इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो ! प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव नागपूर : बॅडमिंटन, टेबल टेनिस, शुटिंग, बुद्धिबळ, कुस्ती, मुष्टियुद्‌ध, ज्युदो-कराटे इत्यादी इनडोअर गेम्सवर शेकडो प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र लॉकडाउनमुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून शहरातील सर्वच इनडोअर सभागृह पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे प्रशिक्षकांची कमाई तर बुडालीच, शिवाय खेळाडूही आवश्‍यक सरावापासून वंचित आहेत. प्रशासनाने अटींवर सभागृह खुले करावीत, अशी मागणी खेळाडू व प्रशिक्षकांनी केली आहे.  उपराजधानीत मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‌यापीठाच्या सुभेदार सभागृह, महानगरपालिकेचे विवेकानंदनगर सभागृह, धनवटे नॅशनल महाविद्‌यालयाचे सभागृह, वायएमसीए, स्वावलंबीनगर आणि शंकरनगर येथील विदर्भ ब्रिज असोसिएशनच्या सभागृहात बॅडमिंटनचा सराव चालतो. येथील प्रशिक्षण केंद्रांवर दररोज सकाळ सायंकाळी शेकडो युवा खेळाडू सराव करतात. यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवंलबून आहे. मात्र कोरोनामुळे सराव पूर्णपणे बंद असल्यामुळे उन्हाळी शिबिरांमध्ये एका पैशाचीही कमा झाली नाही. बहूतांश प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह प्रशिक्षणावर चालतो. त्यांनी आतापर्यंत कसेबसे दिवस ढकलले. मात्र आता एकेक दिवस कठिण जाताहेत. सरावाअभावी खेळाडूंमध्येही चिंता व नैराश्‍येचे वातावरण आहे.    आयसीसीतील मनोहर अध्यायाला पूर्णविराम, काय आहे वाचा   बॅडमिंटनपटूंप्रमाणेच टेबल टेनिस, शुटिंग, बुद्धिबळ, कुस्ती, मुष्टियुद्‌ध, ज्युदो-कराटे या इनडोअर खेळाडूंची जवळपास तशीच अवस्था आहे. हे खेळाडूही गेल्या तीन- चार महिन्यांपासून आपापल्या घरांमध्ये कोंडले गेले आहेत. लवकरच शाळा व महाविद्‌यालये सुरू होणार असून, त्यानंतर लगेच क्रीडा स्पर्धा आरंभ होणार आहे. स्पर्धेपूर्वी सराव गरजेचा असल्याने खेळाडू प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे इनडोअर सभागृह ताबडतोब खुले करून अटींसह सरावाला परवानगी द्‌यावी, अशी खेळाडूंसह प्रशिक्षकांचीही मागणी आहे. यासंदर्भात ते लवकरच जिल्हाधिकारी व मनपा आयुक्‍तांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडणार आहेत. वरील इनडोअर खेळांसह क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्‌डी, खो-खो, फुटबॉल, जलतरण या आऊटडोअर खेळांचाही सराव सध्या बंद आहे.    "गेल्या अनेक वर्षांपासून मी मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात युवा बॅडमिंटनपटूंना धडे देतो. मात्र लॉकडाउन सुरू झाल्यापासून सराव पूर्णपणे बंद आहे. सरावावरच माझा उदरनिर्वाह अवलंबून आहे. केलेली कमाई तीन महिन्यांत खर्च झाली. आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या भल्यासाठी प्रशासनाने सरावाला हिरवी झेंडी दाखवावी, अशी आमची मागणी आहे.'  -अमित राऊत, बॅडमिंटन प्रशिक्षक  "लॉकडाउनमुळे आमचे स्वावलंबीनगर व अजनी येथील नेमबाजी प्रशिक्षण केंद्रही सध्या बंद आहे. त्यामुळे खेळाडूंसह आमचीही अडचण होत आहे. नेमबाजीमध्ये खेळाडू दूर उभे राहात असल्यामुळे एकमेकांना स्पर्श होत नाही. त्यामुळे आपोआपच "सोशल डिस्टन्सिंग' पाळले जाते. त्यामुळे प्रशासनाने सरावाला परवानगी दिल्यास आम्ही आवश्‍यक काळजी घेण्यास तयार आहे.'  -अनिल पांडे, नेमबाजी प्रशिक्षक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 5, 2020

इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो ! प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव नागपूर : बॅडमिंटन, टेबल टेनिस, शुटिंग, बुद्धिबळ, कुस्ती, मुष्टियुद्‌ध, ज्युदो-कराटे इत्यादी इनडोअर गेम्सवर शेकडो प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र लॉकडाउनमुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून शहरातील सर्वच इनडोअर सभागृह पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे प्रशिक्षकांची कमाई तर बुडालीच, शिवाय खेळाडूही आवश्‍यक सरावापासून वंचित आहेत. प्रशासनाने अटींवर सभागृह खुले करावीत, अशी मागणी खेळाडू व प्रशिक्षकांनी केली आहे.  उपराजधानीत मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‌यापीठाच्या सुभेदार सभागृह, महानगरपालिकेचे विवेकानंदनगर सभागृह, धनवटे नॅशनल महाविद्‌यालयाचे सभागृह, वायएमसीए, स्वावलंबीनगर आणि शंकरनगर येथील विदर्भ ब्रिज असोसिएशनच्या सभागृहात बॅडमिंटनचा सराव चालतो. येथील प्रशिक्षण केंद्रांवर दररोज सकाळ सायंकाळी शेकडो युवा खेळाडू सराव करतात. यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवंलबून आहे. मात्र कोरोनामुळे सराव पूर्णपणे बंद असल्यामुळे उन्हाळी शिबिरांमध्ये एका पैशाचीही कमा झाली नाही. बहूतांश प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह प्रशिक्षणावर चालतो. त्यांनी आतापर्यंत कसेबसे दिवस ढकलले. मात्र आता एकेक दिवस कठिण जाताहेत. सरावाअभावी खेळाडूंमध्येही चिंता व नैराश्‍येचे वातावरण आहे.    आयसीसीतील मनोहर अध्यायाला पूर्णविराम, काय आहे वाचा   बॅडमिंटनपटूंप्रमाणेच टेबल टेनिस, शुटिंग, बुद्धिबळ, कुस्ती, मुष्टियुद्‌ध, ज्युदो-कराटे या इनडोअर खेळाडूंची जवळपास तशीच अवस्था आहे. हे खेळाडूही गेल्या तीन- चार महिन्यांपासून आपापल्या घरांमध्ये कोंडले गेले आहेत. लवकरच शाळा व महाविद्‌यालये सुरू होणार असून, त्यानंतर लगेच क्रीडा स्पर्धा आरंभ होणार आहे. स्पर्धेपूर्वी सराव गरजेचा असल्याने खेळाडू प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे इनडोअर सभागृह ताबडतोब खुले करून अटींसह सरावाला परवानगी द्‌यावी, अशी खेळाडूंसह प्रशिक्षकांचीही मागणी आहे. यासंदर्भात ते लवकरच जिल्हाधिकारी व मनपा आयुक्‍तांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडणार आहेत. वरील इनडोअर खेळांसह क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्‌डी, खो-खो, फुटबॉल, जलतरण या आऊटडोअर खेळांचाही सराव सध्या बंद आहे.    "गेल्या अनेक वर्षांपासून मी मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात युवा बॅडमिंटनपटूंना धडे देतो. मात्र लॉकडाउन सुरू झाल्यापासून सराव पूर्णपणे बंद आहे. सरावावरच माझा उदरनिर्वाह अवलंबून आहे. केलेली कमाई तीन महिन्यांत खर्च झाली. आता उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या भल्यासाठी प्रशासनाने सरावाला हिरवी झेंडी दाखवावी, अशी आमची मागणी आहे.'  -अमित राऊत, बॅडमिंटन प्रशिक्षक  "लॉकडाउनमुळे आमचे स्वावलंबीनगर व अजनी येथील नेमबाजी प्रशिक्षण केंद्रही सध्या बंद आहे. त्यामुळे खेळाडूंसह आमचीही अडचण होत आहे. नेमबाजीमध्ये खेळाडू दूर उभे राहात असल्यामुळे एकमेकांना स्पर्श होत नाही. त्यामुळे आपोआपच "सोशल डिस्टन्सिंग' पाळले जाते. त्यामुळे प्रशासनाने सरावाला परवानगी दिल्यास आम्ही आवश्‍यक काळजी घेण्यास तयार आहे.'  -अनिल पांडे, नेमबाजी प्रशिक्षक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gtmHIt

No comments:

Post a Comment