Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 5, 2020

कोरोना लॉकडाऊन : भिवंडीतील सेक्सवर्कर्सनी हाती घेतली पाटी, गिरवतायेत इंग्लिशचे धडे
कोरोना लॉकडाऊन : कडूबाई खरात यांच्या वाट्याला पुन्हा जगण्यासाठीचा संघर्ष
वर्षभर लढाईसाठी केरळ तयार; नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी 

कोचीन - देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिक पातळीवर निर्बंध घालणे आणि कमी करणे सुरु आहे. केरळ सरकारने मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील एक वर्षासाठी आपल्या जनतेला सुरक्षा नियम घालून दिले असून त्यांची अंमलबजावणी सक्तीची करण्यात आली आहे. याप्रकारे वर्षभरासाठी नियम घालून देणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्यातील पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्य साथ रोगाबाबतच्या आदेशात दुरुस्ती करत नागरिकांसाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी पुढील वर्षभर अथवा राज्य सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत होणार आहे. अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कोरोनाचा देशातील पहिला रुग्ण आढळलेल्या या राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर आता त्यात पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारचे नवे नियम
 सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, वाहन चालविताना मास्क बंधनकारक
 सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग
 विवाह समारंभासाठी केवळ ५० जणांनाच परवानगी. उपस्थित राहणाऱ्या लोकांनाही मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य. दोघांमध्ये सहा फूटांचे अंतर हवे. 
    अंत्यविधीवेळी २० जणांना परवानगी
    कोरोना रुग्णाचा अंत्यविधी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार
    आंदोलन, धरणे, निदर्शने अशा कार्यक्रमांसाठी परवानगी अत्यावश्‍यक. कमाल दहा जणांनाच परवानगी. मास्क अनिवार्य.  
    सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई
    बाहेरील राज्यांमधून येणाऱ्यांनी सरकारकडे ऑनलाइन नोंद करणे आवश्‍यक
    मॉल अथवा दुकानांमध्ये एकावेळी वीसहून अधिक लोक नकोत
    आंतरराज्य बस वाहतूक सेवा स्थगित 
    नियम मोडणाऱ्यावर कारवाई

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वर्षभर लढाईसाठी केरळ तयार; नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी  कोचीन - देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिक पातळीवर निर्बंध घालणे आणि कमी करणे सुरु आहे. केरळ सरकारने मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील एक वर्षासाठी आपल्या जनतेला सुरक्षा नियम घालून दिले असून त्यांची अंमलबजावणी सक्तीची करण्यात आली आहे. याप्रकारे वर्षभरासाठी नियम घालून देणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    राज्यातील पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्य साथ रोगाबाबतच्या आदेशात दुरुस्ती करत नागरिकांसाठी नव्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी पुढील वर्षभर अथवा राज्य सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत होणार आहे. अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कोरोनाचा देशातील पहिला रुग्ण आढळलेल्या या राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर आता त्यात पुन्हा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर पावले उचलली आहेत.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सरकारचे नवे नियम  सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, वाहन चालविताना मास्क बंधनकारक  सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग  विवाह समारंभासाठी केवळ ५० जणांनाच परवानगी. उपस्थित राहणाऱ्या लोकांनाही मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य. दोघांमध्ये सहा फूटांचे अंतर हवे.      अंत्यविधीवेळी २० जणांना परवानगी     कोरोना रुग्णाचा अंत्यविधी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार     आंदोलन, धरणे, निदर्शने अशा कार्यक्रमांसाठी परवानगी अत्यावश्‍यक. कमाल दहा जणांनाच परवानगी. मास्क अनिवार्य.       सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई     बाहेरील राज्यांमधून येणाऱ्यांनी सरकारकडे ऑनलाइन नोंद करणे आवश्‍यक     मॉल अथवा दुकानांमध्ये एकावेळी वीसहून अधिक लोक नकोत     आंतरराज्य बस वाहतूक सेवा स्थगित      नियम मोडणाऱ्यावर कारवाई News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3grN55B
Read More
पाऊलखुणा मंदिरांच्या 4 : थेरगावातील 'या' स्मृतीशिल्पामुळे वीरांच्या आठवणी आजही ताज्या

पिंपरी : पवना नदीकाठी वसलेले थेरगाव गावठाणातील पवनेश्‍वराजवळील शिव मंदिर. आजही आठशे ते हजार वर्षीपूर्वीचा प्राचीनत्वाच्या पाऊलखुणा या स्मृतीशिल्पांच्या माध्यमातून गावात आढळल्या आहेत. दुर्मिळ अवस्थेत असलेल्या या शिल्पावर लढाईत युद्ध करताना धनुष्यबाण हातात घेऊन धारातीर्थी पडलेले वीर दाखविले आहेत. त्याचप्रमाणे तलवार व ढाल घेतलेले सैनिकही या वीरगळावर आहेत. एकल वीर पद्धतीच्या या स्मृतीशिळ अतीशय दुर्मिळ असल्याचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

या स्मृतीशिल्पावर शिवलिंग व नंदीची पूजा करताना वीर दर्शविले आहेत. साधू धुपारती करताना दिसत आहेत. सफलतेचे प्रतीक असलेला मंगल कलशही यावर दर्शविलेला आहे. बापूजीबुवा मंदिराच्या बाहेर हनुमान मंदिराच्या समोरच डाव्या बाजूला एका चौथऱ्यावर दुर्मिळ स्मृतिशिल्पे उभी आहेत. येथेच झिजलेल्या अवस्थेत गजलक्ष्मीचे शिल्प शेंदूर लावलेल्या अवस्थेत आहे. गजलक्ष्मीचे शिल्प हे प्राचीन काळातील समृध्दीचे प्रतिक मानले जाते. परंतु, या शिल्पाविषयी ग्रामस्थांना माहिती नाही.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्री बापुजीबुवा मंदिराचे गुरव मारुती तुकाराम बारणे म्हणाले, "गावाच्या निर्मितीपासून बापूजीबुवा मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. वैशाख प्रतिपदेला गावचा उत्सव असतो. यावेळी मोठा कुस्त्यांचा आखाडा या ठिकाणी भरतो."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील म्हणाले, "बापुजी नावाच्या गवळ्याला हा देव त्याच्या झोपडीत सापडल्याचा उल्लेख पुणे गॅझेटमध्ये आहे. घाटावर येणाऱ्या गवळी धनगरांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी या देवाची मंदिरे स्थापन झाली. याठिकाणी देखील काळूबाईची मूर्ती आहे. गावाला बगाडाची मोठी परंपरा आहे. या देवाच्या देवराया देखील सह्याद्रीमध्ये सापडल्याचा उल्लेख आहे. या देवाला कुठलीही सहचरिणी नाही."

काय सांगतो हा थेरगाव मधील इतिहास :

आठव्या ते बाराव्या शतकापासून महाराष्ट्रात वीरगळ निर्मितीची प्रक्रिया

वीरगळ हा खालून वर अशा पद्धतीने वाचला जातो.

थेरगावात एक गजलक्ष्मीचे शिल्प, दोन वीरगळ आणि दहा स्मृतिशिल्पे सापडली आहे.

दोन हत्तीमध्ये बसलेल्या लक्ष्मीवर कुंभाने अभिषेक करत आहेत, असे या गजलक्ष्मीचे शिल्पामध्ये दाखविण्यात आले असून, हे शिल्प महाराष्ट्रात फार कमी गावांमधे अढळते.

हनुमान मंदिर आजही कौलारु असून, चांगल्या स्थितीत उभे आहे.

हनुमान मंदिराच्या भिंतीलाच एक वीरगळ ज्यावर लढाईमधे मरण पावलेल्या वीराच्या मृत्यूचा प्रसंग आहे.

वीरगळामुळे त्या गावाचा इतिहास आठशे ते हजार वर्ष जुना असल्याचे दिसते. असाच एक वीरगळ चांगल्या अवस्थेत थेरगावात नदी किनारी असणाऱ्या पवनेश्वर मंदिराजवळ आहे.

या वीरगळाचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्यतः आढळणारा अप्सरांचा कप्पा यात नसून तो चांगल्या अवस्थेत आहे.

पवनेश्वर येथे शिवमंदिराभोवती आणखीन आठ वृंदावन पध्दतीची स्मृतीशिळा या मध्ययुगीन काळातील असाव्यात असा अंदाज आहे.

