Lockdown : दोघे पळाले; पण परतलेच नाहीत; पोलिसांचा शोध अपयशी औरंगाबाद : लॉकडाउनला महिना उलटला असला तरी ठिकठिकाणी अडकलेल्या मजूर, कामगारांचे पलायन सुरूच असून, गुरुवारी (ता. २३) रात्री १४ जणांना पकडून त्यांना महापालिकेने उभारलेल्या भडकलगेट येथील निवारागृहात पाठविण्यात आले; मात्र पोलिसांची नजर चकवून दोघांनी पलायन केल्याचा प्रकार पहाटे घडला. पोलिसांनी दिवसभर शोध घेतल्यानंतरही हे दोघे आढळून आले नाहीत.  लॉकडाउन लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या मजूर, कामगारांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. गेल्या महिनाभरापासून एकाच ठिकाणी निवारागृहात असलेले हे मजूर कामगार घरी जाण्यासाठी उतावीळ झाले आहेत. पोलिस, प्रशासनातील अधिकारी त्यांची भेट घेऊन वारंवार समजूत काढत आहेत. तरीही शेकडो किलोमीटर दूर असलेल्या गावी पायी जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. गुरुवारी (ता. २३) रात्री १४ जण पुणे, नगर येथून उत्तरप्रदेशातील त्यांच्या गावी पायीच निघाले होते. हे वाचले का? - HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम?  गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन रात्री अडीच वाजता महापालिकेने उभारलेल्या भडकलगेट येथील निवारागृहात पाठविण्यात आले. या ठिकाणी मजूर, कामगारांची संख्या जास्त असल्याने महापालिकेने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. अतिरिक्त पोलिस देण्यात आले; मात्र त्यांची नजर चुकवून दोघांनी पहाटे पाचच्या सुमारास पलायन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला माहिती दिली. त्यांनी शोध घेतला; पण दोघे आढळून आले नाहीत.     संख्या पोचली १७१ वर  महापालिकेने सिडको एन- सहा, एन- सात, गारखेडा परिसर व भडकलगेट या ठिकाणी निवारागृह उभारले आहेत. या ठिकाणी सध्या १७१ जण असून, त्यात महिला, तरुणांचाही समावेश आहे. सिडको एन- सहा येथून काही दिवसांपूर्वी सहा जण पळून गेले होते; मात्र त्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले होते.    मजूर येतात कसे?  गुरुवारी पकडण्यात आलेले काही मजूर पुण्याहून, तर काही मजूर नगर येथून आल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. जिल्हाच्या सीमा बंद असताना शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून अनेक जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून हे मजूर येतात कसे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 24, 2020

Lockdown : दोघे पळाले; पण परतलेच नाहीत; पोलिसांचा शोध अपयशी औरंगाबाद : लॉकडाउनला महिना उलटला असला तरी ठिकठिकाणी अडकलेल्या मजूर, कामगारांचे पलायन सुरूच असून, गुरुवारी (ता. २३) रात्री १४ जणांना पकडून त्यांना महापालिकेने उभारलेल्या भडकलगेट येथील निवारागृहात पाठविण्यात आले; मात्र पोलिसांची नजर चकवून दोघांनी पलायन केल्याचा प्रकार पहाटे घडला. पोलिसांनी दिवसभर शोध घेतल्यानंतरही हे दोघे आढळून आले नाहीत.  लॉकडाउन लागू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या मजूर, कामगारांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. गेल्या महिनाभरापासून एकाच ठिकाणी निवारागृहात असलेले हे मजूर कामगार घरी जाण्यासाठी उतावीळ झाले आहेत. पोलिस, प्रशासनातील अधिकारी त्यांची भेट घेऊन वारंवार समजूत काढत आहेत. तरीही शेकडो किलोमीटर दूर असलेल्या गावी पायी जाण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. गुरुवारी (ता. २३) रात्री १४ जण पुणे, नगर येथून उत्तरप्रदेशातील त्यांच्या गावी पायीच निघाले होते. हे वाचले का? - HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम?  गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन रात्री अडीच वाजता महापालिकेने उभारलेल्या भडकलगेट येथील निवारागृहात पाठविण्यात आले. या ठिकाणी मजूर, कामगारांची संख्या जास्त असल्याने महापालिकेने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. अतिरिक्त पोलिस देण्यात आले; मात्र त्यांची नजर चुकवून दोघांनी पहाटे पाचच्या सुमारास पलायन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला माहिती दिली. त्यांनी शोध घेतला; पण दोघे आढळून आले नाहीत.     संख्या पोचली १७१ वर  महापालिकेने सिडको एन- सहा, एन- सात, गारखेडा परिसर व भडकलगेट या ठिकाणी निवारागृह उभारले आहेत. या ठिकाणी सध्या १७१ जण असून, त्यात महिला, तरुणांचाही समावेश आहे. सिडको एन- सहा येथून काही दिवसांपूर्वी सहा जण पळून गेले होते; मात्र त्यांना शोधण्यात पोलिसांना यश आले होते.    मजूर येतात कसे?  गुरुवारी पकडण्यात आलेले काही मजूर पुण्याहून, तर काही मजूर नगर येथून आल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. जिल्हाच्या सीमा बंद असताना शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून अनेक जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून हे मजूर येतात कसे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2zoMGAx

No comments:

Post a Comment