टीकाकारांचा पालकमंत्र्यांकडून असा समाचार ओरोस (सिंधुदुर्ग) - काही व्यक्ती शिवसेनेने कसे काम करावे याचे सल्ले देत आहेत. शिवसैनिकाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही. जर त्यांना शिवसेनेबाबत एवढीच आत्मीयता असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. आमचे सल्लागार म्हणून संदेश पारकर यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश द्यावा, अशी टीका मनसे नेते परशुराम उपरकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.  जिल्हा नियोजनच्या जुन्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, संदेश पारकर उपस्थित होते. यावेळी श्री. सामंत म्हणाले, ""आम्हाला सल्ला देणाऱ्या व्यक्तींनी किती मदत केली हे जाहीर करावे. शिवसेनेच्या माध्यमातून गोवा येथे अडकलेल्या 800 नागरिकांना किती मदत केली याची माहिती घ्या. त्याचे मी पालकमंत्री या नात्याने फोटो काढून प्रसिद्धी घेतली नाही. आमची बांधीलकी जनतेशी आहे. ऐरागैऱ्यांशी आम्हाला गरज नाही. कोरोना कालावधीत सर्वानी आपआपल्या परीने काम करावे. तुम्ही टीका केल्याने माझी जबाबदारी वाढते. आम्हाला सल्ला देण्यापूर्वी आपला पक्ष सांभाळावा. सल्ला देणाऱ्यांचे नेते राज ठाकरे यांचे मी अभिनंदन करतो. ते या काळात मुख्यमंत्री यांच्या कामाचे कौतुक करीत आहेत; मात्र येथील नेते कोणाच्या तरी सांगण्यावरुन पत्रकार परिषदा घेऊन टीका करीत आहेत. मला अक्कल नाही किंवा आपल्यालाच फार अक्कल आहे, अशा आविर्भावात कोणी राहू नये.''  आंबा वाहतुकीसाठी आम्ही असे केले. त्यामुळे आंबा प्रश्‍न मार्गी लागला, अशा घोषणा केल्या तरी हा प्रश्‍न कोणामुळे सुटला हे आंबा बागायतदार यांना माहीत आहे. मी प्रयत्न केल्यामुळे 15 हजार मेट्रिक टन आंबा निर्यात होऊ शकला, असे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगत भाजप आमदार नीतेश राणे यांना टोमना मारला. काजूला हमीभाव देण्यासाठी जिल्हा बॅंक प्रयत्न करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. खासदार विनायक राऊत हे सर्व परवानग्या घेऊनच जिल्ह्यात दाखल झाले असल्याचा पुनउच्चार त्यांनी केला. दरम्यान, जिल्ह्यातील 100 दशावतारी मंडळांना शक्‍य होईल तेवढी मदत करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यासाठी त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.  व्यापाऱ्यांशीही चर्चा करणार  व्यापारी मंडळासोबत सुद्धा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी लॉकडाउन कालावधीत व्यापारी यांच्या मनात कोणती दुकाने सुरू ठेवायची व कोणती नाही, हा संभ्रम आहे. त्याबाबत केंद्र सरकारचे निर्देश त्यांना सांगण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक व वाहतूकदार यांचीही बैठक बोलाविली आहे. त्यांच्या परमिट, लायसन, पीयूसीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कर 30 जूनपर्यंत स्थगित करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ती मागणी पूर्ण होण्याची शक्‍यता असल्याचे यावेळी सामंत यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 24, 2020

टीकाकारांचा पालकमंत्र्यांकडून असा समाचार ओरोस (सिंधुदुर्ग) - काही व्यक्ती शिवसेनेने कसे काम करावे याचे सल्ले देत आहेत. शिवसैनिकाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही. जर त्यांना शिवसेनेबाबत एवढीच आत्मीयता असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. आमचे सल्लागार म्हणून संदेश पारकर यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश द्यावा, अशी टीका मनसे नेते परशुराम उपरकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.  जिल्हा नियोजनच्या जुन्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, संदेश पारकर उपस्थित होते. यावेळी श्री. सामंत म्हणाले, ""आम्हाला सल्ला देणाऱ्या व्यक्तींनी किती मदत केली हे जाहीर करावे. शिवसेनेच्या माध्यमातून गोवा येथे अडकलेल्या 800 नागरिकांना किती मदत केली याची माहिती घ्या. त्याचे मी पालकमंत्री या नात्याने फोटो काढून प्रसिद्धी घेतली नाही. आमची बांधीलकी जनतेशी आहे. ऐरागैऱ्यांशी आम्हाला गरज नाही. कोरोना कालावधीत सर्वानी आपआपल्या परीने काम करावे. तुम्ही टीका केल्याने माझी जबाबदारी वाढते. आम्हाला सल्ला देण्यापूर्वी आपला पक्ष सांभाळावा. सल्ला देणाऱ्यांचे नेते राज ठाकरे यांचे मी अभिनंदन करतो. ते या काळात मुख्यमंत्री यांच्या कामाचे कौतुक करीत आहेत; मात्र येथील नेते कोणाच्या तरी सांगण्यावरुन पत्रकार परिषदा घेऊन टीका करीत आहेत. मला अक्कल नाही किंवा आपल्यालाच फार अक्कल आहे, अशा आविर्भावात कोणी राहू नये.''  आंबा वाहतुकीसाठी आम्ही असे केले. त्यामुळे आंबा प्रश्‍न मार्गी लागला, अशा घोषणा केल्या तरी हा प्रश्‍न कोणामुळे सुटला हे आंबा बागायतदार यांना माहीत आहे. मी प्रयत्न केल्यामुळे 15 हजार मेट्रिक टन आंबा निर्यात होऊ शकला, असे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगत भाजप आमदार नीतेश राणे यांना टोमना मारला. काजूला हमीभाव देण्यासाठी जिल्हा बॅंक प्रयत्न करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. खासदार विनायक राऊत हे सर्व परवानग्या घेऊनच जिल्ह्यात दाखल झाले असल्याचा पुनउच्चार त्यांनी केला. दरम्यान, जिल्ह्यातील 100 दशावतारी मंडळांना शक्‍य होईल तेवढी मदत करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यासाठी त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.  व्यापाऱ्यांशीही चर्चा करणार  व्यापारी मंडळासोबत सुद्धा बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी लॉकडाउन कालावधीत व्यापारी यांच्या मनात कोणती दुकाने सुरू ठेवायची व कोणती नाही, हा संभ्रम आहे. त्याबाबत केंद्र सरकारचे निर्देश त्यांना सांगण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक व वाहतूकदार यांचीही बैठक बोलाविली आहे. त्यांच्या परमिट, लायसन, पीयूसीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कर 30 जूनपर्यंत स्थगित करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ती मागणी पूर्ण होण्याची शक्‍यता असल्याचे यावेळी सामंत यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bCiHDD

No comments:

Post a Comment