लेक व्ह्यू लॉज, ताजबागला न चुकता हजेरी,  नागपुरातील या कुटुंबीयांशी होते पंडित जसराज यांचे ऋणानुबंध नागपूर : संगीतमार्तंड पंडित जसराज यांचे नागपुरातील प्रसिद्ध लेक व्ह्यू लॉज आणि वझलवार कुटुंबीयांशी ६० च्या दशकात जुळलेले ऋणानुबंध उत्तरोत्तर वृद्धींगत होत गेले आणि मग पंडितजी वझलवार कुटुंबाचे सदस्यच झाले. नागपुरात आले की ‘जय हो‘ म्हणत त्यांची स्वारी लेक व्ह्यू लॉजमध्ये दाखल व्हायची आणि मग दोन-तीन दिवस हा सारा परिसर भारलेला राहायचा. पुढे याच कुटुंबातील गिरीश वझलवार हे त्यांचे पट्टशिष्य बनले आणि हे कौटुंबिक नाते अधिक गहिरे झाले. नागपुरात बाबासाहेब उत्तरवार यांनी स्थापन केलेल्या ‘स्वरसाधना‘ या संस्थेतर्फे आयोजित मैफलीसाठी पंडितजी १९६४ मध्ये नागपुरात आले होते. तेव्हा गाण्याच्या मैफलींचे आयोजन करणारी ही एकमेव संस्था होती. अण्णाजी वझलवार हे या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. अण्णाजींनी त्यांना लेक व्ह्यू लॉजमध्ये आणले आणि तेव्हापासून पंडितजी नागपुरात आले की त्यांचे वास्तव्य येथेच असायचे.  लेक व्ह्यू लॉजमध्ये हीराबाई बडोदेकर, वसंतराव देशपांडे, शंकर-शंभू कव्वाल यांच्यासारखे मातब्बर कलावंत वास्तव्यास असायचे. त्यात पंडितजींची भर पडली. लॉजमध्ये दुसऱ्या मजल्यावर गायक-वादकांसाठी एक वेगळी खोलीच तयार करण्यात आली होती. तेथे रियाज चालायचा. पंडितजींचे वास्तव्य लॉजमध्ये असले तरी वझलवार यांच्या घरी जेवायला यायचे. तिखट नसलेले साधे जेवण पंडितजींना आवडायचे. दुधाचे पदार्थ त्यांना विशेष आवडायचे, असे महेश वझलवार यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले. अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा   पंडितजींचे पट्टशिष्य गिरीश वझलवार यांचे बंधू महेश वझलवार व काही सहकाऱ्यांनी अंदाजे ३० वर्षांपूर्वी ‘नादब्रम्ह' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्‍घाटन पंडितजींच्या हस्ते सीताबर्डीवरील मातृ सेवा संघाच्या सभागृहात झाले होते. काही घरगुती मैफलींमध्ये महेश वझलवार यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत विभागात असलेले महेश हे मुंबईला राजभवन येथे वास्तव्यास असताना तेथेही पंडितजी यायचे.  तसेच गिरीश वझलवार यांच्या भगिनी नंदिनी बल्लाळ यांच्याशी पंडितजींचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. मुंबईत बल्लाळ यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवात पंडितजी गायला यायचे. त्यांचे आमच्या कुटुंबाशी असलेले संबंध ही आमच्यासाठी देवाने दिलेली मौल्यवान भेट होती. ते केवळ शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील गुरू नव्हते तर जीवन शिक्षण देणारेही गुरू होते, अशा शब्दात दामोदर बल्लाळ यांनी पंडितजींना श्रद्धांजली अर्पण केली.   ताजबागला नियमित जायचे पंडितजी नागपुरात आले की मोठा ताजबाग येथे न चुकता हजेरी लावायचेच. एक-दोनदा त्यांच्यासोबत पंचवटी वृद्धाश्रमात गेल्याची आठवण महेश वझलवार यांनी सांगितली. पंडितजींना क्रिकेटची फार आवड होती. मुंबईत शिवाजी पार्कजवळच्या राजकमल इमारतीत ते राहायचे त्या घराला छोटी गच्ची होती. तेथे ते चंद्रशेखर स्वामी, गिरीश वझलवार, परेश नायक या शिष्यांसोबत टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचे, अशीही आठवण त्यांनी सांगितली. असून, पिकांचीही स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे यंदा बंपर पीक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 17, 2020

