Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 4, 2020

शुल्कमाफीसाठी वंचितचा एल्गार; शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण

मुंबई : लॉकडाऊनमुळे सामान्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असताना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळा पालकांकडून अवास्तव शुल्क वसूल करत आहेत. हे शुल्क भरणे सामान्यांना शक्‍य नसल्याने राज्य सरकारने या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण दिनानिमित्त सकाळी धारावीतील 90 फूट रोडवर मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 

स्टंटबाजी जीवावर बेतली, सुर्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी धारावी तालुक्‍याच्या वतीने गेल्या महिन्यात शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. यानंतरही शिक्षण विभागाने याप्रकरणी निर्णय न घेतल्याने पक्षाने शिक्षक दिनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सकाळी 8 वाजता मनिहार इकबाल हुसेन, विनोद जैसवार, नवीन मुगेश, सुनील कांबळे, सुषमा सोहनी आदी पदाधिकारी उपोषणाला बसणार आहेत. हे लोन लवकरच राज्यभरात पोहचून जनता सरकारला शुल्क माफ करण्यासाठी भाग पडेल, असे वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सांगितले.

दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

घरात दोन मुले शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी मोबाईल खरेदी करावा लागत आहे. तसेच मोबाईल डेटावर खर्च करावा लागत आहे. कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाऐवजी ऑनलाईन शिक्षणावर पालकांचा खर्च वाढला आहे. यातच शाळा शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहेत. तरीही शिक्षणमंत्री पालकांना दिलासा देत नसल्याने हे उपोषण करण्यात येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. 
-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शुल्कमाफीसाठी वंचितचा एल्गार; शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण मुंबई : लॉकडाऊनमुळे सामान्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असताना ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळा पालकांकडून अवास्तव शुल्क वसूल करत आहेत. हे शुल्क भरणे सामान्यांना शक्‍य नसल्याने राज्य सरकारने या वर्षीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. याकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण दिनानिमित्त सकाळी धारावीतील 90 फूट रोडवर मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.  स्टंटबाजी जीवावर बेतली, सुर्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी धारावी तालुक्‍याच्या वतीने गेल्या महिन्यात शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. यानंतरही शिक्षण विभागाने याप्रकरणी निर्णय न घेतल्याने पक्षाने शिक्षक दिनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सकाळी 8 वाजता मनिहार इकबाल हुसेन, विनोद जैसवार, नवीन मुगेश, सुनील कांबळे, सुषमा सोहनी आदी पदाधिकारी उपोषणाला बसणार आहेत. हे लोन लवकरच राज्यभरात पोहचून जनता सरकारला शुल्क माफ करण्यासाठी भाग पडेल, असे वंचित बहुजन आघाडीचे वॉर्ड अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सांगितले. दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन घरात दोन मुले शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी मोबाईल खरेदी करावा लागत आहे. तसेच मोबाईल डेटावर खर्च करावा लागत आहे. कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाऐवजी ऑनलाईन शिक्षणावर पालकांचा खर्च वाढला आहे. यातच शाळा शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहेत. तरीही शिक्षणमंत्री पालकांना दिलासा देत नसल्याने हे उपोषण करण्यात येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.  ----------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lPtBeF
Read More
'शिक्षकदिनी तरी कोणी न्याय देईल का?', विनाअनुदानित शिक्षकांची आर्त हाक

पिंपरी : मागील 20 वर्षांपासून शाळांना अनुदान नाही. 15 वर्षे तुकड्यांना अनुदान नाही. आज ना उद्या अनुदान मिळेल, या आशेवर शेकडो विनाअनुदानित शिक्षक 10 ते 15 वर्षे अध्यापन करत आहेत. अनेकांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मागे वळून पाहता येईना, आता नेमकं करावे काय, या चक्रव्यूहात शाळा-महाविद्यालयातील विनाअनुदानित शिक्षक अडकून पडला आहे, ही व्यथा मांडली आहे वडमुखवाडीतील सयाजीनाथ महाराज विद्यालयातील शिक्षक राजकुमार गायकवाड यांनी. या शिक्षकदिनी तरी कोणी न्याय देईल का?, अशी आर्तहाक शिक्षक मारत आहेत. 

- शिक्षकदिनाच्या पुरस्कारांनाही कोरोनाचा 'संसर्ग'

गेल्या 10 ते 15 वर्षांपासून शाळा- महाविद्यालयातील विनाअनुदानित शिक्षक विनावेतन अध्यापन करत आहेत. आता बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांच्या डोळ्यातील आसवे काही केल्या थांबायला तयार नाही. अनेकांनी कंटाळून आत्महत्यादेखील केल्या आहेत. सरकार मात्र, वर्षानुवर्षे केवळ फायली तपासणे आणि आश्‍वासने देण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे दिसून येत आहे. दररोज नवे अध्यादेश निघतात. एवढे अनुदान मंजूर झाले, यांच्या केवळ घोषणा होतात. परंतु, प्रत्यक्षात शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. 

शिक्षक म्हणतात... 

खिशात दमडी नाही, की कोणी उसने देत नाही. शेवटी रोजच हिरमुसल्या चेहऱ्याने शाळेत ज्ञानदानाचे काम करायचे, मुलांसमोर आलबेल असल्याचे भासवायचे, पोटच्या मुलांचे लाडदेखील पुरवू शकत नाही. अंशत: अनुदान, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, हंगामी शिक्षक अशी वर्गवारी करून आपापसांत विचारांची दरी निर्माण केली गेली. अनेक शिक्षक विनावेतन, अल्प वेतनावर ज्ञानदानाचे काम करत आहेत. 
- जी. डी. फलके व एन. बी. खरात 

आपले दुःख, वेदना, समस्या, प्रपंच अडीअडचणी बाजूला सारून विद्यार्थ्यांना घडविण्यात आड आणल्या नाहीत. आता मात्र, पगाराशिवाय जगण्याची सगळ्यांकडून उपेक्षा केली जात आहे. मुलांचे शिक्षण, आजारपण या सगळ्यांना तोंड देणे कठीण झाले आहे. कधीतरी अनुदान मिळेल, या आशेवर वय वाढत गेले. नोकरीची वर्षे वाढत गेली. मागेही वळून पाहता येईना, हाती मात्र काहीच लागले, अशी गत शिक्षकांची झाली आहे. 
- जे. डी. जाधव व जी. एस. बांगर 

संस्थाचालक ही सरकारच्या वेळकाढूपणाला कंटाळलेले आहेत. कोरोनामुळे यावर्षी तर वर्गात विद्यार्थी नाहीत. शुल्क मागायचे कसे? गेल्या वर्षीचे शुल्क अद्याप पालक देईना? शिक्षक मात्र, कायद्याच्या चाकोरीत अडकला आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि पालकांनी आपापल्या सोयीनुसार त्याचे अर्थ लावले आहेत. दरवर्षी केवळ कोट्यवधींचे अनुदान मंजूर झाल्याची घोषणा होते, प्रत्यक्षात शिक्षकांचे हात रिकामेच. 
- डी. बी. मोडक व देविदास जगताप 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