News Story Feeds https://ift.tt/2C4IFTk

पाऊलखुणा मंदिरांच्या 4 : थेरगावातील 'या' स्मृतीशिल्पामुळे वीरांच्या आठवणी आजही ताज्या पिंपरी : पवना नदीकाठी वसलेले थेरगाव गावठाणातील पवनेश्‍वराजवळील शिव मंदिर. आजही आठशे ते हजार वर्षीपूर्वीचा प्राचीनत्वाच्या पाऊलखुणा या स्मृतीशिल्पांच्या माध्यमातून गावात आढळल्या आहेत. दुर्मिळ अवस्थेत असलेल्या या शिल्पावर लढाईत युद्ध करताना धनुष्यबाण हातात घेऊन धारातीर्थी पडलेले वीर दाखविले आहेत. त्याचप्रमाणे तलवार व ढाल घेतलेले सैनिकही या वीरगळावर आहेत. एकल वीर पद्धतीच्या या स्मृतीशिळ अतीशय दुर्मिळ असल्याचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    या स्मृतीशिल्पावर शिवलिंग व नंदीची पूजा करताना वीर दर्शविले आहेत. साधू धुपारती करताना दिसत आहेत. सफलतेचे प्रतीक असलेला मंगल कलशही यावर दर्शविलेला आहे. बापूजीबुवा मंदिराच्या बाहेर हनुमान मंदिराच्या समोरच डाव्या बाजूला एका चौथऱ्यावर दुर्मिळ स्मृतिशिल्पे उभी आहेत. येथेच झिजलेल्या अवस्थेत गजलक्ष्मीचे शिल्प शेंदूर लावलेल्या अवस्थेत आहे. गजलक्ष्मीचे शिल्प हे प्राचीन काळातील समृध्दीचे प्रतिक मानले जाते. परंतु, या शिल्पाविषयी ग्रामस्थांना माहिती नाही. पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा श्री बापुजीबुवा मंदिराचे गुरव मारुती तुकाराम बारणे म्हणाले, "गावाच्या निर्मितीपासून बापूजीबुवा मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. वैशाख प्रतिपदेला गावचा उत्सव असतो. यावेळी मोठा कुस्त्यांचा आखाडा या ठिकाणी भरतो." पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पाटील म्हणाले, "बापुजी नावाच्या गवळ्याला हा देव त्याच्या झोपडीत सापडल्याचा उल्लेख पुणे गॅझेटमध्ये आहे. घाटावर येणाऱ्या गवळी धनगरांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी या देवाची मंदिरे स्थापन झाली. याठिकाणी देखील काळूबाईची मूर्ती आहे. गावाला बगाडाची मोठी परंपरा आहे. या देवाच्या देवराया देखील सह्याद्रीमध्ये सापडल्याचा उल्लेख आहे. या देवाला कुठलीही सहचरिणी नाही." काय सांगतो हा थेरगाव मधील इतिहास : आठव्या ते बाराव्या शतकापासून महाराष्ट्रात वीरगळ निर्मितीची प्रक्रिया वीरगळ हा खालून वर अशा पद्धतीने वाचला जातो. थेरगावात एक गजलक्ष्मीचे शिल्प, दोन वीरगळ आणि दहा स्मृतिशिल्पे सापडली आहे. दोन हत्तीमध्ये बसलेल्या लक्ष्मीवर कुंभाने अभिषेक करत आहेत, असे या गजलक्ष्मीचे शिल्पामध्ये दाखविण्यात आले असून, हे शिल्प महाराष्ट्रात फार कमी गावांमधे अढळते. हनुमान मंदिर आजही कौलारु असून, चांगल्या स्थितीत उभे आहे. हनुमान मंदिराच्या भिंतीलाच एक वीरगळ ज्यावर लढाईमधे मरण पावलेल्या वीराच्या मृत्यूचा प्रसंग आहे. वीरगळामुळे त्या गावाचा इतिहास आठशे ते हजार वर्ष जुना असल्याचे दिसते. असाच एक वीरगळ चांगल्या अवस्थेत थेरगावात नदी किनारी असणाऱ्या पवनेश्वर मंदिराजवळ आहे. या वीरगळाचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्यतः आढळणारा अप्सरांचा कप्पा यात नसून तो चांगल्या अवस्थेत आहे. पवनेश्वर येथे शिवमंदिराभोवती आणखीन आठ वृंदावन पध्दतीची स्मृतीशिळा या मध्ययुगीन काळातील असाव्यात असा अंदाज आहे. News Story Feeds https://ift.tt/2C4IFTk

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3irsSi2
Read More
भंगारातून साकारले कोरोनाविरोधाचे शस्त्र, या कामासाठी अतिशय उपयुक्‍त...

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांनी पडीत भंगारातून कोरोनाविरोधाचे शस्त्र तयार केले आहे. या यंत्राच्या मदतीने आरक्षणाचे अर्ज, पैसे, तिकिटांचे निर्जंतुकीकरण शक्‍य आहे. यंत्राच्या उपयोगामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणे शक्‍य झाले असून, कर्मचारी व प्रवाशांना सुरक्षा मिळणार आहे. 

रेल्वेस्थानकावर आरक्षणासाठी येणारे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये थेट संपर्क येऊ नये, अशा उपाययोजना आहेत. पण, अर्ज, पैसे, तिकिटांची देवाण-घेवाण करावीच लागत असल्याने संसर्गाचा धोका होता. या समस्येवर मात करणारे उपकरण मध्य रेल्वेच्या नागपुरातील वाणिज्य विभागाने भंगारातून साकारले आहे.

रेल्वे आरक्षण कार्यालयातील निकामी प्रिंटर तसेच नोटा मोजण्याच्या यंत्रातील भाग जोडून हे उपकरण तयार झाले आहे. अल्ट्राव्हाइलेट किरणांचा त्यात प्रभावी वापर करण्यात आला आहे. प्रवाशाने आरक्षणाचा भरलेला अर्ज टाकताच निर्जंतुकीकरण होऊन ते बुकिंग क्‍लर्कला मिळते. त्यातूनच पैसे टाकले जातात. यानंतर क्‍लर्क याच यंत्रातून तिकीट टाकून प्रवाशाला देतात. कोणत्याही वस्तूवर कोरोनाचे विषाणू असल्यास अतिनील किरणामुळे त्यांचा खात्मा होऊन प्रसारही रोखला जातो.

सेल्फी काढताना केली स्टंटबाजी, पाचही जणांनी घेतले हातात हात आणि...

प्रायोगिक तत्त्वावर हे यंत्र नागपूर रेल्वेस्थानकाच्या खिडकीवर लावण्यात आले असून, त्यांचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. आगामी दिवसांमध्ये असे यंत्र सर्वच आरक्षण खिडक्‍यांवर दिसण्याची शक्‍यता आहे. 

लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत पुन:श्‍च हरिओमचा नारा देण्यात आला असून देशाला पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, त्याचवेळी लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे सुरू झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशावेळी हे नवे यंत्र उपयोगी सिद्ध होणार आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भंगारातून साकारले कोरोनाविरोधाचे शस्त्र, या कामासाठी अतिशय उपयुक्‍त... नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांनी पडीत भंगारातून कोरोनाविरोधाचे शस्त्र तयार केले आहे. या यंत्राच्या मदतीने आरक्षणाचे अर्ज, पैसे, तिकिटांचे निर्जंतुकीकरण शक्‍य आहे. यंत्राच्या उपयोगामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणे शक्‍य झाले असून, कर्मचारी व प्रवाशांना सुरक्षा मिळणार आहे.  रेल्वेस्थानकावर आरक्षणासाठी येणारे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये थेट संपर्क येऊ नये, अशा उपाययोजना आहेत. पण, अर्ज, पैसे, तिकिटांची देवाण-घेवाण करावीच लागत असल्याने संसर्गाचा धोका होता. या समस्येवर मात करणारे उपकरण मध्य रेल्वेच्या नागपुरातील वाणिज्य विभागाने भंगारातून साकारले आहे. रेल्वे आरक्षण कार्यालयातील निकामी प्रिंटर तसेच नोटा मोजण्याच्या यंत्रातील भाग जोडून हे उपकरण तयार झाले आहे. अल्ट्राव्हाइलेट किरणांचा त्यात प्रभावी वापर करण्यात आला आहे. प्रवाशाने आरक्षणाचा भरलेला अर्ज टाकताच निर्जंतुकीकरण होऊन ते बुकिंग क्‍लर्कला मिळते. त्यातूनच पैसे टाकले जातात. यानंतर क्‍लर्क याच यंत्रातून तिकीट टाकून प्रवाशाला देतात. कोणत्याही वस्तूवर कोरोनाचे विषाणू असल्यास अतिनील किरणामुळे त्यांचा खात्मा होऊन प्रसारही रोखला जातो. सेल्फी काढताना केली स्टंटबाजी, पाचही जणांनी घेतले हातात हात आणि... प्रायोगिक तत्त्वावर हे यंत्र नागपूर रेल्वेस्थानकाच्या खिडकीवर लावण्यात आले असून, त्यांचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. आगामी दिवसांमध्ये असे यंत्र सर्वच आरक्षण खिडक्‍यांवर दिसण्याची शक्‍यता आहे.  लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत पुन:श्‍च हरिओमचा नारा देण्यात आला असून देशाला पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, त्याचवेळी लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे सुरू झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशावेळी हे नवे यंत्र उपयोगी सिद्ध होणार आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z0cgpR
Read More
विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीला वर्षभराचा थांबा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वर्षभरासाठी कुठल्याही प्रकारची शुल्कवाढ करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने याबाबत कुलगुरूंकडे मुद्दा लावून धरला होता. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

राज्यात कोरानाचा प्रादुर्भाव वाढल्याने उद्योगधंद्यासह विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्यात आलीत. यामुळे अनेकांचे रोजगार गेलेत. शेतीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठीही पालकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरता येणे शक्‍य नाही. विद्यापीठाकडून दरवर्षी शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव असतो. कोरोनामुळे जिल्हावार बंदी लागू आहे. अशा परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. शिवाय, शुल्कवाढ झाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच थांबण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.

हेही वाचा : कोरोनापेक्षा विदर्भात या आजाराचा कहर; चाचणीसाठी तब्बल 12 हजारांचा खर्च 

नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने याबाबत कुलगुरूंकडे निवेदन सादर करीत यावर्षी शैक्षणिक सत्रात कुठल्याच प्रकारची शुल्कवाढ होऊ नये, अशी मागणी केली होती. तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांनी सातत्याने हा विषय कुलगुरूंकडे लावून धरला होता. त्यातूनच गुरुवारी (ता. 2) पार पडलेल्या बैठकीत विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात कुठल्याच प्रकारची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यामुळे विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. 

 

कोरोना काळात विद्यार्थी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळेच नुटातर्फे त्यांच्याकडून कुठलेही शैक्षणिक शुल्क घेण्यात येऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली होती. त्याच भूमिकेतून मागणीचा पाठपुरावा करीत विद्यापीठाकडून ती मागणी मान्य करून घेण्यात संघटनेला यश आले. 
-डॉ. नितीन कोंगरे, व्यवस्थापन परिषद सदस्य. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीला वर्षभराचा थांबा नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वर्षभरासाठी कुठल्याही प्रकारची शुल्कवाढ करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना काळात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने याबाबत कुलगुरूंकडे मुद्दा लावून धरला होता. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  राज्यात कोरानाचा प्रादुर्भाव वाढल्याने उद्योगधंद्यासह विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्यात आलीत. यामुळे अनेकांचे रोजगार गेलेत. शेतीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठीही पालकांकडे पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शुल्क भरता येणे शक्‍य नाही. विद्यापीठाकडून दरवर्षी शुल्कवाढ करण्याचा प्रस्ताव असतो. कोरोनामुळे जिल्हावार बंदी लागू आहे. अशा परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. शिवाय, शुल्कवाढ झाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच थांबण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. हेही वाचा : कोरोनापेक्षा विदर्भात या आजाराचा कहर; चाचणीसाठी तब्बल 12 हजारांचा खर्च  नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने याबाबत कुलगुरूंकडे निवेदन सादर करीत यावर्षी शैक्षणिक सत्रात कुठल्याच प्रकारची शुल्कवाढ होऊ नये, अशी मागणी केली होती. तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांनी सातत्याने हा विषय कुलगुरूंकडे लावून धरला होता. त्यातूनच गुरुवारी (ता. 2) पार पडलेल्या बैठकीत विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात कुठल्याच प्रकारची शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यामुळे विद्यापीठातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे.    कोरोना काळात विद्यार्थी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळेच नुटातर्फे त्यांच्याकडून कुठलेही शैक्षणिक शुल्क घेण्यात येऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली होती. त्याच भूमिकेतून मागणीचा पाठपुरावा करीत विद्यापीठाकडून ती मागणी मान्य करून घेण्यात संघटनेला यश आले.  -डॉ. नितीन कोंगरे, व्यवस्थापन परिषद सदस्य.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iu3TuJ
Read More
268 विद्यार्थी अन्‌ सहा खोल्या, ही आहेत पटसंख्या कमी होण्याची कारणे... 

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक शाळांमधील वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उत्तम सोय नाही. हिंगणा तालुक्‍यातील निलडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 268 विद्यार्थी असताना वर्गखोल्या केवळ सहा आहेत. यातील चार वर्गखोल्या गळक्‍या आहेत. शिक्षण विभागाचे याकडे लक्ष नाही. जिल्हा परिषदांच्या शाळांचा दर्जा उंचावणार कसा, असा सवाल यानिमित्त उपस्थित होतो. 

निलडोह येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीत 268 विद्यार्थी मराठी व हिंदी माध्यमातून शिक्षण घेतात. तर मुख्याध्यापकांसह शिक्षकांची 12 पदे मंजूर आहे. मात्र, त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुठे शिकवावे, हा प्रश्‍न आहे. जिल्हा परिषदेच्या इतर शाळांच्या तुलनेत येथील स्थिती भक्कम असताना प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होते. लाखो रुपये खर्चून शासनाने शाळेला विज्ञान प्रयोगशाळेकरिता उपकरणे दिली. मात्र, तेही ठेवायला जागा नसल्याचे चित्र आहे. 

एकेकाला ड्युटीवरून हाकलून देईन; मला समजता काय, अशी धमकी देणारा 'तो' आहे तरी कोण, वाचा...
 

त्या सहा खोल्यातच मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्याचे दिव्य पार पाडले जाते. शाळेत 13 वर्गखोल्यांचे बांधकाम 1980-81 चे आहे. त्यातील सात वर्गखोल्या जीर्ण झाल्याने तोडण्याचे आदेश शाळेला प्राप्त झाले. त्यापैकी तीन वर्गखोल्या पाडण्यात आल्या. ज्या तीन वर्गखोल्या पाडण्यात आल्या. त्या जागेवर माध्यमिक शाळेसाठी इमारत उभारण्यात आली. कोरोनामुळे शाळा बंद आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना पाण्यात शिक्षण घ्यावे लागले असते. शिक्षण सभापती भारती पाटील यांच्यासह शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांनी शाळेला भेट दिली. परंतु, त्यानंतरही वर्गखोल्यासंदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही. 

 
दुर्घटनेस जबाबदार कोण? 

