VIDEO : कोरोना असो, नाहीतर ऊन-पाऊस; त्यांच्यासाठी सदैव कर्तव्य प्रथम! पिंपरी : कंटेन्मेट झोनच्या परिसरात जायचे म्हटले, तरी अनेकांना अक्षरश: धडकी भरते. मात्र, याच ठिकाणी पोलिस मात्र जीव धोक्‍यात घालून ड्युटी बजावत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे ऊन, वारा, पाऊस तर दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाची भीती, अशा स्थितीत पोलिस मात्र बंदोबस्तावर तैनात आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविल्या जात आहेत. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यास तो भाग कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करून सील केला जात आहे. येथील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्या परिसरात तातडीने बंदोबस्तही तैनात केला जात आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 93 कंटेन्मेट झोन आहेत. या परिसरातील रस्त्यावरूनही ये-जा करताना कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिकाला अक्षरश: धडकी भरते. तर पोलिस मात्र ज्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक भीती आहे, अशा ठिकाणी जीव धोक्‍यात घालून ड्युटी बजावत आहेत. मात्र, येथील पोलिसांना साधा भक्कम निवाराही उपलब्ध करून दिलेला नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे बंदोबस्तावरील पोलिसांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली. डोक्‍यावर केवळ कापडी छत असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी जायचे कुठे? असा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला. कंटेन्मेट झोन असल्याने आसरा घेण्यासाठी आजूबाजूच्या एखाद्या घरातही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती होती. तरीही मिळेल त्या आडोशाला उभे राहून त्यांनी ड्युटी बजावली.  असा असतो बंदोबस्त  कंटेन्मेट झोनचा परिसर सील केल्यानंतर येण्या-जाण्याच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त लावला जातो. उपनिरिक्षक अथवा सहायक निरिक्षक दर्जाचा अधिकारी पाच ते सहा कर्मचारी एका पॉईंटवर नेमले जातात. आतील नागरिक बाहेर पडू नये अथवा बाहेरील नागरिक आत जाऊ नये, याची जबाबदारी पोलिसांवर असते.  पुलाचा घेतला आधार  बुधवारी (ता. 3) सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मंडपामध्ये बसणे शक्‍य नव्हते. त्यामुळे या पावसापासून बचाव करण्यासाठी चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर परिसरातील मालधक्का या पॉईंटवरील पोलिसांनी पुलाचा आधार घेतला. सर्व कर्मचारी पुलाखाली जाऊन थांबले. तर जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बाजूने आनंदनगर प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ असलेल्या पॉईंटवरील कर्मचाऱ्यांनी येथे असलेले एक फोटो स्टुडिओ उघडण्याची विनंती करून त्याठिकाणी आधार घेतला.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तकलादू मंडप  बंदोबस्ताच्या याठिकाणी पोलिसांसाठी निवाऱ्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. दहा बाय दहा आकाराचा छोटा तकलादू मंडप उभारला असून त्यावर साधे कापडी छत आहे. दोन दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात अनेक ठिकाणचे मंडप कोसळले. त्यानंतर काही ठिकाणच्या मंडपावर लोखंडी पत्रे टाकण्यात आले. मात्र, हेदेखील मंडप तकलादू आहेत.  जीव धोक्‍यात घालून ड्युटी  कंटेन्मेट झोनच्या ठिकाणी सकाळी आठ वाजता ड्युटीवर उभा राहिलेला कर्मचारी रात्री आठ वाजेपर्यंत पॉईंटवर हजर असतो. अनेक लोकांचे ऐकून घेत त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतात. अशावेळी कोणता व्यक्ती कसा येईल, याचीही खात्री नाही. यादरम्यान, एखाद्या व्यक्तीकडून दुर्देवाने कोरोनाचा संसर्ग झाल्यास जिवाची भीती आहेच.  अशा कठीण परिस्थितीत हे पोलिस जीव धोक्‍यात घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटत आहेत. पोलिसांनी पोटतिडकीने सांगूनही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतच आहेत.  येथे जेवण करणेही टाळतात  कंटेन्मेट झोनच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याबाबत काहीही कल्पना नसते. संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवायला सांगितले जाते. मात्र, त्यासाठी पाण्याचीही उपलब्धता हवी. बंदोबस्ताच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जेवण करायचे असल्यास सॅनिटायझर व पाणी उपलब्ध नसल्याने अनेकजण त्याठिकाणी जेवण्याचे टाळतात.  आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय कंटेन्मेट झोन  पोलिस ठाणे कंटेन्मेट झोन  पिंपरी 12  चिंचवड 4  भोसरी 15  एमआयडीसी भोसरी 1  निगडी 6  दिघी 9  वाकड 12  सांगवी 13  देहूरोड 5  चिखली 9  तळेगाव दाभाडे 2  शिरगाव चौकी 1  तळेगाव एमआयडीसी 1  चाकण 2  म्हाळुंगे चौकी 1  एकूण 93  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 5, 2020

