Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 3, 2020

कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

July 03, 2020 0 Comments
राज्यातील कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.   from Zee24 Taas: Maharas...
Read More
कोरोना मुंबई: अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर ही उपनगरं का झालीत कोरोनाचे हॉटस्पॉट?
महापालिकेच्या डोक्याला ताप; डिस्चार्जनंतर पेशंट 'नॉट रिचेबल'

पुणे - हॅलो, पेशंट कसे आणि कुठे आहात, काही त्रास होतोय, घराबाहेर जात नाही ना, अशा काळजीतून महापालिका कोरोनामुक्तांना रोज फोन करतेय; पण गेल्याच पाच दिवसांत घरी सोडलेल्या हजार-दीड जणांचे फोन लागेनासे झाल्याने महापालिकेच्या काळजीत भर पडली आहे. तर शोधमोहिमेचा वेग वाढवूनही नव्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती सापडत नसल्याने महापालिकेचा ताप वाढला आहे. परिणामी, हे लोक घराबाहेर जात असल्याच्या शक्‍यतेने त्यांना रोखण्यासाठी घराच्या दारावर स्टिकर लावले जाणार आहेत. 

कोरोनाबाधितांवरील उपचार आणि होम क्वारंटाइनचा कालावधी कमी झाल्याने कोरोनामुक्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. पूर्वीच्या 14 ऐवजी आता आठ ते दहा दिवसच उपचार होत आहेत. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची सवलत आहे. मात्र, कोरोनामुक्त (होम क्वारंटाइन) आणि घरीच राहिलेल्या (होम आयसोलेशन) रुग्णांच्या हालचालींवर आरोग्य खात्याचे अधिकारी लक्ष ठेवत आहेत. त्यातून संबंधित व्यक्ती घरी आहे का, त्यांची प्रकृती कशी आहे, या बाबी जाणून घेऊन त्यावर उपाय करण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. दुसरीकडे, हे नागरिक सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनामुक्त आणि होम आयसोलेशनच्या रुग्णांना रोज किमान एक फोन करून त्याची चौकशी केली जात आहे. गेल्या दहा दिवसांत सोडलेल्या सुमारे 5 हजार 664 जणांच्या मोबाईलवर संपर्क साधला; तेव्हा शुक्रवारी दिवसभरात 4 हजार 336 जणांनी प्रतिसाद दिला. तर 1 हजार 308 नागरिकांचे फोन लागलेले नसल्याचा अहवाल आहे. त्याआधी शुक्रवारी सहा हजार जणांपैकी 12 लोकांचा संपर्क होऊ शकला नाही. संपर्क होत नसलेल्यांपैकी बहुतांश जणांना किमान आठ ते 14 दिवस घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्यांच्या संवाद होत नसल्याने आरोग्य खात्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