शाळेत हिंदी व मराठी माध्यम असल्याने येथे 14 खोल्यांची गरज आहे. त्यात एक विज्ञान कक्ष, संगणक कक्ष व मुख्याध्यापकांचे कार्यालय आवश्‍यक आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापतींच्या भेटीदरम्यान वर्गखोल्यांची मागणी केली. मात्र कार्यवाही शून्य आहे. एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण राहील, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र हरडे यांनी उपस्थित केला. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

268 विद्यार्थी अन्‌ सहा खोल्या, ही आहेत पटसंख्या कमी होण्याची कारणे...  नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक शाळांमधील वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उत्तम सोय नाही. हिंगणा तालुक्‍यातील निलडोह येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 268 विद्यार्थी असताना वर्गखोल्या केवळ सहा आहेत. यातील चार वर्गखोल्या गळक्‍या आहेत. शिक्षण विभागाचे याकडे लक्ष नाही. जिल्हा परिषदांच्या शाळांचा दर्जा उंचावणार कसा, असा सवाल यानिमित्त उपस्थित होतो.  निलडोह येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीत 268 विद्यार्थी मराठी व हिंदी माध्यमातून शिक्षण घेतात. तर मुख्याध्यापकांसह शिक्षकांची 12 पदे मंजूर आहे. मात्र, त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुठे शिकवावे, हा प्रश्‍न आहे. जिल्हा परिषदेच्या इतर शाळांच्या तुलनेत येथील स्थिती भक्कम असताना प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होते. लाखो रुपये खर्चून शासनाने शाळेला विज्ञान प्रयोगशाळेकरिता उपकरणे दिली. मात्र, तेही ठेवायला जागा नसल्याचे चित्र आहे.  एकेकाला ड्युटीवरून हाकलून देईन; मला समजता काय, अशी धमकी देणारा 'तो' आहे तरी कोण, वाचा...   त्या सहा खोल्यातच मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्याचे दिव्य पार पाडले जाते. शाळेत 13 वर्गखोल्यांचे बांधकाम 1980-81 चे आहे. त्यातील सात वर्गखोल्या जीर्ण झाल्याने तोडण्याचे आदेश शाळेला प्राप्त झाले. त्यापैकी तीन वर्गखोल्या पाडण्यात आल्या. ज्या तीन वर्गखोल्या पाडण्यात आल्या. त्या जागेवर माध्यमिक शाळेसाठी इमारत उभारण्यात आली. कोरोनामुळे शाळा बंद आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना पाण्यात शिक्षण घ्यावे लागले असते. शिक्षण सभापती भारती पाटील यांच्यासह शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांनी शाळेला भेट दिली. परंतु, त्यानंतरही वर्गखोल्यासंदर्भात कुठलीही कारवाई झाली नाही.    दुर्घटनेस जबाबदार कोण?  शाळेत हिंदी व मराठी माध्यम असल्याने येथे 14 खोल्यांची गरज आहे. त्यात एक विज्ञान कक्ष, संगणक कक्ष व मुख्याध्यापकांचे कार्यालय आवश्‍यक आहे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापतींच्या भेटीदरम्यान वर्गखोल्यांची मागणी केली. मात्र कार्यवाही शून्य आहे. एखादी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण राहील, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र हरडे यांनी उपस्थित केला.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NUjG7Q
Read More
घरबसल्याच आता मिळवा प्रॉपर्टी कार्ड 

पुणे - डिजिटल स्वाक्षरी असलेल्या ऑनलाइन सातबारा उताऱ्यापाठोपाठ आता डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) घरबसल्या एका क्‍लिकवर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठीचे दर राज्य सरकारने निश्‍चित केले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीत 135 रुपये, नगरपालिकांच्या हद्दीत 90 रुपये, तर ग्रामीण हद्दीत 45 रुपये शुल्क भरून हे कार्ड काढता येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून ई-फेरफार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत ऑनलाइन डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी पंधरा रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहिली नाही. भूमी अभिलेख विभागाच्या प्रकल्पाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, गेल्या काही महिन्यांत काही लाख लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
त्यापाठोपाठ प्रॉपर्टी कार्डही ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता. त्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील प्रॉपर्टी कार्डच्या संगणकीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे एका क्‍लिकवर प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहे. मात्र त्यासाठीचे दर राज्य सरकारने निश्‍चित केले नव्हते. नुकतेच हे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या महसूल विभागाचे सहसचिव डॉ. संतोष भोगले यांनी या बाबतचा आदेश काढला आहे. त्यामुळे हे शुल्क भरून नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड आता घरबसल्या मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. 

डिजिटल प्रॉपर्टी कार्डसाठीचे दर 
महापालिका हद्द नगरपालिका हद्द ग्रामीण भागासाठी 
135 रुपये 90 रुपये 45 

राज्यात 50 लाख कार्ड 
राज्यात महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण हद्दीत मिळून सुमारे 50 लाख प्रॉपर्टी कार्ड आहेत. तसेच दोन हजारांपेक्षा जास्त वस्ती असलेल्या गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ते देखील ऑनलाइन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

घरबसल्याच आता मिळवा प्रॉपर्टी कार्ड  पुणे - डिजिटल स्वाक्षरी असलेल्या ऑनलाइन सातबारा उताऱ्यापाठोपाठ आता डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) घरबसल्या एका क्‍लिकवर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठीचे दर राज्य सरकारने निश्‍चित केले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीत 135 रुपये, नगरपालिकांच्या हद्दीत 90 रुपये, तर ग्रामीण हद्दीत 45 रुपये शुल्क भरून हे कार्ड काढता येणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून ई-फेरफार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत ऑनलाइन डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी पंधरा रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहिली नाही. भूमी अभिलेख विभागाच्या प्रकल्पाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, गेल्या काही महिन्यांत काही लाख लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   त्यापाठोपाठ प्रॉपर्टी कार्डही ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता. त्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील प्रॉपर्टी कार्डच्या संगणकीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे एका क्‍लिकवर प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहे. मात्र त्यासाठीचे दर राज्य सरकारने निश्‍चित केले नव्हते. नुकतेच हे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या महसूल विभागाचे सहसचिव डॉ. संतोष भोगले यांनी या बाबतचा आदेश काढला आहे. त्यामुळे हे शुल्क भरून नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड आता घरबसल्या मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही.  डिजिटल प्रॉपर्टी कार्डसाठीचे दर  महापालिका हद्द नगरपालिका हद्द ग्रामीण भागासाठी  135 रुपये 90 रुपये 45  राज्यात 50 लाख कार्ड  राज्यात महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण हद्दीत मिळून सुमारे 50 लाख प्रॉपर्टी कार्ड आहेत. तसेच दोन हजारांपेक्षा जास्त वस्ती असलेल्या गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ते देखील ऑनलाइन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z33CXP
Read More
माहेराच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी, पहिली आषाढीही सासरीच... 

अमरावती : उन्हाचा सुट्यांचा काळ असल्याने या दिवसांत मोठ्या प्रमाणात लग्नकार्य उरकले जातात. यंदा कोरोनामुळे बऱ्याच जणांना लग्नाचा मुहूर्त साधता आला नाही. तरी पाच-पन्नास वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी विवाह पार पडले. उन्हाळ्यात लग्न होऊन सासरी गेलेल्या नवविवाहितेला पावसाळा सुरू होताच माहेरचे वेध लागतात. पावसाच्या सरींसोबतच तिचे मन माहेरच्या वाटेवर लागते. आषाढ महिना उजाडताच पुढचे दहा दिवस कसे जातात, याचाच विचार तिच्या मनात असतो. कारण आई-बाब, भाऊ बहिणींच्या आठवणी तिच्या मनात रुंजी घालत असतात. परंतु यंदा माहेरवाशीणीची ही वाट अडली आणि पहिला आषाढसणही तिला सासरीच साजरा करावा लागला. त्याची कारणेही आहेत... 

सासुरवाशिणींची पहिल्या आषाढीला माहेरी परतण्याची वाट यंदा कोरोनाने रोखली. सासरी असलेल्या मुलींना यंदा पहिल्या सणालाही माहेरी येता आले नाही. त्यामुळे सासरीच माहेर अनुभवत पहिला सण साजरा करावा लागला. विवाहानंतर सासरी असलेल्या मुलींना आषाढातील पहिल्या आषाढी पौर्णिमेला माहेरी आणण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मातील हा पहिला सण मुली माहेरी करतात. जावयालाही त्यासाठी निमंत्रण दिले जाते व मुलीला साडीचोळीसह जावयाला भेटवस्तू देत सत्कार केला जातो. त्यानंतरच पाठवणी होते. पहिल्या सणाला माहेरी जाण्याची ओढ प्रत्येक विवाहितेला राहत असल्याने तिच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. 

हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य
 

मात्र, यंदा कोरोनाने त्यावर पाणी फेरले. माहेरी आल्यावर मन मोकळे करण्याची, सासरी कशी वागणूक मिळते, त्याचे रसभरीत वर्णन करण्याची व तिथे कसे वागायचे ही शिकवण मिळण्याची संधी कोरोनाने हिरावून घेतली. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवास करणे कठीण झाले आहे. महत्प्रयासाने गावी परतले तर आधी वैद्यकीय चाचणी व विलगीकरणास (क्वारंटाइन) सामोरे जावे लागते. पहिल्या सणाला येण्याचा आनंद यामुळे हिरावला जाण्याची भीती असल्याने अनेकांनी मुलींना माहेरी आणणे टाळले तर काहींनी माहेरी येणार नाही, असा निरोप देत माहेरच्यांना चिंतामुक्त केले. 