'शिक्षकदिनी तरी कोणी न्याय देईल का?', विनाअनुदानित शिक्षकांची आर्त हाक पिंपरी : मागील 20 वर्षांपासून शाळांना अनुदान नाही. 15 वर्षे तुकड्यांना अनुदान नाही. आज ना उद्या अनुदान मिळेल, या आशेवर शेकडो विनाअनुदानित शिक्षक 10 ते 15 वर्षे अध्यापन करत आहेत. अनेकांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मागे वळून पाहता येईना, आता नेमकं करावे काय, या चक्रव्यूहात शाळा-महाविद्यालयातील विनाअनुदानित शिक्षक अडकून पडला आहे, ही व्यथा मांडली आहे वडमुखवाडीतील सयाजीनाथ महाराज विद्यालयातील शिक्षक राजकुमार गायकवाड यांनी. या शिक्षकदिनी तरी कोणी न्याय देईल का?, अशी आर्तहाक शिक्षक मारत आहेत.  - शिक्षकदिनाच्या पुरस्कारांनाही कोरोनाचा 'संसर्ग' गेल्या 10 ते 15 वर्षांपासून शाळा- महाविद्यालयातील विनाअनुदानित शिक्षक विनावेतन अध्यापन करत आहेत. आता बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांच्या डोळ्यातील आसवे काही केल्या थांबायला तयार नाही. अनेकांनी कंटाळून आत्महत्यादेखील केल्या आहेत. सरकार मात्र, वर्षानुवर्षे केवळ फायली तपासणे आणि आश्‍वासने देण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे दिसून येत आहे. दररोज नवे अध्यादेश निघतात. एवढे अनुदान मंजूर झाले, यांच्या केवळ घोषणा होतात. परंतु, प्रत्यक्षात शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली जातात.  शिक्षक म्हणतात...  खिशात दमडी नाही, की कोणी उसने देत नाही. शेवटी रोजच हिरमुसल्या चेहऱ्याने शाळेत ज्ञानदानाचे काम करायचे, मुलांसमोर आलबेल असल्याचे भासवायचे, पोटच्या मुलांचे लाडदेखील पुरवू शकत नाही. अंशत: अनुदान, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, हंगामी शिक्षक अशी वर्गवारी करून आपापसांत विचारांची दरी निर्माण केली गेली. अनेक शिक्षक विनावेतन, अल्प वेतनावर ज्ञानदानाचे काम करत आहेत.  - जी. डी. फलके व एन. बी. खरात  आपले दुःख, वेदना, समस्या, प्रपंच अडीअडचणी बाजूला सारून विद्यार्थ्यांना घडविण्यात आड आणल्या नाहीत. आता मात्र, पगाराशिवाय जगण्याची सगळ्यांकडून उपेक्षा केली जात आहे. मुलांचे शिक्षण, आजारपण या सगळ्यांना तोंड देणे कठीण झाले आहे. कधीतरी अनुदान मिळेल, या आशेवर वय वाढत गेले. नोकरीची वर्षे वाढत गेली. मागेही वळून पाहता येईना, हाती मात्र काहीच लागले, अशी गत शिक्षकांची झाली आहे.  - जे. डी. जाधव व जी. एस. बांगर  संस्थाचालक ही सरकारच्या वेळकाढूपणाला कंटाळलेले आहेत. कोरोनामुळे यावर्षी तर वर्गात विद्यार्थी नाहीत. शुल्क मागायचे कसे? गेल्या वर्षीचे शुल्क अद्याप पालक देईना? शिक्षक मात्र, कायद्याच्या चाकोरीत अडकला आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि पालकांनी आपापल्या सोयीनुसार त्याचे अर्थ लावले आहेत. दरवर्षी केवळ कोट्यवधींचे अनुदान मंजूर झाल्याची घोषणा होते, प्रत्यक्षात शिक्षकांचे हात रिकामेच.  - डी. बी. मोडक व देविदास जगताप  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ES8zM1
Read More
फटाक्यांच्या स्फोटात सात महिला ठार

चेन्नई - फटाका कारखान्यात स्फोट होऊन सात जण मृत्युमुखी, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज कुरुनगुडी गावात घडली. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सर्व  महिला कामगार आहेत. स्फोटाची तीव्रता एवढी होती, की आवाज बराच अंतरावर आवाज ऐकू गेला.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चेन्नईपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर कट्टूमन्नारकोली परिसरातील कुरुनगुडी गावातील फटाके कारखान्यात अचानक  स्फोट झाला. कारखान्याकडे फटाके निर्मितीचा परवाना होता. तसेच या ठिकाणी  स्थानिक महिला आणि पुरुष  काम करत होते. या कारखान्यात गावठी बॉम्ब तयार करत होते की परवानाप्राप्त स्फोटकांचा वापर करत होते, याचा तपास सुरू असल्याचे कुड्डालोरचे पोलीस अधीक्षक अभिनव यांनी सांगितले. स्फोटामुळे इमारतीचा बराच भाग ढासळला आणि त्याखाली कामगार दबले गेले. घटनेची माहिती कळताच कामगारांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. 

परीक्षेसाठी गर्भवती पत्नीला दुचाकीवरून 1200 किमी केला प्रवास

दिवाळीचा हंगाम गेला
सध्या कोरोना संसर्गाचे अनलॉक-४ सुरू असताना कारखान्यात शंभर टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे बहुतांश कारखाने पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. तसेच, लॉकडाउनमुळे दिवाळीचा हंगाम गेला असला तरी उर्वरित काळात फटाके तयार करण्याचे काम सुरू आहे. 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

फटाक्यांच्या स्फोटात सात महिला ठार चेन्नई - फटाका कारखान्यात स्फोट होऊन सात जण मृत्युमुखी, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज कुरुनगुडी गावात घडली. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सर्व  महिला कामगार आहेत. स्फोटाची तीव्रता एवढी होती, की आवाज बराच अंतरावर आवाज ऐकू गेला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चेन्नईपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर कट्टूमन्नारकोली परिसरातील कुरुनगुडी गावातील फटाके कारखान्यात अचानक  स्फोट झाला. कारखान्याकडे फटाके निर्मितीचा परवाना होता. तसेच या ठिकाणी  स्थानिक महिला आणि पुरुष  काम करत होते. या कारखान्यात गावठी बॉम्ब तयार करत होते की परवानाप्राप्त स्फोटकांचा वापर करत होते, याचा तपास सुरू असल्याचे कुड्डालोरचे पोलीस अधीक्षक अभिनव यांनी सांगितले. स्फोटामुळे इमारतीचा बराच भाग ढासळला आणि त्याखाली कामगार दबले गेले. घटनेची माहिती कळताच कामगारांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.  परीक्षेसाठी गर्भवती पत्नीला दुचाकीवरून 1200 किमी केला प्रवास दिवाळीचा हंगाम गेला सध्या कोरोना संसर्गाचे अनलॉक-४ सुरू असताना कारखान्यात शंभर टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे बहुतांश कारखाने पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. तसेच, लॉकडाउनमुळे दिवाळीचा हंगाम गेला असला तरी उर्वरित काळात फटाके तयार करण्याचे काम सुरू आहे.  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QVFpOh
Read More
Video : पिंपरीतील जम्बो रुग्णालयात फॅसिलिटीही 'जम्बोच' 

पिंपरी : "पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तशी परिस्थिती आपल्यावर ओढवणार नाही, याची काळजी घ्या.' "रुग्णांना चांगली सेवा द्या. मनुष्यबळ वाढवा.' "आपल्याकडे सर्व सुविधा आहेत. रुग्णांवर वैयक्तिक लक्ष आहे.' हे संवाद आहेत, महापालिकेतील दोन वरिष्ठ अधिकारी आणि अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयातील डॉक्‍टरांमधील. यावरून रुग्णांची वैयक्तिकपणे काळजी घेतली जात असल्याचे दिसले. 

- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

- शिक्षकदिनाच्या पुरस्कारांनाही कोरोनाचा 'संसर्ग'

पुणे व पिंपरी-चिंचवडसह परिसरातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. महापालिका व शहरातील खासगी रुग्णालयांतील बेड कमी पडू लागले आहेत. त्यांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने जम्बो फॅसिलिटी रुग्णालये उभारले आहेत. यातील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारलेले रुग्णालय तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. चिंचवड स्टेशन येथील ऑटोक्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथील जम्बो रुग्णालय शुक्रवारपासून (ता. 4) सुरू झाले. पहिल्याच दिवशी दुपारी तीनपर्यंत सहा रुग्ण दाखल झाले होते. या रुग्णालयाचा सर्व खर्च महापालिकेने केला आहे. 

