शिवकालीन वस्तू पाहून डोळ्यांसमोर तरळतो रोमांचकारी इतिहास  औरंगाबाद : छत्रपती शिवरायांचे नाव घेतले तरी त्यांचा अवघा इतिहास लगेच डोळ्यांसमोर उभा राहतो. चारशे वर्षे होऊन गेले तरी जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि तारे आहेत, तोपर्यंत हा इतिहास पुसला जाणार नाही. त्यांच्या आठवणीबरोबरच इतिहास नवीन पिढीसमोर यावा, यासाठी रमेश रुणवाल यांनी गेल्या तीस वर्षांपासून शिवकालीन वस्तूंचा संग्रह करून शिवरायांचा इतिहास आणि आठवणी जतन केल्या आहेत. या वस्तू स्फूर्ती देतात शिवाय त्या आपले सांस्कृतिक संचितही आहेत.  हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   शिवराज्याभिषेक उत्सवदिनाच्या (सहा जून) निमित्ताने सर्वत्र शिवकालीन वस्तूंबद्दल दिवसभर सोशल मीडियावर चर्चा होईल. याशिवाय अलौकिक आनंद आणि मनःशांतीसाठी छंद जोपासणारे अनेक आहेत. त्यातीलच एक म्हणजे रमेश मोतीलाल रुणवाल. अगदी विद्यार्थी जीवनापासूनच त्यांना प्राचीन नाणी जमा करण्याचा छंद जडला. आज त्यांच्याजवळ अगदी ऋग्वेद काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत हजारो नाणी त्यांच्या संग्रहातून प्राचीन भारतीय इतिहासाचा संपन्न काळ मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक संस्कृती संवर्धन आणि लोकसंग्रह या दोन गोष्टींतून त्यांचे जीवन अद्भुत चमत्कारांनी भरलेले असते. रुणवाल यांचे जीवन असेच आहे. त्यांच्या संग्रहातील प्रत्येक दुर्मिळ नाणे हे इतिहास सांगतात. आपल्या या संग्रहाविषयी ते सांगतात, की औरंगाबादपासून जवळ असलेल्या जुन्या सावखेड्यात आमची शेती. गावाजवळ गोदावरी वाहते. गोदाकाठी प्राचीन नृसिंह मंदिर असून विद्यार्थी जीवनात नरसिंह मंदिराच्या उत्सवानिमित्ताने नदीत स्नानासाठी जात असताना एक तांब्याचे नाणे सापडले. हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..  ते त्यांनी काकांना, शिक्षकांना दाखविले असता ते नाणे होते सातवाहनांचे. गोदाकाठ ही सातवाहनांची भूमी. त्या नाण्याने त्यांच्या जीवनात एक नवा चमत्कार घडविला.  दुर्मिळ नाणी, शिक्के, पुरातन वस्तूंचे संचित अमूल्य बनले असून, पुरातन वस्तूंचे महत्त्व सांगणारा हा खजिना वृद्धिंगत करून जतन करण्यासाठी कुणी काही मदत करू शकतील का, असा प्रश्‍नही ते उपस्थित करतात. हजारो दुर्मिळ नाणी, शिक्के, चलन वेगवेगळ्या धातूंच्या अत्यंत दुर्मिळ, आकर्षक, पारंपरिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मूर्ती रुणवाल यांच्याकडे आहेत. जवळपास सर्व धातूंच्या नाण्यांचा समावेश आहे. हा साठा सातत्याने वाढत असून, या वस्तू सांभाळायच्या कशा, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   तीस वर्षांपासून त्यांना हा छंद जडला. आज त्यांना या वस्तू किंबहुना हा ठेवा ठेवायला जागा नाही. त्याची देखभाल करायला वेळ आणि पैसा पुरत नाही, अशा स्थितीत त्यांना एक ना अनेक ठिकाणाहून मित्र हा दुर्मिळ वस्तू आणून देतात, तर ते स्वतःही भंगारच्या बाजारात जाऊन असा ठेवा जमा करतात. त्यांच्याकडे आज सातवाहन, मोगल, मराठा, पेशवे, निजाम, ब्रिटिशकालीन नाणी व नोटा आहेत. ही नाणी गोळा करता करता त्यांना जुन्या दुर्मिळ मूर्ती, वस्तू, अवजारे, उपकरणे, शिल्पही मिळू लागले. महिलांच्या पायातील वजनदार कडे त्यांच्याकडे आहेत.  