यंदा विवाहही मास्क घालून कोरोनाचे नियम पाळूनच झाले. वऱ्हाडीसुद्धा निमंत्रित करता आले नाही. अनेकांना विवाहाच्या तारखा रद्द कराव्या लागल्या. दरवर्षीच्या तुलनेत यंदा विवाह कमी झाले. जे झाले त्यांना आदर्श विवाहाचा दर्जा दिला गेला. महामारीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध अधिक असल्याने सासूरवाशीणींना माहेरी परतणे कठीण झाले व गेल्या अनेक वर्षांतील पहिल्या सणाला विवाहिता माहेरी येऊ शकल्या नाही. माहेरही त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत राहले व त्या येणार नाहीत ही हुरहूर मनाला लागून राहिली. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

माहेराच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी, पहिली आषाढीही सासरीच...  अमरावती : उन्हाचा सुट्यांचा काळ असल्याने या दिवसांत मोठ्या प्रमाणात लग्नकार्य उरकले जातात. यंदा कोरोनामुळे बऱ्याच जणांना लग्नाचा मुहूर्त साधता आला नाही. तरी पाच-पन्नास वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी विवाह पार पडले. उन्हाळ्यात लग्न होऊन सासरी गेलेल्या नवविवाहितेला पावसाळा सुरू होताच माहेरचे वेध लागतात. पावसाच्या सरींसोबतच तिचे मन माहेरच्या वाटेवर लागते. आषाढ महिना उजाडताच पुढचे दहा दिवस कसे जातात, याचाच विचार तिच्या मनात असतो. कारण आई-बाब, भाऊ बहिणींच्या आठवणी तिच्या मनात रुंजी घालत असतात. परंतु यंदा माहेरवाशीणीची ही वाट अडली आणि पहिला आषाढसणही तिला सासरीच साजरा करावा लागला. त्याची कारणेही आहेत...  सासुरवाशिणींची पहिल्या आषाढीला माहेरी परतण्याची वाट यंदा कोरोनाने रोखली. सासरी असलेल्या मुलींना यंदा पहिल्या सणालाही माहेरी येता आले नाही. त्यामुळे सासरीच माहेर अनुभवत पहिला सण साजरा करावा लागला. विवाहानंतर सासरी असलेल्या मुलींना आषाढातील पहिल्या आषाढी पौर्णिमेला माहेरी आणण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मातील हा पहिला सण मुली माहेरी करतात. जावयालाही त्यासाठी निमंत्रण दिले जाते व मुलीला साडीचोळीसह जावयाला भेटवस्तू देत सत्कार केला जातो. त्यानंतरच पाठवणी होते. पहिल्या सणाला माहेरी जाण्याची ओढ प्रत्येक विवाहितेला राहत असल्याने तिच्या मनात प्रचंड उत्सुकता असते.  हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य   मात्र, यंदा कोरोनाने त्यावर पाणी फेरले. माहेरी आल्यावर मन मोकळे करण्याची, सासरी कशी वागणूक मिळते, त्याचे रसभरीत वर्णन करण्याची व तिथे कसे वागायचे ही शिकवण मिळण्याची संधी कोरोनाने हिरावून घेतली. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर प्रवास करणे कठीण झाले आहे. महत्प्रयासाने गावी परतले तर आधी वैद्यकीय चाचणी व विलगीकरणास (क्वारंटाइन) सामोरे जावे लागते. पहिल्या सणाला येण्याचा आनंद यामुळे हिरावला जाण्याची भीती असल्याने अनेकांनी मुलींना माहेरी आणणे टाळले तर काहींनी माहेरी येणार नाही, असा निरोप देत माहेरच्यांना चिंतामुक्त केले.  यंदा विवाहही मास्क घालून कोरोनाचे नियम पाळूनच झाले. वऱ्हाडीसुद्धा निमंत्रित करता आले नाही. अनेकांना विवाहाच्या तारखा रद्द कराव्या लागल्या. दरवर्षीच्या तुलनेत यंदा विवाह कमी झाले. जे झाले त्यांना आदर्श विवाहाचा दर्जा दिला गेला. महामारीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंध अधिक असल्याने सासूरवाशीणींना माहेरी परतणे कठीण झाले व गेल्या अनेक वर्षांतील पहिल्या सणाला विवाहिता माहेरी येऊ शकल्या नाही. माहेरही त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत राहले व त्या येणार नाहीत ही हुरहूर मनाला लागून राहिली.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NXRpNN
Read More
विभागीय आयुक्त म्हणतायेत, दुकानदारांनो, नियम मोडल्यास दुकानांचे परवाने रद्द

पुणे - पुण्यात कोरोना आवाक्‍याबाहेर जात असल्याने आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांसह विनाकारण रस्त्यांवर उतरणाऱ्यांना धडा शिकविण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. लॉकडाउन शिथिलेतत वेळापत्रक ठरवून, सरसकट दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द होणार आहेत; तसेच हॉटेलसमोर ग्राहकांची गर्दी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मास्क न बांधता फिरणाऱ्यांचीही गय केली जाणार नाही. 

कोरोनाला अटकाव घालण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नवा आदेश काढून, बेजबाबदार व्यापारी, नागरिकांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. एका बाजारपेठांमधील त्या-त्या रस्त्यांवरील दुकाने दिवसाआड सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तरीही बहुतांश दुकाने उघडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर कठोर उपाययोजना राबवली जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

शहरातील बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना करताना चौकात गप्पा मारणे, पत्ते खेळणे, बाजारात गर्दी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा आदेश दिला आहे. या भागांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींवर जबाबदारी सोपविण्याचा सल्ला म्हैसेकर यांनी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाहनांची तपासणी होणार 
सध्या मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर येत असल्याकडे म्हैसेकर यांनी लक्ष वेधले आहे. बाधित क्षेत्रासह सर्व भागांत ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. त्याशिवाय, लग्ना समारंभात गर्दी झाल्यास संबंधित कार्यालयाचाही परवाना रद्द होणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विभागीय आयुक्त म्हणतायेत, दुकानदारांनो, नियम मोडल्यास दुकानांचे परवाने रद्द पुणे - पुण्यात कोरोना आवाक्‍याबाहेर जात असल्याने आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांसह विनाकारण रस्त्यांवर उतरणाऱ्यांना धडा शिकविण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. लॉकडाउन शिथिलेतत वेळापत्रक ठरवून, सरसकट दुकाने उघडणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द होणार आहेत; तसेच हॉटेलसमोर ग्राहकांची गर्दी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मास्क न बांधता फिरणाऱ्यांचीही गय केली जाणार नाही.  कोरोनाला अटकाव घालण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नवा आदेश काढून, बेजबाबदार व्यापारी, नागरिकांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. एका बाजारपेठांमधील त्या-त्या रस्त्यांवरील दुकाने दिवसाआड सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. तरीही बहुतांश दुकाने उघडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर कठोर उपाययोजना राबवली जाणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    शहरातील बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना करताना चौकात गप्पा मारणे, पत्ते खेळणे, बाजारात गर्दी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा आदेश दिला आहे. या भागांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींवर जबाबदारी सोपविण्याचा सल्ला म्हैसेकर यांनी महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वाहनांची तपासणी होणार  सध्या मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यांवर येत असल्याकडे म्हैसेकर यांनी लक्ष वेधले आहे. बाधित क्षेत्रासह सर्व भागांत ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. त्याशिवाय, लग्ना समारंभात गर्दी झाल्यास संबंधित कार्यालयाचाही परवाना रद्द होणार आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eXN6hg
Read More
इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो ! प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव

नागपूर : बॅडमिंटन, टेबल टेनिस, शुटिंग, बुद्धिबळ, कुस्ती, मुष्टियुद्‌ध, ज्युदो-कराटे इत्यादी इनडोअर गेम्सवर शेकडो प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र लॉकडाउनमुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून शहरातील सर्वच इनडोअर सभागृह पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे प्रशिक्षकांची कमाई तर बुडालीच, शिवाय खेळाडूही आवश्‍यक सरावापासून वंचित आहेत. प्रशासनाने अटींवर सभागृह खुले करावीत, अशी मागणी खेळाडू व प्रशिक्षकांनी केली आहे. 

