लाॅकडाउननंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला असाही फायदा  कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटात विविध उद्योगासह, ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला होता; मात्र ग्रामीण भागातच बाजारपेठा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सावरली. एवढेच नव्हे तर भाजीपाल्यासह, गावठी कोंबड्या व इतर उत्पादनांना मागणी कमालीची वाढली. त्यामुळे कोरोना संकट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला संकट न ठरता इष्टापत्तीच ठरली आहे.  कोरोनामुळे अचानक लॉकडाउनची घोषणा झाली. यात शेती-बागायतदारांकडील हापूस आंबा, कलिंगड, भाजीपाला यांचे काय करायचे? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. यात हापूस आंबा उत्पादकांनी दलालांची साखळी तोडली आणि महाराष्ट्रासह इतर राज्यात हापूसची विक्री व्यवस्था निर्माण केली. तर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी गावागावांत जाऊन स्टॉल लावले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्या त्या पंचक्रोशीतील आठवडा बाजारात आपले स्थान पक्‍के केले.  - भाजीपाला, फळे व इतर शेती उत्पादनांवर मर्यादा  - स्थानिक भाजीपाला व इतर उत्पादकांना चांगला दर  - गावठी कोंबड्यांचा दर प्रतिनग 600 रुपयापर्यंत  - शेतकऱ्यांकडील गायीच्या दुधाला 46 ते 50 रु.  - म्हैशीच्या दुधाला 56 ते 60 रुपये दर  - बकऱ्याच्या मटणाचा दर 650 रुपये प्रतिकिलो  नव्या बाजारपेठाही उपलब्ध  लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असली तरी परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजी आणि फळ विक्रेत्यांची संख्या घटली आहे. याखेरीज या व्यवसायात असणारे परराज्यातील मजूर देखील आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी नव्या बाजारपेठा देखील उपलब्ध झाल्या आहेत.  ...तर रोजगार शक्‍य  कोरोनामुळे हजारो चाकरमान्यांचा कामधंदा बुडाला. अनेकजण कुटुंब कबिला घेऊन गावी परतले. चाकरमान्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू केले तर जिल्ह्यातच रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे. व्यावसायिक तत्त्वावर शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू झाले तर रोजगाराचे नवे दालनही सुरू होईल.  लॉकडाउनच्या प्रारंभी सर्वच व्यवहार ठप्प झाले. भाजीपाला उत्पादनाचे प्रचंड नुकसान होण्याची भीती होती; मात्र आठवडा बाजारातच मोठी मागणी झाली. त्यानंतर शहरातही भाजी विक्रीला मुभा मिळाली. ग्राहकांनीही स्थानिक भाजी खरेदी केली. त्यामुळे लॉकडाउनमध्येही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडील उत्पादनांना चांगली मागणी राहिली.  - प्रशांत राणे, जानवली- घरटणवाडी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 11, 2020

लाॅकडाउननंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला असाही फायदा  कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटात विविध उद्योगासह, ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला होता; मात्र ग्रामीण भागातच बाजारपेठा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सावरली. एवढेच नव्हे तर भाजीपाल्यासह, गावठी कोंबड्या व इतर उत्पादनांना मागणी कमालीची वाढली. त्यामुळे कोरोना संकट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला संकट न ठरता इष्टापत्तीच ठरली आहे.  कोरोनामुळे अचानक लॉकडाउनची घोषणा झाली. यात शेती-बागायतदारांकडील हापूस आंबा, कलिंगड, भाजीपाला यांचे काय करायचे? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. यात हापूस आंबा उत्पादकांनी दलालांची साखळी तोडली आणि महाराष्ट्रासह इतर राज्यात हापूसची विक्री व्यवस्था निर्माण केली. तर कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी गावागावांत जाऊन स्टॉल लावले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्या त्या पंचक्रोशीतील आठवडा बाजारात आपले स्थान पक्‍के केले.  - भाजीपाला, फळे व इतर शेती उत्पादनांवर मर्यादा  - स्थानिक भाजीपाला व इतर उत्पादकांना चांगला दर  - गावठी कोंबड्यांचा दर प्रतिनग 600 रुपयापर्यंत  - शेतकऱ्यांकडील गायीच्या दुधाला 46 ते 50 रु.  - म्हैशीच्या दुधाला 56 ते 60 रुपये दर  - बकऱ्याच्या मटणाचा दर 650 रुपये प्रतिकिलो  नव्या बाजारपेठाही उपलब्ध  लॉकडाउनमध्ये शिथिलता आली असली तरी परजिल्ह्यातून येणाऱ्या भाजी आणि फळ विक्रेत्यांची संख्या घटली आहे. याखेरीज या व्यवसायात असणारे परराज्यातील मजूर देखील आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल विक्रीसाठी नव्या बाजारपेठा देखील उपलब्ध झाल्या आहेत.  ...तर रोजगार शक्‍य  कोरोनामुळे हजारो चाकरमान्यांचा कामधंदा बुडाला. अनेकजण कुटुंब कबिला घेऊन गावी परतले. चाकरमान्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू केले तर जिल्ह्यातच रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे. व्यावसायिक तत्त्वावर शेती आणि शेतीपूरक उद्योग सुरू झाले तर रोजगाराचे नवे दालनही सुरू होईल.  लॉकडाउनच्या प्रारंभी सर्वच व्यवहार ठप्प झाले. भाजीपाला उत्पादनाचे प्रचंड नुकसान होण्याची भीती होती; मात्र आठवडा बाजारातच मोठी मागणी झाली. त्यानंतर शहरातही भाजी विक्रीला मुभा मिळाली. ग्राहकांनीही स्थानिक भाजी खरेदी केली. त्यामुळे लॉकडाउनमध्येही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडील उत्पादनांना चांगली मागणी राहिली.  - प्रशांत राणे, जानवली- घरटणवाडी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2N33EIB

No comments:

Post a Comment