Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 1, 2020

शार्ली एब्दो यांनी पुन्हा पैगंबर मोहम्मद यांच्यावरील व्यंगचित्र का छापलं?
फिरत्या विसर्जन हौदाकडे फिरवली पाठ, गणेश विसर्जन कॅनॉलमध्येच!

धायरी(पुणे) :अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस होय. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता, परंतू मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आज विसर्जनासाठी देखील तितक्याच साधेपणाने पण, पवित्र मानसिक भावनेतून सर्वत्र मोठी लगबग सुरू होती. 

वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरात 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'', आशा घोषणा देत घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन हे घरीच बादलीत करण्यात आले तर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यांनी बाप्पाचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये करण्यात आले. गणेश मुर्ती संकलन व निर्माल्य संकलनची पालिकेने ज्या ठिकाणी सोय केले त्या ठिकाणी नागरिक जाऊन मुर्ती तसेच निर्माल्य देत होते. या वर्षी गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं नागरिकांनी साजरा केला.

गणेश मंडळांनी कोरोनामुळे या वर्षी गणेश उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले. येथील मंडळांनी स्टेज, विद्युत रोषणाई, स्पीकर, व विविध लहान मोठयांसाठी कार्यक्रम तसेच मिरवणूकसाठी लागणारे भव्य असे ढोल, ताशा, डीजे, लेझीम अशा अनेक गोष्टींना फाटा देत गणेश उत्सव सध्या पद्धतीने साजरा केला. महानगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या फिरत्या हौदांकडे गणेश भक्तांनी फिरवली पाठ, बाप्पाचे विसर्जन कॅनॉल मध्येच यावेळी मात्र, वडगाव फाटा येथील कॅनॉल जवळ महानगरपालिका एकही कर्मचारी कॅनॉलकडे फिरकले नाही. त्या बरोबर पोलीस बंदोबस्त देखील कॅनॉल परिसरात बघावयास मिळाला नाही.

गणपती विसर्जनासाठी स्थनिक लहान लहान मुले आपला जीव धोक्यात घालून कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन करत होते, तसेच कॅनॉल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिक कुठल्याही प्रकारची खबरदारी घेताने दिसत नव्हते. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती. महानगरपालिकेला दान केलेल्या मुर्त्या महानगरपालिका करणार काय? अशी परिसरामधील नागरिकांनमध्ये चर्चा सुरु होती.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

फिरत्या विसर्जन हौदाकडे फिरवली पाठ, गणेश विसर्जन कॅनॉलमध्येच! धायरी(पुणे) :अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस होय. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता, परंतू मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि आज विसर्जनासाठी देखील तितक्याच साधेपणाने पण, पवित्र मानसिक भावनेतून सर्वत्र मोठी लगबग सुरू होती.  वडगाव, धायरी, नऱ्हे परिसरात 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'', आशा घोषणा देत घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन हे घरीच बादलीत करण्यात आले तर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, यांनी बाप्पाचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये करण्यात आले. गणेश मुर्ती संकलन व निर्माल्य संकलनची पालिकेने ज्या ठिकाणी सोय केले त्या ठिकाणी नागरिक जाऊन मुर्ती तसेच निर्माल्य देत होते. या वर्षी गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं नागरिकांनी साजरा केला. गणेश मंडळांनी कोरोनामुळे या वर्षी गणेश उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले. येथील मंडळांनी स्टेज, विद्युत रोषणाई, स्पीकर, व विविध लहान मोठयांसाठी कार्यक्रम तसेच मिरवणूकसाठी लागणारे भव्य असे ढोल, ताशा, डीजे, लेझीम अशा अनेक गोष्टींना फाटा देत गणेश उत्सव सध्या पद्धतीने साजरा केला. महानगरपालिकेने गणपती विसर्जनासाठी ठेवलेल्या फिरत्या हौदांकडे गणेश भक्तांनी फिरवली पाठ, बाप्पाचे विसर्जन कॅनॉल मध्येच यावेळी मात्र, वडगाव फाटा येथील कॅनॉल जवळ महानगरपालिका एकही कर्मचारी कॅनॉलकडे फिरकले नाही. त्या बरोबर पोलीस बंदोबस्त देखील कॅनॉल परिसरात बघावयास मिळाला नाही. गणपती विसर्जनासाठी स्थनिक लहान लहान मुले आपला जीव धोक्यात घालून कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन करत होते, तसेच कॅनॉल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिक कुठल्याही प्रकारची खबरदारी घेताने दिसत नव्हते. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती. महानगरपालिकेला दान केलेल्या मुर्त्या महानगरपालिका करणार काय? अशी परिसरामधील नागरिकांनमध्ये चर्चा सुरु होती. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jGfmqN
Read More
सातारा : तब्बल 30 कोटींच्या निधीची विकासकामे रखडणार; दुर्लक्षाचा परिणाम

सातारा : जिल्हा परिषद व नगरपंचायत प्रशासनाचा तब्बल 30 कोटींचा निधी केवळ संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे परत गेला आहे. "बीडीएस'मधून निधी काढून घेण्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा निधी परत गेला आहे. 

जिल्हा परिषदेतील बांधकाम (उत्तर) विभागाचा सात कोटी 64 लाख, पाणीपुरवठा 93 लाख 73 हजार, समाजकल्याण विभागांतर्गत बौद्ध वस्ती सुधार योजनेचा सहा कोटी 64 लाख रुपये तसेच पालिकांना दिलेला दलित वस्ती सुविधा योजनेचा तब्बल 14 कोटी 40 लाख 26 हजार रुपयांच्या निधीचा त्यामध्ये समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग येण्यापूर्वीच जिल्हा परिषद व नगरपंचायत प्रशासनाला निधी उपलब्ध होतो. मार्चअखेरपर्यंत हा निधी "बीडीएस'मधून उचलण्यास संबंधित विभागांनी उशीर केला. परिणामी "बीडीएस' बंद झाल्याने निधी काढता आलेला नाही. या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेचा 15.60 कोटी, तर पालिका प्रशासनाला यावर्षी जादा मिळालेल्या निधीपैकी 14.40 कोटींचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत गेला आहे.