उपराजधानीत मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‌यापीठाच्या सुभेदार सभागृह, महानगरपालिकेचे विवेकानंदनगर सभागृह, धनवटे नॅशनल महाविद्‌यालयाचे सभागृह, वायएमसीए, स्वावलंबीनगर आणि शंकरनगर येथील विदर्भ ब्रिज असोसिएशनच्या सभागृहात बॅडमिंटनचा सराव चालतो. येथील प्रशिक्षण केंद्रांवर दररोज सकाळ सायंकाळी शेकडो युवा खेळाडू सराव करतात. यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवंलबून आहे. मात्र कोरोनामुळे सराव पूर्णपणे बंद असल्यामुळे उन्हाळी शिबिरांमध्ये एका पैशाचीही कमा झाली नाही. बहूतांश प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह प्रशिक्षणावर चालतो. त्यांनी आतापर्यंत कसेबसे दिवस ढकलले. मात्र आता एकेक दिवस कठिण जाताहेत. सरावाअभावी खेळाडूंमध्येही चिंता व नैराश्‍येचे वातावरण आहे. 

 

आयसीसीतील मनोहर अध्यायाला पूर्णविराम, काय आहे वाचा

 

बॅडमिंटनपटूंप्रमाणेच टेबल टेनिस, शुटिंग, बुद्धिबळ, कुस्ती, मुष्टियुद्‌ध, ज्युदो-कराटे या इनडोअर खेळाडूंची जवळपास तशीच अवस्था आहे. हे खेळाडूही गेल्या तीन- चार महिन्यांपासून आपापल्या घरांमध्ये कोंडले गेले आहेत. लवकरच शाळा व महाविद्‌यालये सुरू होणार असून, त्यानंतर लगेच क्रीडा स्पर्धा आरंभ होणार आहे. स्पर्धेपूर्वी सराव गरजेचा असल्याने खेळाडू प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे इनडोअर सभागृह ताबडतोब खुले करून अटींसह सरावाला परवानगी द्‌यावी, अशी खेळाडूंसह प्रशिक्षकांचीही मागणी आहे. यासंदर्भात ते लवकरच जिल्हाधिकारी व मनपा आयुक्‍तांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडणार आहेत. वरील इनडोअर खेळांसह क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्‌डी, खो-खो, फुटबॉल, जलतरण या आऊटडोअर खेळांचाही सराव सध्या बंद आहे. 

 

"गेल्या अनेक वर्षांपासून मी मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात युवा बॅडमिंटनपटूंना धडे देतो. मात्र लॉकडाउन सुरू झाल्यापासून सराव पूर्णपणे बंद आहे. सरावावरच माझा उदरनिर्वाह अवलंबून आहे. केलेली कमाई तीन महिन्यांत खर्च झाली. आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या भल्यासाठी प्रशासनाने सरावाला हिरवी झेंडी दाखवावी, अशी आमची मागणी आहे.' 
-अमित राऊत, बॅडमिंटन प्रशिक्षक 

"लॉकडाउनमुळे आमचे स्वावलंबीनगर व अजनी येथील नेमबाजी प्रशिक्षण केंद्रही सध्या बंद आहे. त्यामुळे खेळाडूंसह आमचीही अडचण होत आहे. नेमबाजीमध्ये खेळाडू दूर उभे राहात असल्यामुळे एकमेकांना स्पर्श होत नाही. त्यामुळे आपोआपच "सोशल डिस्टन्सिंग' पाळले जाते. त्यामुळे प्रशासनाने सरावाला परवानगी दिल्यास आम्ही आवश्‍यक काळजी घेण्यास तयार आहे.' 
-अनिल पांडे, नेमबाजी प्रशिक्षक 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो ! प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव नागपूर : बॅडमिंटन, टेबल टेनिस, शुटिंग, बुद्धिबळ, कुस्ती, मुष्टियुद्‌ध, ज्युदो-कराटे इत्यादी इनडोअर गेम्सवर शेकडो प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र लॉकडाउनमुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून शहरातील सर्वच इनडोअर सभागृह पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे प्रशिक्षकांची कमाई तर बुडालीच, शिवाय खेळाडूही आवश्‍यक सरावापासून वंचित आहेत. प्रशासनाने अटींवर सभागृह खुले करावीत, अशी मागणी खेळाडू व प्रशिक्षकांनी केली आहे.  उपराजधानीत मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‌यापीठाच्या सुभेदार सभागृह, महानगरपालिकेचे विवेकानंदनगर सभागृह, धनवटे नॅशनल महाविद्‌यालयाचे सभागृह, वायएमसीए, स्वावलंबीनगर आणि शंकरनगर येथील विदर्भ ब्रिज असोसिएशनच्या सभागृहात बॅडमिंटनचा सराव चालतो. येथील प्रशिक्षण केंद्रांवर दररोज सकाळ सायंकाळी शेकडो युवा खेळाडू सराव करतात. यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवंलबून आहे. मात्र कोरोनामुळे सराव पूर्णपणे बंद असल्यामुळे उन्हाळी शिबिरांमध्ये एका पैशाचीही कमा झाली नाही. बहूतांश प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह प्रशिक्षणावर चालतो. त्यांनी आतापर्यंत कसेबसे दिवस ढकलले. मात्र आता एकेक दिवस कठिण जाताहेत. सरावाअभावी खेळाडूंमध्येही चिंता व नैराश्‍येचे वातावरण आहे.    आयसीसीतील मनोहर अध्यायाला पूर्णविराम, काय आहे वाचा   बॅडमिंटनपटूंप्रमाणेच टेबल टेनिस, शुटिंग, बुद्धिबळ, कुस्ती, मुष्टियुद्‌ध, ज्युदो-कराटे या इनडोअर खेळाडूंची जवळपास तशीच अवस्था आहे. हे खेळाडूही गेल्या तीन- चार महिन्यांपासून आपापल्या घरांमध्ये कोंडले गेले आहेत. लवकरच शाळा व महाविद्‌यालये सुरू होणार असून, त्यानंतर लगेच क्रीडा स्पर्धा आरंभ होणार आहे. स्पर्धेपूर्वी सराव गरजेचा असल्याने खेळाडू प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे इनडोअर सभागृह ताबडतोब खुले करून अटींसह सरावाला परवानगी द्‌यावी, अशी खेळाडूंसह प्रशिक्षकांचीही मागणी आहे. यासंदर्भात ते लवकरच जिल्हाधिकारी व मनपा आयुक्‍तांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडणार आहेत. वरील इनडोअर खेळांसह क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्‌डी, खो-खो, फुटबॉल, जलतरण या आऊटडोअर खेळांचाही सराव सध्या बंद आहे.    "गेल्या अनेक वर्षांपासून मी मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात युवा बॅडमिंटनपटूंना धडे देतो. मात्र लॉकडाउन सुरू झाल्यापासून सराव पूर्णपणे बंद आहे. सरावावरच माझा उदरनिर्वाह अवलंबून आहे. केलेली कमाई तीन महिन्यांत खर्च झाली. आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या भल्यासाठी प्रशासनाने सरावाला हिरवी झेंडी दाखवावी, अशी आमची मागणी आहे.'  -अमित राऊत, बॅडमिंटन प्रशिक्षक  "लॉकडाउनमुळे आमचे स्वावलंबीनगर व अजनी येथील नेमबाजी प्रशिक्षण केंद्रही सध्या बंद आहे. त्यामुळे खेळाडूंसह आमचीही अडचण होत आहे. नेमबाजीमध्ये खेळाडू दूर उभे राहात असल्यामुळे एकमेकांना स्पर्श होत नाही. त्यामुळे आपोआपच "सोशल डिस्टन्सिंग' पाळले जाते. त्यामुळे प्रशासनाने सरावाला परवानगी दिल्यास आम्ही आवश्‍यक काळजी घेण्यास तयार आहे.'  -अनिल पांडे, नेमबाजी प्रशिक्षक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gtmHIt
Read More

Saturday, July 4, 2020

स्मार्ट पार्किंगची कुणी लावली वाट?

