मोबाईल, लॅपटॉप विक्रेत्यांची झाली बल्लेबल्ले, हे आहे कारण  नागपूर :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्याच राहणीमानात बदल झालेला असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीतही बदल झालेला आहे. जून महिन्यात शाळा सुरू होताच पालक आणि विद्यार्थ्यांची पुस्तक, दप्तर आणि गणवेशच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात. यंदा मात्र ऑनलाइन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम या बदलत्या ट्रेंडमुळे पुनश्‍च हरिओमनंतर उपराजधानीत गेल्या पंधरा दिवसांत 50 कोटींचे मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि कॉम्प्युटरची विक्री झाली आहे.  शहरातील 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खासगी शाळा आणि शिकवणीही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीसोबतच मोबाईल, संगणक आणि टॅबच्या दुरुस्तीचेही प्रमाण वाढले आहे. पाच ते सात हजार रुपये या किमतीतले मोबाईल घेण्याकडे पालकांचा सर्वाधिक कल आहे. शाळा, क्‍लास आणि विविध प्रोजेक्‍टच्या माध्यमातून मोबाईल व टॅबवरच अभ्यास करावा लागणार आहे. यामुळे इयत्ता पाचवी आणि त्यापुढील प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्याला मोबाईलवर अधिकाधिक वेळ घालवावा लागतो.  घरातील इतर सदस्यांचा मोबाईल वापरण्यापेक्षा पाल्याला स्वतंत्र मोबाईल देण्याकडे कल वाढला आहे. या बदलामुळे मोबाईल म्हणजे केवळ खेळ व मनोरंजनाचे साहित्य राहिले नसून अभ्यासासाठी महत्त्वाचे अंग झालेले आहे. मोबाईल, लॅपटॉप व टॅबवर अभ्यास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी आता घरच शाळा झाल्याचा अनुभव घेऊ लागले आहेत.  बापरे! नागपुरात सात दिवसांत पाच रुपयांची पेट्रोल वाढ!   ऍक्‍सेसरीजच्या किमती वाढल्या  मोबाईल डिस्प्ले, टचपॅड, चार्जर किंवा अन्य मोबाईल ऍक्‍सेसरीजच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. या सर्व साहित्याचा पुरवठा चीनवरूनच मोठ्या प्रमाणावर होतो. आता आवक कमी झाल्याने या सर्व वस्तू विक्रेत्यांनाच जास्त किमतीत मिळत आहेत. परिणामी, ग्राहकांनाही या वस्तूंसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.  मोबाईल आणि टॅबची तर मागणी वाढलीच आहे; पण त्यासोबतच ब्लू टूथ, ईअर फोन, ब्लू टूथ हेडफोन, बॅटरी, चार्जर, ट्रायपॉड यांची विक्रीही वाढली आहे.  अनिल कांबळे, संचालक, अनिल मोबाईल शॉपी    टॅब, लॅपटॉप व मोबाईलला पसंती  मोबाईलपेक्षा टॅबचा आकार मोठा असल्याने बहुसंख्य पालक आपल्या पाल्यासाठी टॅब खरेदीस प्राधान्य देत आहेत. नेहमीच्या तुलनेत पाच पटींनी मोबाईल आणि टॅबची विक्री वाढलेली आहे. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाची बाजारपेठ असल्याने येथूनच इतरही शहरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्याचा पुरवठा होते. गेल्या पंधरा दिवसांत 40 पटीने मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपची मागणी वाढलेली आहे. त्याची उलाढाल अंदाजे 50 कोटींपर्यंत आहे.  अश्‍विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 14, 2020

मोबाईल, लॅपटॉप विक्रेत्यांची झाली बल्लेबल्ले, हे आहे कारण  नागपूर :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांच्याच राहणीमानात बदल झालेला असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीतही बदल झालेला आहे. जून महिन्यात शाळा सुरू होताच पालक आणि विद्यार्थ्यांची पुस्तक, दप्तर आणि गणवेशच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात. यंदा मात्र ऑनलाइन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम या बदलत्या ट्रेंडमुळे पुनश्‍च हरिओमनंतर उपराजधानीत गेल्या पंधरा दिवसांत 50 कोटींचे मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि कॉम्प्युटरची विक्री झाली आहे.  शहरातील 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खासगी शाळा आणि शिकवणीही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीसोबतच मोबाईल, संगणक आणि टॅबच्या दुरुस्तीचेही प्रमाण वाढले आहे. पाच ते सात हजार रुपये या किमतीतले मोबाईल घेण्याकडे पालकांचा सर्वाधिक कल आहे. शाळा, क्‍लास आणि विविध प्रोजेक्‍टच्या माध्यमातून मोबाईल व टॅबवरच अभ्यास करावा लागणार आहे. यामुळे इयत्ता पाचवी आणि त्यापुढील प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्याला मोबाईलवर अधिकाधिक वेळ घालवावा लागतो.  घरातील इतर सदस्यांचा मोबाईल वापरण्यापेक्षा पाल्याला स्वतंत्र मोबाईल देण्याकडे कल वाढला आहे. या बदलामुळे मोबाईल म्हणजे केवळ खेळ व मनोरंजनाचे साहित्य राहिले नसून अभ्यासासाठी महत्त्वाचे अंग झालेले आहे. मोबाईल, लॅपटॉप व टॅबवर अभ्यास सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी आता घरच शाळा झाल्याचा अनुभव घेऊ लागले आहेत.  बापरे! नागपुरात सात दिवसांत पाच रुपयांची पेट्रोल वाढ!   ऍक्‍सेसरीजच्या किमती वाढल्या  मोबाईल डिस्प्ले, टचपॅड, चार्जर किंवा अन्य मोबाईल ऍक्‍सेसरीजच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. या सर्व साहित्याचा पुरवठा चीनवरूनच मोठ्या प्रमाणावर होतो. आता आवक कमी झाल्याने या सर्व वस्तू विक्रेत्यांनाच जास्त किमतीत मिळत आहेत. परिणामी, ग्राहकांनाही या वस्तूंसाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.  मोबाईल आणि टॅबची तर मागणी वाढलीच आहे; पण त्यासोबतच ब्लू टूथ, ईअर फोन, ब्लू टूथ हेडफोन, बॅटरी, चार्जर, ट्रायपॉड यांची विक्रीही वाढली आहे.  अनिल कांबळे, संचालक, अनिल मोबाईल शॉपी    टॅब, लॅपटॉप व मोबाईलला पसंती  मोबाईलपेक्षा टॅबचा आकार मोठा असल्याने बहुसंख्य पालक आपल्या पाल्यासाठी टॅब खरेदीस प्राधान्य देत आहेत. नेहमीच्या तुलनेत पाच पटींनी मोबाईल आणि टॅबची विक्री वाढलेली आहे. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाची बाजारपेठ असल्याने येथूनच इतरही शहरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्याचा पुरवठा होते. गेल्या पंधरा दिवसांत 40 पटीने मोबाईल, टॅब आणि लॅपटॉपची मागणी वाढलेली आहे. त्याची उलाढाल अंदाजे 50 कोटींपर्यंत आहे.  अश्‍विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30GRE7r

No comments:

Post a Comment