अशा आहेत सुविधा 
जम्बो रुग्णालयात जनरल, ऑक्‍सिजन, आयसीयू (अतिदक्षता विभाग), व्हेंटिलेटर सुविधा (एचडीयू) आहेत. रुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा असून, सकस आहार, पाण्याची सोय आहे. आपत्कालीन स्थितीसाठी अग्निरोधक यंत्रणा बसविली आहे. प्रत्येक विभागात डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. स्ट्रेचरसह व्हिलचेअरही आहेत. रुग्णालयाच्या (स्टेडियम) संरक्षण भिंतीलगतचे गवत, अनावश्‍यक झाडेझुडपे काढण्याचे काम शुक्रवारी सुरू होते. सध्या ऑक्‍सिजन, आयसीयू व एचडीयू असे तीन वॉर्ड कार्यान्वित झाले आहेत. 

कोरोना तपासणी नाही 
रुग्णालय आवाराच्या प्रवेशद्वारावर मोशीतील दोन तरुण आले होते. एकाच्या तोंडाला रुमाल तर, दुसऱ्याने मास्क लावले होते. मास्कवाल्याला कोरोनाची तपासणी करून घ्यायची होती. मात्र, या ठिकाणी तपासणी होत नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याचा मित्र, "चल जिजामाताला जाऊ', म्हणाला आणि दोघेही निघून गेले. 

वस्तुस्थिती 
रुग्णालयाच्या परिसरात काही लोखंडी साहित्य पडून आहे. तसेच एका प्रवेशद्वाराच्या समोर भंगार साहित्य पडलेले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केलेले हे सर्व साहित्य आहे. 

जम्बो फॅसिलिटी रुग्णालये 

मगर स्टेडियम : 800 (रुग्णसेवा सुरू) 

ऑटोक्‍लस्टर : 200 (काम पूर्ण) 

बालनगरी पिंपरी : 425 (उद्‌घाटन बाकी) 

मगर स्टेडियम सद्यःस्थिती 

एकूण बेड : 800 

ऑक्‍सिजन बेड : 600 

आयसीयू बेड : 200 

दृष्टिक्षेपात आयसीयू बेड 

आयसीयू : 60 

एचडीयू बेड : 140 

व्हेंटिलेटर : 30 

शुक्रवारची रुग्णसंख्या (दुपारी बारापर्यंत) 

एकूण रुग्ण : 171 

आयसीयूमध्ये : 20 

जनरल वॉर्ड : 151 

दृष्टिक्षेपात मनुष्यबळ 

डॉक्‍टर : 50 

नर्स : 80 

एकूण युनिट : 3 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वायसीएम, नवीन भोसरी, जिजामाता, ससून व पुणे महापालिका रुग्णालयातून पाठविलेले पॉझिटिव्ह रुग्ण जम्बो फॅसिलिटी रुग्णालयात दाखल करून घेतो. आयसीयू, एचडीयूसह एक्‍स-रे, पॅथॉलॉजी लॅब, डायलिसिसची सुविधा येथे आहे. डॉक्‍टर्स, नर्ससह स्वच्छता कर्मचारी, वॉर्डबॉय पुरेसे आहेत. भविष्यात कोविड टेस्ट इथेच करण्याचे नियोजन आहे. 
- डॉ. प्रीती व्हिक्‍टर, प्रमुख, जम्बो फॅसिलिटी रुग्णालय, मगर स्टेडियम, पिंपरी 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : पिंपरीतील जम्बो रुग्णालयात फॅसिलिटीही 'जम्बोच'  पिंपरी : "पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तशी परिस्थिती आपल्यावर ओढवणार नाही, याची काळजी घ्या.' "रुग्णांना चांगली सेवा द्या. मनुष्यबळ वाढवा.' "आपल्याकडे सर्व सुविधा आहेत. रुग्णांवर वैयक्तिक लक्ष आहे.' हे संवाद आहेत, महापालिकेतील दोन वरिष्ठ अधिकारी आणि अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयातील डॉक्‍टरांमधील. यावरून रुग्णांची वैयक्तिकपणे काळजी घेतली जात असल्याचे दिसले.  - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका - शिक्षकदिनाच्या पुरस्कारांनाही कोरोनाचा 'संसर्ग' पुणे व पिंपरी-चिंचवडसह परिसरातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. महापालिका व शहरातील खासगी रुग्णालयांतील बेड कमी पडू लागले आहेत. त्यांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने जम्बो फॅसिलिटी रुग्णालये उभारले आहेत. यातील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारलेले रुग्णालय तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. चिंचवड स्टेशन येथील ऑटोक्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथील जम्बो रुग्णालय शुक्रवारपासून (ता. 4) सुरू झाले. पहिल्याच दिवशी दुपारी तीनपर्यंत सहा रुग्ण दाखल झाले होते. या रुग्णालयाचा सर्व खर्च महापालिकेने केला आहे.  अशा आहेत सुविधा  जम्बो रुग्णालयात जनरल, ऑक्‍सिजन, आयसीयू (अतिदक्षता विभाग), व्हेंटिलेटर सुविधा (एचडीयू) आहेत. रुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा असून, सकस आहार, पाण्याची सोय आहे. आपत्कालीन स्थितीसाठी अग्निरोधक यंत्रणा बसविली आहे. प्रत्येक विभागात डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. स्ट्रेचरसह व्हिलचेअरही आहेत. रुग्णालयाच्या (स्टेडियम) संरक्षण भिंतीलगतचे गवत, अनावश्‍यक झाडेझुडपे काढण्याचे काम शुक्रवारी सुरू होते. सध्या ऑक्‍सिजन, आयसीयू व एचडीयू असे तीन वॉर्ड कार्यान्वित झाले आहेत.  कोरोना तपासणी नाही  रुग्णालय आवाराच्या प्रवेशद्वारावर मोशीतील दोन तरुण आले होते. एकाच्या तोंडाला रुमाल तर, दुसऱ्याने मास्क लावले होते. मास्कवाल्याला कोरोनाची तपासणी करून घ्यायची होती. मात्र, या ठिकाणी तपासणी होत नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याचा मित्र, "चल जिजामाताला जाऊ', म्हणाला आणि दोघेही निघून गेले.  वस्तुस्थिती  रुग्णालयाच्या परिसरात काही लोखंडी साहित्य पडून आहे. तसेच एका प्रवेशद्वाराच्या समोर भंगार साहित्य पडलेले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केलेले हे सर्व साहित्य आहे.  जम्बो फॅसिलिटी रुग्णालये  मगर स्टेडियम : 800 (रुग्णसेवा सुरू)  ऑटोक्‍लस्टर : 200 (काम पूर्ण)  बालनगरी पिंपरी : 425 (उद्‌घाटन बाकी)  मगर स्टेडियम सद्यःस्थिती  एकूण बेड : 800  ऑक्‍सिजन बेड : 600  आयसीयू बेड : 200  दृष्टिक्षेपात आयसीयू बेड  आयसीयू : 60  एचडीयू बेड : 140  व्हेंटिलेटर : 30  शुक्रवारची रुग्णसंख्या (दुपारी बारापर्यंत)  एकूण रुग्ण : 171  आयसीयूमध्ये : 20  जनरल वॉर्ड : 151  दृष्टिक्षेपात मनुष्यबळ  डॉक्‍टर : 50  नर्स : 80  एकूण युनिट : 3  - पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा वायसीएम, नवीन भोसरी, जिजामाता, ससून व पुणे महापालिका रुग्णालयातून पाठविलेले पॉझिटिव्ह रुग्ण जम्बो फॅसिलिटी रुग्णालयात दाखल करून घेतो. आयसीयू, एचडीयूसह एक्‍स-रे, पॅथॉलॉजी लॅब, डायलिसिसची सुविधा येथे आहे. डॉक्‍टर्स, नर्ससह स्वच्छता कर्मचारी, वॉर्डबॉय पुरेसे आहेत. भविष्यात कोविड टेस्ट इथेच करण्याचे नियोजन आहे.  - डॉ. प्रीती व्हिक्‍टर, प्रमुख, जम्बो फॅसिलिटी रुग्णालय, मगर स्टेडियम, पिंपरी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3h1mufA
Read More