नागपूर : राज्यातील पहिल्या स्मार्ट पार्किंग प्रकल्पाला उदासिनतेचे ग्रहण लागले असून महापालिका वाहतूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे चांगल्या प्रकल्पाची 'वाट' लागली आहे. प्रकल्प पूर्ण होऊन दोन वर्षे झाली. परंतु आयुक्त व पदाधिकाऱ्यांतील वादाने पार्किंगची अडचण दूर करणाऱ्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले असून चांगल्या सुविधेपासून नागपूरकरांना वंचित राहावे लागत आहे. 

रामदासपेठेतील वर्दळीच्या सेंट्रल बाजार रोडवर काचीपुरा चौक ते हॉटेल तुली इम्पेरिअलपर्यंतच्या पाचशे मीटर अंतरात स्मार्ट पार्किंग तयार करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पहिली स्मार्ट पार्किंग नागपुरात व्हावी, या हेतूने 140 कोटींचा स्मार्ट ऍन्ड सेफ सिटी प्रकल्प मंजूर केला होता. यात पार्किंगसह स्मार्ट स्ट्रिटचाही समावेश होता.

नागपूर स्मार्ट सिटी ऍन्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने स्मार्ट ऍन्ड सेफ सिटीअंतर्गत एलऍन्डटी कंपनीला स्मार्ट पार्किंग तयार करण्याचे काम देण्यात आले होते. सीटीटीव्ही कॅमेरे, पार्किंगस्थळी सेंसर, प्रवेशद्वारावर संगणकीय प्रणालीयुक्त सुविधा या पार्किंगच्या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या एसपीव्ही कंपनी हा प्रकल्प महापालिकेच्या वाहतूक विभागाकडे सुपूर्द केला.

वाहतूक विभागाने स्मार्ट पार्किंगच्या संचालनासाठी एका एजन्सीची नियुक्ती करणे अपेक्षित होते. परंतु दोन वर्षे होत असून पालिकेच्या वाहतुक विभागाने या प्रकल्पाचे बारा वाजवल्याचे चित्र आहे. आयुक्त तुकाराम मुंढे आल्यानंतर पार्किंग सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु स्मार्ट सिटीवरून सत्ताधारी व आयुक्त यांच्यातील वादाने शहरातील विकास कामे ठप्प झालीच, शिवाय एका चांगल्या प्रकल्पाचीही वाताहत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सत्ताधारी आता कसे घेरणार तुकाराम मुंढेंना?मनपाची सभा आता होणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे

एकीकडे महापालिकेला उत्पन्न नसल्याने विकास कामांच्या फाईल्स आयुक्तांनी रोखल्या आहेत. मात्र, त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याची क्षमता असलेल्या प्रकल्प सुरू करण्याकडे आयुक्तांचेही दुर्लक्ष होत आहे. 

अतिक्रमणाचा धोका 
सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने स्मार्ट पार्किंगमधील अतिक्रमण गायब झाले. परंतु लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे पुन्हा दुकानदारांचे अतिक्रमण होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या आगमनापूर्वी स्मार्ट पार्किंगच्या वसुलीसाठी तयार करण्यात आलेले स्टॉल येथील चहाटपरीवाल्यांसाठी सोयीचे झाले होते. भविष्यातही अशीच स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. 

पालिकेच्या उत्पन्नालाही फटका 
स्मार्ट पार्किंगमध्ये 85 कार पार्किंगसाठी जागा निश्‍चित करण्यात आल्याचे पालिकेतील सुत्राने नमुद केले. एवढेच नव्हे दुचाकी वाहनांनाही पार्किंगसाठी स्थान देण्यात येणार आहे. येथे पार्किंगसाठी तासाप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामुळे आर्थिक संकटातील पालिकेला दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. परंतु पार्किंग सुरू न झाल्याने उत्पन्नालाही फटका बसत आहे. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्मार्ट पार्किंगची कुणी लावली वाट? नागपूर : राज्यातील पहिल्या स्मार्ट पार्किंग प्रकल्पाला उदासिनतेचे ग्रहण लागले असून महापालिका वाहतूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे चांगल्या प्रकल्पाची 'वाट' लागली आहे. प्रकल्प पूर्ण होऊन दोन वर्षे झाली. परंतु आयुक्त व पदाधिकाऱ्यांतील वादाने पार्किंगची अडचण दूर करणाऱ्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले असून चांगल्या सुविधेपासून नागपूरकरांना वंचित राहावे लागत आहे.  रामदासपेठेतील वर्दळीच्या सेंट्रल बाजार रोडवर काचीपुरा चौक ते हॉटेल तुली इम्पेरिअलपर्यंतच्या पाचशे मीटर अंतरात स्मार्ट पार्किंग तयार करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पहिली स्मार्ट पार्किंग नागपुरात व्हावी, या हेतूने 140 कोटींचा स्मार्ट ऍन्ड सेफ सिटी प्रकल्प मंजूर केला होता. यात पार्किंगसह स्मार्ट स्ट्रिटचाही समावेश होता. नागपूर स्मार्ट सिटी ऍन्ड डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने स्मार्ट ऍन्ड सेफ सिटीअंतर्गत एलऍन्डटी कंपनीला स्मार्ट पार्किंग तयार करण्याचे काम देण्यात आले होते. सीटीटीव्ही कॅमेरे, पार्किंगस्थळी सेंसर, प्रवेशद्वारावर संगणकीय प्रणालीयुक्त सुविधा या पार्किंगच्या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या एसपीव्ही कंपनी हा प्रकल्प महापालिकेच्या वाहतूक विभागाकडे सुपूर्द केला. वाहतूक विभागाने स्मार्ट पार्किंगच्या संचालनासाठी एका एजन्सीची नियुक्ती करणे अपेक्षित होते. परंतु दोन वर्षे होत असून पालिकेच्या वाहतुक विभागाने या प्रकल्पाचे बारा वाजवल्याचे चित्र आहे. आयुक्त तुकाराम मुंढे आल्यानंतर पार्किंग सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु स्मार्ट सिटीवरून सत्ताधारी व आयुक्त यांच्यातील वादाने शहरातील विकास कामे ठप्प झालीच, शिवाय एका चांगल्या प्रकल्पाचीही वाताहत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आता कसे घेरणार तुकाराम मुंढेंना?मनपाची सभा आता होणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकीकडे महापालिकेला उत्पन्न नसल्याने विकास कामांच्या फाईल्स आयुक्तांनी रोखल्या आहेत. मात्र, त्याचवेळी महापालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याची क्षमता असलेल्या प्रकल्प सुरू करण्याकडे आयुक्तांचेही दुर्लक्ष होत आहे.  अतिक्रमणाचा धोका  सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने स्मार्ट पार्किंगमधील अतिक्रमण गायब झाले. परंतु लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे पुन्हा दुकानदारांचे अतिक्रमण होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या आगमनापूर्वी स्मार्ट पार्किंगच्या वसुलीसाठी तयार करण्यात आलेले स्टॉल येथील चहाटपरीवाल्यांसाठी सोयीचे झाले होते. भविष्यातही अशीच स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.  पालिकेच्या उत्पन्नालाही फटका  स्मार्ट पार्किंगमध्ये 85 कार पार्किंगसाठी जागा निश्‍चित करण्यात आल्याचे पालिकेतील सुत्राने नमुद केले. एवढेच नव्हे दुचाकी वाहनांनाही पार्किंगसाठी स्थान देण्यात येणार आहे. येथे पार्किंगसाठी तासाप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. या शुल्कामुळे आर्थिक संकटातील पालिकेला दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. परंतु पार्किंग सुरू न झाल्याने उत्पन्नालाही फटका बसत आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2C9nteJ
Read More
सावधान! तुमच्या आहारातील कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक

मुंबई - काही लोक त्यांच्या आहारावर जास्त लक्ष देतात. ठरलेल्या डाएटनुसार त्यांचं खाणं पिणं सुरु असतं. मात्र तरीही अनेकदा कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती त्यांना नसते. फळे, दही, दूध, सॅलड, डाळ, मटण यातून पोषक तत्वे मिळतात पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्यासोबत योग्य गोष्टी खाता. एकावेळी अनेक पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. आयुर्वेदात कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती मिळते. थंड आणि गरम, गोड आणि खारट असं मिश्रण खाणं टाळावं. 

