ध्रुवतारा गुरूजी नाहीत‌ यावर अजूनही विश्वास बसत नाही. ते माझे दैवत होते. जेव्हा जेव्हा गातो,‌ त्यावेळी ते मला आठवत. आमच्यातील नातं हे आत्मिक होते. आमचं नातं खूप घट्ट होतं. गुरूजींनी चार-पाच‌ दशकं‌ रसिकांना आनंद दिला आणि या काळातील गायकांना देखील खूप दिले. त्यामुळे शतकातील एक अनमोल कलावंत होते. त्यांची जागा भरून काढणारं ते असतानाही कुणी नव्हतं. आताही ती जागा कुणी भरून काढू शकणार नाही. अशी कलावंत आपली जागा निर्माण करतात आणि ती ध्रुव ताऱ्यासारखी तशीच अढळ राहते. वयाच्या नव्वदीतही ते रसिकांना स्टेजवर हवे होते, हाही इतिहास त्यांनी रचला. एक अतिशय लोभस आणि सर्वांना मोहून टाकणारी त्यांची‌ गायकी होती. गायन क्षेत्रात बौद्धिक आणि लालित्यपूर्ण गायकी एकावेळी एका व्यक्तीत असणे अवघड असते. गुरुजींकडे दोन्ही होते. त्यामुळेच ते असामान्य असे होते. ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन मी तेरा वर्षांचा असल्यापासून त्यांच्याकडे शिकू लागलो. त्यापूर्वी लहान वयातच दीड तासांची मैफली करू लागलो होतो. त्यांच्याकडे गेलो त्यावेळी ते म्हणाले की हा तिसऱ्या जन्मातील गातो आहे. आधीचे दोन जन्म त्याचं‌ गाऊन झाले आहे. त्यामुळे तो पूर्णवेळ गायक होणार असेल, तर मी त्याला शिकवेन. आता तुम्ही पालकांनी ठरवायचे की त्याला इंजिनिअर करायचे की गायक. आई-बाबांनी आधी ठरवलेच होते की गुरूजी शिकविणार असतील, तर पूर्णवेळ गाणं करू द्यायचं. मग प्रवास सुरू झाला. त्यावेळी आई-बाबांना त्यांनी सांगितले होते की आता तुम्ही त्याची काळजी करू नका. कारण मी जिथे जाईल, तिथे हा असेल. मी घरी असलो, ‌तर तो घरी असेल. दिल्लीत मैफलीत गात असेल, तर तो माझ्याबरोबर असेल. ते एक जबाबदार गुरू होते. एकदा जबाबदार स्वीकारली, तर पार पाडत. मी सर्व सोडून गायन करतो म्हणून त्यांच्या नेहमी बरोबर असायचो. असे करीत त्यांच्या चारशे मैफलींना मी स्वरसाथ केली आहे. त्यांच्याकडून मला बौद्धिक आणि आत्मिक ताकद त्यांच्याकडून मिळत‌ राहिले. ते लोभस, सर्वांना हवेहवे वाटायचे, दिलखुलास एक सच्चा कलाकार होते. त्यामुळे त्यांनी माणसे‌ खूप जोडली. एखाद्या शिष्याने साथ करताना चांगले गायले, तर ते ‘जियो बेटा’ म्हणायचे. मला तर ही दाद मोठ्या पुरस्कारासारखीच वाटायची. मला त्यांचा ३८ वर्षे सहवास लाभला. मी‌ दहा वर्षे त्यांच्याबरोबर पूर्णवेळ राहिलो. ते संगीतातील माझे वडीलच होते. माझ्या गाण्यात संजीव अभ्यंकर दिसला, तरी त्या‌वेळी गुरूजींची आठवण येणारच. ती आली नाही, तर मला त्यांच्याकडून काही घेता आले नाही.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा त्यांच्या‌ दोन ह्रद्य आठवणी मला सांगाव्याशा वाटतात. ग्वाल्हेरला तानसेन संगीत महोत्सव‌ होतो. १९८७ मधील गोष्ट आहे. मी‌ त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळी गुरुजी विमानाने जात आणि आम्ही रेल्वेने जात. कारण विमानाची तिकिटे तेव्हा खूप महाग असत. तसं‌ आम्ही ग्वाल्हेरला गेलो. त्या महोत्सवात गुरूजी कलावती गायले. त्यावेळी माझी‌ स्वरसाथ इतकी चांगली झाली की आयोजक गुरुजींना म्हणाले, ‘संजीव को हम गिफ्ट देना चाहते है!’ त्यावर गुरुजी म्हणाले, ''फिर उसका प्लेन का तिकिट दे दो मेरे साथ.'' आयोजकांनी कसलाच विचार न करता मला विमानाचे‌ तिकिट दिले आणि मी गुरूजींबरोबर आलो. पुण्यात २८ जानेवारी १९९० मध्ये‌ गुरुजींचा षठ्यब्दीपूर्ती सोहळा झाला. त्यासाठी पं. भीमसेन जोशी, पं. रवीशंकर, पं. बालमुरली कृष्ण, पं. शिवकुमार शर्मा असे अनेक दिग्गज कलाकार होते. माझे गायनही होते. माझ्यानंतर शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर‌ हुसेन मंचावर येणार होते. त्या कार्यक्रमात टिळक स्मारकमध्ये माझे गायन झाले आणि गुरुजी स्टेजवर आले आणि मला मिठी मारली. माझ्यासाठी केवढी मोठी दाद होती. त्यांचे असे अनेक अनुभव माझ्याबरोबर संचित म्हणून आहेत. पण आता‌‌ ते नाहीत हे पचविणे फार कठीण आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 17, 2020