VIDEO : कोरोना असो, नाहीतर ऊन-पाऊस; त्यांच्यासाठी सदैव कर्तव्य प्रथम! पिंपरी : कंटेन्मेट झोनच्या परिसरात जायचे म्हटले, तरी अनेकांना अक्षरश: धडकी भरते. मात्र, याच ठिकाणी पोलिस मात्र जीव धोक्‍यात घालून ड्युटी बजावत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे ऊन, वारा, पाऊस तर दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाची भीती, अशा स्थितीत पोलिस मात्र बंदोबस्तावर तैनात आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप      पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविल्या जात आहेत. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यास तो भाग कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करून सील केला जात आहे. येथील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्या परिसरात तातडीने बंदोबस्तही तैनात केला जात आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 93 कंटेन्मेट झोन आहेत. या परिसरातील रस्त्यावरूनही ये-जा करताना कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिकाला अक्षरश: धडकी भरते. तर पोलिस मात्र ज्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक भीती आहे, अशा ठिकाणी जीव धोक्‍यात घालून ड्युटी बजावत आहेत. मात्र, येथील पोलिसांना साधा भक्कम निवाराही उपलब्ध करून दिलेला नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे बंदोबस्तावरील पोलिसांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली. डोक्‍यावर केवळ कापडी छत असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी जायचे कुठे? असा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला. कंटेन्मेट झोन असल्याने आसरा घेण्यासाठी आजूबाजूच्या एखाद्या घरातही जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती होती. तरीही मिळेल त्या आडोशाला उभे राहून त्यांनी ड्युटी बजावली.  असा असतो बंदोबस्त  कंटेन्मेट झोनचा परिसर सील केल्यानंतर येण्या-जाण्याच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त लावला जातो. उपनिरिक्षक अथवा सहायक निरिक्षक दर्जाचा अधिकारी पाच ते सहा कर्मचारी एका पॉईंटवर नेमले जातात. आतील नागरिक बाहेर पडू नये अथवा बाहेरील नागरिक आत जाऊ नये, याची जबाबदारी पोलिसांवर असते.  पुलाचा घेतला आधार  बुधवारी (ता. 3) सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मंडपामध्ये बसणे शक्‍य नव्हते. त्यामुळे या पावसापासून बचाव करण्यासाठी चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर परिसरातील मालधक्का या पॉईंटवरील पोलिसांनी पुलाचा आधार घेतला. सर्व कर्मचारी पुलाखाली जाऊन थांबले. तर जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बाजूने आनंदनगर प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ असलेल्या पॉईंटवरील कर्मचाऱ्यांनी येथे असलेले एक फोटो स्टुडिओ उघडण्याची विनंती करून त्याठिकाणी आधार घेतला.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तकलादू मंडप  बंदोबस्ताच्या याठिकाणी पोलिसांसाठी निवाऱ्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. दहा बाय दहा आकाराचा छोटा तकलादू मंडप उभारला असून त्यावर साधे कापडी छत आहे. दोन दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात अनेक ठिकाणचे मंडप कोसळले. त्यानंतर काही ठिकाणच्या मंडपावर लोखंडी पत्रे टाकण्यात आले. मात्र, हेदेखील मंडप तकलादू आहेत.  जीव धोक्‍यात घालून ड्युटी  कंटेन्मेट झोनच्या ठिकाणी सकाळी आठ वाजता ड्युटीवर उभा राहिलेला कर्मचारी रात्री आठ वाजेपर्यंत पॉईंटवर हजर असतो. अनेक लोकांचे ऐकून घेत त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतात. अशावेळी कोणता व्यक्ती कसा येईल, याचीही खात्री नाही. यादरम्यान, एखाद्या व्यक्तीकडून दुर्देवाने कोरोनाचा संसर्ग झाल्यास जिवाची भीती आहेच.  अशा कठीण परिस्थितीत हे पोलिस जीव धोक्‍यात घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटत आहेत. पोलिसांनी पोटतिडकीने सांगूनही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतच आहेत.  येथे जेवण करणेही टाळतात  कंटेन्मेट झोनच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याबाबत काहीही कल्पना नसते. संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवायला सांगितले जाते. मात्र, त्यासाठी पाण्याचीही उपलब्धता हवी. बंदोबस्ताच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना जेवण करायचे असल्यास सॅनिटायझर व पाणी उपलब्ध नसल्याने अनेकजण त्याठिकाणी जेवण्याचे टाळतात.  आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय कंटेन्मेट झोन  पोलिस ठाणे कंटेन्मेट झोन  पिंपरी 12  चिंचवड 4  भोसरी 15  एमआयडीसी भोसरी 1  निगडी 6  दिघी 9  वाकड 12  सांगवी 13  देहूरोड 5  चिखली 9  तळेगाव दाभाडे 2  शिरगाव चौकी 1  तळेगाव एमआयडीसी 1  चाकण 2  म्हाळुंगे चौकी 1  एकूण 93  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XCbHC3

No comments:

Post a Comment