पिंपरी-चिंचवडमध्ये वादळ अंगावर झेलत तीन दिवस लढले अग्निशमन दलाचे लढवय्ये! पिंपरी :  गेल्यावर्षी पुराचं भयानक संकट अनुभवलं. पण यावर्षी वादळ, सोसाट्याचा वारा, उन्मळून पडलेली मोठमोठी झाडं आणि पावसाचा तडाखा आम्ही अनुभवतोय. एकीकडं विजांच्या तारा अंगावर झेलतोय, तर दुसरीकडे फांद्या तोडून हात बधिर झाले. मात्र, न डगमगता काम करतोय. हेच आमचं कर्तव्य आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      हे अनुभव सांगतायेत पिंपरीतील अग्निशमन दलाचे जवान. सलग दहा ते बारा तास दिवसभर झाड पडल्याचे कॉल सुरू होते. एक वर्दी झाली, की दुसरी वर्दी लगेच लागत होती. त्यातही दिवसभर पाण्यात. काही परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवत जवानांना चहा दिला. दिवसपाळीनंतर लगेचच रात्रपाळीत सलग १६ तास  जवानांना काम करावे लागले आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या पिंपरी-चिंचवडच्या पाच उपअग्निशमन केंद्रात मिळून १२५ जवान आहेत. ही संख्या शहरासाठी नगण्य आहे. त्यामुळे वर्दीची संख्या जास्त आणि मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तरीही सलग तिसऱ्या दिवशी (ता. ५) जवानांचे काम सुरू आहे. अजूनही रस्त्यावरील रहदारी सुरळीत केली जात आहे. आजही मोडकळीस आलेल्या झाडांचे 20 ते 25 कॉल होते. त्यामुळे सलग तीन दिवस जवान अहोरात्र काम करत आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  काही ठिकाणी नागरिकांनी असहकार्य दाखविल्याने जवानांना मनस्ताप सहन करावा लागला. झाडे काढताना नागरिकांनी जवानांना अरेरावी केली. दुसरी वर्दी असल्याने बहुतांश नागरिकांनी पडलेले झाड लगेच हटविण्यात यावे असा हट्ट धरला. दुसऱ्या वर्दीवर जाण्यासाठी त्यामुळे जवानांना विलंब झाला. बाचाबाची करण्याची वेळ जवानांवर आली. तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून फांद्या हटविण्यासाठी मदत केली. जीवितहानी कुठे झाली नसल्याचे समाधान जवानांनी व्यक्त केले. जवानांना ही होती धाकधूक फांद्या अंगावर पडण्याची भीती विजेचा खांब कोसळण्याची भीती इलेक्ट्रिक स्वा मशीन (जाड फांद्या कापण्याचे मशीन )बंद पडल्याने फांद्या कापण्याची कसरत स्थानिक नागरिकांचे हद्दीवरून असहकार्य News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 5, 2020

पिंपरी-चिंचवडमध्ये वादळ अंगावर झेलत तीन दिवस लढले अग्निशमन दलाचे लढवय्ये! पिंपरी :  गेल्यावर्षी पुराचं भयानक संकट अनुभवलं. पण यावर्षी वादळ, सोसाट्याचा वारा, उन्मळून पडलेली मोठमोठी झाडं आणि पावसाचा तडाखा आम्ही अनुभवतोय. एकीकडं विजांच्या तारा अंगावर झेलतोय, तर दुसरीकडे फांद्या तोडून हात बधिर झाले. मात्र, न डगमगता काम करतोय. हेच आमचं कर्तव्य आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      हे अनुभव सांगतायेत पिंपरीतील अग्निशमन दलाचे जवान. सलग दहा ते बारा तास दिवसभर झाड पडल्याचे कॉल सुरू होते. एक वर्दी झाली, की दुसरी वर्दी लगेच लागत होती. त्यातही दिवसभर पाण्यात. काही परिसरातील नागरिकांनी माणुसकी दाखवत जवानांना चहा दिला. दिवसपाळीनंतर लगेचच रात्रपाळीत सलग १६ तास  जवानांना काम करावे लागले आहे. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या पिंपरी-चिंचवडच्या पाच उपअग्निशमन केंद्रात मिळून १२५ जवान आहेत. ही संख्या शहरासाठी नगण्य आहे. त्यामुळे वर्दीची संख्या जास्त आणि मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तरीही सलग तिसऱ्या दिवशी (ता. ५) जवानांचे काम सुरू आहे. अजूनही रस्त्यावरील रहदारी सुरळीत केली जात आहे. आजही मोडकळीस आलेल्या झाडांचे 20 ते 25 कॉल होते. त्यामुळे सलग तीन दिवस जवान अहोरात्र काम करत आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  काही ठिकाणी नागरिकांनी असहकार्य दाखविल्याने जवानांना मनस्ताप सहन करावा लागला. झाडे काढताना नागरिकांनी जवानांना अरेरावी केली. दुसरी वर्दी असल्याने बहुतांश नागरिकांनी पडलेले झाड लगेच हटविण्यात यावे असा हट्ट धरला. दुसऱ्या वर्दीवर जाण्यासाठी त्यामुळे जवानांना विलंब झाला. बाचाबाची करण्याची वेळ जवानांवर आली. तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून फांद्या हटविण्यासाठी मदत केली. जीवितहानी कुठे झाली नसल्याचे समाधान जवानांनी व्यक्त केले. जवानांना ही होती धाकधूक फांद्या अंगावर पडण्याची भीती विजेचा खांब कोसळण्याची भीती इलेक्ट्रिक स्वा मशीन (जाड फांद्या कापण्याचे मशीन )बंद पडल्याने फांद्या कापण्याची कसरत स्थानिक नागरिकांचे हद्दीवरून असहकार्य News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cCmcJO

No comments:

Post a Comment