण्याचा त्यांनी संकल्प केला. बारामतीतील डॉक्टर म्हणताहेत, ...तर कोविड केअर सेंटर बंद करणार त्यांची आई नीला जोशी, सासूबाई अनुराधा पाळंदे, अभिनवच्या निवृत्त मुख्याध्यापिका वंदना भगत, अभियंते मुकूल लाटकर, अमोद झांबरे यांच्याकडून टॅब मिळविले. त्यात पहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर टाकले. हे सर्व टॅब त्यांनी शाळेत आणून दिले. यावेळी गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे, केंद्रप्रमुख अविनाश टेमघरे, सरपंच अरूणा वीर, उपसरपंच संजय वीर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश वीर, सदस्य काशिनाथ वीर, दत्तात्रेय वीर, मुख्याध्यापिका वंदना राठोड, रेखा वाळूंज, अमोल काळे, मंगेश खामकर आदि उपस्थित होते. माणिक बांगर (गटशिक्षणाधिकारी, मुळशी) - शहरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या पाळंदे बाईंनी मांदेड्याच्या मुलांची घालमेल हेरली. आपल्या नातेवाईक आणि स्नेह्यांकडून टॅब मिळवून या मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांच्यामुळे शक्य झाले. त्यांचे हे दातृत्व प्रशंसनीय असून त्याचा आदर्श इतरांनी घेतला पाहीजे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32oKmWd

No comments:

Post a Comment