लेक व्ह्यू लॉज, ताजबागला न चुकता हजेरी,  नागपुरातील या कुटुंबीयांशी होते पंडित जसराज यांचे ऋणानुबंध नागपूर : संगीतमार्तंड पंडित जसराज यांचे नागपुरातील प्रसिद्ध लेक व्ह्यू लॉज आणि वझलवार कुटुंबीयांशी ६० च्या दशकात जुळलेले ऋणानुबंध उत्तरोत्तर वृद्धींगत होत गेले आणि मग पंडितजी वझलवार कुटुंबाचे सदस्यच झाले. नागपुरात आले की ‘जय हो‘ म्हणत त्यांची स्वारी लेक व्ह्यू लॉजमध्ये दाखल व्हायची आणि मग दोन-तीन दिवस हा सारा परिसर भारलेला राहायचा. पुढे याच कुटुंबातील गिरीश वझलवार हे त्यांचे पट्टशिष्य बनले आणि हे कौटुंबिक नाते अधिक गहिरे झाले. नागपुरात बाबासाहेब उत्तरवार यांनी स्थापन केलेल्या ‘स्वरसाधना‘ या संस्थेतर्फे आयोजित मैफलीसाठी पंडितजी १९६४ मध्ये नागपुरात आले होते. तेव्हा गाण्याच्या मैफलींचे आयोजन करणारी ही एकमेव संस्था होती. अण्णाजी वझलवार हे या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. अण्णाजींनी त्यांना लेक व्ह्यू लॉजमध्ये आणले आणि तेव्हापासून पंडितजी नागपुरात आले की त्यांचे वास्तव्य येथेच असायचे.  लेक व्ह्यू लॉजमध्ये हीराबाई बडोदेकर, वसंतराव देशपांडे, शंकर-शंभू कव्वाल यांच्यासारखे मातब्बर कलावंत वास्तव्यास असायचे. त्यात पंडितजींची भर पडली. लॉजमध्ये दुसऱ्या मजल्यावर गायक-वादकांसाठी एक वेगळी खोलीच तयार करण्यात आली होती. तेथे रियाज चालायचा. पंडितजींचे वास्तव्य लॉजमध्ये असले तरी वझलवार यांच्या घरी जेवायला यायचे. तिखट नसलेले साधे जेवण पंडितजींना आवडायचे. दुधाचे पदार्थ त्यांना विशेष आवडायचे, असे महेश वझलवार यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले. अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा   पंडितजींचे पट्टशिष्य गिरीश वझलवार यांचे बंधू महेश वझलवार व काही सहकाऱ्यांनी अंदाजे ३० वर्षांपूर्वी ‘नादब्रम्ह' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्‍घाटन पंडितजींच्या हस्ते सीताबर्डीवरील मातृ सेवा संघाच्या सभागृहात झाले होते. काही घरगुती मैफलींमध्ये महेश वझलवार यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत विभागात असलेले महेश हे मुंबईला राजभवन येथे वास्तव्यास असताना तेथेही पंडितजी यायचे.  तसेच गिरीश वझलवार यांच्या भगिनी नंदिनी बल्लाळ यांच्याशी पंडितजींचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. मुंबईत बल्लाळ यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवात पंडितजी गायला यायचे. त्यांचे आमच्या कुटुंबाशी असलेले संबंध ही आमच्यासाठी देवाने दिलेली मौल्यवान भेट होती. ते केवळ शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील गुरू नव्हते तर जीवन शिक्षण देणारेही गुरू होते, अशा शब्दात दामोदर बल्लाळ यांनी पंडितजींना श्रद्धांजली अर्पण केली.   ताजबागला नियमित जायचे पंडितजी नागपुरात आले की मोठा ताजबाग येथे न चुकता हजेरी लावायचेच. एक-दोनदा त्यांच्यासोबत पंचवटी वृद्धाश्रमात गेल्याची आठवण महेश वझलवार यांनी सांगितली. पंडितजींना क्रिकेटची फार आवड होती. मुंबईत शिवाजी पार्कजवळच्या राजकमल इमारतीत ते राहायचे त्या घराला छोटी गच्ची होती. तेथे ते चंद्रशेखर स्वामी, गिरीश वझलवार, परेश नायक या शिष्यांसोबत टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचे, अशीही आठवण त्यांनी सांगितली. असून, पिकांचीही स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे यंदा बंपर पीक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iQNMGG

No comments:

Post a Comment