Thursday, September 3, 2020

अवतरेल क्वांटम कम्प्युटिंगचे नवयुग

पुणे - क्वांटम कंप्युटरच्या लॉजिक गेटसाठी (क्‍युबिट्‌स) सामान्य तापमानातही कार्य करू शकेल, असा सूक्ष्म पदार्थ शोधण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) शास्त्रज्ञ डॉ. अंशुमन कुमार यांच्या नेतृत्वातील हे संशोधन क्वांटम कंप्युटिंगच्या नवयुगाचा पाया रचेल यात शंका नाही.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकविसाव्या शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. संगणकापासून सुरू झालेले हे युग आता वेगवान ‘क्वांटम कम्प्युटिंग’मध्ये पदार्पण करत आहे. संगणकात ज्याप्रमाणे लॉजिक गेट असतात त्याप्रमाणे क्वांटम कम्प्युटरमध्ये ‘क्‍युबिट’ असतात. वेगवान गणन प्रक्रियेसाठी या क्‍युबिट्‌समध्ये अतिसंवाहक पदार्थ वापरले जातात. या पदार्थांमध्ये अतिसंवाहकता टिकण्यासाठी अति कमी म्हणजेच उणे तापमानाची गरज असते. परंतु भारतीय शास्त्रज्ञांनी शोधलेला ‘टीएमडीसी’ नावाचा हा सूक्ष्म पदार्थ सामान्य तापमानालाही (वातावरणीय तापमान) कार्य करतो. डॉ. कुमार यांच्यासोबत संशोधक विद्यार्थी डॉ. मुरलीधर नालाबोथुला यांचाही या संशोधनात सहभाग आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून अर्थसाहाय्य लाभलेले हे संशोधन फिजिकल रिव्ह्यू बिया शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'!

क्वांटम कम्प्युटर  
ज्या संगणनासाठी आजच्या अगदी प्रगत सूपरकम्प्यूटर्सना सुद्धा दहा हजार वर्षे लागू शकतात ते संगणन गुगलचे क्वांटम प्रोसेसर निव्वळ २०० सेकंदात करू शकतात, असा दावा ऑक्‍टोबर २०१९ मध्ये गुगलने केला होता. अजूनही जरी नवजात अवस्थेत असले तरी संगणन जगतात क्वांटम संगणक क्रांती घडवू शकतात. 

- इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी​

काय आहे क्‍युबिट्‌स? 

सध्याच्या संगणकांमध्ये गणनेचे मूलभूत एकक बिट आहे. ज्यामध्ये ० किंवा १ अशा दोन स्थिती असतात. 

क्वांटम संगणनात मूलभूत एकक क्‍यूबिट असते. 

प्रकाशकिरणांचे वर्तन एकाच वेळी लहरी किंवा कणा सारखे असते, हा पुंज्य भौतिकशास्त्राचा (क्वांटम फिजिक्‍स) प्रसिद्ध सिद्धांत तुम्हाला माहीतच असेल.

क्‍युबिटमध्ये एकाच वेळी ० आणि १ दोनही वापरता येतात. म्हणजे दोनही अवस्थांचे संकलन आणि वहन करता येते. ज्यामुळे क्‍यूबिट च्या दोन स्थिती शक्‍य होतात.पर्यायाने गणन प्रक्रिया अति वेगवान होते.

- रेल्वेरुळाभोवतीच्या झोपड्या तीन महिन्यांत हटवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश​ 

काय आहे संशोधन 

काही अणूंएवढी जाडी असलेल्या नॅनोचिप्स विकसित

मोनोलेयर ट्रांसिशन मेटल डायकलकोजेनाइड नावाचा या पदार्थाला विद्युतधार दिल्यास (व्होल्टेज) दोनही अवस्था प्राप्त होतात.

पदार्थाच्या मर्यादा 

एक किंवा दोन अणूंचे एकसारखी बांधणी करणे आव्हानात्मक

वैश्विक विकीरणापासून संरक्षण करणे आवश्‍यक

विद्युत विभवंतराचा उपयोग करून क्वांटम स्थिती नियंत्रित करणे शक्‍य असल्यामुळे, तांत्रिकदृष्ट्या क्वांटम स्थिती प्रत्यक्षात आणणे शक्‍य आहे. पुढील तीन ते चार वर्षातच यातील मर्यादा मिटविणे शक्‍य होणार आहे.
- डॉ. अंशुमन कुमार, शास्त्रज्ञ, आयआयटी, मुंबई

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अवतरेल क्वांटम कम्प्युटिंगचे नवयुग पुणे - क्वांटम कंप्युटरच्या लॉजिक गेटसाठी (क्‍युबिट्‌स) सामान्य तापमानातही कार्य करू शकेल, असा सूक्ष्म पदार्थ शोधण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटी) शास्त्रज्ञ डॉ. अंशुमन कुमार यांच्या नेतृत्वातील हे संशोधन क्वांटम कंप्युटिंगच्या नवयुगाचा पाया रचेल यात शंका नाही. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा एकविसाव्या शतक हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. संगणकापासून सुरू झालेले हे युग आता वेगवान ‘क्वांटम कम्प्युटिंग’मध्ये पदार्पण करत आहे. संगणकात ज्याप्रमाणे लॉजिक गेट असतात त्याप्रमाणे क्वांटम कम्प्युटरमध्ये ‘क्‍युबिट’ असतात. वेगवान गणन प्रक्रियेसाठी या क्‍युबिट्‌समध्ये अतिसंवाहक पदार्थ वापरले जातात. या पदार्थांमध्ये अतिसंवाहकता टिकण्यासाठी अति कमी म्हणजेच उणे तापमानाची गरज असते. परंतु भारतीय शास्त्रज्ञांनी शोधलेला ‘टीएमडीसी’ नावाचा हा सूक्ष्म पदार्थ सामान्य तापमानालाही (वातावरणीय तापमान) कार्य करतो. डॉ. कुमार यांच्यासोबत संशोधक विद्यार्थी डॉ. मुरलीधर नालाबोथुला यांचाही या संशोधनात सहभाग आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून अर्थसाहाय्य लाभलेले हे संशोधन फिजिकल रिव्ह्यू बिया शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. दारुच्या नशेत तो पोलिसांना म्हणाला, 'मला गाडी पकडून द्या घरी जायचंय'! क्वांटम कम्प्युटर   ज्या संगणनासाठी आजच्या अगदी प्रगत सूपरकम्प्यूटर्सना सुद्धा दहा हजार वर्षे लागू शकतात ते संगणन गुगलचे क्वांटम प्रोसेसर निव्वळ २०० सेकंदात करू शकतात, असा दावा ऑक्‍टोबर २०१९ मध्ये गुगलने केला होता. अजूनही जरी नवजात अवस्थेत असले तरी संगणन जगतात क्वांटम संगणक क्रांती घडवू शकतात.  - इंडो-चायना संबंधावर शरद पवारांनी तज्ज्ञांशी केली चर्चा; राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी​ काय आहे क्‍युबिट्‌स?  सध्याच्या संगणकांमध्ये गणनेचे मूलभूत एकक बिट आहे. ज्यामध्ये ० किंवा १ अशा दोन स्थिती असतात.  क्वांटम संगणनात मूलभूत एकक क्‍यूबिट असते.  प्रकाशकिरणांचे वर्तन एकाच वेळी लहरी किंवा कणा सारखे असते, हा पुंज्य भौतिकशास्त्राचा (क्वांटम फिजिक्‍स) प्रसिद्ध सिद्धांत तुम्हाला माहीतच असेल. क्‍युबिटमध्ये एकाच वेळी ० आणि १ दोनही वापरता येतात. म्हणजे दोनही अवस्थांचे संकलन आणि वहन करता येते. ज्यामुळे क्‍यूबिट च्या दोन स्थिती शक्‍य होतात.पर्यायाने गणन प्रक्रिया अति वेगवान होते. - रेल्वेरुळाभोवतीच्या झोपड्या तीन महिन्यांत हटवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश​  काय आहे संशोधन  काही अणूंएवढी जाडी असलेल्या नॅनोचिप्स विकसित मोनोलेयर ट्रांसिशन मेटल डायकलकोजेनाइड नावाचा या पदार्थाला विद्युतधार दिल्यास (व्होल्टेज) दोनही अवस्था प्राप्त होतात. पदार्थाच्या मर्यादा  एक किंवा दोन अणूंचे एकसारखी बांधणी करणे आव्हानात्मक वैश्विक विकीरणापासून संरक्षण करणे आवश्‍यक विद्युत विभवंतराचा उपयोग करून क्वांटम स्थिती नियंत्रित करणे शक्‍य असल्यामुळे, तांत्रिकदृष्ट्या क्वांटम स्थिती प्रत्यक्षात आणणे शक्‍य आहे. पुढील तीन ते चार वर्षातच यातील मर्यादा मिटविणे शक्‍य होणार आहे. - डॉ. अंशुमन कुमार, शास्त्रज्ञ, आयआयटी, मुंबई Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3bpdRu5
Read More
लॉकडाऊनचा फटका; औरंगाबादेत मद्यनिर्मितीचा अकराशे कोटींचा महसुल बुडाला  