कोरोनाची करुण कहाणी; आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे?
 
जिल्हा परिषदेतील बांधकाम उत्तर विभागाकडील साकव बांधण्यासाठी आलेला सात कोटी 64 लाख 66 हजार रुपये, पाणीपुरवठा विभागाकडील खास उपाययोजनांसाठी मिळालेला 93 लाख 73 हजार रुपये, समाजकल्याण विभागाला अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेसाठी आलेला सहा कोटी 64 लख 39 हजार रुपये असा एकूण 15 कोटी 60 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे. जिल्ह्यातील पालिकांना मिळालेल्या जादाचा दलित वस्ती सुविधा पुरविण्यासाठीचा 14 कोटी 40 लाख 16 हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे. 

बँड व्यावसायिकांवर कोरोनाचं विघ्न; ४५ हजार कलाकारांची उपासमार

अनेक विकासकामे रखडणार
 
अखर्चिक निधी परत गेल्यामुळे पालिका व जिल्हा परिषदेकडील दलित वस्ती सुधार योजनेची कामे यावर्षी निधीअभावी होणार नाहीत. तसेच साकवांच्या कामासाठी जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी आग्रही असतात. त्यासाठी आलेला सात कोटी 64 लाखांचा निधी परत गेल्याने ही कामेही आता होणार नाहीत. आता पुढील वर्षी मार्चमध्ये पुन्हा निधी उपलब्ध झाल्यावरच या कामांवर निधी टाकून ती पूर्ण करावी लागणार आहेत.

पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा

Edited By : Siddharth Latkar 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सातारा : तब्बल 30 कोटींच्या निधीची विकासकामे रखडणार; दुर्लक्षाचा परिणाम सातारा : जिल्हा परिषद व नगरपंचायत प्रशासनाचा तब्बल 30 कोटींचा निधी केवळ संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे परत गेला आहे. "बीडीएस'मधून निधी काढून घेण्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हा निधी परत गेला आहे.  जिल्हा परिषदेतील बांधकाम (उत्तर) विभागाचा सात कोटी 64 लाख, पाणीपुरवठा 93 लाख 73 हजार, समाजकल्याण विभागांतर्गत बौद्ध वस्ती सुधार योजनेचा सहा कोटी 64 लाख रुपये तसेच पालिकांना दिलेला दलित वस्ती सुविधा योजनेचा तब्बल 14 कोटी 40 लाख 26 हजार रुपयांच्या निधीचा त्यामध्ये समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग येण्यापूर्वीच जिल्हा परिषद व नगरपंचायत प्रशासनाला निधी उपलब्ध होतो. मार्चअखेरपर्यंत हा निधी "बीडीएस'मधून उचलण्यास संबंधित विभागांनी उशीर केला. परिणामी "बीडीएस' बंद झाल्याने निधी काढता आलेला नाही. या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेचा 15.60 कोटी, तर पालिका प्रशासनाला यावर्षी जादा मिळालेल्या निधीपैकी 14.40 कोटींचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत गेला आहे. कोरोनाची करुण कहाणी; आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे?   जिल्हा परिषदेतील बांधकाम उत्तर विभागाकडील साकव बांधण्यासाठी आलेला सात कोटी 64 लाख 66 हजार रुपये, पाणीपुरवठा विभागाकडील खास उपाययोजनांसाठी मिळालेला 93 लाख 73 हजार रुपये, समाजकल्याण विभागाला अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेसाठी आलेला सहा कोटी 64 लख 39 हजार रुपये असा एकूण 15 कोटी 60 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे. जिल्ह्यातील पालिकांना मिळालेल्या जादाचा दलित वस्ती सुविधा पुरविण्यासाठीचा 14 कोटी 40 लाख 16 हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे.  बँड व्यावसायिकांवर कोरोनाचं विघ्न; ४५ हजार कलाकारांची उपासमार अनेक विकासकामे रखडणार   अखर्चिक निधी परत गेल्यामुळे पालिका व जिल्हा परिषदेकडील दलित वस्ती सुधार योजनेची कामे यावर्षी निधीअभावी होणार नाहीत. तसेच साकवांच्या कामासाठी जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी आग्रही असतात. त्यासाठी आलेला सात कोटी 64 लाखांचा निधी परत गेल्याने ही कामेही आता होणार नाहीत. आता पुढील वर्षी मार्चमध्ये पुन्हा निधी उपलब्ध झाल्यावरच या कामांवर निधी टाकून ती पूर्ण करावी लागणार आहेत. पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा Edited By : Siddharth Latkar  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DjL6lS
Read More
अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत टाकले युरिया खत; शेतकऱ्याचे झाले २ लाखांचे नुकसान!

मंचर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील शेतकरी सुभाष यशवंत वाळुंज यांनी कांदा चाळीत साठवलेल्या 700 कांदा पिशव्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोनशे कांदा पिशव्या भरतील एवढा कांदा काळा पडला आहे. हा कांदा फेकून देणे शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.शेतकर्या चे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिंगवे (पारगाव) याठिकाणी माळी मळ्यात सुभाष यशवंत वाळुंज  राहतात. यावर्षी त्यांनी मोठा खर्च करून कांद्याचे भर घोस उत्पादन घेतले. काढलेला कांदा पिशव्या त्यांनी शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांची कांदा चाळ भाड्याने घेऊन त्यामध्ये साठवला होता.  कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने  दहा  दिवसांपूर्वी युरिया टाकला असा अंदाज आहे. सोमवारी ( ता 31)सुभाष वाळूंज कांदाचाळी कडे कांदा पाहण्यासाठी गेले. त्यांना कांदा चाळीत युरीया टाकल्याचे आढळून आले. हे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. कांदा खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थोडाफार सुरक्षित राहिले ला कांदा पिशव्यांमध्येभरण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक महिन्यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे त. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न चांगले मिळेल अशी वाळूज यांना अपेक्षा होती. पण त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे.

