Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 1, 2020

कुडाळ प्रशासन `लेप्टो`बाबत सतर्क

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोनाबरोबरच तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात लेप्टोची साथ व रूग्ण वाढत असल्याने या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी तालुक्‍यातील सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करावे. नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी. साथ पसरू नये, यासाठी प्रत्येकाने नियमावलीचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत येथील गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली. 

कोरोनासह कुडाळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात लेप्टोचे रुग्ण आढळत आहेत. याबाबत प्रशासनाच्यावतीने माहिती देण्याकरिता येथील पंचायत समिती येथे आज सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सभापती नूतन आहीर, उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे आदी उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, ""तालुक्‍यात आतापर्यंत सहा महिन्यात लेप्टोचे 93 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये चार जणांचा लेप्टोने मृत्यू झाला आहे. सर्व रूग्णावर उपचार सुरू आहेत. लेप्टोवर औषध असूनही तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. याचे प्रमुख कारण तापसरीचे रूग्ण तपासणीकरीता येत नाहीत. प्रशासनाच्यावतीने लेप्टोची साथ पसरू नये यासाठी योग्य उपाययोजना, योग्य ती तपासणी केली सुरू आहे. गोळ्या वाटप सुरू आहेत.

ग्रामपंचायतस्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक कृती समितीच्यावतीने आता साथ नियंत्रण करण्यासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. ताप आला तर घाबरून न जाता प्रत्येकाने आरोग्य तपासणी करावी. कोरोना, लेप्टो, डेंग्यु, मलेरिया, माकडताप यासारख्या सर्व तपासण्या मोफत शासकीय रुग्णालयात केल्या जाणार आहेत.'' ते पुढे म्हणाले, ""कोरोना कमी होत असताना आता कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्याच बरोबर लेप्टोचे रुग्ण वाढत असल्याने या साथ रोगापासून तालुक्‍यातील सुमारे 1 लाख 30 हजार जनतेची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सर्व जनतेने सहकार्य करावे.'' 

प्रशासनाकडून योग्य काळजी 
डॉ. संदेश कांबळे म्हणाले, की कसाल, हिर्लोक, हुमरमळा-वालावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी पाच गावात तर कडावल प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन गावांत लेप्टोचे रूग्ण आहेत. जांभवडे व भुतवड गावात मोठ्या प्रमाणात रूग्ण आहेत. साथ आटोक्‍यात आणण्यासाठी योग्य ती प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. शासकीय डॉक्‍टरांबरोबरच खाजगी डॉक्‍टरांचीही मदत घेण्यात येत आहे. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कुडाळ प्रशासन `लेप्टो`बाबत सतर्क कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोनाबरोबरच तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात लेप्टोची साथ व रूग्ण वाढत असल्याने या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी तालुक्‍यातील सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या नियमावलीचे पालन करावे. नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी. साथ पसरू नये, यासाठी प्रत्येकाने नियमावलीचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत येथील गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.  कोरोनासह कुडाळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात लेप्टोचे रुग्ण आढळत आहेत. याबाबत प्रशासनाच्यावतीने माहिती देण्याकरिता येथील पंचायत समिती येथे आज सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सभापती नूतन आहीर, उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे आदी उपस्थित होते.  चव्हाण म्हणाले, ""तालुक्‍यात आतापर्यंत सहा महिन्यात लेप्टोचे 93 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये चार जणांचा लेप्टोने मृत्यू झाला आहे. सर्व रूग्णावर उपचार सुरू आहेत. लेप्टोवर औषध असूनही तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. याचे प्रमुख कारण तापसरीचे रूग्ण तपासणीकरीता येत नाहीत. प्रशासनाच्यावतीने लेप्टोची साथ पसरू नये यासाठी योग्य उपाययोजना, योग्य ती तपासणी केली सुरू आहे. गोळ्या वाटप सुरू आहेत. ग्रामपंचायतस्तरावर कोरोना प्रतिबंधात्मक कृती समितीच्यावतीने आता साथ नियंत्रण करण्यासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. ताप आला तर घाबरून न जाता प्रत्येकाने आरोग्य तपासणी करावी. कोरोना, लेप्टो, डेंग्यु, मलेरिया, माकडताप यासारख्या सर्व तपासण्या मोफत शासकीय रुग्णालयात केल्या जाणार आहेत.'' ते पुढे म्हणाले, ""कोरोना कमी होत असताना आता कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्याच बरोबर लेप्टोचे रुग्ण वाढत असल्याने या साथ रोगापासून तालुक्‍यातील सुमारे 1 लाख 30 हजार जनतेची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सर्व जनतेने सहकार्य करावे.''  प्रशासनाकडून योग्य काळजी  डॉ. संदेश कांबळे म्हणाले, की कसाल, हिर्लोक, हुमरमळा-वालावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी पाच गावात तर कडावल प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन गावांत लेप्टोचे रूग्ण आहेत. जांभवडे व भुतवड गावात मोठ्या प्रमाणात रूग्ण आहेत. साथ आटोक्‍यात आणण्यासाठी योग्य ती प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. शासकीय डॉक्‍टरांबरोबरच खाजगी डॉक्‍टरांचीही मदत घेण्यात येत आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HXZwug
Read More
पुणे विद्यापीठाकडून सहा हजार तक्रारींचे निवारण 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या निकालातील त्रुटींमुळे आलेल्या सुमारे सहा हजार तक्रारींचे निवारण करत सुधारीत निकाल तयार केला आहे. त्यातील दोन हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन जाहीर केल आहे. परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या तारखेपेक्षा दोन दिवस आधीच तयार केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन- एमसीक्यू) पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत अडथळे आले. त्याचा परिणाम निकाल जाहीर झाल्यानंतर समोर आले. 

अनेक विद्यार्थ्यांना एकाच विषयात शून्य गुण मिळाले होते, तसेच परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखवणे, चुकीचा विषय गुणपत्रिकेत दाखवणे अशा अनेक तक्रारी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.  

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

 

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्याने गडबड असताना चुकीच्या निकालामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत असल्याने विद्यापीठाने त्यांचे विश्लेषण करून त्याची कारणे शोधण्यास सुरूवात केली. यात काही तक्रारी तांत्रिक चुका, विद्यार्थ्यांनी दोन ईमेल देणे, वारंवार पेपर सोडविणे या कारणामुळे निकाल बदलला असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले होते. विद्यापीठाकडे आलेल्या सर्व तक्रारींचे ३ डिसेंबर पर्यंत निवारण केले जाईल असे परीक्षा विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट केले होते. परंतु दोन दिवस आधीच हे काम पूर्ण केले आहे. 

पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी

परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, विद्यापीठाने दोन दिवस आधीच सुमारे सहा हजार जणांचा सुधारीत  निकाल तयार केला आहे. हा निकाल अपलोड करण्याचे काम सुरू असून, आत्तापर्यंत दोन हजार जणांचा निकाल जाहीर केला आहे. उर्वरीत निकाल ही लवकरच अपलोड केला जाईल. 

निकालपत्र वाटपास सुरूवात 
विद्यापीठाने निकाल जाहीर केले, पण अजून अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका उपलब्ध झालेली नाही. परदेशी शिक्षण, पदव्युत्तर पदवीचा प्रवेश, बार काउन्सिलकडे विधीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणारी नोंदणी व त्याची संपत आलेली मुदत यासाठी गुणपत्रिका आवश्यक आहे.  विद्यापीठाकडे आत्तापर्यंत फार्मसी, इंजिनिअरींगच्या गुणपत्रिका छापून पूर्ण केल्या आहेत, त्या संबंधित महाविद्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका येत्या काही दिवसात उपलब्ध होतील, असे काकडे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे विद्यापीठाकडून सहा हजार तक्रारींचे निवारण  पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या निकालातील त्रुटींमुळे आलेल्या सुमारे सहा हजार तक्रारींचे निवारण करत सुधारीत निकाल तयार केला आहे. त्यातील दोन हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन जाहीर केल आहे. परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या तारखेपेक्षा दोन दिवस आधीच तयार केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाइस क्वेश्चन- एमसीक्यू) पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत अडथळे आले. त्याचा परिणाम निकाल जाहीर झाल्यानंतर समोर आले.  अनेक विद्यार्थ्यांना एकाच विषयात शून्य गुण मिळाले होते, तसेच परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखवणे, चुकीचा विषय गुणपत्रिकेत दाखवणे अशा अनेक तक्रारी विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.   महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी   अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्याने गडबड असताना चुकीच्या निकालामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत असल्याने विद्यापीठाने त्यांचे विश्लेषण करून त्याची कारणे शोधण्यास सुरूवात केली. यात काही तक्रारी तांत्रिक चुका, विद्यार्थ्यांनी दोन ईमेल देणे, वारंवार पेपर सोडविणे या कारणामुळे निकाल बदलला असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले होते. विद्यापीठाकडे आलेल्या सर्व तक्रारींचे ३ डिसेंबर पर्यंत निवारण केले जाईल असे परीक्षा विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट केले होते. परंतु दोन दिवस आधीच हे काम पूर्ण केले आहे.  पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, विद्यापीठाने दोन दिवस आधीच सुमारे सहा हजार जणांचा सुधारीत  निकाल तयार केला आहे. हा निकाल अपलोड करण्याचे काम सुरू असून, आत्तापर्यंत दोन हजार जणांचा निकाल जाहीर केला आहे. उर्वरीत निकाल ही लवकरच अपलोड केला जाईल.  निकालपत्र वाटपास सुरूवात  विद्यापीठाने निकाल जाहीर केले, पण अजून अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका उपलब्ध झालेली नाही. परदेशी शिक्षण, पदव्युत्तर पदवीचा प्रवेश, बार काउन्सिलकडे विधीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणारी नोंदणी व त्याची संपत आलेली मुदत यासाठी गुणपत्रिका आवश्यक आहे.  विद्यापीठाकडे आत्तापर्यंत फार्मसी, इंजिनिअरींगच्या गुणपत्रिका छापून पूर्ण केल्या आहेत, त्या संबंधित महाविद्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका येत्या काही दिवसात उपलब्ध होतील, असे काकडे यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37obfep
Read More
ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक अद्याप बंदच 