औरंगाबाद : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम मद्यनिर्मिती उद्योगावरही झाला आहे. यात मद्यनिर्मितीतून शासनाला मिळणाऱ्या महसुलातही तब्बल १ हजार १६५ कोटींची मोठी तूट आली आहे. यंदा एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात केवळ ७६४ कोटींचा महसुल आला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्के महसुल कमी आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी गुरुवारी ‘सकाळ’शी बोलतांना सांगीतले. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

राज्य उत्पादन शुल्काच्या माध्यमातून औरंगाबादच्या नऊ मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून राज्य सरकारला दरवर्षी तीन हजार कोटींचा महसूल मिळतो. गेल्या वर्षी ५ हजार ५७५ कोटींचे लक्ष्य राज्य उत्पादन शुल्कला देण्यात आले होते. या उद्दिष्टपूर्तीला कोरोनाची आडकाठी आली आहे. यामुळे ४ हजार ६१५ कोटींचा महसूल विभागाला मिळाला आहे. त्यात तीन ते चार महिने कंपन्याचे उत्पादन बंद होते. त्यानंतर मद्य विक्री बंद होती. त्याचाही मोठा परिणाम जाणवला आहे. परिणामी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल अकराशे कोटींचा महसुल कमी आला आहे. ‘लॉकडाउन’मुळे हा परिणाम झाला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री. कदम यांनी सांगितले.  

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

एप्रिल महिन्यात ८०० कोटींहून अधिक महसूल कमी आला होता. त्यानंतर विक्री नियमीतपणे होत नाही. औरंगाबाद येथील नऊ कंपन्यांमध्ये निर्मिती होणाऱ्या मद्याची सर्वाधिक विक्री ही मुंबई, पुणे, ठाणे या शहरांत होते. साधारणतः निर्मिती होणारे ७० टक्के प्रॉडक्शन या तिन्ही शहरांत जाते. तर तीस टक्के उर्वरित महाराष्ट्रात विक्री होते. ट्रान्स्पोटेशनमुळे आणि या तीन्ही शहरातून ऑर्डर कमी आल्यामुळे याचा थेट परिणाम महसुलावर झाला आहे. 

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन   

 

                      वर्ष           महसुल(कोटींत)   तुट 

एप्रिल ते ऑगस्ट २०१९          १,९२९           नाही 

एप्रिल ते ऑगस्ट २०२०          ७६४       ११६५ (६०टक्के)  

 मद्यनिर्मिती करणाऱ्या नऊ कंपन्यांच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. यंदा गेल्या वर्षीच्या तूलनेत १ हजार १६५ कोटींचा महसुल आला आहे. साडेपाच हजार कोटींच्या महसुलाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते; मात्र पाच महिन्यात केवळ ७६४ कोटींचा महसूल आला आहे. 
- एस. एल. कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.

(संपादन-प्रताप अवचार)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाऊनचा फटका; औरंगाबादेत मद्यनिर्मितीचा अकराशे कोटींचा महसुल बुडाला   औरंगाबाद : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम मद्यनिर्मिती उद्योगावरही झाला आहे. यात मद्यनिर्मितीतून शासनाला मिळणाऱ्या महसुलातही तब्बल १ हजार १६५ कोटींची मोठी तूट आली आहे. यंदा एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात केवळ ७६४ कोटींचा महसुल आला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्के महसुल कमी आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी गुरुवारी ‘सकाळ’शी बोलतांना सांगीतले.  आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव  राज्य उत्पादन शुल्काच्या माध्यमातून औरंगाबादच्या नऊ मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून राज्य सरकारला दरवर्षी तीन हजार कोटींचा महसूल मिळतो. गेल्या वर्षी ५ हजार ५७५ कोटींचे लक्ष्य राज्य उत्पादन शुल्कला देण्यात आले होते. या उद्दिष्टपूर्तीला कोरोनाची आडकाठी आली आहे. यामुळे ४ हजार ६१५ कोटींचा महसूल विभागाला मिळाला आहे. त्यात तीन ते चार महिने कंपन्याचे उत्पादन बंद होते. त्यानंतर मद्य विक्री बंद होती. त्याचाही मोठा परिणाम जाणवला आहे. परिणामी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल अकराशे कोटींचा महसुल कमी आला आहे. ‘लॉकडाउन’मुळे हा परिणाम झाला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री. कदम यांनी सांगितले.   बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन   एप्रिल महिन्यात ८०० कोटींहून अधिक महसूल कमी आला होता. त्यानंतर विक्री नियमीतपणे होत नाही. औरंगाबाद येथील नऊ कंपन्यांमध्ये निर्मिती होणाऱ्या मद्याची सर्वाधिक विक्री ही मुंबई, पुणे, ठाणे या शहरांत होते. साधारणतः निर्मिती होणारे ७० टक्के प्रॉडक्शन या तिन्ही शहरांत जाते. तर तीस टक्के उर्वरित महाराष्ट्रात विक्री होते. ट्रान्स्पोटेशनमुळे आणि या तीन्ही शहरातून ऑर्डर कमी आल्यामुळे याचा थेट परिणाम महसुलावर झाला आहे.  शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन                            वर्ष           महसुल(कोटींत)   तुट  एप्रिल ते ऑगस्ट २०१९          १,९२९           नाही  एप्रिल ते ऑगस्ट २०२०          ७६४       ११६५ (६०टक्के)    मद्यनिर्मिती करणाऱ्या नऊ कंपन्यांच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. यंदा गेल्या वर्षीच्या तूलनेत १ हजार १६५ कोटींचा महसुल आला आहे. साडेपाच हजार कोटींच्या महसुलाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते; मात्र पाच महिन्यात केवळ ७६४ कोटींचा महसूल आला आहे.  - एस. एल. कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3h4mThu
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 04 सप्टेंबर