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

 गेल्या वर्षी सुभाष वाळुंज यांच्या उसाच्या शेतीला अज्ञातांनी आग लावल्याने तसेच ठिबक संच ही पेटवून दिल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कोरोना साथीमुळे गेल्या सहा महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे वाळुज यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. बाजारभाव वाढू लागल्याने त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला होता. पण खोडसाळपणा ने केलेल्या कृत्यामुळे त्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. खोडसाळपणे नुकसान करणाऱ्या चा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अज्ञात व्यक्तीने कांदा चाळीत टाकले युरिया खत; शेतकऱ्याचे झाले २ लाखांचे नुकसान! मंचर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील शेतकरी सुभाष यशवंत वाळुंज यांनी कांदा चाळीत साठवलेल्या 700 कांदा पिशव्यावर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोनशे कांदा पिशव्या भरतील एवढा कांदा काळा पडला आहे. हा कांदा फेकून देणे शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.शेतकर्या चे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिंगवे (पारगाव) याठिकाणी माळी मळ्यात सुभाष यशवंत वाळुंज  राहतात. यावर्षी त्यांनी मोठा खर्च करून कांद्याचे भर घोस उत्पादन घेतले. काढलेला कांदा पिशव्या त्यांनी शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांची कांदा चाळ भाड्याने घेऊन त्यामध्ये साठवला होता.  कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने  दहा  दिवसांपूर्वी युरिया टाकला असा अंदाज आहे. सोमवारी ( ता 31)सुभाष वाळूंज कांदाचाळी कडे कांदा पाहण्यासाठी गेले. त्यांना कांदा चाळीत युरीया टाकल्याचे आढळून आले. हे पाहून त्यांना मानसिक धक्का बसला. कांदा खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी थोडाफार सुरक्षित राहिले ला कांदा पिशव्यांमध्येभरण्यास सुरुवात केली आहे. मागील अनेक महिन्यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे त. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न चांगले मिळेल अशी वाळूज यांना अपेक्षा होती. पण त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे. हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त  गेल्या वर्षी सुभाष वाळुंज यांच्या उसाच्या शेतीला अज्ञातांनी आग लावल्याने तसेच ठिबक संच ही पेटवून दिल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कोरोना साथीमुळे गेल्या सहा महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे वाळुज यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. बाजारभाव वाढू लागल्याने त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला होता. पण खोडसाळपणा ने केलेल्या कृत्यामुळे त्यांचे आर्थिक मोठे नुकसान झाल्याने शेतकरीवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. खोडसाळपणे नुकसान करणाऱ्या चा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32KuMTW
Read More
पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा

सातारा : पुढच्या वर्षी लवकर... केवळ या जयघोषात सातारा शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणपतींचे मंगळवारी (ता.1) विसर्जन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव काळ सुना सुना झालेला होता. ना विसर्जन मिरवणुक ना ढोल-ताशांच्या कडकडाट. तरीही सर्वत्र केवळ टाळ्यांचा कडकडाटात बाप्पांना निरोप देताना प्रत्येकजण कोरोनाचे विघ्न दूर होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करीत होता. 

गणपती विसर्जनासाठी सातारा शहरातील बुधवार नाका, पोहणे तलाव, कल्याणी शाळा परिसर आदी ठिकाणी कृत्रिम तळ्यांची निर्मीती करुन विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवार नाका या ठिकाणी नागरिकांकडून गणपती घेतले जात होते. त्यानंतर एक ट्रॉलीतून ते विसर्जन तळी नेऊन एकत्रित तळ्यात विसर्जीत केली जात होते. विसर्जन स्थळावर पोलिसांचा बंदोबस्त होता. याबरोबरच पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

संगम माहूली, उरमोडी नदीवर देखील गावातील घरोघरचे गणपती विसर्जनासाठी नेले जात होते. विसर्जनासाठी पाच पेक्षा जादा माणसांनी परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा गर्दीचे प्रमाण घटले होते. सर्वच विसर्जनस्थळी पालिका, ग्रामपंचातय प्रशासनाने निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली होती. नागरिक त्या कुंडातच निर्माल्य ठेवत होते. दरम्यान शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील (कंटेनमेंट झोन) गणपतींच्या मुर्तींचे पालिकेने संकलन केल्याचे सांगण्यात आले.

जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता

दरवर्षी ताशांचा गजर,गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष करत गणेश विसर्जनाचा जल्लोष पहाटे सहा वाजेपर्यत चालायचा. यंदा मात्र तो डामडौल आणि जल्लोष दिसत नव्हता. पोलीस प्रशासनाने मानाच्या पाच मंडळांना सायंकाळी साडे सहा वाजता विसर्जनासाठी अर्धा तासाची वेळ दिली. त्यानूसार एकेक गणपती 501 पाटी नजीक आले. तेथून ते बुधवार नाका तळ्याच्या येथे मार्गस्थ झाले.

साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश

विसर्जनातील शेवटचा मानाचा गणपती श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) याचे नगराध्यक्षा माधवी कदम, शाहूपूरी पोलिस स्टेशनचे प्रमुख विशाल वायकर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा या जयघोष करत उपस्थित भक्तांनी गणरायाला भावपुर्ण निरोप दिला. कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुढच्या वर्षी लवकर या...जयघोष... सातारा शहरातील मानाच्या गणपतींनी राखली परंपरा सातारा : पुढच्या वर्षी लवकर... केवळ या जयघोषात सातारा शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरगुती गणपतींचे मंगळवारी (ता.1) विसर्जन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव काळ सुना सुना झालेला होता. ना विसर्जन मिरवणुक ना ढोल-ताशांच्या कडकडाट. तरीही सर्वत्र केवळ टाळ्यांचा कडकडाटात बाप्पांना निरोप देताना प्रत्येकजण कोरोनाचे विघ्न दूर होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करीत होता.  गणपती विसर्जनासाठी सातारा शहरातील बुधवार नाका, पोहणे तलाव, कल्याणी शाळा परिसर आदी ठिकाणी कृत्रिम तळ्यांची निर्मीती करुन विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवार नाका या ठिकाणी नागरिकांकडून गणपती घेतले जात होते. त्यानंतर एक ट्रॉलीतून ते विसर्जन तळी नेऊन एकत्रित तळ्यात विसर्जीत केली जात होते. विसर्जन स्थळावर पोलिसांचा बंदोबस्त होता. याबरोबरच पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.  संगम माहूली, उरमोडी नदीवर देखील गावातील घरोघरचे गणपती विसर्जनासाठी नेले जात होते. विसर्जनासाठी पाच पेक्षा जादा माणसांनी परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा गर्दीचे प्रमाण घटले होते. सर्वच विसर्जनस्थळी पालिका, ग्रामपंचातय प्रशासनाने निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली होती. नागरिक त्या कुंडातच निर्माल्य ठेवत होते. दरम्यान शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील (कंटेनमेंट झोन) गणपतींच्या मुर्तींचे पालिकेने संकलन केल्याचे सांगण्यात आले. जिवाची पर्वा न करणारा कऱ्हाडचा 'गणेश' ठरला त्यांच्यासाठी विघ्नहर्ता दरवर्षी ताशांचा गजर,गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोष करत गणेश विसर्जनाचा जल्लोष पहाटे सहा वाजेपर्यत चालायचा. यंदा मात्र तो डामडौल आणि जल्लोष दिसत नव्हता. पोलीस प्रशासनाने मानाच्या पाच मंडळांना सायंकाळी साडे सहा वाजता विसर्जनासाठी अर्धा तासाची वेळ दिली. त्यानूसार एकेक गणपती 501 पाटी नजीक आले. तेथून ते बुधवार नाका तळ्याच्या येथे मार्गस्थ झाले. साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश विसर्जनातील शेवटचा मानाचा गणपती श्री शंकर पार्वती गणपती (महादेव) याचे नगराध्यक्षा माधवी कदम, शाहूपूरी पोलिस स्टेशनचे प्रमुख विशाल वायकर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा या जयघोष करत उपस्थित भक्तांनी गणरायाला भावपुर्ण निरोप दिला. कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32TzcYW
Read More
तरुण पाण्यात आडकल्याचे समजताच धरणाचे ११ आकरा दरवाजे केले बंद

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले. प्रचंड वेगाने जलप्रपात धरणाच्या दरवाजा खालील स्थिर पात्रात कोसळून, नदीपात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागला. स्थिर पात्राच्या मधोमध असलेल्या भिंतीवर एक तरुण अडकला. पाण्याने वेढलेल्या तरुणाला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच उघडलेले सर्व दरवाजे पुन्हा बंद केले. दरवाजांच्याखाली स्थिर पात्राच्या भिंतीवर अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. १५ मिनिटांनी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. धनराज बर्डे (वय २०, रा. नांदगाव) असे अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. ते दृश्य पाहण्यासाठी आलेला धनराज बर्डे थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला. पहिले तीन दरवाजे उघडले. धनराज भांबावला. तसाच बसून राहिला. सकाळी साडेनऊवाजेपर्यंत सर्व ११ दरवाजे उघडले. झपाट्याने स्थिर पात्रात पडलेले पाणी मुळा नदी पात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागले. धनराजच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिला. धनराज अडकला.

पर्यटकांसह उपस्थित काही पत्रकारांनी एक तरुण पाण्याने वेढलेल्या भिंतीवर बसल्याचे पाहिले. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पत्रकारांनी जलसंपदा खात्याचे धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, घटनेची माहिती दिली. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी तातडीने दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले. पाणी कमी झाले. धनराजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंधरा- वीस मिनिटे धनराज पाण्याने वेढला होता. त्याच्या जवळून दोन हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने प्रचंड आवाज करीत जलप्रपात नदीपात्रात वेगाने जात होता. नशीब बलवत्तर म्हणून धनराजचे प्राण वाचले.

घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने काही उत्साही पर्यटक दरवाजा खाली असलेल्या स्थिर पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. तर, काही पर्यटक स्थिर पात्राच्या भिंतीवरून, वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून चालत होते.  अत्यंत धोकादायक ठिकाणी पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात वावरत होते. त्यामुळे, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे.

मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील म्हणाल्या, धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर सावधानतेसाठी तीन वेळा भोंगा वाजविण्यात आला. परंतु, उत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन बसतात. अडकलेल्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे.  जलसंपदाची कर्मचारी संख्या अपुरी असल्याने, पर्यटकांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही.

