कोकणकन्येच्या धाडसाला सलाम! अनोळखींना पुनर्जन्म देण्यासाठी आयुष्य पणाला सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाने अख्खे जग भीतीच्या छायेखाली आहे. सख्खी रक्ताची नाती दहशतीमुळे आटलीत; पण काही दिवसांपूर्वी डॉक्‍टर झालेली एक तरुणी कल्याणमध्ये कोरोनाशी दोन हात करतेय. ओळख-पाळख नसलेल्या लोकांना पुनर्जन्म देण्यासाठी आयुष्य पणाला लावतेय. मूळ कोकणातील या कोरोना वॉरिअरचे नाव आहे. डॉ. गायत्री गिरीष करंदीकर.  कोरोनाने अख्खे जग अनिश्‍चिततेच्या विश्‍वात लोटून गेलं आहे. भीतीने सख्खी रक्ताची नाती दुरावली आहेत. कोरोना झालेल्या कित्येकांचे मृतदेह त्यांचे नातेवाईक स्वीकारत नाहीत. मुंबई आणि परिसरात तर अधिकच भीती आहे. कित्येक खासगी दवाखाने बंद आहेत. अशावेळी अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी डॉक्‍टर झालेल्या गायत्री यांचे धाडस नक्कीच "तेजस्वी' म्हणायला हवे.  डॉ. गायत्री यांचे कुटुंब मूळ महाड येथील. वडील कोकण रेल्वेत जनसंपर्क अधिकारी. "डीएनए'तच सेवाभाव असल्याने गायत्री यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडले. डी. वाय. पाटील महाविद्यालयातून 2019 ला एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. यंदाच्या फेब्रुवारीत इंटरनशीप, रजिस्ट्रेशन वगैरे पूर्ण करून डॉ. गायत्री खऱ्या अर्थाने वैद्यकीय पेशासाठी सज्ज झाल्या. हातात पदवी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा कहर सुरू झाला. डॉक्‍टरांची कमतरता जाणवू लागली. डॉ. गायत्री यांनी या संकटकाळात कोरोनाशी लढण्यासाठी उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. रीतसर मुलाखत व इतर प्रक्रिया पूर्ण करून त्या 15 फेब्रुवारीच्या दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत दाखल झाल्या. त्या कोरोनाचा जोर ओसरेपर्यंत या क्षेत्रात थांबू शकल्या असत्या; पण कोणताही अनुभव पाठीशी नसताना आणि जीवावरची लढाई असताना त्यांनी उचललेले पाऊल नक्कीच धाडसी म्हणायला हवे. सध्या त्यांच्याकडे तेथील आंबेडकर रोड हेल्थ पोस्टची जबाबदारी आहे. तपासणीची जबाबदारी पार पाडताना सहकारी कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. एक दिवस आराम मिळत नाही. स्वतः पॉझिटिव्ह होण्याचा धोका क्षणाक्षणाला आहे; पण कोरोनावर मात करण्याची जिद्द आणखी मजबूत झाली आहे. कोकण कन्येच्या या धाडसाला सलाम करावा तितका थोडाच आहे.  कोरोनाचे संकट तर मोठे आहे. त्याच्याशी लढा दिलाच पाहिजे. डॉक्‍टर, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वचजण त्याच्याशी दोन हात करत आहेत. सरकारनेही या यंत्रणेला आणखी प्रोत्साहन द्यायला हवे.  - डॉ. गायत्री गिरीष करंदीकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 11, 2020

कोकणकन्येच्या धाडसाला सलाम! अनोळखींना पुनर्जन्म देण्यासाठी आयुष्य पणाला सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाने अख्खे जग भीतीच्या छायेखाली आहे. सख्खी रक्ताची नाती दहशतीमुळे आटलीत; पण काही दिवसांपूर्वी डॉक्‍टर झालेली एक तरुणी कल्याणमध्ये कोरोनाशी दोन हात करतेय. ओळख-पाळख नसलेल्या लोकांना पुनर्जन्म देण्यासाठी आयुष्य पणाला लावतेय. मूळ कोकणातील या कोरोना वॉरिअरचे नाव आहे. डॉ. गायत्री गिरीष करंदीकर.  कोरोनाने अख्खे जग अनिश्‍चिततेच्या विश्‍वात लोटून गेलं आहे. भीतीने सख्खी रक्ताची नाती दुरावली आहेत. कोरोना झालेल्या कित्येकांचे मृतदेह त्यांचे नातेवाईक स्वीकारत नाहीत. मुंबई आणि परिसरात तर अधिकच भीती आहे. कित्येक खासगी दवाखाने बंद आहेत. अशावेळी अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी डॉक्‍टर झालेल्या गायत्री यांचे धाडस नक्कीच "तेजस्वी' म्हणायला हवे.  डॉ. गायत्री यांचे कुटुंब मूळ महाड येथील. वडील कोकण रेल्वेत जनसंपर्क अधिकारी. "डीएनए'तच सेवाभाव असल्याने गायत्री यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडले. डी. वाय. पाटील महाविद्यालयातून 2019 ला एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. यंदाच्या फेब्रुवारीत इंटरनशीप, रजिस्ट्रेशन वगैरे पूर्ण करून डॉ. गायत्री खऱ्या अर्थाने वैद्यकीय पेशासाठी सज्ज झाल्या. हातात पदवी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा कहर सुरू झाला. डॉक्‍टरांची कमतरता जाणवू लागली. डॉ. गायत्री यांनी या संकटकाळात कोरोनाशी लढण्यासाठी उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. रीतसर मुलाखत व इतर प्रक्रिया पूर्ण करून त्या 15 फेब्रुवारीच्या दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय सेवेत दाखल झाल्या. त्या कोरोनाचा जोर ओसरेपर्यंत या क्षेत्रात थांबू शकल्या असत्या; पण कोणताही अनुभव पाठीशी नसताना आणि जीवावरची लढाई असताना त्यांनी उचललेले पाऊल नक्कीच धाडसी म्हणायला हवे. सध्या त्यांच्याकडे तेथील आंबेडकर रोड हेल्थ पोस्टची जबाबदारी आहे. तपासणीची जबाबदारी पार पाडताना सहकारी कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. एक दिवस आराम मिळत नाही. स्वतः पॉझिटिव्ह होण्याचा धोका क्षणाक्षणाला आहे; पण कोरोनावर मात करण्याची जिद्द आणखी मजबूत झाली आहे. कोकण कन्येच्या या धाडसाला सलाम करावा तितका थोडाच आहे.  कोरोनाचे संकट तर मोठे आहे. त्याच्याशी लढा दिलाच पाहिजे. डॉक्‍टर, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वचजण त्याच्याशी दोन हात करत आहेत. सरकारनेही या यंत्रणेला आणखी प्रोत्साहन द्यायला हवे.  - डॉ. गायत्री गिरीष करंदीकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cTsZ21

No comments:

Post a Comment