नागरिकांमध्ये नाराजी; ट्रॅकवरील गवताच्या साम्राज्यामुळे व्यायाम करण्यास अडचण
सिंहगड रस्ता - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकनंतर महापालिकेने उद्याने खुली केली. मात्र, ओपन जिम आणि जॉगिंग ट्रॅक अद्याप खुली केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सिंहगड रस्त्यावर तुकाई माता उद्यान तसेच जॉगिंग ट्रॅक आहे. याच भागात दोन ठिकाणी ओपन जिम देखील आहे. मात्र त्या भागात कुलूप घातले आहे. त्यामुळे या उद्यानाचा नागरिकांना वापर करता येत नाही. उद्याने खुली करून एक महिना झाला मात्र उद्यानाचे प्रवेशद्वार अद्यापही बंदच आहेत. या सोबतच येथे वाढलेली झाडेझुडपे याचा जॉगिंग ट्रॅकवर चालण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. ट्रॅकवर कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यासोबतच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. झाडांची छाटणी, वाढलेले गवत तसेच आहे. त्यामुळे फिरावयास येणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तुकाई माता उद्यानाचे प्रवेशद्वारास कुलूप लावण्यात आले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परंतु तेथे जाण्यासाठी वाट करण्यात आली असून नागरिक कसरतीने उद्यानात प्रवेश करतात. उद्यानात देखील झाडे झुडपे वाढलेली आहेत. हिंगण्यातील जॉगिंग ट्रॅक मोठा असून येथे सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक फिरावयास येतात. परंतु वाढलेली झाडे, गवत तसेच कचरा, प्राण्यांची घाण यामुळे नागरिकांना चालताना अडथळे येतात. यावर तत्काळ कारवाई करावी. तसेच तुकाई माता विज्ञान आणि ओपन जिम तत्काळ सुरू करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमचा जिमचा ग्रुप आहे. आम्ही दररोज येथे फिरावयास येतो तसेच तुकाईमाता उद्यानात असलेल्या ओपन जिमच्या साहाय्याने व्यायाम करतो. मात्र, येथील प्रवेशद्वार उघडले नाही तसेच झाडे गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा त्रास होतो. त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
- अक्षय कोकरे, नागरिक, हिंगणे

आम्ही या परिसरात नियमित व्यायामासाठी येतो. सकाळी किमान दोन तास या परिसरात व्यायामासाठी असतो. परंतु कचरा, घाण, वाढलेली झाडेझुडपे, गवत यामुळे त्रास होत आहे. तसेच उद्यान खुले नसल्याने अडचण होत आहे. उद्यान खुले करावे.
- हमीद इनामदार, नागरिक, सिंहगड रस्ता 

हे उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक जवळ असून, येथे फिरावयास जाता येते. परंतु, वाढलेली झाडे आणि अस्वच्छतेमुळे चालणे अवघड होते. तसेच, झाडे जास्त प्रमाणात वाढल्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍नही उपस्थित होऊ शकतो. ट्रॅकवर वाढदिवस आदी साजरे केले जातात. त्याचा कचरा देखील येथे पडलेला असतो. त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
- स्मिता कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक, हिंगणे

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक अद्याप बंदच  नागरिकांमध्ये नाराजी; ट्रॅकवरील गवताच्या साम्राज्यामुळे व्यायाम करण्यास अडचण सिंहगड रस्ता - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकनंतर महापालिकेने उद्याने खुली केली. मात्र, ओपन जिम आणि जॉगिंग ट्रॅक अद्याप खुली केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सिंहगड रस्त्यावर तुकाई माता उद्यान तसेच जॉगिंग ट्रॅक आहे. याच भागात दोन ठिकाणी ओपन जिम देखील आहे. मात्र त्या भागात कुलूप घातले आहे. त्यामुळे या उद्यानाचा नागरिकांना वापर करता येत नाही. उद्याने खुली करून एक महिना झाला मात्र उद्यानाचे प्रवेशद्वार अद्यापही बंदच आहेत. या सोबतच येथे वाढलेली झाडेझुडपे याचा जॉगिंग ट्रॅकवर चालण्यास येणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. ट्रॅकवर कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यासोबतच कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. झाडांची छाटणी, वाढलेले गवत तसेच आहे. त्यामुळे फिरावयास येणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तुकाई माता उद्यानाचे प्रवेशद्वारास कुलूप लावण्यात आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप परंतु तेथे जाण्यासाठी वाट करण्यात आली असून नागरिक कसरतीने उद्यानात प्रवेश करतात. उद्यानात देखील झाडे झुडपे वाढलेली आहेत. हिंगण्यातील जॉगिंग ट्रॅक मोठा असून येथे सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक फिरावयास येतात. परंतु वाढलेली झाडे, गवत तसेच कचरा, प्राण्यांची घाण यामुळे नागरिकांना चालताना अडथळे येतात. यावर तत्काळ कारवाई करावी. तसेच तुकाई माता विज्ञान आणि ओपन जिम तत्काळ सुरू करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आमचा जिमचा ग्रुप आहे. आम्ही दररोज येथे फिरावयास येतो तसेच तुकाईमाता उद्यानात असलेल्या ओपन जिमच्या साहाय्याने व्यायाम करतो. मात्र, येथील प्रवेशद्वार उघडले नाही तसेच झाडे गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा त्रास होतो. त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. - अक्षय कोकरे, नागरिक, हिंगणे आम्ही या परिसरात नियमित व्यायामासाठी येतो. सकाळी किमान दोन तास या परिसरात व्यायामासाठी असतो. परंतु कचरा, घाण, वाढलेली झाडेझुडपे, गवत यामुळे त्रास होत आहे. तसेच उद्यान खुले नसल्याने अडचण होत आहे. उद्यान खुले करावे. - हमीद इनामदार, नागरिक, सिंहगड रस्ता  हे उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक जवळ असून, येथे फिरावयास जाता येते. परंतु, वाढलेली झाडे आणि अस्वच्छतेमुळे चालणे अवघड होते. तसेच, झाडे जास्त प्रमाणात वाढल्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍नही उपस्थित होऊ शकतो. ट्रॅकवर वाढदिवस आदी साजरे केले जातात. त्याचा कचरा देखील येथे पडलेला असतो. त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. - स्मिता कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक, हिंगणे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37ssL10
Read More
व्हर्च्युअली अनुभवा नौदलाचा थरार! 

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ‘भारतीय नौदल दिवस’ व्हर्च्युअली साजरा करण्यात येणार आहे. दलाच्या विविध थरारक सागर मोहिमांसह त्यामध्ये शौर्य गाजविलेल्या जवानांच्या मुलाखती घरबसल्या पाहता येणार आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

१९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर भारतीय नौदलाच्या मिळविलेल्या विजयाच्या प्रीत्यर्थ दरवर्षी ४ डिसेंबर हा ‘नौदल दिवस’ (नेव्ही डे) म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी भारतीय नौदलाच्या वतीने नागरिकांत जनजागृती करण्यासाठी, राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी, आपली प्रतिमा उंचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या दिनाची थीम ‘इंडियन नेव्ही-कॉम्बॅट रेडी, क्रेडीबल एंड कोचसिव्ह’ ही आहे.

पदवीधरमध्ये तिप्पटीने, तर शिक्षकांमध्ये दुप्पटीने मतदानाचा टक्का वाढला 

आयएनएस विक्रमादित्यची टूर
आयएनएस विक्रमादित्यच्या वरच्या डेकचा एक छोटा व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) टूर व्हिडिओ हा भारतीय नौदलातील विमानवाहू सेवेचा असेल, जो दर्शकांना पाहण्यासाठी तयार आहे. दर्शक आपला स्मार्ट फोन वापरून फ्लाइट डेक आणि अन्य अवर्गीकृत क्षेत्र ३६० अंशातून व्हिडिओद्वारे पाहू शकतात.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बदल करण्यासाठी मुदत

आयएनएस म्हैसूर ‘अ वॉक अराऊंड’ 
नौदलातील विनाशक ‘आयएनएस म्हैसूर’ही दर्शकांसाठी व्हर्च्युअली उपलब्ध आहे. दर्शकांना जहाजातील कर्मचाऱ्यांकडून संबंधित ब्रीफिंगसह जहाजाच्या प्रमुख ठिकाणांच्या आभासी प्रवासाची अनुभूती देणारा ‘अ वॉक अराऊंड’ हा कार्यक्रम होईल.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी

शौर्य पुरस्कार पुरस्कारार्थीच्या मुलाखती 
शौर्य पुरस्कार विजेते आणि भारतीय नौदलाच्या इतर तज्ज्ञांच्या रेडिओ मुलाखती एफएम चॅनेलद्वारे प्रसारित केल्या जात आहेत. ४ डिसेंबर रोजी रेडिओ मिर्चीवर आणि ‘एआयआर एफएम’वर १ ते ४ डिसेंबर दरम्यान प्रसारण होईल.

पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी

भारतीय नौदलाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण www.indiannavy.nic.in/content/wnc-navy-week-2020 या संकेतस्थळावर होईल. तसेच नौदलाच्या फेसबुक, यु ट्यूब आणि इन्स्टाग्राम पेजवरही संबंधित कार्यक्रम पाहता येतील.

बीटिंग रिट्रीट सोहळ्यासह नेव्ही डे स्पेशल फिल्म 
नौदल दिनावर आधारित असलेल्या इंग्रजी फिल्म ३ डिसेंबर रोजी दूरदर्शनवर प्रसारित होईल. प्रादेशिक वाहिनीवरही याचे प्रसारण केले जाणार आहे. यात फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड यांचा संदेश असेल. प्रादेशिक भाषांमध्ये नेव्हल ऑपरेशन्सचा थरार माहितीपटातून उलगडला जाणार आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्हर्च्युअली अनुभवा नौदलाचा थरार!  पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा ‘भारतीय नौदल दिवस’ व्हर्च्युअली साजरा करण्यात येणार आहे. दलाच्या विविध थरारक सागर मोहिमांसह त्यामध्ये शौर्य गाजविलेल्या जवानांच्या मुलाखती घरबसल्या पाहता येणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर भारतीय नौदलाच्या मिळविलेल्या विजयाच्या प्रीत्यर्थ दरवर्षी ४ डिसेंबर हा ‘नौदल दिवस’ (नेव्ही डे) म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी भारतीय नौदलाच्या वतीने नागरिकांत जनजागृती करण्यासाठी, राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी, आपली प्रतिमा उंचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या दिनाची थीम ‘इंडियन नेव्ही-कॉम्बॅट रेडी, क्रेडीबल एंड कोचसिव्ह’ ही आहे. पदवीधरमध्ये तिप्पटीने, तर शिक्षकांमध्ये दुप्पटीने मतदानाचा टक्का वाढला  आयएनएस विक्रमादित्यची टूर आयएनएस विक्रमादित्यच्या वरच्या डेकचा एक छोटा व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) टूर व्हिडिओ हा भारतीय नौदलातील विमानवाहू सेवेचा असेल, जो दर्शकांना पाहण्यासाठी तयार आहे. दर्शक आपला स्मार्ट फोन वापरून फ्लाइट डेक आणि अन्य अवर्गीकृत क्षेत्र ३६० अंशातून व्हिडिओद्वारे पाहू शकतात. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बदल करण्यासाठी मुदत आयएनएस म्हैसूर ‘अ वॉक अराऊंड’  नौदलातील विनाशक ‘आयएनएस म्हैसूर’ही दर्शकांसाठी व्हर्च्युअली उपलब्ध आहे. दर्शकांना जहाजातील कर्मचाऱ्यांकडून संबंधित ब्रीफिंगसह जहाजाच्या प्रमुख ठिकाणांच्या आभासी प्रवासाची अनुभूती देणारा ‘अ वॉक अराऊंड’ हा कार्यक्रम होईल. महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी शौर्य पुरस्कार पुरस्कारार्थीच्या मुलाखती  शौर्य पुरस्कार विजेते आणि भारतीय नौदलाच्या इतर तज्ज्ञांच्या रेडिओ मुलाखती एफएम चॅनेलद्वारे प्रसारित केल्या जात आहेत. ४ डिसेंबर रोजी रेडिओ मिर्चीवर आणि ‘एआयआर एफएम’वर १ ते ४ डिसेंबर दरम्यान प्रसारण होईल. पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी भारतीय नौदलाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण www.indiannavy.nic.in/content/wnc-navy-week-2020 या संकेतस्थळावर होईल. तसेच नौदलाच्या फेसबुक, यु ट्यूब आणि इन्स्टाग्राम पेजवरही संबंधित कार्यक्रम पाहता येतील. बीटिंग रिट्रीट सोहळ्यासह नेव्ही डे स्पेशल फिल्म  नौदल दिनावर आधारित असलेल्या इंग्रजी फिल्म ३ डिसेंबर रोजी दूरदर्शनवर प्रसारित होईल. प्रादेशिक वाहिनीवरही याचे प्रसारण केले जाणार आहे. यात फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड यांचा संदेश असेल. प्रादेशिक भाषांमध्ये नेव्हल ऑपरेशन्सचा थरार माहितीपटातून उलगडला जाणार आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ltwLU3
Read More
प्रत्येक सरकारविरोधी ट्विटवर कारवाई करणार का? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक सरकारविरोधी ट्विटवर राज्य सरकार कारवाई करणार का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज केला. मुख्यमंत्र्यांविरोधात ट्विट करणाऱ्या महिलेच्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला आहे. 

हेही वाचा - जलयुक्त शिवार चौकशीतून योग्य तेच बाहेर येईल; विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांची प्रतिक्रिया

अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत अधिकार असला तरी त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर आक्रमण होता कामा नये. मात्र सरकारी सेवेत असणाऱ्यांनी जनतेकडून होणारी टीका सामना करायला हवा, असे मत न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने व्यक्त केली. समाज आणि व्यक्तिगत अधिकार यामध्ये समतोल साधता आला पाहिजे. ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक व्यक्ती विरोधात सरकार कारवाई करणार का? अशा किती कारवाया सरकारला कराव्या लागतील, असे प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले. याचिकादार महिला सुनयना होले यांच्या विरोधात पालघर आणि मुंबई पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट त्यांनी केले होते, असे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. हे गुन्हे रद्द करण्यासाठी त्यांनी ऍड. अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे. 
 

बुधवारी पुढील सुनावणी 
याचिकादार महिला सुनयना होले यांनी सरकारी धोरणांवर मत व्यक्त करुन टीका केली होती, असा युक्तिवाद चंद्रचूड यांनी केला. मात्र अशाप्रकारे सर्रासपणे सरकार आणि राजकीय पक्षांवर टीका करणाऱ्यांना प्रतिबंध करायला हवा, असे सरकारी वकील जे.पी.याज्ञिक यांनी सांगितले. या ट्विटचा हेतू उघड करण्यासाठी तपास सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी यावर पुढील सुनावणी होणार आहे. याआधीही अशाप्रकारे ट्विट करणार्या विरोधात सरकारने गुन्हा दाखल केला आहे. नागपूर खंडपीठामध्येही यावर याचिका करण्यात आल्या होत्या. 

हेही वाचा - जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती गठित; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

काय म्हणाले खंडपीठ? 

आम्ही न्यायाधीश ट्विटर पाहत नाही आणि टीव्हीही बघत नाही. त्यामुळेच आम्ही तटस्थपणे न्यायालयात येतो, असे सुनावणी दरम्यान न्या. शिंदे म्हणाले. तरुण पिढीला मत व्यक्त करायला दिले नाही तर चूक आणि बरोबर त्यांना कसे कळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

Will every anti government tweet be acted upon Mumbai High Court questions state government 

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रत्येक सरकारविरोधी ट्विटवर कारवाई करणार का? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल मुंबई : ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक सरकारविरोधी ट्विटवर राज्य सरकार कारवाई करणार का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज केला. मुख्यमंत्र्यांविरोधात ट्विट करणाऱ्या महिलेच्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला आहे.  हेही वाचा - जलयुक्त शिवार चौकशीतून योग्य तेच बाहेर येईल; विरोधी पक्ष नेते प्रविण देरकर यांची प्रतिक्रिया अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत अधिकार असला तरी त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर आक्रमण होता कामा नये. मात्र सरकारी सेवेत असणाऱ्यांनी जनतेकडून होणारी टीका सामना करायला हवा, असे मत न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने व्यक्त केली. समाज आणि व्यक्तिगत अधिकार यामध्ये समतोल साधता आला पाहिजे. ट्विटरवर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक व्यक्ती विरोधात सरकार कारवाई करणार का? अशा किती कारवाया सरकारला कराव्या लागतील, असे प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले. याचिकादार महिला सुनयना होले यांच्या विरोधात पालघर आणि मुंबई पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट त्यांनी केले होते, असे या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. हे गुन्हे रद्द करण्यासाठी त्यांनी ऍड. अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे.    बुधवारी पुढील सुनावणी  याचिकादार महिला सुनयना होले यांनी सरकारी धोरणांवर मत व्यक्त करुन टीका केली होती, असा युक्तिवाद चंद्रचूड यांनी केला. मात्र अशाप्रकारे सर्रासपणे सरकार आणि राजकीय पक्षांवर टीका करणाऱ्यांना प्रतिबंध करायला हवा, असे सरकारी वकील जे.पी.याज्ञिक यांनी सांगितले. या ट्विटचा हेतू उघड करण्यासाठी तपास सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी यावर पुढील सुनावणी होणार आहे. याआधीही अशाप्रकारे ट्विट करणार्या विरोधात सरकारने गुन्हा दाखल केला आहे. नागपूर खंडपीठामध्येही यावर याचिका करण्यात आल्या होत्या.  हेही वाचा - जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती गठित; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय काय म्हणाले खंडपीठ?  आम्ही न्यायाधीश ट्विटर पाहत नाही आणि टीव्हीही बघत नाही. त्यामुळेच आम्ही तटस्थपणे न्यायालयात येतो, असे सुनावणी दरम्यान न्या. शिंदे म्हणाले. तरुण पिढीला मत व्यक्त करायला दिले नाही तर चूक आणि बरोबर त्यांना कसे कळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.  Will every anti government tweet be acted upon Mumbai High Court questions state government  ------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33yqvnT
Read More
थंडी गुलाबी असली तरी त्वचेची काळजी घ्यावीच लागते ना? जाणून घ्या खास टिप्स

हिवाळ्यातील थंडी कधी गुलाबी तर कधी कुडकुडी भरवणारी अशी असते. कुणाला पावसाळ्यातील दलदलीपेक्षा हा ऋतू हवासा वाटतो. तर कुणाला उन्हात घामाच्या धारा सहन करण्यापेक्षा दोन कपडे अधिक घालून थंडीत फिरलेलं बर अशी अवस्था असते. ज्या-त्या भागातील हवामानानुसार थंडीचे रुप बदलतानाचे चित्र पाहायला मिळते.