ध्रुवतारा गुरूजी नाहीत‌ यावर अजूनही विश्वास बसत नाही. ते माझे दैवत होते. जेव्हा जेव्हा गातो,‌ त्यावेळी ते मला आठवत. आमच्यातील नातं हे आत्मिक होते. आमचं नातं खूप घट्ट होतं. गुरूजींनी चार-पाच‌ दशकं‌ रसिकांना आनंद दिला आणि या काळातील गायकांना देखील खूप दिले. त्यामुळे शतकातील एक अनमोल कलावंत होते. त्यांची जागा भरून काढणारं ते असतानाही कुणी नव्हतं. आताही ती जागा कुणी भरून काढू शकणार नाही. अशी कलावंत आपली जागा निर्माण करतात आणि ती ध्रुव ताऱ्यासारखी तशीच अढळ राहते. वयाच्या नव्वदीतही ते रसिकांना स्टेजवर हवे होते, हाही इतिहास त्यांनी रचला. एक अतिशय लोभस आणि सर्वांना मोहून टाकणारी त्यांची‌ गायकी होती. गायन क्षेत्रात बौद्धिक आणि लालित्यपूर्ण गायकी एकावेळी एका व्यक्तीत असणे अवघड असते. गुरुजींकडे दोन्ही होते. त्यामुळेच ते असामान्य असे होते. ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन मी तेरा वर्षांचा असल्यापासून त्यांच्याकडे शिकू लागलो. त्यापूर्वी लहान वयातच दीड तासांची मैफली करू लागलो होतो. त्यांच्याकडे गेलो त्यावेळी ते म्हणाले की हा तिसऱ्या जन्मातील गातो आहे. आधीचे दोन जन्म त्याचं‌ गाऊन झाले आहे. त्यामुळे तो पूर्णवेळ गायक होणार असेल, तर मी त्याला शिकवेन. आता तुम्ही पालकांनी ठरवायचे की त्याला इंजिनिअर करायचे की गायक. आई-बाबांनी आधी ठरवलेच होते की गुरूजी शिकविणार असतील, तर पूर्णवेळ गाणं करू द्यायचं. मग प्रवास सुरू झाला. त्यावेळी आई-बाबांना त्यांनी सांगितले होते की आता तुम्ही त्याची काळजी करू नका. कारण मी जिथे जाईल, तिथे हा असेल. मी घरी असलो, ‌तर तो घरी असेल. दिल्लीत मैफलीत गात असेल, तर तो माझ्याबरोबर असेल. ते एक जबाबदार गुरू होते. एकदा जबाबदार स्वीकारली, तर पार पाडत. मी सर्व सोडून गायन करतो म्हणून त्यांच्या नेहमी बरोबर असायचो. असे करीत त्यांच्या चारशे मैफलींना मी स्वरसाथ केली आहे. त्यांच्याकडून मला बौद्धिक आणि आत्मिक ताकद त्यांच्याकडून मिळत‌ राहिले. ते लोभस, सर्वांना हवेहवे वाटायचे, दिलखुलास एक सच्चा कलाकार होते. त्यामुळे त्यांनी माणसे‌ खूप जोडली. एखाद्या शिष्याने साथ करताना चांगले गायले, तर ते ‘जियो बेटा’ म्हणायचे. मला तर ही दाद मोठ्या पुरस्कारासारखीच वाटायची. मला त्यांचा ३८ वर्षे सहवास लाभला. मी‌ दहा वर्षे त्यांच्याबरोबर पूर्णवेळ राहिलो. ते संगीतातील माझे वडीलच होते. माझ्या गाण्यात संजीव अभ्यंकर दिसला, तरी त्या‌वेळी गुरूजींची आठवण येणारच. ती आली नाही, तर मला त्यांच्याकडून काही घेता आले नाही.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा त्यांच्या‌ दोन ह्रद्य आठवणी मला सांगाव्याशा वाटतात. ग्वाल्हेरला तानसेन संगीत महोत्सव‌ होतो. १९८७ मधील गोष्ट आहे. मी‌ त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळी गुरुजी विमानाने जात आणि आम्ही रेल्वेने जात. कारण विमानाची तिकिटे तेव्हा खूप महाग असत. तसं‌ आम्ही ग्वाल्हेरला गेलो. त्या महोत्सवात गुरूजी कलावती गायले. त्यावेळी माझी‌ स्वरसाथ इतकी चांगली झाली की आयोजक गुरुजींना म्हणाले, ‘संजीव को हम गिफ्ट देना चाहते है!’ त्यावर गुरुजी म्हणाले, ''फिर उसका प्लेन का तिकिट दे दो मेरे साथ.'' आयोजकांनी कसलाच विचार न करता मला विमानाचे‌ तिकिट दिले आणि मी गुरूजींबरोबर आलो. पुण्यात २८ जानेवारी १९९० मध्ये‌ गुरुजींचा षठ्यब्दीपूर्ती सोहळा झाला. त्यासाठी पं. भीमसेन जोशी, पं. रवीशंकर, पं. बालमुरली कृष्ण, पं. शिवकुमार शर्मा असे अनेक दिग्गज कलाकार होते. माझे गायनही होते. माझ्यानंतर शिवकुमार शर्मा आणि उस्ताद झाकीर‌ हुसेन मंचावर येणार होते. त्या कार्यक्रमात टिळक स्मारकमध्ये माझे गायन झाले आणि गुरुजी स्टेजवर आले आणि मला मिठी मारली. माझ्यासाठी केवढी मोठी दाद होती. त्यांचे असे अनेक अनुभव माझ्याबरोबर संचित म्हणून आहेत. पण आता‌‌ ते नाहीत हे पचविणे फार कठीण आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iQMKKO

No comments:

Post a Comment