जेवणाच्या वेळी अनेकांना दही खाण्याची सवय असते. दह्यासोबत आंबट फळं खाऊ नयेत. दही आणि फळामध्ये वेगवेगळ्या एंजाइम असतात .यामुळे पचनास जड जातं. यासाठी दोन्ही एकत्र खाण्याचा सल्ला दिला जात नाही. दही गरम किंवा उष्णता असलेल्या पदार्थांसोबत खाऊ नये. माशामध्ये उष्णता असते यासाठी मासे दह्यासोबत खाऊ नयेत. पराठे, पूरी यासारख्या तळलेल्या गोष्टींसोबतही दही खाणं चांगलं नसतं. याशिवाय दही आणि खजूर किंवा चिकनसुद्धा एकत्र खाऊ नये.  

हे वाचा - हेल्दी रेसिपी’मध्ये देखील कोहळ्याचे बोंडे बनणार

दुधासोबत काही पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. दूध आणि खारट पदार्थ एकत्र खाणं टाळावं. तसंच दुधाच्या चहासोबतही असे पदार्थ खाऊ नयेत. मिठ मिसळल्याने मिल्क प्रोटीन घट्ट होतं आणि त्यात पोषण कमी होतं. दुधासोबत फळेही खाऊ नयेत. दुधात फळे मिसळून खाल्ल्याने त्यातील कॅल्शिअम फळांच्या एंजाइमला शोषून घेते. यातून शरीराला फळांमधून मिळणारी पोषक द्रव्ये मिळत नाहीत.

शिवाय उडीद दाळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. हिरव्या भाज्या किंवा मूळा खाल्यानंतरही दुध खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अंडी, मटण आणि पनीर यासारख्या पदार्थांच्या सेवनानंतर दूध पिऊ नये. हे एकत्र खाल्ल्यास पचनशक्ती बिघडू शकते.

हे वाचा - गाढवाच्या दुधापासून बनतं जगातलं सर्वात महागडं पनीर, किंमत वाचून चकीत व्हाल

काही फळेसुद्धा एकत्र खाल्ल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो. यामध्ये संत्री आणि केळे एकत्र खाऊ नये. कारण आंबट फळे गोड फळांमधून निघणाऱ्या साखरेमध्ये अडथळा निर्माण करतात यामुळे पचनाला त्रास होऊ शकतो. 

मध कधीच गरम करून खाऊ नये. ताप वाढत असेल तर मधाचे सेवन टाळावे. खाल्ल्याश शरिरात पित्ताचे प्रमाण वाढते. मध आणि लोणी किंवा तूप एकत्र खाऊ नये. इतकंच काय मधात पाणी घालून पिणेही हानीकारक ठरण्याची शकता असते. 

हे वाचा - पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत!

मासा आणि काळी मिर्ची एकत्र खाऊ नये. 

तिळ आणि पालक यांचे एकत्र सेवन डायरियाला कारणीभूत ठरते. 

तांब्याच्या भांड्यात 10 दिवसापर्यंत ठेवलेलं तूप खाऊ नये.

पिवळ्या छत्रीचे मशरूम मोहरीच्या तेलातून खाऊ नयेय

थंड पाण्यासोत तूप, तेल, पेरू, जांभूळ, भूईमुंगाच्या शेंगा खाऊ नयेत. 

आयुर्वेदात जरी थंड गरम पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत सांगण्यात आलं असलं तरी मॉडर्न सायन्स बॅलन्स असलेलं डाएट या गोष्टी मान्य करेलच असं नाही. जर तुम्ही एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशा पदार्थांचे सेवन करावे. आपल्या आहारात पचनशक्ती बिघडेल अशा गोष्टींचा समावेश असणार नाही याची काळजी घ्यावी. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सावधान! तुमच्या आहारातील कॉम्बिनेशन ठरू शकतं घातक मुंबई - काही लोक त्यांच्या आहारावर जास्त लक्ष देतात. ठरलेल्या डाएटनुसार त्यांचं खाणं पिणं सुरु असतं. मात्र तरीही अनेकदा कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती त्यांना नसते. फळे, दही, दूध, सॅलड, डाळ, मटण यातून पोषक तत्वे मिळतात पण तेव्हाच जेव्हा तुम्ही त्यासोबत योग्य गोष्टी खाता. एकावेळी अनेक पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. आयुर्वेदात कोणत्या पदार्थासोबत काय खाऊ नये याची माहिती मिळते. थंड आणि गरम, गोड आणि खारट असं मिश्रण खाणं टाळावं.  जेवणाच्या वेळी अनेकांना दही खाण्याची सवय असते. दह्यासोबत आंबट फळं खाऊ नयेत. दही आणि फळामध्ये वेगवेगळ्या एंजाइम असतात .यामुळे पचनास जड जातं. यासाठी दोन्ही एकत्र खाण्याचा सल्ला दिला जात नाही. दही गरम किंवा उष्णता असलेल्या पदार्थांसोबत खाऊ नये. माशामध्ये उष्णता असते यासाठी मासे दह्यासोबत खाऊ नयेत. पराठे, पूरी यासारख्या तळलेल्या गोष्टींसोबतही दही खाणं चांगलं नसतं. याशिवाय दही आणि खजूर किंवा चिकनसुद्धा एकत्र खाऊ नये.   हे वाचा - हेल्दी रेसिपी’मध्ये देखील कोहळ्याचे बोंडे बनणार दुधासोबत काही पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. दूध आणि खारट पदार्थ एकत्र खाणं टाळावं. तसंच दुधाच्या चहासोबतही असे पदार्थ खाऊ नयेत. मिठ मिसळल्याने मिल्क प्रोटीन घट्ट होतं आणि त्यात पोषण कमी होतं. दुधासोबत फळेही खाऊ नयेत. दुधात फळे मिसळून खाल्ल्याने त्यातील कॅल्शिअम फळांच्या एंजाइमला शोषून घेते. यातून शरीराला फळांमधून मिळणारी पोषक द्रव्ये मिळत नाहीत. शिवाय उडीद दाळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. हिरव्या भाज्या किंवा मूळा खाल्यानंतरही दुध खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अंडी, मटण आणि पनीर यासारख्या पदार्थांच्या सेवनानंतर दूध पिऊ नये. हे एकत्र खाल्ल्यास पचनशक्ती बिघडू शकते. हे वाचा - गाढवाच्या दुधापासून बनतं जगातलं सर्वात महागडं पनीर, किंमत वाचून चकीत व्हाल काही फळेसुद्धा एकत्र खाल्ल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो. यामध्ये संत्री आणि केळे एकत्र खाऊ नये. कारण आंबट फळे गोड फळांमधून निघणाऱ्या साखरेमध्ये अडथळा निर्माण करतात यामुळे पचनाला त्रास होऊ शकतो.  मध कधीच गरम करून खाऊ नये. ताप वाढत असेल तर मधाचे सेवन टाळावे. खाल्ल्याश शरिरात पित्ताचे प्रमाण वाढते. मध आणि लोणी किंवा तूप एकत्र खाऊ नये. इतकंच काय मधात पाणी घालून पिणेही हानीकारक ठरण्याची शकता असते.  हे वाचा - पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत! मासा आणि काळी मिर्ची एकत्र खाऊ नये.  तिळ आणि पालक यांचे एकत्र सेवन डायरियाला कारणीभूत ठरते.  तांब्याच्या भांड्यात 10 दिवसापर्यंत ठेवलेलं तूप खाऊ नये. पिवळ्या छत्रीचे मशरूम मोहरीच्या तेलातून खाऊ नयेय थंड पाण्यासोत तूप, तेल, पेरू, जांभूळ, भूईमुंगाच्या शेंगा खाऊ नयेत.  आयुर्वेदात जरी थंड गरम पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत सांगण्यात आलं असलं तरी मॉडर्न सायन्स बॅलन्स असलेलं डाएट या गोष्टी मान्य करेलच असं नाही. जर तुम्ही एखाद्या आजाराशी झुंज देत असाल तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अशा पदार्थांचे सेवन करावे. आपल्या आहारात पचनशक्ती बिघडेल अशा गोष्टींचा समावेश असणार नाही याची काळजी घ्यावी.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dZD8dW
Read More