'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित    नागपूर: गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून आपल्या कानावर सतत काही शब्दांचा वर्षाव सुरु आहे. त्यापैकी काही मुख्य शब्द म्हणजे कोरोना, आत्महत्या आणि त्याहूनही मोठा शब्द म्हणजे ड्रग्स. हा शब्द आपण या आधी ऐकलाच नव्हता असं नाही मात्र गेल्या काही दिवसात सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाने ड्रग्स घेणाऱ्यांची आणि विक्री करणाऱ्यांची झोप उडवली आहे. पण हे ड्रग्स नक्की असतात तरी काय? कोणत्या पद्धतीने ड्रग्स घेतले जातात? आणि त्यावरील उपाय याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.   ड्रग्स म्हणजे नक्की काय?  भारतात तरुणांमध्ये ड्रग्स घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) या पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो.  ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालवर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते.  स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जातो. अति शौकीन लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर करतात. इतकेच नाही तर मॅजिक मश्रूम, एलसीडी, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर यांचाही वापर ड्रग्स म्हणून केला जातो. ठळक बातमी - काय सांगता! नागपुरातील या तलावातून होतो चक्क एका मोठ्या नदीचा उगम; जाणून घ्या काय काय आहे इतिहास या देशांतून होतो पुरवठा  शेजारील देशातून म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान इथून ड्रग्स आपल्या देशात येतात. याची किंमतही लाखो- करोडो रूपयात असते. याची खरेदी - विक्रीही सांकेतिक भाषेत म्हणजेच खुणांच्या माध्यमातून होते. ‘हशीश’सारखे अंमली पदार्थ नेपाळमधून पुरवले जातात. नायजेरियामधून भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. नायजेरियन विद्यार्थी वा कपड्यांचे व्यापारी या माध्यमातून ही तस्करी केली जाते.  हे आहेत ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे  मुलांच्या वागण्यात अचानक बदल होतो. अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्याचे मन न लागणे. घरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे. डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे. बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे. भूक न लागणे. वजन कमी होणे. व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे. निद्रानाश व्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे. अस्वस्थता, मानसिक आजार होणे.  इम्युनिटी ठेवा मजबूत, व्यायाम करा टाइट  तरच कोरोनाशी फाईट; डॉक्टर म्हणतात हे करा आणि वाढवा इम्युनिटी आपल्या मुलांना असे ठेवा ड्रग्सपासून दूर  पालकांनी आपल्या पाल्याला समजून घ्यावे. त्याच्याशी प्रेमाने वागा. त्यांना विश्वासात घ्या. काय वाईट..काय चांगले हे गोडीने व मित्रत्वाच्या नात्याने पटवून द्या. वाईट मित्रांची संगत करू देऊ नका. शिक्षकांचे हुशार मुलांबरोबर कमी मार्क्स असलेल्या मुलाकडेही तितकेच लक्ष हवे. कोणत्याही मुलाला कमी लेखू नका. मुलांवर वेळीच औषधोपचार मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्या.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 12, 2020

'ड्रग्स' म्हणजे नक्की असतं तरी काय? काय असतात ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे.. वाचा आणि आपल्या मुलांना असं ठेवा सुरक्षित    नागपूर: गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून आपल्या कानावर सतत काही शब्दांचा वर्षाव सुरु आहे. त्यापैकी काही मुख्य शब्द म्हणजे कोरोना, आत्महत्या आणि त्याहूनही मोठा शब्द म्हणजे ड्रग्स. हा शब्द आपण या आधी ऐकलाच नव्हता असं नाही मात्र गेल्या काही दिवसात सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाने ड्रग्स घेणाऱ्यांची आणि विक्री करणाऱ्यांची झोप उडवली आहे. पण हे ड्रग्स नक्की असतात तरी काय? कोणत्या पद्धतीने ड्रग्स घेतले जातात? आणि त्यावरील उपाय याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.   ड्रग्स म्हणजे नक्की काय?  भारतात तरुणांमध्ये ड्रग्स घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस (हशिश) या पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो.  ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालवर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते.  स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जातो. अति शौकीन लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा (मेफेड्रॉन) वापर करतात. इतकेच नाही तर मॅजिक मश्रूम, एलसीडी, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर यांचाही वापर ड्रग्स म्हणून केला जातो. ठळक बातमी - काय सांगता! नागपुरातील या तलावातून होतो चक्क एका मोठ्या नदीचा उगम; जाणून घ्या काय काय आहे इतिहास या देशांतून होतो पुरवठा  शेजारील देशातून म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान इथून ड्रग्स आपल्या देशात येतात. याची किंमतही लाखो- करोडो रूपयात असते. याची खरेदी - विक्रीही सांकेतिक भाषेत म्हणजेच खुणांच्या माध्यमातून होते. ‘हशीश’सारखे अंमली पदार्थ नेपाळमधून पुरवले जातात. नायजेरियामधून भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. नायजेरियन विद्यार्थी वा कपड्यांचे व्यापारी या माध्यमातून ही तस्करी केली जाते.  हे आहेत ड्रग्स घेणाऱ्यांची लक्षणे  मुलांच्या वागण्यात अचानक बदल होतो. अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्याचे मन न लागणे. घरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे. डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे. बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे. भूक न लागणे. वजन कमी होणे. व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे. निद्रानाश व्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे. अस्वस्थता, मानसिक आजार होणे.  इम्युनिटी ठेवा मजबूत, व्यायाम करा टाइट  तरच कोरोनाशी फाईट; डॉक्टर म्हणतात हे करा आणि वाढवा इम्युनिटी आपल्या मुलांना असे ठेवा ड्रग्सपासून दूर  पालकांनी आपल्या पाल्याला समजून घ्यावे. त्याच्याशी प्रेमाने वागा. त्यांना विश्वासात घ्या. काय वाईट..काय चांगले हे गोडीने व मित्रत्वाच्या नात्याने पटवून द्या. वाईट मित्रांची संगत करू देऊ नका. शिक्षकांचे हुशार मुलांबरोबर कमी मार्क्स असलेल्या मुलाकडेही तितकेच लक्ष हवे. कोणत्याही मुलाला कमी लेखू नका. मुलांवर वेळीच औषधोपचार मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्या.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33qH443

No comments:

Post a Comment