त्वचेची काळजी घेण्याची खटोटोप थंडीच्या दिवांसामध्ये करावी लागते  हिवाळा सुरू होताच थंडीमुळे अनेक  छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात.  हात आणि पायांवर रॅशेस पडणे (फुटणे) ही समस्या अनेकांना जाणवते. त्वचा कोरडी पडल्यामुळे हे होत असते. चला तर मग जाणून घेऊयात थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या नेमकेपणाने करुन त्वचा टवटवीत कशी ठेवता येईल यासंदर्भातील काही खास टिप्स 

1) एका बादलीत किंवा टबमध्ये कोमट पाणी घ्यावे व त्या पाण्यात एक ते  दोन चमचे शाम्पू किंवा फेस वॉश टाकावा.
2) खोबऱ्याचे तेल त्वचेला लावणे खूप उपयुक्त आहे. तेलाचे आठ ते नऊ  थेंब पाण्यात टाकावे. 
3)लिंबाच्या कापलेल्या एक ते दोन फोडी पाण्यात टाकाव्या.
4)तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात टाकावा.
5) या पाण्यात हात आणि पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे.
6) लिंबाचा सालीने हात व पाय घासावे तुरतीने ही  हात पाय घासावे.
7) दहा ते पंधरा मिनिटानंतर हात पाय स्वच्छ कापडाने अथवा रुमालाने पुसून टाकावे
8) हात व पायांना आवडीनुसार बॉडी लोशनचा वापर करावा. 
9) बाजारात काही आयुर्वेदिक लोशनही उपलब्ध आहेत. ते वापरण्यासही हरकत नाही
10)साबणाच्या वापरामुळेही त्वचा फुटण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे साबण निवडतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी लागते. 

------------------------------------------------------------------------------------------------

(थंडीच्या दिवसांत त्वचेची निगा राखण्यासाठी उपायासंदर्भात कोणताही उपाय करताना कृपया आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला निश्चित घ्यावा. माहितीच्या आधारावर कोणत्याही गोष्टी करु नयेत.)   

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

थंडी गुलाबी असली तरी त्वचेची काळजी घ्यावीच लागते ना? जाणून घ्या खास टिप्स हिवाळ्यातील थंडी कधी गुलाबी तर कधी कुडकुडी भरवणारी अशी असते. कुणाला पावसाळ्यातील दलदलीपेक्षा हा ऋतू हवासा वाटतो. तर कुणाला उन्हात घामाच्या धारा सहन करण्यापेक्षा दोन कपडे अधिक घालून थंडीत फिरलेलं बर अशी अवस्था असते. ज्या-त्या भागातील हवामानानुसार थंडीचे रुप बदलतानाचे चित्र पाहायला मिळते. त्वचेची काळजी घेण्याची खटोटोप थंडीच्या दिवांसामध्ये करावी लागते  हिवाळा सुरू होताच थंडीमुळे अनेक  छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात.  हात आणि पायांवर रॅशेस पडणे (फुटणे) ही समस्या अनेकांना जाणवते. त्वचा कोरडी पडल्यामुळे हे होत असते. चला तर मग जाणून घेऊयात थंडीच्या दिवसांत त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या नेमकेपणाने करुन त्वचा टवटवीत कशी ठेवता येईल यासंदर्भातील काही खास टिप्स  1) एका बादलीत किंवा टबमध्ये कोमट पाणी घ्यावे व त्या पाण्यात एक ते  दोन चमचे शाम्पू किंवा फेस वॉश टाकावा. 2) खोबऱ्याचे तेल त्वचेला लावणे खूप उपयुक्त आहे. तेलाचे आठ ते नऊ  थेंब पाण्यात टाकावे.  3)लिंबाच्या कापलेल्या एक ते दोन फोडी पाण्यात टाकाव्या. 4)तुरटीचा छोटा तुकडा पाण्यात टाकावा. 5) या पाण्यात हात आणि पाय दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे. 6) लिंबाचा सालीने हात व पाय घासावे तुरतीने ही  हात पाय घासावे. 7) दहा ते पंधरा मिनिटानंतर हात पाय स्वच्छ कापडाने अथवा रुमालाने पुसून टाकावे 8) हात व पायांना आवडीनुसार बॉडी लोशनचा वापर करावा.  9) बाजारात काही आयुर्वेदिक लोशनही उपलब्ध आहेत. ते वापरण्यासही हरकत नाही 10)साबणाच्या वापरामुळेही त्वचा फुटण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे साबण निवडतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी लागते.  ------------------------------------------------------------------------------------------------ (थंडीच्या दिवसांत त्वचेची निगा राखण्यासाठी उपायासंदर्भात कोणताही उपाय करताना कृपया आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला निश्चित घ्यावा. माहितीच्या आधारावर कोणत्याही गोष्टी करु नयेत.)      News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VlW7bU
Read More
गॅजेट्स : वेध 5G मोबाईल्सचे...

तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा वेग जेवढा अधिक, तेवढे तुम्ही अधिक ‘अपग्रेड’ समजले जाता. इंटरनेटचा वेग अवलंबून असतो तो तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरवर. ती तुम्हाला ‘फोर-जी’ सेवा देते की ‘फाइव्ह-जी’ यावर. सध्या देशात ‘फोर-जी’चे नेटवर्क उपलब्ध असले, तरी प्रत्यक्षात इंटरनेटच्या स्पीडबाबतची ओरड कायमच असते. अशातच आता आपल्या देशात ‘फाइव्ह-जी’ इंटरनेटसेवेचे वेध लागले आहेत. त्यासाठी काही कंपन्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. दरम्यान, ‘फाइव्ह-जी’ तंत्रज्ञान भारतात येईल तेव्हा येईल; मात्र फाइव्ह जी मोबाईल बाजारात दाखल झाले आहेत. जाणून घेऊया काही निवडक ‘फाइव्ह-जी’ मोबाईल्सबद्दल... 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Specifications

डिस्प्ले 

प्रोसेसर 

रॅम

स्टोरेज 

कॅमेरा 

फ्रंट कॅमेरा 

बॅटरी

ऑपरेटिंग सिस्टिम

किंमत

वन प्लस नॉर्ड
वनप्लस या लोकप्रिय मोबाईल ब्रॅंडने वनप्लस नॉर्ड या किफायतशीर दरातील मोबाईलमध्ये फाइव्ह-जी तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरी असलेल्या या मोबाईलमध्ये ड्युएल सेल्फी कॅमेरा आणि चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप दिला आहे. ६.४४ इंची फुल एचडी एमोल्ड डिस्प्ले हा या मोबाईलचा यूएसपी आहे. या मोबाईलची किंमत २७९९९ पासून सुरू होते. 

६.४४ एचडी एमोल्ड डिस्प्ले 

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५जी 

८ GB 

१२८ GB 

४८MP + ८MP + ५MP + २MP 

३२MP + ८MP 

४११५mAh 

ॲण्ड्रॉइड १० 

२७,९९९ रुपये

आसूस आरओजी फोन ३
मोबाईलवरील गेमिंगप्रेमींसाठी खास सादर केलेल्या आसूस आरोजी फोन ३ या मोबाईलमध्येही फाइव्ह-जी तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. तब्बल ६००० एमएएच बॅटरी ३० वॉट सुपरफास्ट चार्जिंग करण्यास साह्य करते. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरीसह येणाऱ्या या मोबाईलची किंमत ४६९९९ रुपये इतकी आहे. 

६.४४ एचडी एमोल्ड डिस्प्ले 

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५जी 

८ GB 

१२८ GB 

६४MP + १३MP + ५MP 

२४MP 

६०००mAh 

ॲण्ड्रॉइड १० 

४६,९९९ रुपये

मोटोरोला एज + 
मोटोरोलानेही फाइव्ह-जी तंत्रज्ञानाला साह्य करणारा मोबाईल बाजारात आणला आहे. तब्बल १०८ मेगापिक्‍सलचा कॅमेरा हे या मोबाईलचे खास वैशिष्ट्य आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीची जबरदस्त मेमरीमुळे हा मोबाईल जणू एक छोटा संगणकच आहे. या मोबाईलची किंमत आहे सुमारे ६४९९९ रुपये. 