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तरुण पाण्यात आडकल्याचे समजताच धरणाचे ११ आकरा दरवाजे केले बंद राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले. प्रचंड वेगाने जलप्रपात धरणाच्या दरवाजा खालील स्थिर पात्रात कोसळून, नदीपात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागला. स्थिर पात्राच्या मधोमध असलेल्या भिंतीवर एक तरुण अडकला. पाण्याने वेढलेल्या तरुणाला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच उघडलेले सर्व दरवाजे पुन्हा बंद केले. दरवाजांच्याखाली स्थिर पात्राच्या भिंतीवर अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. १५ मिनिटांनी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. धनराज बर्डे (वय २०, रा. नांदगाव) असे अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. ते दृश्य पाहण्यासाठी आलेला धनराज बर्डे थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला. पहिले तीन दरवाजे उघडले. धनराज भांबावला. तसाच बसून राहिला. सकाळी साडेनऊवाजेपर्यंत सर्व ११ दरवाजे उघडले. झपाट्याने स्थिर पात्रात पडलेले पाणी मुळा नदी पात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागले. धनराजच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिला. धनराज अडकला. पर्यटकांसह उपस्थित काही पत्रकारांनी एक तरुण पाण्याने वेढलेल्या भिंतीवर बसल्याचे पाहिले. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पत्रकारांनी जलसंपदा खात्याचे धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, घटनेची माहिती दिली. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी तातडीने दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले. पाणी कमी झाले. धनराजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंधरा- वीस मिनिटे धनराज पाण्याने वेढला होता. त्याच्या जवळून दोन हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने प्रचंड आवाज करीत जलप्रपात नदीपात्रात वेगाने जात होता. नशीब बलवत्तर म्हणून धनराजचे प्राण वाचले. घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने काही उत्साही पर्यटक दरवाजा खाली असलेल्या स्थिर पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. तर, काही पर्यटक स्थिर पात्राच्या भिंतीवरून, वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून चालत होते.  अत्यंत धोकादायक ठिकाणी पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात वावरत होते. त्यामुळे, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे. मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील म्हणाल्या, धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर सावधानतेसाठी तीन वेळा भोंगा वाजविण्यात आला. परंतु, उत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन बसतात. अडकलेल्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे.  जलसंपदाची कर्मचारी संख्या अपुरी असल्याने, पर्यटकांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gTqVsG
Read More
या गावात दगड वापरायला बंदी आहे ! गावात दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही नाही सापडणार 

या गावात तुम्हाला दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही सापडणार नाही. माती आणि विटांची सुबक घरे हे इथले वैशिष्ट्य. या गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव रामेश्‍वराचे मंदिर मात्र दगडातील वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराशी जोडलेल्या आख्यायिकेमुळे गावात दगडाचे घर उभारले जात नाही. ही परंपरा कित्येक पिढ्या जपली आहे. सावंतवाडीपासून अवघ्या 6 किलोमीटरवर असलेले आकेरी-हुमरस (ता. कुडाळ). 
आकेरी आणि हुमरस ही आता दोन गावे म्हणून ओळखली जातात. त्यांच्या ग्रामपंचायती वेगळ्या आहेत; मात्र पूर्वी ही दोन्ही गावे मिळून एकच गाव होते आणि बांधकामात दगड न वापरण्याची परंपरा आजही या दोन गावांत जपली जाते.

 
माणगावला जाणाऱ्या मार्गाशेजारीच श्री देव रामेश्‍वर मंदिराचे बांधकाम झाले. त्यावेळी मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा दगड देवगडवरून बैलगाडीतून आणला होता. श्री रामेश्‍वरावर आकेरीवासीयांची मोठी नितांत श्रद्धा असून, आपल्या मंदिराचे बांधकाम दगडी असल्यामुळे देवापेक्षा मोठे कोणी असू नये, या विचारधारेने गावात कोणीही आपल्या घराला दगड वापरणार नाही, असा शब्द मानकाऱ्यांनी मंदिरात देवासमोर दिला. त्यानंतर ते आजतागायत गावात कोणीही स्थायिक झालेली व्यक्ती आपल्या वास्तूला दगड वापरत नाही. त्यामुळे गावातील सर्वच घरांचे बांधकाम विटांपासून झालेले आहे. अलीकडे स्लॅबची घरे बांधणारे सिमेंटच्या ब्लॉकचा वापर करतात. श्रीदेव रामेश्‍वराच्या तुलनेत कोणतीच गोष्ट मोठी असू नये. तसे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला गावात स्थिरता लाभत नाही, त्याची हानी होते, अशा पूर्वीपासून चालत आलेल्या आख्यायिकेनुसार आकेरी व हुमरसवासीय दगडी बांधकाम करत नाहीत. गावात दगडी बांधकाम करण्याचे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना तशी वेगळी प्रचीती किंवा वेगळेच अनुभव आले असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. त्यामुळे दगडी घरे नसलेला गाव म्हणून आकेरी-हुमरसचा नावलौकिक सर्वदूर आहे. 

पूर्वी आकेरी व हुमरस हे कुडाळ तालुक्‍यातील एकच गाव होते; मात्र नंतर काही कारणास्तव आकेरी व हुमरस असे दोन भाग करण्यात आले. आकेरी गावची लोकसंख्या 3 हजारांच्या आत आहे. गावचे दोन भाग झाल्यानंतरही दोन्ही गावांत देवाच्या दंतकथेनुसार दगडी बांधकाम करण्यास कोणीही तयार होत नाही. माणगावचे खोरे जवळच असल्यामुळे निसर्गाच्या कुशीत मुंबई-गोवा महामार्गावरच ही गावे आहेत. इथल्या स्थायिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे पावसाळ्यात गावाचे सौंदर्य विशेष खुलून दिसते. गावात सर्वांचीच घरे विटांची असल्यामुळे लगतच्या कोलगाव, आंबेगाव येथे वीट व्यवसाय जोरात चालतो. 
ग्रामस्थांची घरे दगडी नसली तरी गावातील शासकीय यंत्रणेची कार्यालये म्हणजे ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, प्राथमिक उपकेंद्रे आदींच्या बांधकामाला दगड वापरला गेला आहे. 