पंचांग -
शुक्रवार - भाद्रपद कृ.2, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय रा. 8.18, चंद्रास्त स. 7.57, भारतीय सौर 13, शके 1942.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८२५ - काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचा जन्म. ‘भारताचे पितामह’ हे बिरुद त्यांना लावण्यात येते.
१८९३ - भारतीय रसायनशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ, आय.आय.टी. खरगपूर या अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक ग्यानचंद्र घोष यांचा जन्म. 
१९६७ - जातीयता निर्मूलनासाठी सहभोजनाचा उपक्रम चालविणारे, धाडसी संपादक, नाटिकाकार, जाहिरातशास्त्रातील तज्ज्ञ, समतानंद अनंत हरी गद्रे यांचे निधन. ‘मौज’ आणि ‘निर्भीड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. 
१९९७ - ख्यातनाम हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ.धर्मवीर भारती यांचे निधन. ते ‘अभ्युदय’ व ‘संगम’ या नियतकालिकांचे संपादक होते. ते २७ वर्षे ‘धर्मयुग’च्या संपादकपदी होते. 
१९९७ - एशियाटिक सोसायटीचे माजी सरचिटणीस व क्रीडावैद्यक शास्त्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. चंदन रॉयचौधरी यांचे कलकत्ता येथे निधन.
१९९९ - संपूर्ण देशी बनावटीच्या ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची बालासोर येथील चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
२००० - आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसविणारे प्रसिद्ध अभिनेते मुक्री यांचे निधन.
२००३  - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष  : वाहने चालवताना काळजी घ्यावी. कामाचा ताण व दगदग जाणवेल.उसनवारी वसूल होईल. 
वृषभ : तुमच्या नवीन परिचय होतील. संततिच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल.
मिथुन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
कर्क  : हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. 
कन्या : मनोबल व उत्साह वाढेल. छोेटे प्रवास होतील.रखडलेली कामे मार्गी लागतील.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील.
वृश्‍चिक  : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. गाठीभेटी होतील.
धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 
मकर  : हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 04 सप्टेंबर पंचांग - शुक्रवार - भाद्रपद कृ.2, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय रा. 8.18, चंद्रास्त स. 7.57, भारतीय सौर 13, शके 1942. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १८२५ - काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचा जन्म. ‘भारताचे पितामह’ हे बिरुद त्यांना लावण्यात येते. १८९३ - भारतीय रसायनशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ, आय.आय.टी. खरगपूर या अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक ग्यानचंद्र घोष यांचा जन्म.  १९६७ - जातीयता निर्मूलनासाठी सहभोजनाचा उपक्रम चालविणारे, धाडसी संपादक, नाटिकाकार, जाहिरातशास्त्रातील तज्ज्ञ, समतानंद अनंत हरी गद्रे यांचे निधन. ‘मौज’ आणि ‘निर्भीड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली.  १९९७ - ख्यातनाम हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ.धर्मवीर भारती यांचे निधन. ते ‘अभ्युदय’ व ‘संगम’ या नियतकालिकांचे संपादक होते. ते २७ वर्षे ‘धर्मयुग’च्या संपादकपदी होते.  १९९७ - एशियाटिक सोसायटीचे माजी सरचिटणीस व क्रीडावैद्यक शास्त्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. चंदन रॉयचौधरी यांचे कलकत्ता येथे निधन. १९९९ - संपूर्ण देशी बनावटीच्या ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची बालासोर येथील चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी. २००० - आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसविणारे प्रसिद्ध अभिनेते मुक्री यांचे निधन. २००३  - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार जाहीर. दिनमान - मेष  : वाहने चालवताना काळजी घ्यावी. कामाचा ताण व दगदग जाणवेल.उसनवारी वसूल होईल.  वृषभ : तुमच्या नवीन परिचय होतील. संततिच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल. मिथुन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. कर्क  : हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.  कन्या : मनोबल व उत्साह वाढेल. छोेटे प्रवास होतील.रखडलेली कामे मार्गी लागतील. तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील. वृश्‍चिक  : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. गाठीभेटी होतील. धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.  मकर  : हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gXQ3yL
Read More
क्रॉफर्ड मार्केट अपघातः अपघातावेळी नेमकं काय झालं?,चालकानं केला 'हा' दावा

मुंबईः क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलसमोर झालेल्या कार अपघातातील चालकाला अपघात घडतेवेळी अपस्माराचा झटका(फिट्स) आला होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे 100 फूट दूर अपघात घडल्यानंतर आरोपीने कारसोबत महिलेला फरफटत आणले होते. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

 भरधाव वेगात असलेल्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  सय्यद समीर अली ऊर्फ डिग्गी(46) असे या कार चालकाचे नाव असून त्यालाही दुखापत झाली आहे. समीर विरोधात 304(2), 279, 337, 427, 308 भादविसह मोटार वाहन कायदा कलम 183 व 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम हारून मरेडिया(33) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरेडिया हे तेथील एका हॉटेलचे व्यवस्थापक असून त्याच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचाः  मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष

क्रॉफर्ड मार्केट परिसरात कायमच खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात. रात्री 9 च्या सुमारास या गर्दीच्या ठिकाणी एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यावेळी त्याच्या भरधाव कारनेदिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी उपचारादरम्यान अपघातात जमखी झालेल्या कमलेश सिंगचाही मृत्यू झाला. याप्रकरणातील चालकाच्या चौकशीत आरोपी चालकाला अपस्माराचा झटका यायचा. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्यावर यासाठी उपचार सुरू आहेत. अपघात घडला त्यावेळीही त्याला अपस्माराचा झटका  आला होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. पोलिस त्याची सत्यता पडताळत आहेत.

(संपादनः पूजा विचारे)

crawford market epileptic seizure at the time of the accident driver said

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

क्रॉफर्ड मार्केट अपघातः अपघातावेळी नेमकं काय झालं?,चालकानं केला 'हा' दावा मुंबईः क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता हॉटेलसमोर झालेल्या कार अपघातातील चालकाला अपघात घडतेवेळी अपस्माराचा झटका(फिट्स) आला होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे 100 फूट दूर अपघात घडल्यानंतर आरोपीने कारसोबत महिलेला फरफटत आणले होते. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  भरधाव वेगात असलेल्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  सय्यद समीर अली ऊर्फ डिग्गी(46) असे या कार चालकाचे नाव असून त्यालाही दुखापत झाली आहे. समीर विरोधात 304(2), 279, 337, 427, 308 भादविसह मोटार वाहन कायदा कलम 183 व 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम हारून मरेडिया(33) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरेडिया हे तेथील एका हॉटेलचे व्यवस्थापक असून त्याच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हेही वाचाः  मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष क्रॉफर्ड मार्केट परिसरात कायमच खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असतात. रात्री 9 च्या सुमारास या गर्दीच्या ठिकाणी एका कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यावेळी त्याच्या भरधाव कारनेदिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी उपचारादरम्यान अपघातात जमखी झालेल्या कमलेश सिंगचाही मृत्यू झाला. याप्रकरणातील चालकाच्या चौकशीत आरोपी चालकाला अपस्माराचा झटका यायचा. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्यावर यासाठी उपचार सुरू आहेत. अपघात घडला त्यावेळीही त्याला अपस्माराचा झटका  आला होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. पोलिस त्याची सत्यता पडताळत आहेत. (संपादनः पूजा विचारे) crawford market epileptic seizure at the time of the accident driver said News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31WbSu7
Read More
नागपूर शहरात आणखी १६ कोविड चाचणी केंद्र, एकूण ५० केंद्र सेवेत

नागपूर शहरात आणखी १६ कोविड चाचणी केंद्र, एकूण ५० केंद्र सेवेत

September 03, 2020 0 Comments
नागपूर शहरात कोविडचा संसर्ग वाढता असताना जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे यादृष्टीने मनपातर्फे नवीन १६ कोविड चाचणी ...
Read More
उद्धव ठाकरे: शिवसेनेतले ज्येष्ठ नेते नेतृत्वावर नाराज आहेत का?
नागपूरकरांनो सावधान! औषध दुकानांमध्ये गेल्यावर घ्या काळजी..अन्यथा होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर 

नागपूर : सध्या सही हजारांवर सौम्य लक्षणे असलेले कोरोनाबाधित घरीच विलगीकरणात आहेत. त्यांना मेयो, मेडिकल किंवा महापालिकेच्या रुग्णालयांतून मोफत औषधोपचार व्हावेत. परंतु, रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयातील किंवा मेयो, मेडिकलमधील डॉक्टरांकडून औषधांऐवजी केवळ सल्ला मिळतो. त्या बाधितांच्या हाती प्रिस्क्रिप्शन दिले जाते.