६.४७ एचडी डिस्प्ले 

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५

१२ GB 

२५६ GB 

१०८MP + १६MP + ८MP 

२५MP 

५०००mAh 

ॲण्ड्रॉइड १० 

६४,९९९ रुपये

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गॅजेट्स : वेध 5G मोबाईल्सचे... तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा वेग जेवढा अधिक, तेवढे तुम्ही अधिक ‘अपग्रेड’ समजले जाता. इंटरनेटचा वेग अवलंबून असतो तो तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरवर. ती तुम्हाला ‘फोर-जी’ सेवा देते की ‘फाइव्ह-जी’ यावर. सध्या देशात ‘फोर-जी’चे नेटवर्क उपलब्ध असले, तरी प्रत्यक्षात इंटरनेटच्या स्पीडबाबतची ओरड कायमच असते. अशातच आता आपल्या देशात ‘फाइव्ह-जी’ इंटरनेटसेवेचे वेध लागले आहेत. त्यासाठी काही कंपन्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. दरम्यान, ‘फाइव्ह-जी’ तंत्रज्ञान भारतात येईल तेव्हा येईल; मात्र फाइव्ह जी मोबाईल बाजारात दाखल झाले आहेत. जाणून घेऊया काही निवडक ‘फाइव्ह-जी’ मोबाईल्सबद्दल...  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा Specifications डिस्प्ले  प्रोसेसर  रॅम स्टोरेज  कॅमेरा  फ्रंट कॅमेरा  बॅटरी ऑपरेटिंग सिस्टिम किंमत वन प्लस नॉर्ड वनप्लस या लोकप्रिय मोबाईल ब्रॅंडने वनप्लस नॉर्ड या किफायतशीर दरातील मोबाईलमध्ये फाइव्ह-जी तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरी असलेल्या या मोबाईलमध्ये ड्युएल सेल्फी कॅमेरा आणि चार रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप दिला आहे. ६.४४ इंची फुल एचडी एमोल्ड डिस्प्ले हा या मोबाईलचा यूएसपी आहे. या मोबाईलची किंमत २७९९९ पासून सुरू होते.  ६.४४ एचडी एमोल्ड डिस्प्ले  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५जी  ८ GB  १२८ GB  ४८MP + ८MP + ५MP + २MP  ३२MP + ८MP  ४११५mAh  ॲण्ड्रॉइड १०  २७,९९९ रुपये आसूस आरओजी फोन ३ मोबाईलवरील गेमिंगप्रेमींसाठी खास सादर केलेल्या आसूस आरोजी फोन ३ या मोबाईलमध्येही फाइव्ह-जी तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. तब्बल ६००० एमएएच बॅटरी ३० वॉट सुपरफास्ट चार्जिंग करण्यास साह्य करते. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरीसह येणाऱ्या या मोबाईलची किंमत ४६९९९ रुपये इतकी आहे.  ६.४४ एचडी एमोल्ड डिस्प्ले  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५जी  ८ GB  १२८ GB  ६४MP + १३MP + ५MP  २४MP  ६०००mAh  ॲण्ड्रॉइड १०  ४६,९९९ रुपये मोटोरोला एज +  मोटोरोलानेही फाइव्ह-जी तंत्रज्ञानाला साह्य करणारा मोबाईल बाजारात आणला आहे. तब्बल १०८ मेगापिक्‍सलचा कॅमेरा हे या मोबाईलचे खास वैशिष्ट्य आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबीची जबरदस्त मेमरीमुळे हा मोबाईल जणू एक छोटा संगणकच आहे. या मोबाईलची किंमत आहे सुमारे ६४९९९ रुपये.  ६.४७ एचडी डिस्प्ले  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ १२ GB  २५६ GB  १०८MP + १६MP + ८MP  २५MP  ५०००mAh  ॲण्ड्रॉइड १०  ६४,९९९ रुपये Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JEpYK8
Read More
केम्ब्रिजच्या रसायनशास्र विभागाला या भारतीय शास्रज्ञाचे नाव देण्यात आले

पुणे - इंग्लंडस्थित केम्ब्रिज विद्यापीठाच्या रसायनशास्र विभागाला भारतीय शास्रज्ञ डॉ. युसूफ हमीद यांचे नाव देण्यात आले आहे. सिप्ला या औषधनिर्माण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ.हमीद यांच्या नावाने हा विभाग २०५० पर्यंत ओळखला जाईल. यासंबंधीची घोषणा केम्ब्रिज विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी केली.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वयाचे ८४ वर्ष पूर्ण करणारे डॉ. हमीद ख्राईस्ट कॉलेजचे विद्यार्थी होते. केम्ब्रिजशी त्यांचा मागील ६६ वर्षांपासून संबंध असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. तसेच जगातील सर्वात जुन्या रसायनशास्रातील अध्यासनांपैकी एक असलेल्या अध्यासनाला आता युसूफ हमीद १७०२ चेअर म्हणून ओळखले जाईल.

पुणे - नगर रस्त्यालगत भर रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने खळबळ

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. स्टीफन जे टोपे म्हणाले,"युसूफ हॅमिद यांनी केंब्रिजमध्ये असतानापासून जीवनातील सकारात्मक बदलांसाठी एक निर्विवाद वचनबद्धता दर्शविली आहे. विभागातील त्यांच्या योगदानाचा विद्यार्थ्यांना आणि संशोधनाला मोठा फायदा होणार आहे.'

खुबीने लपवीले २३ लाखांचे चंदन अखेर जिल्हा पोलिसांनी पकडलेच...

'आयसर'शी होते विशेष संबंध -
डॉ. हमीद यांचे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेशी (आयसर) विशेष संबंध होते. जागतिक स्तरावरील पदवी आणि विज्ञान प्रसार (आउटरिच प्रोग्रॅम) साठी पंधरा कोटी दिल्याचे, आयसरचे ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी सांगितले.

केंब्रिजने मला रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा पाया दिला, मला कसे जगायचे ते शिकवले आणि समाजात कसे योगदान द्यावे हे मला सांगितले. मी एक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी होतो. म्हणून भविष्यातील विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना मदत करण्यास मला आनंद होत आहे. 
- डॉ. युसूफ हमीद.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

केम्ब्रिजच्या रसायनशास्र विभागाला या भारतीय शास्रज्ञाचे नाव देण्यात आले पुणे - इंग्लंडस्थित केम्ब्रिज विद्यापीठाच्या रसायनशास्र विभागाला भारतीय शास्रज्ञ डॉ. युसूफ हमीद यांचे नाव देण्यात आले आहे. सिप्ला या औषधनिर्माण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ.हमीद यांच्या नावाने हा विभाग २०५० पर्यंत ओळखला जाईल. यासंबंधीची घोषणा केम्ब्रिज विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी केली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वयाचे ८४ वर्ष पूर्ण करणारे डॉ. हमीद ख्राईस्ट कॉलेजचे विद्यार्थी होते. केम्ब्रिजशी त्यांचा मागील ६६ वर्षांपासून संबंध असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. तसेच जगातील सर्वात जुन्या रसायनशास्रातील अध्यासनांपैकी एक असलेल्या अध्यासनाला आता युसूफ हमीद १७०२ चेअर म्हणून ओळखले जाईल. पुणे - नगर रस्त्यालगत भर रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने खळबळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. स्टीफन जे टोपे म्हणाले,"युसूफ हॅमिद यांनी केंब्रिजमध्ये असतानापासून जीवनातील सकारात्मक बदलांसाठी एक निर्विवाद वचनबद्धता दर्शविली आहे. विभागातील त्यांच्या योगदानाचा विद्यार्थ्यांना आणि संशोधनाला मोठा फायदा होणार आहे.' खुबीने लपवीले २३ लाखांचे चंदन अखेर जिल्हा पोलिसांनी पकडलेच... 'आयसर'शी होते विशेष संबंध - डॉ. हमीद यांचे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेशी (आयसर) विशेष संबंध होते. जागतिक स्तरावरील पदवी आणि विज्ञान प्रसार (आउटरिच प्रोग्रॅम) साठी पंधरा कोटी दिल्याचे, आयसरचे ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांनी सांगितले. केंब्रिजने मला रसायनशास्त्राच्या शिक्षणाचा पाया दिला, मला कसे जगायचे ते शिकवले आणि समाजात कसे योगदान द्यावे हे मला सांगितले. मी एक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी होतो. म्हणून भविष्यातील विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना मदत करण्यास मला आनंद होत आहे.  - डॉ. युसूफ हमीद. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3okv4u5
Read More
चेन्नईतील स्वयंसेवकाची समस्या लसीशी निगडित नाही; सिरम इंस्टिट्यूटचा दावा

पुणे - चेन्नईतील स्वयंसेवकाच्या ढासळलेल्या आरोग्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. पण याचा कोविशिल्ड लशीच्या चाचणीशी कोणताही संबंध नसल्याचे नैतिक समिती आणि डेटा ऍण्ड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाच्या मुख्य तपासणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे, असा दावा सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविशिल्ड लस टोचून घेतल्यामुळे मेंदुशी निगडित आजारांची गंभीर लक्षणे दिसून येत असल्याचा दावा, चेन्नईतील एका नागरिकाने केला होता. संबंधित संस्थांना नोटीस पाठवून पाच कोटीची नुकसान भरपाईची मागनीही त्यांनी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सिरम इंस्टिट्यूटच्या वतीने समाजमाध्यमांवर हा खुलासा करण्यात आला आहे. कोविशिल्डच्या चाचणीसाठी आवश्‍यक सर्व नियमांसह, नैतिक तत्त्वांचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. यासंबंधीचा सर्व माहिती आणि अहवाल आम्ही ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाला सादर केला असून, पुढील चाचण्या चालू ठेवण्यात येत असल्याचे सिरमने स्पष्ट केले आहे. 