कोकणपण आजही टिकून
गावात पूर्वापार स्थित असलेल्या नागरिकांना गावची दंतकथा माहिती असल्यामुळे कोणीही जाणून बुजून घरकामात दगड वापरण्याचे धाडस करत नाही. इतर गावातून येथे स्थायिक होण्यास कोणी आल्यास त्याला स्थानिक नागरिक गावची दंतकथा व श्रीदेव रामेश्‍वराची महती ते स्पष्ट करून सांगतात. हे गाव शहरापासून जवळ आहे; मात्र दगडाचा वापर होत नसल्याने येथे निवासी संकुले किंवा फारसे सिमेंटीकरण झालेले नाही. त्यामुळे गावचे कोकणपण आजही टिकून आहे. 
 
""गावावर श्री देव रामेश्‍वराची कृपा कायम आहे. गावात चालत आलेल्या दंतकथेनुसार आजपर्यंत दगडी बांधकाम झालेले नाही. हे आमच्या गावचे वैशिष्ट्य आहे. आकेरी गावचा रथोत्सव एक मोठा उत्सव होतो. यावेळी गावच्या माहेरवाशिणी गावात येतात. रथोत्सव म्हणजे दसरा व दिवाळीसारखाच गावात उत्सव असतो.''
- बाळकृष्ण राऊळ, ग्रामस्थ.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

या गावात दगड वापरायला बंदी आहे ! गावात दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही नाही सापडणार  या गावात तुम्हाला दगडी बांधकाम केलेले घर औषधालाही सापडणार नाही. माती आणि विटांची सुबक घरे हे इथले वैशिष्ट्य. या गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव रामेश्‍वराचे मंदिर मात्र दगडातील वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराशी जोडलेल्या आख्यायिकेमुळे गावात दगडाचे घर उभारले जात नाही. ही परंपरा कित्येक पिढ्या जपली आहे. सावंतवाडीपासून अवघ्या 6 किलोमीटरवर असलेले आकेरी-हुमरस (ता. कुडाळ).  आकेरी आणि हुमरस ही आता दोन गावे म्हणून ओळखली जातात. त्यांच्या ग्रामपंचायती वेगळ्या आहेत; मात्र पूर्वी ही दोन्ही गावे मिळून एकच गाव होते आणि बांधकामात दगड न वापरण्याची परंपरा आजही या दोन गावांत जपली जाते.   माणगावला जाणाऱ्या मार्गाशेजारीच श्री देव रामेश्‍वर मंदिराचे बांधकाम झाले. त्यावेळी मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा दगड देवगडवरून बैलगाडीतून आणला होता. श्री रामेश्‍वरावर आकेरीवासीयांची मोठी नितांत श्रद्धा असून, आपल्या मंदिराचे बांधकाम दगडी असल्यामुळे देवापेक्षा मोठे कोणी असू नये, या विचारधारेने गावात कोणीही आपल्या घराला दगड वापरणार नाही, असा शब्द मानकाऱ्यांनी मंदिरात देवासमोर दिला. त्यानंतर ते आजतागायत गावात कोणीही स्थायिक झालेली व्यक्ती आपल्या वास्तूला दगड वापरत नाही. त्यामुळे गावातील सर्वच घरांचे बांधकाम विटांपासून झालेले आहे. अलीकडे स्लॅबची घरे बांधणारे सिमेंटच्या ब्लॉकचा वापर करतात. श्रीदेव रामेश्‍वराच्या तुलनेत कोणतीच गोष्ट मोठी असू नये. तसे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला गावात स्थिरता लाभत नाही, त्याची हानी होते, अशा पूर्वीपासून चालत आलेल्या आख्यायिकेनुसार आकेरी व हुमरसवासीय दगडी बांधकाम करत नाहीत. गावात दगडी बांधकाम करण्याचे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना तशी वेगळी प्रचीती किंवा वेगळेच अनुभव आले असल्याचा दावा ग्रामस्थ करतात. त्यामुळे दगडी घरे नसलेला गाव म्हणून आकेरी-हुमरसचा नावलौकिक सर्वदूर आहे.  पूर्वी आकेरी व हुमरस हे कुडाळ तालुक्‍यातील एकच गाव होते; मात्र नंतर काही कारणास्तव आकेरी व हुमरस असे दोन भाग करण्यात आले. आकेरी गावची लोकसंख्या 3 हजारांच्या आत आहे. गावचे दोन भाग झाल्यानंतरही दोन्ही गावांत देवाच्या दंतकथेनुसार दगडी बांधकाम करण्यास कोणीही तयार होत नाही. माणगावचे खोरे जवळच असल्यामुळे निसर्गाच्या कुशीत मुंबई-गोवा महामार्गावरच ही गावे आहेत. इथल्या स्थायिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे पावसाळ्यात गावाचे सौंदर्य विशेष खुलून दिसते. गावात सर्वांचीच घरे विटांची असल्यामुळे लगतच्या कोलगाव, आंबेगाव येथे वीट व्यवसाय जोरात चालतो.  ग्रामस्थांची घरे दगडी नसली तरी गावातील शासकीय यंत्रणेची कार्यालये म्हणजे ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, प्राथमिक उपकेंद्रे आदींच्या बांधकामाला दगड वापरला गेला आहे.  कोकणपण आजही टिकून गावात पूर्वापार स्थित असलेल्या नागरिकांना गावची दंतकथा माहिती असल्यामुळे कोणीही जाणून बुजून घरकामात दगड वापरण्याचे धाडस करत नाही. इतर गावातून येथे स्थायिक होण्यास कोणी आल्यास त्याला स्थानिक नागरिक गावची दंतकथा व श्रीदेव रामेश्‍वराची महती ते स्पष्ट करून सांगतात. हे गाव शहरापासून जवळ आहे; मात्र दगडाचा वापर होत नसल्याने येथे निवासी संकुले किंवा फारसे सिमेंटीकरण झालेले नाही. त्यामुळे गावचे कोकणपण आजही टिकून आहे.    ""गावावर श्री देव रामेश्‍वराची कृपा कायम आहे. गावात चालत आलेल्या दंतकथेनुसार आजपर्यंत दगडी बांधकाम झालेले नाही. हे आमच्या गावचे वैशिष्ट्य आहे. आकेरी गावचा रथोत्सव एक मोठा उत्सव होतो. यावेळी गावच्या माहेरवाशिणी गावात येतात. रथोत्सव म्हणजे दसरा व दिवाळीसारखाच गावात उत्सव असतो.'' - बाळकृष्ण राऊळ, ग्रामस्थ. संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DjGRqs
Read More
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

