संसर्ग रोखण्यासाठी धावपळ; महाराष्ट्रात विस्फोटाची शक्यता मुंबई - महाराष्ट्रातील कोविडग्रस्तांची दररोजची संख्या ३१ जुलैपर्यंत दहा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने हा आकडा आणखी वर म्हणजे २५ हजारापर्यंत जाऊ शकतो हे लक्षात घ्या असे सांगितले आहे.  एप्रिलमध्ये परदेशातून आलेल्यांच्या संपर्कातील नागरिक कोरोनाग्रस्त होत असत, आता हा आजार गरीब वस्त्यांमध्ये पसरला आहे. सवलती दिल्यामुळे नागरिक बाहेर पडू लागले असतानाच पावसाळी वातावरणामुळे तपमान कमी झाले आहे. त्यामुळे रोग्यांची संख्या वाढत असून या दहा किंवा २५ हजारातील एक ते दोन टक्के रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडेल असे गृहित धरून आखणी करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त कृती गटाने दिले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने ‘एमएमआर’ आणि पुण्यात संसर्ग वाढला. आता हा संसर्ग अन्य भागातही फैलावू शकतो अशी सूचनाही करण्यात आली आहे. व्हेंटीलेटर कुठलाही उत्पादक आता तयार करू शकत नसल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यातर्फे महाराष्ट्राला चार हजार व्हेंटिलेटर पाठवण्यात येणार असल्याचेही समजते. महाराष्ट्रात जी स्थिती आहे ती अन्य राज्यांतही उद्‍भवू शकते तेंव्हा कोरोनाहाताळणीसाठी आम्ही शक्य ती सर्व मदत करू असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहे.  महाराष्ट्रातील जनतेने परिस्थिती लक्षात घेत लॉकडाउनमध्ये आलेल्या शिथिलतेचा योग्य उपयोग करावा असे आवाहन मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे. मुंबईत रुग्णांची सतत होत असलेली परवड आता ठाण्याकडे सरकण्याची शक्यता आहे. तेथील प्रमाण गेल्या आठवड्यात दुपटीने वाढले असून रायगड जिल्ह्याची स्थितीही तशीच खालावत आहे. जळगाव, अकोला, सोलापूर या जिल्ह्यांकडेही लक्ष दिले जात आहे.  आरोग्य खात्याचे मिशन संचालक डॉ. सतीश पवार यांनी कोरोना बुचकळ्यात टाकणारे वर्तन जगभर करतो हे मान्य केले, मात्र महाराष्ट्रातील दुपटीचा वेग आता कमी झाला आहे याकडेही लक्ष वेधले. पूर्वी देशातील एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ४० टक्के होते ते आता ३५ टक्क्यांपर्यंत आले आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात २.९ लाख आयसोलेशन बेड तयार होत असून येत्या दोन महिन्यात नऊ हजार अतिदक्षता विभागात मोडणाऱ्या रुग्णखाटा तयार होत आहेत.  कृतीगटाची निरीक्षणे  - पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता  - मुंबई, पुण्याबाहेरही मोठी रुग्ण वाढ शक्य  - आपत्कालीन योजना तयार करा  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 14, 2020

संसर्ग रोखण्यासाठी धावपळ; महाराष्ट्रात विस्फोटाची शक्यता मुंबई - महाराष्ट्रातील कोविडग्रस्तांची दररोजची संख्या ३१ जुलैपर्यंत दहा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने हा आकडा आणखी वर म्हणजे २५ हजारापर्यंत जाऊ शकतो हे लक्षात घ्या असे सांगितले आहे.  एप्रिलमध्ये परदेशातून आलेल्यांच्या संपर्कातील नागरिक कोरोनाग्रस्त होत असत, आता हा आजार गरीब वस्त्यांमध्ये पसरला आहे. सवलती दिल्यामुळे नागरिक बाहेर पडू लागले असतानाच पावसाळी वातावरणामुळे तपमान कमी झाले आहे. त्यामुळे रोग्यांची संख्या वाढत असून या दहा किंवा २५ हजारातील एक ते दोन टक्के रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडेल असे गृहित धरून आखणी करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त कृती गटाने दिले आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने ‘एमएमआर’ आणि पुण्यात संसर्ग वाढला. आता हा संसर्ग अन्य भागातही फैलावू शकतो अशी सूचनाही करण्यात आली आहे. व्हेंटीलेटर कुठलाही उत्पादक आता तयार करू शकत नसल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यातर्फे महाराष्ट्राला चार हजार व्हेंटिलेटर पाठवण्यात येणार असल्याचेही समजते. महाराष्ट्रात जी स्थिती आहे ती अन्य राज्यांतही उद्‍भवू शकते तेंव्हा कोरोनाहाताळणीसाठी आम्ही शक्य ती सर्व मदत करू असे आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहे.  महाराष्ट्रातील जनतेने परिस्थिती लक्षात घेत लॉकडाउनमध्ये आलेल्या शिथिलतेचा योग्य उपयोग करावा असे आवाहन मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे. मुंबईत रुग्णांची सतत होत असलेली परवड आता ठाण्याकडे सरकण्याची शक्यता आहे. तेथील प्रमाण गेल्या आठवड्यात दुपटीने वाढले असून रायगड जिल्ह्याची स्थितीही तशीच खालावत आहे. जळगाव, अकोला, सोलापूर या जिल्ह्यांकडेही लक्ष दिले जात आहे.  आरोग्य खात्याचे मिशन संचालक डॉ. सतीश पवार यांनी कोरोना बुचकळ्यात टाकणारे वर्तन जगभर करतो हे मान्य केले, मात्र महाराष्ट्रातील दुपटीचा वेग आता कमी झाला आहे याकडेही लक्ष वेधले. पूर्वी देशातील एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ४० टक्के होते ते आता ३५ टक्क्यांपर्यंत आले आहे असेही त्यांनी सांगितले. राज्यात २.९ लाख आयसोलेशन बेड तयार होत असून येत्या दोन महिन्यात नऊ हजार अतिदक्षता विभागात मोडणाऱ्या रुग्णखाटा तयार होत आहेत.  कृतीगटाची निरीक्षणे  - पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता  - मुंबई, पुण्याबाहेरही मोठी रुग्ण वाढ शक्य  - आपत्कालीन योजना तयार करा  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2zBsADQ

No comments:

Post a Comment