हेही वाचा - कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका

सोमवारी (ता.३१) नागपुरात ५ हजार ८१२ कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. नियमानुसार या रुग्णांना आवश्यक औषधे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळायला हवी. मात्र, महापालिकेच्या डॉक्टरांकडून केवळ सल्ला देण्यात येत असल्याची माहिती एका गृहविलगीकरणातील व्यक्तीने दिली. 

त्यांना औषधपुरवठा करण्यात येत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु, त्यांना मेडिकल, मेयोसह महापालिकेच्या रुग्णालयात औषधाऐवजी प्रिस्क्रिप्शन देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

क्लिक करा - कंत्राटदाराकडून खंडणी न आणल्याने नक्षलवाद्यांनी आपल्याच समर्थकाला संपविले

औषधांच्या दुकानात मुक्तसंचार

सौम्य लक्षणे असलेले कोरोनाबाधित हातात असलेले प्रिस्क्रिप्शन घेऊन औषध दुकानांसमोर उभे राहून औषध खरेदी करतात. यामुळे संक्रमणाची मोठी जोखीम आहे. सर्वच रुग्णालयांत अत्यवस्थ रुग्ण वाढत असल्याने बाधितांसाठी औषधे कमी पडत आहेत. पूर्वी कोरोनाच्या सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार होत असून, येथे मोफत औषधे मिळत होती. गृहविलगीकरणातील रुग्णांनाही महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात तपासणी केल्यावर औषधे नि:शुल्क उपलब्ध करून द्यायला हवी, अशी मागणी जोर धरत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपूरकरांनो सावधान! औषध दुकानांमध्ये गेल्यावर घ्या काळजी..अन्यथा होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर  नागपूर : सध्या सही हजारांवर सौम्य लक्षणे असलेले कोरोनाबाधित घरीच विलगीकरणात आहेत. त्यांना मेयो, मेडिकल किंवा महापालिकेच्या रुग्णालयांतून मोफत औषधोपचार व्हावेत. परंतु, रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयातील किंवा मेयो, मेडिकलमधील डॉक्टरांकडून औषधांऐवजी केवळ सल्ला मिळतो. त्या बाधितांच्या हाती प्रिस्क्रिप्शन दिले जाते. हेही वाचा - कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका सोमवारी (ता.३१) नागपुरात ५ हजार ८१२ कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. नियमानुसार या रुग्णांना आवश्यक औषधे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळायला हवी. मात्र, महापालिकेच्या डॉक्टरांकडून केवळ सल्ला देण्यात येत असल्याची माहिती एका गृहविलगीकरणातील व्यक्तीने दिली.  त्यांना औषधपुरवठा करण्यात येत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु, त्यांना मेडिकल, मेयोसह महापालिकेच्या रुग्णालयात औषधाऐवजी प्रिस्क्रिप्शन देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. क्लिक करा - कंत्राटदाराकडून खंडणी न आणल्याने नक्षलवाद्यांनी आपल्याच समर्थकाला संपविले औषधांच्या दुकानात मुक्तसंचार सौम्य लक्षणे असलेले कोरोनाबाधित हातात असलेले प्रिस्क्रिप्शन घेऊन औषध दुकानांसमोर उभे राहून औषध खरेदी करतात. यामुळे संक्रमणाची मोठी जोखीम आहे. सर्वच रुग्णालयांत अत्यवस्थ रुग्ण वाढत असल्याने बाधितांसाठी औषधे कमी पडत आहेत. पूर्वी कोरोनाच्या सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार होत असून, येथे मोफत औषधे मिळत होती. गृहविलगीकरणातील रुग्णांनाही महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात तपासणी केल्यावर औषधे नि:शुल्क उपलब्ध करून द्यायला हवी, अशी मागणी जोर धरत आहे.  संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32SOJIs
Read More
ठाण्यात लॉकडाऊन दरम्यान झालेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा, कठोर कारवाईचे आदेश

ठाणे : कोरोना काळात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी लॉकडाऊन काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांविरूद्ध कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. गुरुवारपासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एकूण 12 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली तर 221 हातगाड्या, गॅरेजेस आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान ही कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. 

अधिक वाचाः  किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 'फोर्ट फाऊंडेशन' उभारणार, छत्रपती संभाजी राजेंकडून घोडबंदर किल्ल्यांची पाहणी

गुरुवारी दुपारपासून पोलिस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईमध्ये नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत आंबेडकर रोड येथील तळ अधिक एक मजल्याचे आरसीसीचे वाढीव बांधकाम आणि 21 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये भीमनगर येथील दोन बांधकामे आणि 22 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत दोन वीट बांधकाम, चार पत्र्याच्या शेडस्‌ आणि 19 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. तर उथळसर प्रभाग समितीअंतर्गत 37 हातगाडी, टपऱ्या व गॅरेजवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभाग समितीअंतर्गत एकूण 17 हातगाडी व टपऱ्यांवर तर लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 57 हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. 

अधिक वाचाः  क्रॉफर्ड मार्केट दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण

दरम्यान कळवा प्रभाग समिती अंतर्गत लॉकडाऊन काळात झालेल्या तळ अधिक दोन मजली इमारतीचे बांधकाम तोडून टाकण्यात आले तर एकूण 21 हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रामध्ये तळ अधिक सात मजली इमारतीचे वरील दोन मजल्यांचे बांधकाम तोडण्यात आले. तर 27 हातगाडी व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दिवा प्रभाग समितीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तळ अधिक चार मजली इमारतीचे वाढीव दोन मजल्याचे बांधकाम पूर्णतः तोडून टाकण्यात आले. 

(संपादन : वैभव गाटे)

action on illegal construction during lockdown in thane

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

ठाण्यात लॉकडाऊन दरम्यान झालेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा, कठोर कारवाईचे आदेश ठाणे : कोरोना काळात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी लॉकडाऊन काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांविरूद्ध कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. गुरुवारपासून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये एकूण 12 अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली तर 221 हातगाड्या, गॅरेजेस आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान ही कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.  अधिक वाचाः  किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 'फोर्ट फाऊंडेशन' उभारणार, छत्रपती संभाजी राजेंकडून घोडबंदर किल्ल्यांची पाहणी गुरुवारी दुपारपासून पोलिस बंदोबस्तात या कारवाईला सुरूवात झाली. या कारवाईमध्ये नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत आंबेडकर रोड येथील तळ अधिक एक मजल्याचे आरसीसीचे वाढीव बांधकाम आणि 21 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत केलेल्या कारवाईमध्ये भीमनगर येथील दोन बांधकामे आणि 22 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत दोन वीट बांधकाम, चार पत्र्याच्या शेडस्‌ आणि 19 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. तर उथळसर प्रभाग समितीअंतर्गत 37 हातगाडी, टपऱ्या व गॅरेजवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभाग समितीअंतर्गत एकूण 17 हातगाडी व टपऱ्यांवर तर लोकमान्यनगर-सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 57 हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.  अधिक वाचाः  क्रॉफर्ड मार्केट दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण दरम्यान कळवा प्रभाग समिती अंतर्गत लॉकडाऊन काळात झालेल्या तळ अधिक दोन मजली इमारतीचे बांधकाम तोडून टाकण्यात आले तर एकूण 21 हातगाडी आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुंब्रामध्ये तळ अधिक सात मजली इमारतीचे वरील दोन मजल्यांचे बांधकाम तोडण्यात आले. तर 27 हातगाडी व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दिवा प्रभाग समितीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तळ अधिक चार मजली इमारतीचे वाढीव दोन मजल्याचे बांधकाम पूर्णतः तोडून टाकण्यात आले.  (संपादन : वैभव गाटे) action on illegal construction during lockdown in thane News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EMVxiN
Read More
दिव्यांगांची परवड; शासनाकडून मिळतात कोट्यवधी रुपये, पण खर्च होतात किती?, वाचा वास्तव  

अमरावती : एकीकडे जग 21 व्या शतकाकडे वाटचाल करीत आहे, नवनवीन तंत्रज्ञानाने संपूर्ण जग व्यापून टाकले असतानाच समाजापासून दुर्लक्षित अशा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी कुठल्याच तरतुदी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे 1967 च्या साचेबद्ध शिक्षणप्रणालीत दिव्यांग विद्यार्थी भरडले जात आहेत.