September 01, 2020 0 Comments
लिंगायत धर्मगुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर काल रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  from Zee24 Ta...
Read More
सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत- सीबीआय #मोठ्याबातम्या
मुंबईत नवीन 1,142 कोरोना रुग्णांची भर, रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर

मुंबई : मुंबईत आज 1,142 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,46,947 झाली आहे.मुंबईत आज 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,690 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,596 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे. 

मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग

मुंबईत आज नोंद झालेल्या 35 मृत्यूंपैकी 28 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 28 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 35 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते. 22 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. 

आज 1,596 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,18,864 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 80 दिवसांवर गेला आहे. तर 31 ऑगस्ट पर्यंत एकूण 7,75,974  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 25 ऑगस्ट  ते 31 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.87 इतका आहे. 

 

'राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरूतुल्य मुर्ती काळाच्या पडद्याआड';मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली

मुंबईत 577 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,293 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,080 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,555 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबईत नवीन 1,142 कोरोना रुग्णांची भर, रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर मुंबई : मुंबईत आज 1,142 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,46,947 झाली आहे.मुंबईत आज 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,690 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,596 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे.  मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग मुंबईत आज नोंद झालेल्या 35 मृत्यूंपैकी 28 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 28 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 35 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते. 22 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 11 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.  आज 1,596 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,18,864 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 80 दिवसांवर गेला आहे. तर 31 ऑगस्ट पर्यंत एकूण 7,75,974  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 25 ऑगस्ट  ते 31 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.87 इतका आहे.    'राष्ट्राभिमान जागृत ठेवणारी गुरूतुल्य मुर्ती काळाच्या पडद्याआड';मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली मुंबईत 577 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,293 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,080 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,555 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत. ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DlfMTX
Read More
लॉकडाऊनमुळे महामुंबईच्या महत्वकांशी प्रकल्पांना खीळ; मजूर नसल्याने पुर्ण क्षमतेने काम करण्यास अडचणी

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विकासकामांना कोरोनाचा जबर फटका बसलेला दिसून येत आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खीळ बसली आहे. या मोठ्या प्रकल्पांच्या विकासासाठी 50 टक्केच मजूर कार्यकत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या दिवसात ही कमी भरून न निघाल्यास प्रकल्प पुर्ण होण्यास लागणारा अवधी वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग

एमएमआरडीए परिसरात सध्या मुंबई मेट्रो, रस्त्यांची कामे, उड्डाणपुल, सागरी सेतू , अन्य पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळी ही कामे थांबवण्यात आली होती. तरी सर्व यंत्रणांनी आपल्या मजूरांचे वेतन, राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली होती. लॉकडाऊनच्या अखेरच्या टप्प्यांपर्यंत जवळपास 80 टक्के मजूर आपल्या मूळ गावी निघून गेले. मे महिण्याच्या अखेरिस फक्त 20 टक्के मजूर या पायाभूत सुविधांची कामे करीत होते. मजूराचंच्या कमतरतेमुळे कामे रखडली होती. त्यामुळे यंत्रणांनी नवीन कामगारांची जुळवाजुळव सुरू केली. तरीदेखील जुलैपर्यंत ती 35 टक्के इतकीच होती. सध्या ऑगस्टमध्ये या मजूरांची टक्केवारी 50 इतकी झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांचे काम पुर्ण क्षमतेने अजूनही करणे शक्य होत नाहीये.

अंमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उगडकीस; 'एनसीबी'ची एकाला अटक