बॅकलाॅगची परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीनेच; गैरप्रकारांना बसणार आळा

लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. तोपर्यंत लसीकरणासाठी आम्ही तिला बाजारात आणणार नाही. लसींच्या वैद्यकीय चाचण्यांची क्‍लिष्टता लक्षात घेता आणि कंपनीच्या प्रतिष्ठेला धोका पोचविणाऱ्या अन्यायकारक गोष्टींविरुद्ध आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. 
- सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चेन्नईतील स्वयंसेवकाची समस्या लसीशी निगडित नाही; सिरम इंस्टिट्यूटचा दावा पुणे - चेन्नईतील स्वयंसेवकाच्या ढासळलेल्या आरोग्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. पण याचा कोविशिल्ड लशीच्या चाचणीशी कोणताही संबंध नसल्याचे नैतिक समिती आणि डेटा ऍण्ड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाच्या मुख्य तपासणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे, असा दावा सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोविशिल्ड लस टोचून घेतल्यामुळे मेंदुशी निगडित आजारांची गंभीर लक्षणे दिसून येत असल्याचा दावा, चेन्नईतील एका नागरिकाने केला होता. संबंधित संस्थांना नोटीस पाठवून पाच कोटीची नुकसान भरपाईची मागनीही त्यांनी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सिरम इंस्टिट्यूटच्या वतीने समाजमाध्यमांवर हा खुलासा करण्यात आला आहे. कोविशिल्डच्या चाचणीसाठी आवश्‍यक सर्व नियमांसह, नैतिक तत्त्वांचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. यासंबंधीचा सर्व माहिती आणि अहवाल आम्ही ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाला सादर केला असून, पुढील चाचण्या चालू ठेवण्यात येत असल्याचे सिरमने स्पष्ट केले आहे.  बॅकलाॅगची परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीनेच; गैरप्रकारांना बसणार आळा लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. तोपर्यंत लसीकरणासाठी आम्ही तिला बाजारात आणणार नाही. लसींच्या वैद्यकीय चाचण्यांची क्‍लिष्टता लक्षात घेता आणि कंपनीच्या प्रतिष्ठेला धोका पोचविणाऱ्या अन्यायकारक गोष्टींविरुद्ध आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत.  - सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36uj9Ue
Read More
दातृत्वाची परिसीमा

बाह्या दुमडलेला स्वच्छ पांढरा शर्ट, किंचितशा सैल पँटमध्ये शर्ट खोवलेला, हळुवारपणे बोलणे, दोन-चार वाक्‍यांनंतर चेहऱ्यावर मंद स्मित करीत खिशातून काजू किंवा बदाम हातांवर ठेवीत एखाद्या सामाजिक घटनेचा उल्लेख करणारे आणि आपण कशी मदत करूया, असा उच्चार करणारे साने डेअरीचे संचालक अनंतराव साने खऱ्या अर्थाने संवेदनशील, क्रियाशील सच्चे समाजसेवक, जिमखाना परिसराचे वैभव होते. त्‍यांचे निधन नुकतेच झाले. त्‍यांना आदरांजली.

 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनंतरावांशी माझा परिचय झाला तब्बल ६५ वर्षापूर्वी साने डेअरीमुळे, एका सामान्य कष्टकरी कुटुंबात १९३४ मध्ये जन्मलेले,  अनंतरावांमध्ये प्रामाणिकपणा, हरहुन्नरीपणा, कष्टप्रद कामाचे दैनंदिन जीवन याचा वारसा मिळाला विष्णूपंत आणि लक्ष्मीबाई या मात्यापित्यांकडून. वडिलांनी गाई म्हशी पाळून दुधाचा व्यवसाय लक्ष्मी रोडवर सुरू केला. वडिलांचे स्नेही परांजपे यांची भांडारकर रस्त्यांवरील डेअरी काही कारणास्तव नीट चालत नव्हती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुर्दैवाने विष्णूपंतांचे अकाली निधन झाले आणि लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलांसह भांडारकर रस्त्यांवरील डेअरीचा कारभार सांभाळण्याचे धाडस केले १९४४ मध्ये. दहा वर्षाचे बालक अनंत मातेसह डेअरीत काम करू लागले. डेअरीचा जम बसला आणि अनंतरावांना व्यायामाचा छंद जडला. उत्साही मित्रांसमवेत शाखेत जाऊन समाजसेवा व्यायाम याची ओळख झाल्यावर १९५० मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, राजमाचीकर, भय्याजी जोशी यांनी हनुमान व्यायाम मंडळ स्थापन केले. 

ते १९५४मध्ये गोवा, दमण, दीव मुक्ती आंदोलनाने वातावरण भारीत झाले. ते सच्चे स्वातंत्र्यसैनिक होते. सरकारकडून मानधन घ्यायचे नाही या उच्चविचाराने त्यांनी कागदोपत्री कोणताही पुरावा स्वीकारला नाही. डेअरीचा जम बसल्यावर त्यांनी लक्ष्मी मोटर्स वर्कशॉप काढले. चारचाकींची सर्व प्रकारची दुरुस्ती त्यांनी आत्मसात केली. त्यांनी १९६० पासून डेअरीमध्ये संपूर्ण लक्ष घातले. पुण्याच्या परिसरांतील गावांमध्ये जाऊन गरजूंना मदत, मार्गदर्शन करून अनेक दूधवाल्यांशी संबंध प्रस्थापित केले. मोठ्या प्रमाणावर दूधसंकलन, पाश्‍चरायझेशन आदी आधुनिक तंत्रज्ञान कार्यरत केले. 

समाजातील कष्टकरी, गरजू आपादग्रस्त घटकांना सढळ हाताने आर्थिक साहाय्य करण्याचा त्यांचा कल कधीच उमगला नाही. त्यांना प्रसिद्धीची हाव कधीच नव्हती. हनुमान व्यायाम मंडळ, विनायक नवयुग मित्र मंडळ, अनंत चर्तुदशीच्या भव्य मिरवणुकीत पोलिसांना हजारो पिशव्या दूध, ‘सकाळ’च्या माध्यमांतून पूरग्रस्त, आपत्तीग्रस्त, बॉम्बस्फोटग्रस्तांना निधी देणे, अनेक शेतकरी तरुणांना देशी गाईचे गोठे उभारून देणे योगविद्या संस्था, वसूबारसेचा भव्य गोमाता पूजन इत्यादी माध्यमातून त्यांनी लक्षावधी रुपयांचे दान केले.

प्रामाणिक शारीरिक श्रमांचे कौतुक आणि दातृत्व यांचा मला न विसरता येणारा अनुभव आला. गिरीप्रेमीच्या एव्हरेस्ट नागरी मोहिमेच्या वेळी २०१२ मध्ये. एव्हरेस्ट मोहिमेसाठी निधी संकलनासाठी मी अनेकांना भेटत होतो. अनंतरावांना त्या मोहिमेची माहिती दिली. निधीची अपेक्षा बोलून दाखविली. त्यांनी क्षणार्धात निक्षून सांगितले ‘एकही पैसा देणार नाही’  मी स्तब्ध झालो.