दिव्यांगांसाठी असलेले वसतिगृह तसेच शाळांना कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला जातो. मात्र, यापैकी फारच थोडा निधी त्यांच्यावर खर्च करण्यात येतो. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगाराच्या अनेक समस्या निर्माण होत असून, व्यवसायासाठी साधे कर्जसुद्धा मिळत नाही. कारण 18 वर्षांपर्यंतच त्यांना शासकीय बालगृहात ठेवता येते. 

जाणून घ्या - नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर

राज्याचा विचार करता जवळपास 10 लाख दिव्यांग विद्यार्थी बेरोजगारीत खितपत पडले आहेत. रोजगाराअभावी अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अमरावती जिल्ह्यात मूकबधिर, दृष्टीहीन तसेच दिव्यांगांची संख्या जवळपास 40 हजारांच्या घरात आहे. त्यातही बेरोजगारांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. दिव्यांगांच्या शाळांमध्ये 1967 च्या पॅटर्ननुसारच शिक्षण देण्यात येत आहे. काळानुरूप ही शिक्षणपद्धती अतिशय जुनी आणि कुचकामी ठरली आहे, याची जाणीव कोणत्याही सरकारला झाली नाही हे दुर्देवच म्हणावे लागेल. 

राज्याच्या अर्थसंकल्पातील जवळपास पाच कोटींचा निधी अपंग, अंध शाळांसाठी दिला जातो. मात्र त्यापैकी फारच थोडा म्हणजे 30 ते 40 लाख रुपये प्रत्यक्षात विद्यार्थ्यांवर खर्च केले जातात. 18 वर्षांपर्यंत दिव्यांगांना बालगृहात ठेवण्याची सुविधा आहे, मात्र त्यानंतर त्यांच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने परवड सुरू होते. बालगृहातून बाहेर निघणाऱ्या अन्य मुलांना अनेकदा लहान-मोठ्या नोकऱ्या किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध होते, मात्र दिव्यांगांचे तसे नाही.

अधिक माहितीसाठी - शेतातील मजूर करीत होता लाख विनवणी अन् अचानक निर्दयी दरोडेखोरांनी...
 

कारखाने, खासगी कार्यालयांमध्ये त्यांना नोकरी दिली जात नाही, ही वास्तविकता आहे. बदलत्या काळानुसार रोजगाराभिमुख शिक्षण देणे गरजेचे असताना जुन्याच साचेबद्ध शिक्षणप्रणालीत दिव्यांगजन भरडले जात आहेत. या जुन्या शिक्षणाचा त्यांना कुठलाही फायदा होत नाही. बदलत्या जागतिक स्वरूपाचा विचार करता ही मंडळी पुन्हा मागेच राहतात. 

 
वझ्झर पॅटर्नची राज्यभरात अंमलबजावणी व्हावी
बहुतांश दिव्यांग विद्यार्थी अनाथ, निराधार आहेत. बालगृहामध्ये त्यांचे जीवन सुरू होते. त्यांना शिक्षणासोबतच सर्वाधिक गरज आहे ती पुनर्वसनाची. सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेने दिव्यांग मुले आधीच माघारलेली असतात. बाहेर खऱ्या जगात आल्यानंतर त्यांना विविध संघर्षाला सामोरे जावे लागते. समाजानेसुद्धा त्यांची जबाबदारी घेणे आवश्‍यक आहे. वझ्झर पॅटर्नची राज्यभरात अंमलबजावणी केली पाहिजे.
शंकरराव पापळकर, संचालक स्व. अंबादासपंत मतिमंद अनाथांचे बालगृह, वझ्झर  
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

दिव्यांगांची परवड; शासनाकडून मिळतात कोट्यवधी रुपये, पण खर्च होतात किती?, वाचा वास्तव   अमरावती : एकीकडे जग 21 व्या शतकाकडे वाटचाल करीत आहे, नवनवीन तंत्रज्ञानाने संपूर्ण जग व्यापून टाकले असतानाच समाजापासून दुर्लक्षित अशा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी कुठल्याच तरतुदी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे 1967 च्या साचेबद्ध शिक्षणप्रणालीत दिव्यांग विद्यार्थी भरडले जात आहेत. दिव्यांगांसाठी असलेले वसतिगृह तसेच शाळांना कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला जातो. मात्र, यापैकी फारच थोडा निधी त्यांच्यावर खर्च करण्यात येतो. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना रोजगाराच्या अनेक समस्या निर्माण होत असून, व्यवसायासाठी साधे कर्जसुद्धा मिळत नाही. कारण 18 वर्षांपर्यंतच त्यांना शासकीय बालगृहात ठेवता येते.  जाणून घ्या - नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर राज्याचा विचार करता जवळपास 10 लाख दिव्यांग विद्यार्थी बेरोजगारीत खितपत पडले आहेत. रोजगाराअभावी अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अमरावती जिल्ह्यात मूकबधिर, दृष्टीहीन तसेच दिव्यांगांची संख्या जवळपास 40 हजारांच्या घरात आहे. त्यातही बेरोजगारांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. दिव्यांगांच्या शाळांमध्ये 1967 च्या पॅटर्ननुसारच शिक्षण देण्यात येत आहे. काळानुरूप ही शिक्षणपद्धती अतिशय जुनी आणि कुचकामी ठरली आहे, याची जाणीव कोणत्याही सरकारला झाली नाही हे दुर्देवच म्हणावे लागेल.  राज्याच्या अर्थसंकल्पातील जवळपास पाच कोटींचा निधी अपंग, अंध शाळांसाठी दिला जातो. मात्र त्यापैकी फारच थोडा म्हणजे 30 ते 40 लाख रुपये प्रत्यक्षात विद्यार्थ्यांवर खर्च केले जातात. 18 वर्षांपर्यंत दिव्यांगांना बालगृहात ठेवण्याची सुविधा आहे, मात्र त्यानंतर त्यांच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने परवड सुरू होते. बालगृहातून बाहेर निघणाऱ्या अन्य मुलांना अनेकदा लहान-मोठ्या नोकऱ्या किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध होते, मात्र दिव्यांगांचे तसे नाही. अधिक माहितीसाठी - शेतातील मजूर करीत होता लाख विनवणी अन् अचानक निर्दयी दरोडेखोरांनी...   कारखाने, खासगी कार्यालयांमध्ये त्यांना नोकरी दिली जात नाही, ही वास्तविकता आहे. बदलत्या काळानुसार रोजगाराभिमुख शिक्षण देणे गरजेचे असताना जुन्याच साचेबद्ध शिक्षणप्रणालीत दिव्यांगजन भरडले जात आहेत. या जुन्या शिक्षणाचा त्यांना कुठलाही फायदा होत नाही. बदलत्या जागतिक स्वरूपाचा विचार करता ही मंडळी पुन्हा मागेच राहतात.    वझ्झर पॅटर्नची राज्यभरात अंमलबजावणी व्हावी बहुतांश दिव्यांग विद्यार्थी अनाथ, निराधार आहेत. बालगृहामध्ये त्यांचे जीवन सुरू होते. त्यांना शिक्षणासोबतच सर्वाधिक गरज आहे ती पुनर्वसनाची. सामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेने दिव्यांग मुले आधीच माघारलेली असतात. बाहेर खऱ्या जगात आल्यानंतर त्यांना विविध संघर्षाला सामोरे जावे लागते. समाजानेसुद्धा त्यांची जबाबदारी घेणे आवश्‍यक आहे. वझ्झर पॅटर्नची राज्यभरात अंमलबजावणी केली पाहिजे. शंकरराव पापळकर, संचालक स्व. अंबादासपंत मतिमंद अनाथांचे बालगृह, वझ्झर     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Dq9YbE
Read More