हेही वाचा : लाॅकडाऊन हटवताना अशी घ्यावी काळजी - डाॅ. अजित भागवत आपला चहापत्तीचा व्यवसाय सांभाळत त्यांनी यासाठी वेळ दिला आहे. अनेक जणांनी त्यांना या खजिन्यातून खूप पैसा करायचा सल्ला दिला. हा सल्ला मानला असता तर माझ्याकडे खूप पैसा आला असता; पण हे आपले संचित आपल्या देशाबाहेर गेले असते. नवीन पिढीला शिवरायांचा इतिहास माहिती व्हावा, यासाठी मी हा इतिहास जपला आहे, असे ते सांगतात.  तलवारी अन् बंदूकही  शिवरायांच्या काळात लढाईसाठी वापरलेल्या तीन प्रकारच्या तलवारी संग्रहात आहेत. साडेतीनशे वर्षांपूर्वीची बंदूक आहे. त्याकाळी बंदुकीत गोळ्या नव्हत्या. गोळ्यांऐवजी भरमार दारूगोळा भरून लढाईमध्ये याचा वापर केला जात होता. याशिवाय शिवाजी महाराजांच्या काळात जीवनशैली कशी होती, कुठल्या प्रकारची भांडी वापरली जायची, याचे महत्त्व आणि इतिहास सांगणाऱ्या वस्तूही त्यांनी जतन केल्या आहेत. शिवरायांचा इतिहास हा अनमोल ठेवा आहे. शिवकालीन वस्तूंमध्ये गरुडावर बसलेले विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी, बालाजीची मूर्ती; तसेच शिवकालीन दीपलक्ष्मीचा समावेश आहे. याशिवाय महादेवाची पिंड, नंदी याचाही समावेश संग्रहात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 5, 2020

शिवकालीन वस्तू पाहून डोळ्यांसमोर तरळतो रोमांचकारी इतिहास  औरंगाबाद : छत्रपती शिवरायांचे नाव घेतले तरी त्यांचा अवघा इतिहास लगेच डोळ्यांसमोर उभा राहतो. चारशे वर्षे होऊन गेले तरी जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि तारे आहेत, तोपर्यंत हा इतिहास पुसला जाणार नाही. त्यांच्या आठवणीबरोबरच इतिहास नवीन पिढीसमोर यावा, यासाठी रमेश रुणवाल यांनी गेल्या तीस वर्षांपासून शिवकालीन वस्तूंचा संग्रह करून शिवरायांचा इतिहास आणि आठवणी जतन केल्या आहेत. या वस्तू स्फूर्ती देतात शिवाय त्या आपले सांस्कृतिक संचितही आहेत.  हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   शिवराज्याभिषेक उत्सवदिनाच्या (सहा जून) निमित्ताने सर्वत्र शिवकालीन वस्तूंबद्दल दिवसभर सोशल मीडियावर चर्चा होईल. याशिवाय अलौकिक आनंद आणि मनःशांतीसाठी छंद जोपासणारे अनेक आहेत. त्यातीलच एक म्हणजे रमेश मोतीलाल रुणवाल. अगदी विद्यार्थी जीवनापासूनच त्यांना प्राचीन नाणी जमा करण्याचा छंद जडला. आज त्यांच्याजवळ अगदी ऋग्वेद काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत हजारो नाणी त्यांच्या संग्रहातून प्राचीन भारतीय इतिहासाचा संपन्न काळ मोठ्या अभिमानाने सांगत आहेत. हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक संस्कृती संवर्धन आणि लोकसंग्रह या दोन गोष्टींतून त्यांचे जीवन अद्भुत चमत्कारांनी भरलेले असते. रुणवाल यांचे जीवन असेच आहे. त्यांच्या संग्रहातील प्रत्येक दुर्मिळ नाणे हे इतिहास सांगतात. आपल्या या संग्रहाविषयी ते सांगतात, की औरंगाबादपासून जवळ असलेल्या जुन्या सावखेड्यात आमची शेती. गावाजवळ गोदावरी वाहते. गोदाकाठी प्राचीन नृसिंह मंदिर असून विद्यार्थी जीवनात नरसिंह मंदिराच्या उत्सवानिमित्ताने नदीत स्नानासाठी जात असताना एक तांब्याचे नाणे सापडले. हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..  