नगरच्या शेतकऱ्यांचे हरभरा, तुरीचे 55 कोटी नाफेड देईना नगर ः सरकारच्या हमी केंद्रांवर तूर, हरभरा विक्री केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचावन्न कोटी रुपये थकले आहेत. खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत असताना "नाफेड'मार्फत खरेदी केलेल्या तूर-हरभऱ्याची रक्कम मिळत नसल्याने, सुमारे पस्तीस ते चाळीस टक्के शेतकरी त्रस्त आहेत. या बाबत बोलण्यास "नाफेड' व मार्केटिंग फेडरेशनचे राज्य पातळीवरील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरात सुमारे वीस लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर- हरभऱ्याची खरेदी झाली असून, थकीत रकमेचा आकडा पावणेचारशे कोटींच्या जवळपास आहे.  हेही वाचा - राष्ट्रवादी स्थापनेवेळचे दुरावले भारतीय अन्न महामंडळामार्फत सोलापूर, चंद्रपूर, उस्मानाबाद, वर्धा, बीड येथे; राज्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत 41 केंद्रांवर, तसेच "नाफेड'तर्फे राज्यात 157 केंद्रांवर तुरीची खरेदी 5 हजार 800 रुपये क्विंटल या हमी भावाने सुरू आहे. खरेदीनंतर साधारण आठ ते पंधरा दिवसांत पैसे मिळणे गरजेचे असताना, वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात वीस लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर- हरभऱ्याची खरेदी झाली आहे. त्यातील पस्तीस ते चाळीस टक्के रक्कम देणे बाकी असून, राज्याचा हा आकडा पावणेचारशे कोटींच्या जवळपास आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 40 हजार क्विंटल तूर- हरभरा यांची खरेदी झाली असून, शेतकऱ्यांचे साधारण पंचावन्न कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.  सरकार खरेदी करीत असलेल्या कोणत्याच शेतमालाचे पैसे वेळेवर देत नाही, हा अनुभव जुना आहे. त्यामुळे सरकारने शेतमाल खरेदीतील हस्तक्षेप थांबवावा, अशी आमची मागणी आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने, अडकलेले पैसे तातडीने देण्याची तसदी नाफेड, मार्केटिंग फेडरेशनने घ्यावी.  - अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना, महाराष्ट्र  दोन महिन्यांपूर्वी कुटुंबातील मिळून चोवीस क्विंटल तूर चापडगाव केंद्रावर विकली. अजून पैसे मिळाले नाहीत. पैसे नसल्याने आता खरिपासाठी बियाणे-खते, खरेदी करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  - प्रदीप मापारी, शेतकरी, बोधेगाव, ता. शेवगाव  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 12, 2020

नगरच्या शेतकऱ्यांचे हरभरा, तुरीचे 55 कोटी नाफेड देईना नगर ः सरकारच्या हमी केंद्रांवर तूर, हरभरा विक्री केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचावन्न कोटी रुपये थकले आहेत. खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत असताना "नाफेड'मार्फत खरेदी केलेल्या तूर-हरभऱ्याची रक्कम मिळत नसल्याने, सुमारे पस्तीस ते चाळीस टक्के शेतकरी त्रस्त आहेत. या बाबत बोलण्यास "नाफेड' व मार्केटिंग फेडरेशनचे राज्य पातळीवरील अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरात सुमारे वीस लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर- हरभऱ्याची खरेदी झाली असून, थकीत रकमेचा आकडा पावणेचारशे कोटींच्या जवळपास आहे.  हेही वाचा - राष्ट्रवादी स्थापनेवेळचे दुरावले भारतीय अन्न महामंडळामार्फत सोलापूर, चंद्रपूर, उस्मानाबाद, वर्धा, बीड येथे; राज्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत 41 केंद्रांवर, तसेच "नाफेड'तर्फे राज्यात 157 केंद्रांवर तुरीची खरेदी 5 हजार 800 रुपये क्विंटल या हमी भावाने सुरू आहे. खरेदीनंतर साधारण आठ ते पंधरा दिवसांत पैसे मिळणे गरजेचे असताना, वेळेवर पैसे मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात वीस लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर- हरभऱ्याची खरेदी झाली आहे. त्यातील पस्तीस ते चाळीस टक्के रक्कम देणे बाकी असून, राज्याचा हा आकडा पावणेचारशे कोटींच्या जवळपास आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 40 हजार क्विंटल तूर- हरभरा यांची खरेदी झाली असून, शेतकऱ्यांचे साधारण पंचावन्न कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.  सरकार खरेदी करीत असलेल्या कोणत्याच शेतमालाचे पैसे वेळेवर देत नाही, हा अनुभव जुना आहे. त्यामुळे सरकारने शेतमाल खरेदीतील हस्तक्षेप थांबवावा, अशी आमची मागणी आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने, अडकलेले पैसे तातडीने देण्याची तसदी नाफेड, मार्केटिंग फेडरेशनने घ्यावी.  - अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना, महाराष्ट्र  दोन महिन्यांपूर्वी कुटुंबातील मिळून चोवीस क्विंटल तूर चापडगाव केंद्रावर विकली. अजून पैसे मिळाले नाहीत. पैसे नसल्याने आता खरिपासाठी बियाणे-खते, खरेदी करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  - प्रदीप मापारी, शेतकरी, बोधेगाव, ता. शेवगाव  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/37r2boP

No comments:

Post a Comment