अपेक्षाभंग पचवता पचवता मी उठू लागलो. त्यांनी हाताला धरून खाली बसविले. त्यांच्या दैनंदिन खुराकासाठी रोज २० लिटर गाईचे दूध पुढच्या ६० दिवसांसाठी दिले. मिनिटाभरांत हिशोब करून १६०० लिटर्स टोकन्सची पिशवी माझ्या हातात ठेवली! १९ मे २०१२ रोजी गिरिप्रेमीच्या नऊ मावळ्यांनी एव्हरेस्ट सर करून विश्‍वविक्रम प्रस्थापित केल्याची बातमी झळकली. आपण त्या मावळयांना भेटायला बाकरवडया, पेढे घेऊन काठमांडूला जायचे अशी ऑर्डर दिली. आम्ही २६ मेला तेथे पोचलो. एव्हरेस्टवीरांना अनंतरावांनी दिलेले आलिंगन मी कधीच विसरू शकत नाही.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दातृत्वाची परिसीमा बाह्या दुमडलेला स्वच्छ पांढरा शर्ट, किंचितशा सैल पँटमध्ये शर्ट खोवलेला, हळुवारपणे बोलणे, दोन-चार वाक्‍यांनंतर चेहऱ्यावर मंद स्मित करीत खिशातून काजू किंवा बदाम हातांवर ठेवीत एखाद्या सामाजिक घटनेचा उल्लेख करणारे आणि आपण कशी मदत करूया, असा उच्चार करणारे साने डेअरीचे संचालक अनंतराव साने खऱ्या अर्थाने संवेदनशील, क्रियाशील सच्चे समाजसेवक, जिमखाना परिसराचे वैभव होते. त्‍यांचे निधन नुकतेच झाले. त्‍यांना आदरांजली.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अनंतरावांशी माझा परिचय झाला तब्बल ६५ वर्षापूर्वी साने डेअरीमुळे, एका सामान्य कष्टकरी कुटुंबात १९३४ मध्ये जन्मलेले,  अनंतरावांमध्ये प्रामाणिकपणा, हरहुन्नरीपणा, कष्टप्रद कामाचे दैनंदिन जीवन याचा वारसा मिळाला विष्णूपंत आणि लक्ष्मीबाई या मात्यापित्यांकडून. वडिलांनी गाई म्हशी पाळून दुधाचा व्यवसाय लक्ष्मी रोडवर सुरू केला. वडिलांचे स्नेही परांजपे यांची भांडारकर रस्त्यांवरील डेअरी काही कारणास्तव नीट चालत नव्हती.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दुर्दैवाने विष्णूपंतांचे अकाली निधन झाले आणि लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलांसह भांडारकर रस्त्यांवरील डेअरीचा कारभार सांभाळण्याचे धाडस केले १९४४ मध्ये. दहा वर्षाचे बालक अनंत मातेसह डेअरीत काम करू लागले. डेअरीचा जम बसला आणि अनंतरावांना व्यायामाचा छंद जडला. उत्साही मित्रांसमवेत शाखेत जाऊन समाजसेवा व्यायाम याची ओळख झाल्यावर १९५० मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, राजमाचीकर, भय्याजी जोशी यांनी हनुमान व्यायाम मंडळ स्थापन केले.  ते १९५४मध्ये गोवा, दमण, दीव मुक्ती आंदोलनाने वातावरण भारीत झाले. ते सच्चे स्वातंत्र्यसैनिक होते. सरकारकडून मानधन घ्यायचे नाही या उच्चविचाराने त्यांनी कागदोपत्री कोणताही पुरावा स्वीकारला नाही. डेअरीचा जम बसल्यावर त्यांनी लक्ष्मी मोटर्स वर्कशॉप काढले. चारचाकींची सर्व प्रकारची दुरुस्ती त्यांनी आत्मसात केली. त्यांनी १९६० पासून डेअरीमध्ये संपूर्ण लक्ष घातले. पुण्याच्या परिसरांतील गावांमध्ये जाऊन गरजूंना मदत, मार्गदर्शन करून अनेक दूधवाल्यांशी संबंध प्रस्थापित केले. मोठ्या प्रमाणावर दूधसंकलन, पाश्‍चरायझेशन आदी आधुनिक तंत्रज्ञान कार्यरत केले.  समाजातील कष्टकरी, गरजू आपादग्रस्त घटकांना सढळ हाताने आर्थिक साहाय्य करण्याचा त्यांचा कल कधीच उमगला नाही. त्यांना प्रसिद्धीची हाव कधीच नव्हती. हनुमान व्यायाम मंडळ, विनायक नवयुग मित्र मंडळ, अनंत चर्तुदशीच्या भव्य मिरवणुकीत पोलिसांना हजारो पिशव्या दूध, ‘सकाळ’च्या माध्यमांतून पूरग्रस्त, आपत्तीग्रस्त, बॉम्बस्फोटग्रस्तांना निधी देणे, अनेक शेतकरी तरुणांना देशी गाईचे गोठे उभारून देणे योगविद्या संस्था, वसूबारसेचा भव्य गोमाता पूजन इत्यादी माध्यमातून त्यांनी लक्षावधी रुपयांचे दान केले. प्रामाणिक शारीरिक श्रमांचे कौतुक आणि दातृत्व यांचा मला न विसरता येणारा अनुभव आला. गिरीप्रेमीच्या एव्हरेस्ट नागरी मोहिमेच्या वेळी २०१२ मध्ये. एव्हरेस्ट मोहिमेसाठी निधी संकलनासाठी मी अनेकांना भेटत होतो. अनंतरावांना त्या मोहिमेची माहिती दिली. निधीची अपेक्षा बोलून दाखविली. त्यांनी क्षणार्धात निक्षून सांगितले ‘एकही पैसा देणार नाही’  मी स्तब्ध झालो. अपेक्षाभंग पचवता पचवता मी उठू लागलो. त्यांनी हाताला धरून खाली बसविले. त्यांच्या दैनंदिन खुराकासाठी रोज २० लिटर गाईचे दूध पुढच्या ६० दिवसांसाठी दिले. मिनिटाभरांत हिशोब करून १६०० लिटर्स टोकन्सची पिशवी माझ्या हातात ठेवली! १९ मे २०१२ रोजी गिरिप्रेमीच्या नऊ मावळ्यांनी एव्हरेस्ट सर करून विश्‍वविक्रम प्रस्थापित केल्याची बातमी झळकली. आपण त्या मावळयांना भेटायला बाकरवडया, पेढे घेऊन काठमांडूला जायचे अशी ऑर्डर दिली. आम्ही २६ मेला तेथे पोचलो. एव्हरेस्टवीरांना अनंतरावांनी दिलेले आलिंगन मी कधीच विसरू शकत नाही. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33vx8as
Read More

Monday, November 30, 2020

वाळवा तालुक्‍यात निवडणूक यंत्रणा सज्ज

इस्लामपूर:  पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी वाळवा तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. तालुक्‍यात पदवीधर मतदारसंघासाठी १६ हजार ४९८ मतदारांसाठी २६ तर शिक्षक मतदारसंघातील १३७७ मतदारांसाठी ८ अशी एकूण ३४ मतदान केंद्रे करण्यात आली आहेत.

मंगळवारी १ डिसेंबरला मतदान होईल. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २३ मतदान केंद्रांवर पाचशेहून अधिक मतदार संख्या असल्याने या केंद्रांवर प्रत्येकी ५ मतदान अधिकारी, उर्वरित ११ मतदान केंद्रांवर चार अधिकारी असे एकूण १५९ मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच ६८ शिपाई निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील.

वाळवा तालुक्‍यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान केंद्र व त्याअंतर्गत  येणारी गावे अशी ः 
  ताकारी- जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन, अंगणवाडी क्रमांक २७१, गणपती मंदिराजवळ ताकारी- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची.
  वाळवा- जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २- वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव. 

इस्लामपूर- इस्लामपूर हायस्कूल, आदर्श बालक मंदिर- इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो.), हुबालवाडी, खरातवाडी. 

पेठ- जिल्हा परिषद शाळा क्र. एक- पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी.

कासेगाव- आझाद विद्यालय- कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी. 

चिकुर्डे- भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे.

येलूर- जिल्हा परिषद मराठी शाळा-  येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी. 

आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स - आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर,  कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी.

शिक्षक मतदारसंघ - 

ताकारी - जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची 

वाळवा - जिल्हा परिषद शाळा क्रं. २ - वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव. 

इस्लामपूर - आदर्श बालक मंदिर - इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो), हुबालवाडी, खरातवाडी. 

पेठ - जिल्हा परिषद शाळा क्र. १ - पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी. 

कासेगाव - आझाद विद्यालय - कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी. 

चिकुर्डे- भारतमाता विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रुक, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे. 

येलूर- जिल्हा परिषद शाळा- येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी. 

आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स- आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर, कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी.

संपादन - अर्चना बनगे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वाळवा तालुक्‍यात निवडणूक यंत्रणा सज्ज इस्लामपूर:  पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी वाळवा तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली. तालुक्‍यात पदवीधर मतदारसंघासाठी १६ हजार ४९८ मतदारांसाठी २६ तर शिक्षक मतदारसंघातील १३७७ मतदारांसाठी ८ अशी एकूण ३४ मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. मंगळवारी १ डिसेंबरला मतदान होईल. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २३ मतदान केंद्रांवर पाचशेहून अधिक मतदार संख्या असल्याने या केंद्रांवर प्रत्येकी ५ मतदान अधिकारी, उर्वरित ११ मतदान केंद्रांवर चार अधिकारी असे एकूण १५९ मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच ६८ शिपाई निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील. वाळवा तालुक्‍यातील पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतदान केंद्र व त्याअंतर्गत  येणारी गावे अशी ः    ताकारी- जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन, अंगणवाडी क्रमांक २७१, गणपती मंदिराजवळ ताकारी- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची.   वाळवा- जिल्हा परिषद शाळा क्र. १ व २- वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव.  इस्लामपूर- इस्लामपूर हायस्कूल, आदर्श बालक मंदिर- इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो.), हुबालवाडी, खरातवाडी.  पेठ- जिल्हा परिषद शाळा क्र. एक- पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी. कासेगाव- आझाद विद्यालय- कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी.  चिकुर्डे- भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे. येलूर- जिल्हा परिषद मराठी शाळा-  येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी.  आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स - आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर,  कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी. शिक्षक मतदारसंघ -  ताकारी - जिल्हा परिषद शाळा ताकारी स्टेशन- ताकारी, रेठरेहरणाक्ष, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, नरसिंहपूर, शिरटे, दुधारी, किल्लेमच्छिंद्रगड, बिचूद, कोळे, लवंडमाची, बेरडमाची  वाळवा - जिल्हा परिषद शाळा क्रं. २ - वाळवा, शिरगाव, गोटखिंडी, बावची, पडवळवाडी, नवेखेड, जुनेखेड, पोखर्णी, गाताडवाडी, ढवळी, अहिरवाडी, नागाव.  इस्लामपूर - आदर्श बालक मंदिर - इस्लामपूर, बोरगाव, बनेवाडी, तुजारपूर, बहे, साखराळे, मसूचीवाडी, साटपेवाडी, फार्णेवाडी (बो), हुबालवाडी, खरातवाडी.  पेठ - जिल्हा परिषद शाळा क्र. १ - पेठ, नायकलवाडी, घबकवाडी, धुमाळवाडी, कामेरी, ओझर्डे, माणिकवाडी, रेठरेधरण, सुरुल, महादेववाडी, वाघवाडी, शिवपुरी, विठ्ठलवाडी, कापूरवाडी.  कासेगाव - आझाद विद्यालय - कासेगाव, भाटवाडी, नेर्ले, काळमवाडी, तांबवे, वाटेगाव, कापूसखेड, धोत्रेवाडी, शेणे, केदारवाडी.  चिकुर्डे- भारतमाता विद्यालय- चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रुक, कुरळप, वशी, लाडेगाव, करंजवडे, कार्वे, देवर्डे, ढगेवाडी, डोंगरवाडी, शेखरवाडी, ठाणापुडे.  येलूर- जिल्हा परिषद शाळा- येलूर, कणेगाव, येडेनिपाणी, बहादूरवाडी, तांदूळवाडी, मालेवाडी, इटकरे, कुंडलवाडी.  आष्टा- न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स- आष्टा, शिगाव, बागणी, कोरेगाव, मिरजवाडी, कृष्णानगर, कारंदवाडी, मर्दवाडी, भडकंबे, फाळकेवाडी, फार्णेवाडी (शि), काकाचीवाडी. संपादन - अर्चना बनगे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qqr9Oa
Read More
रद्द विमानप्रवास, सहलींचा परतावा साह्यासाठी, ग्राहक पंचायत सज्ज! प्रवाशांना मार्गदर्शक पत्रके जारी

मुंबई ः कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे रद्द झालेले विमान प्रवास तसेच सहली आदींचे पैसे पर्यटकांना परत मिळण्यासंदर्भात त्यांना साह्य करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत सज्ज असून, त्यांनी याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करणारी पत्रकेही जारी केली आहेत. 

हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका

रद्द विमान प्रवासाबद्दल विमान कंपन्यांनी ग्राहकांना क्रेडिट शेल दिले असले तरीही त्या रकमेचा पूर्ण परतावा ग्राहकांना व्याजासह मिळायला हवा. त्याबाबत काही शंका असल्यास प्रवाशांनी मुंबई ग्राहक पंचायतीला ई-मेल पाठवावा, असे आवाहन कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केले आहे. 
प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा एजंटामार्फत तिकीट काढले असले तरीही त्यांना परतावा मिळेल. परदेशी विमान कंपन्या क्रेडिट शेल देऊ शकत नाहीत. त्यांनी तत्काळ पैसे परत दिले पाहिजेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक विमान कंपन्या प्रवाशांना पैसे परत देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी यासंदर्भात संबंधित विमान कंपनी, एजंट, प्रवासी कंपनी आदींकडे तिकीट रकमेच्या परताव्याची मागणी करावी. त्यासोबत ग्राहक पंचायत व डीजीसीए यांनाही पुढील ई-मेलवर सीसी ठेवावे, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात mgptakrar@gmail.com व dgoffice.dgca@nic.in येथेही तक्रार करावी, असेही आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे. 

हेही वाचा - जोगेश्वरीतल्या तरुणीला फेसबुकवरील मैत्री पडली महागात

दरम्यान, पर्यटन कंपन्यांमार्फत सहलींचे आरक्षण केलेल्या ग्राहकांनाही परतावा मिळत नसल्याबाबत मुंबई ग्राहक पंचायत व केंद्रीय पर्यटन महासंचालक यांच्या पुढाकाराने पर्यटन कंपन्यांसोबत बैठक झाली. पर्यटन कंपन्यांकडून परताव्याबाबत ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देशपांडे आणि अर्चना सबनीस यांनी दिली. अनेक युरोपीय देशांनी पर्यटन कंपन्यांना ग्राहकांचे पैसे परत देण्याचे आदेश दिले आहेत. विमानप्रवास रकमेच्या परताव्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा पर्यटन किंवा सहलीतील विमान प्रवासालाही लागू होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत संबंधितांनी पुढील आठवड्यात आपले प्रस्ताव मांडावेत व यावर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असे पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती रुपिंदर ब्रार यांनी सांगितले. 

Consumer Panchayat ready for canceled flights, return of trips Issuance of guide sheets to passengers

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

रद्द विमानप्रवास, सहलींचा परतावा साह्यासाठी, ग्राहक पंचायत सज्ज! प्रवाशांना मार्गदर्शक पत्रके जारी मुंबई ः कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे रद्द झालेले विमान प्रवास तसेच सहली आदींचे पैसे पर्यटकांना परत मिळण्यासंदर्भात त्यांना साह्य करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत सज्ज असून, त्यांनी याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करणारी पत्रकेही जारी केली आहेत.  हेही वाचा - कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका रद्द विमान प्रवासाबद्दल विमान कंपन्यांनी ग्राहकांना क्रेडिट शेल दिले असले तरीही त्या रकमेचा पूर्ण परतावा ग्राहकांना व्याजासह मिळायला हवा. त्याबाबत काही शंका असल्यास प्रवाशांनी मुंबई ग्राहक पंचायतीला ई-मेल पाठवावा, असे आवाहन कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी केले आहे.  प्रवाशांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा एजंटामार्फत तिकीट काढले असले तरीही त्यांना परतावा मिळेल. परदेशी विमान कंपन्या क्रेडिट शेल देऊ शकत नाहीत. त्यांनी तत्काळ पैसे परत दिले पाहिजेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक विमान कंपन्या प्रवाशांना पैसे परत देत नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी यासंदर्भात संबंधित विमान कंपनी, एजंट, प्रवासी कंपनी आदींकडे तिकीट रकमेच्या परताव्याची मागणी करावी. त्यासोबत ग्राहक पंचायत व डीजीसीए यांनाही पुढील ई-मेलवर सीसी ठेवावे, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात mgptakrar@gmail.com व dgoffice.dgca@nic.in येथेही तक्रार करावी, असेही आवाहन ग्राहक पंचायतीने केले आहे.  हेही वाचा - जोगेश्वरीतल्या तरुणीला फेसबुकवरील मैत्री पडली महागात दरम्यान, पर्यटन कंपन्यांमार्फत सहलींचे आरक्षण केलेल्या ग्राहकांनाही परतावा मिळत नसल्याबाबत मुंबई ग्राहक पंचायत व केंद्रीय पर्यटन महासंचालक यांच्या पुढाकाराने पर्यटन कंपन्यांसोबत बैठक झाली. पर्यटन कंपन्यांकडून परताव्याबाबत ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देशपांडे आणि अर्चना सबनीस यांनी दिली. अनेक युरोपीय देशांनी पर्यटन कंपन्यांना ग्राहकांचे पैसे परत देण्याचे आदेश दिले आहेत. विमानप्रवास रकमेच्या परताव्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा पर्यटन किंवा सहलीतील विमान प्रवासालाही लागू होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याचेही देशपांडे यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत संबंधितांनी पुढील आठवड्यात आपले प्रस्ताव मांडावेत व यावर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असे पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती रुपिंदर ब्रार यांनी सांगितले.  Consumer Panchayat ready for canceled flights, return of trips Issuance of guide sheets to passengers -------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lp73jx
Read More
राज्यातील घराणेशाही बदलण्यासाठी संभाजी बिग्रेडचा राजकीय जन्म - प्रा. गंगाधर बनबरे

पुणे - राज्यातील प्रस्थापित घराणेशाही बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा राजकीय जन्म झाला असल्याचे मत या संघटनेचे मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी सोमवारी (ता.30) पुण्यात बोलताना व्यक्त केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज पुण्यात संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदेश कोशाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, ठाणे विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, सूर्यकांत भोसले, नीलेश काळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महिला जिल्हाध्यक्ष मोहिनी रणदिवे, गणेश चऱ्हाटे, संदीप लहाने पाटील, नीलेश काळे, विवेक कावरे आदी उपस्थित होते.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

 

प्रा. बनबरे म्हणाले, 'संभाजी ब्रिगेडने 25 वर्ष समाजकारण केले. या कालावधीत राज्यातील गावागावात जाऊन प्रत्येक घराघरांत प्रबोधनाचा महासागर निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकरांची विचारधारा लोकांच्या मनामध्ये रुजवली. मात्र आता राज्याला सामाजिक व राजकीयदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी व प्रस्थापित घराणेशाही व्यवस्था बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या अगदी गाव पातळीपासून विधिमंडळापर्यंत राजकीय स्पेस निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडची घोडदौड सुरू आहे.''

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणार आहे. यासाठी तरुणांचे संघटन आहे. राज्याचे नेतृत्व तरुणांनी करावे, यासाठी संभाजी ब्रिगेडचा संघर्ष सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले. चंद्रशेखर घाडगे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश मोहिते व उत्तम कामठे यांनी आभार मानले.

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यातील घराणेशाही बदलण्यासाठी संभाजी बिग्रेडचा राजकीय जन्म - प्रा. गंगाधर बनबरे पुणे - राज्यातील प्रस्थापित घराणेशाही बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा राजकीय जन्म झाला असल्याचे मत या संघटनेचे मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी सोमवारी (ता.30) पुण्यात बोलताना व्यक्त केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आज पुण्यात संभाजी ब्रिगेडचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रदेश कोशाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, ठाणे विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, सूर्यकांत भोसले, नीलेश काळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महिला जिल्हाध्यक्ष मोहिनी रणदिवे, गणेश चऱ्हाटे, संदीप लहाने पाटील, नीलेश काळे, विवेक कावरे आदी उपस्थित होते. पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी   प्रा. बनबरे म्हणाले, 'संभाजी ब्रिगेडने 25 वर्ष समाजकारण केले. या कालावधीत राज्यातील गावागावात जाऊन प्रत्येक घराघरांत प्रबोधनाचा महासागर निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू- आंबेडकरांची विचारधारा लोकांच्या मनामध्ये रुजवली. मात्र आता राज्याला सामाजिक व राजकीयदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी व प्रस्थापित घराणेशाही व्यवस्था बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या अगदी गाव पातळीपासून विधिमंडळापर्यंत राजकीय स्पेस निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडची घोडदौड सुरू आहे.'' कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणार आहे. यासाठी तरुणांचे संघटन आहे. राज्याचे नेतृत्व तरुणांनी करावे, यासाठी संभाजी ब्रिगेडचा संघर्ष सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले. चंद्रशेखर घाडगे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश मोहिते व उत्तम कामठे यांनी आभार मानले. पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

November 30, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mD3Tdz
Read More