ते त्यांनी काकांना, शिक्षकांना दाखविले असता ते नाणे होते सातवाहनांचे. गोदाकाठ ही सातवाहनांची भूमी. त्या नाण्याने त्यांच्या जीवनात एक नवा चमत्कार घडविला.  दुर्मिळ नाणी, शिक्के, पुरातन वस्तूंचे संचित अमूल्य बनले असून, पुरातन वस्तूंचे महत्त्व सांगणारा हा खजिना वृद्धिंगत करून जतन करण्यासाठी कुणी काही मदत करू शकतील का, असा प्रश्‍नही ते उपस्थित करतात. हजारो दुर्मिळ नाणी, शिक्के, चलन वेगवेगळ्या धातूंच्या अत्यंत दुर्मिळ, आकर्षक, पारंपरिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मूर्ती रुणवाल यांच्याकडे आहेत. जवळपास सर्व धातूंच्या नाण्यांचा समावेश आहे. हा साठा सातत्याने वाढत असून, या वस्तू सांभाळायच्या कशा, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   तीस वर्षांपासून त्यांना हा छंद जडला. आज त्यांना या वस्तू किंबहुना हा ठेवा ठेवायला जागा नाही. त्याची देखभाल करायला वेळ आणि पैसा पुरत नाही, अशा स्थितीत त्यांना एक ना अनेक ठिकाणाहून मित्र हा दुर्मिळ वस्तू आणून देतात, तर ते स्वतःही भंगारच्या बाजारात जाऊन असा ठेवा जमा करतात. त्यांच्याकडे आज सातवाहन, मोगल, मराठा, पेशवे, निजाम, ब्रिटिशकालीन नाणी व नोटा आहेत. ही नाणी गोळा करता करता त्यांना जुन्या दुर्मिळ मूर्ती, वस्तू, अवजारे, उपकरणे, शिल्पही मिळू लागले. महिलांच्या पायातील वजनदार कडे त्यांच्याकडे आहेत.  हेही वाचा : लाॅकडाऊन हटवताना अशी घ्यावी काळजी - डाॅ. अजित भागवत आपला चहापत्तीचा व्यवसाय सांभाळत त्यांनी यासाठी वेळ दिला आहे. अनेक जणांनी त्यांना या खजिन्यातून खूप पैसा करायचा सल्ला दिला. हा सल्ला मानला असता तर माझ्याकडे खूप पैसा आला असता; पण हे आपले संचित आपल्या देशाबाहेर गेले असते. नवीन पिढीला शिवरायांचा इतिहास माहिती व्हावा, यासाठी मी हा इतिहास जपला आहे, असे ते सांगतात.  तलवारी अन् बंदूकही  शिवरायांच्या काळात लढाईसाठी वापरलेल्या तीन प्रकारच्या तलवारी संग्रहात आहेत. साडेतीनशे वर्षांपूर्वीची बंदूक आहे. त्याकाळी बंदुकीत गोळ्या नव्हत्या. गोळ्यांऐवजी भरमार दारूगोळा भरून लढाईमध्ये याचा वापर केला जात होता. याशिवाय शिवाजी महाराजांच्या काळात जीवनशैली कशी होती, कुठल्या प्रकारची भांडी वापरली जायची, याचे महत्त्व आणि इतिहास सांगणाऱ्या वस्तूही त्यांनी जतन केल्या आहेत. शिवरायांचा इतिहास हा अनमोल ठेवा आहे. शिवकालीन वस्तूंमध्ये गरुडावर बसलेले विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी, बालाजीची मूर्ती; तसेच शिवकालीन दीपलक्ष्मीचा समावेश आहे. याशिवाय महादेवाची पिंड, नंदी याचाही समावेश संग्रहात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3eVK1xP

No comments:

Post a Comment