मजूराच्या अभावामुळे ठरलेल्या वेळेत प्रकल्पांची कामे होतील का याबबात शंकाच आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मते या कामांना निच्छितवेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकण्याची शक्तता आहे.  तरी देखील मेट्रो2ए आणि मेट्रो7 या प्रकल्पांचे काम ठरलेल्या वेळेत पुर्ण करण्याचा प्रयत्न एमएमआरडीए करणार आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाऊनमुळे महामुंबईच्या महत्वकांशी प्रकल्पांना खीळ; मजूर नसल्याने पुर्ण क्षमतेने काम करण्यास अडचणी मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विकासकामांना कोरोनाचा जबर फटका बसलेला दिसून येत आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खीळ बसली आहे. या मोठ्या प्रकल्पांच्या विकासासाठी 50 टक्केच मजूर कार्यकत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या दिवसात ही कमी भरून न निघाल्यास प्रकल्प पुर्ण होण्यास लागणारा अवधी वाढण्याची शक्यता आहे. मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग एमएमआरडीए परिसरात सध्या मुंबई मेट्रो, रस्त्यांची कामे, उड्डाणपुल, सागरी सेतू , अन्य पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळी ही कामे थांबवण्यात आली होती. तरी सर्व यंत्रणांनी आपल्या मजूरांचे वेतन, राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली होती. लॉकडाऊनच्या अखेरच्या टप्प्यांपर्यंत जवळपास 80 टक्के मजूर आपल्या मूळ गावी निघून गेले. मे महिण्याच्या अखेरिस फक्त 20 टक्के मजूर या पायाभूत सुविधांची कामे करीत होते. मजूराचंच्या कमतरतेमुळे कामे रखडली होती. त्यामुळे यंत्रणांनी नवीन कामगारांची जुळवाजुळव सुरू केली. तरीदेखील जुलैपर्यंत ती 35 टक्के इतकीच होती. सध्या ऑगस्टमध्ये या मजूरांची टक्केवारी 50 इतकी झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांचे काम पुर्ण क्षमतेने अजूनही करणे शक्य होत नाहीये. अंमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उगडकीस; 'एनसीबी'ची एकाला अटक मजूराच्या अभावामुळे ठरलेल्या वेळेत प्रकल्पांची कामे होतील का याबबात शंकाच आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मते या कामांना निच्छितवेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकण्याची शक्तता आहे.  तरी देखील मेट्रो2ए आणि मेट्रो7 या प्रकल्पांचे काम ठरलेल्या वेळेत पुर्ण करण्याचा प्रयत्न एमएमआरडीए करणार आहे. --------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EQVlir
Read More
अजबच! फक्त कोरोना पॉझिटिव्ह लोकांनाच 'या' जागी फिरण्यासाठी परवानगी

रिओ : अनेकांना जुन महिना खूप आवडतो कारण त्या महिन्यापासून पावसाळा सुरु होतो. पावसात भिजायला कुणाला नाही आवडत बरोबर ना. तसेच पावसाळ्यातील तो निसर्ग, डोंगर, दऱ्या, धबधबे आणि बेट. या ठिकाणी जाऊन त्या निसर्गाचा आनंद घ्यायला काहीजण नेहमीच तयार असतात. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळे सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आलेली होती.  

कोरोना महामारीच्या दिवसात एका बेटाने आपल्या पर्यटकांसाठी अशी अट घातली आहे की, पर्यटक हा कोरोनाहून बरा होऊन परत येणे आवश्यक आहे, म्हणजेच फक्त तेच पर्यटक या बेटावर येऊ शकतात. ज्यांना पहिला कोरोना होऊन त्यातून ते बरे झालेले असले पाहिजेत. 

ब्राजील येथील फर्नान्डो डी नोरोन्हा हे बेट गेल्या पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद होते. परंतु आता ते नव्या स्थितीसह उघडले गेले आहे. या बेटावर दररोज मर्यादित संख्येने लोकांना प्रवेश घेण्याची परवानगी आहे. ही अट पूर्ण करणारे पर्यटक एक सप्टेंबरपासून येथे येऊ शकतात, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेटावर राहणाऱ्या सर्व लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही नवीन अट यासाठी लागू केली आहे. बेटावर येताना पर्यटकांना कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सोबत आणावा लागणार आहे. अहवाल किमान 20 दिवस जुना असलेला असावा. तसेच, बेटावर येण्यासाठी पर्यावरणीय कर सुद्धा भरावा लागणार आहे.

हे बेट नैसर्गिक समुद्रकिनारे, सुंदर हिरवळ आणि राष्ट्रीय समुद्री राखीव म्हणून ओळखले जाते. जगभरातून या ठिकाणी पर्यटक येतात. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्येही याचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी गर्दी असते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अजबच! फक्त कोरोना पॉझिटिव्ह लोकांनाच 'या' जागी फिरण्यासाठी परवानगी रिओ : अनेकांना जुन महिना खूप आवडतो कारण त्या महिन्यापासून पावसाळा सुरु होतो. पावसात भिजायला कुणाला नाही आवडत बरोबर ना. तसेच पावसाळ्यातील तो निसर्ग, डोंगर, दऱ्या, धबधबे आणि बेट. या ठिकाणी जाऊन त्या निसर्गाचा आनंद घ्यायला काहीजण नेहमीच तयार असतात. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळे सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आलेली होती.   कोरोना महामारीच्या दिवसात एका बेटाने आपल्या पर्यटकांसाठी अशी अट घातली आहे की, पर्यटक हा कोरोनाहून बरा होऊन परत येणे आवश्यक आहे, म्हणजेच फक्त तेच पर्यटक या बेटावर येऊ शकतात. ज्यांना पहिला कोरोना होऊन त्यातून ते बरे झालेले असले पाहिजेत.  ब्राजील येथील फर्नान्डो डी नोरोन्हा हे बेट गेल्या पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद होते. परंतु आता ते नव्या स्थितीसह उघडले गेले आहे. या बेटावर दररोज मर्यादित संख्येने लोकांना प्रवेश घेण्याची परवानगी आहे. ही अट पूर्ण करणारे पर्यटक एक सप्टेंबरपासून येथे येऊ शकतात, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेटावर राहणाऱ्या सर्व लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही नवीन अट यासाठी लागू केली आहे. बेटावर येताना पर्यटकांना कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सोबत आणावा लागणार आहे. अहवाल किमान 20 दिवस जुना असलेला असावा. तसेच, बेटावर येण्यासाठी पर्यावरणीय कर सुद्धा भरावा लागणार आहे. हे बेट नैसर्गिक समुद्रकिनारे, सुंदर हिरवळ आणि राष्ट्रीय समुद्री राखीव म्हणून ओळखले जाते. जगभरातून या ठिकाणी पर्यटक येतात. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्येही याचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी गर्दी असते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

September 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Go6FDf
Read More
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच

September 01, 2020 0 Comments
पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत्या ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार आहे.   from Zee24 Taas: Maharashtra News https://i...
Read More