याबाबत महापालिकेचे उपायुक्त (तांत्रिक विभाग) संजय गावडे म्हणाले, ""उपचारानंतर घरी सोडलेल्या व्यक्तींना फोन करून तब्येतीची विचारपूस केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीशी बोलून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहोत. मात्र, काही लोकांचे फोन लागत नाहीत.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्ण वाढण्याचा अंदाज 
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून नवे रुग्ण आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे पुढील काही दिवसांत हे आकडे वाढण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका कठोर पावले उचलत असून, घरी सोडलेल्या आणि घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या घरांवर स्टिकर लावण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी यांनी स्पष्ट आहे. या आधी घराच्या दारावर छोटे स्टिकर्स लावण्याचा प्रयोग झाला होता. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महापालिकेच्या डोक्याला ताप; डिस्चार्जनंतर पेशंट 'नॉट रिचेबल' पुणे - हॅलो, पेशंट कसे आणि कुठे आहात, काही त्रास होतोय, घराबाहेर जात नाही ना, अशा काळजीतून महापालिका कोरोनामुक्तांना रोज फोन करतेय; पण गेल्याच पाच दिवसांत घरी सोडलेल्या हजार-दीड जणांचे फोन लागेनासे झाल्याने महापालिकेच्या काळजीत भर पडली आहे. तर शोधमोहिमेचा वेग वाढवूनही नव्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती सापडत नसल्याने महापालिकेचा ताप वाढला आहे. परिणामी, हे लोक घराबाहेर जात असल्याच्या शक्‍यतेने त्यांना रोखण्यासाठी घराच्या दारावर स्टिकर लावले जाणार आहेत.  कोरोनाबाधितांवरील उपचार आणि होम क्वारंटाइनचा कालावधी कमी झाल्याने कोरोनामुक्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. पूर्वीच्या 14 ऐवजी आता आठ ते दहा दिवसच उपचार होत आहेत. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची सवलत आहे. मात्र, कोरोनामुक्त (होम क्वारंटाइन) आणि घरीच राहिलेल्या (होम आयसोलेशन) रुग्णांच्या हालचालींवर आरोग्य खात्याचे अधिकारी लक्ष ठेवत आहेत. त्यातून संबंधित व्यक्ती घरी आहे का, त्यांची प्रकृती कशी आहे, या बाबी जाणून घेऊन त्यावर उपाय करण्याचा महापालिकेचा उद्देश आहे. दुसरीकडे, हे नागरिक सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनामुक्त आणि होम आयसोलेशनच्या रुग्णांना रोज किमान एक फोन करून त्याची चौकशी केली जात आहे. गेल्या दहा दिवसांत सोडलेल्या सुमारे 5 हजार 664 जणांच्या मोबाईलवर संपर्क साधला; तेव्हा शुक्रवारी दिवसभरात 4 हजार 336 जणांनी प्रतिसाद दिला. तर 1 हजार 308 नागरिकांचे फोन लागलेले नसल्याचा अहवाल आहे. त्याआधी शुक्रवारी सहा हजार जणांपैकी 12 लोकांचा संपर्क होऊ शकला नाही. संपर्क होत नसलेल्यांपैकी बहुतांश जणांना किमान आठ ते 14 दिवस घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्यांच्या संवाद होत नसल्याने आरोग्य खात्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    याबाबत महापालिकेचे उपायुक्त (तांत्रिक विभाग) संजय गावडे म्हणाले, ""उपचारानंतर घरी सोडलेल्या व्यक्तींना फोन करून तब्येतीची विचारपूस केली जात आहे. प्रत्येक व्यक्तीशी बोलून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहोत. मात्र, काही लोकांचे फोन लागत नाहीत.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रुग्ण वाढण्याचा अंदाज  पुण्यात गेल्या काही दिवसांपासून नवे रुग्ण आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे पुढील काही दिवसांत हे आकडे वाढण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका कठोर पावले उचलत असून, घरी सोडलेल्या आणि घरीच राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या घरांवर स्टिकर लावण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी यांनी स्पष्ट आहे. या आधी घराच्या दारावर छोटे स्टिकर्स लावण्याचा प्रयोग झाला होता.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2D1Qzxa
Read More
पिंपरी-चिंचवडमधील कोरोना स्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

पिंपरी : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यूदर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेने सर्वात कमी म्हणजे अवघा 1.42 टक्के राहिला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय प्रशासनाचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कौतुक केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळला. तेव्हापासून आजपर्यंत रुग्णसंख्या वाढतच आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत एकूण रुग्णसंख्या तीन हजार 708 झाली होती. विशेषतः दाट लोकवस्तीत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. जूनमध्ये रुग्णवाढीचा वेग व मृत्यूदर सर्वाधिक राहिला आहे. मात्र, राज्याच्या तुलनेत मृत्यूदर सर्वात कमी आहे. 31 मेपर्यंत केवळ आठ जणांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात 39 जणांचा बळी गेला. जुलै महिन्याचा तिसरा दिवस आहे. काल एकाचा मृत्यू झाला. आज (ता. 3) दुपारी एकपर्यंत पाच जणांचा बळी गेला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 53 झाली आहे. 

असे केले कौतुक 

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील कोविड रुग्णालयांची माहिती घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यात वायसीएम रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूदर राज्यात सर्वात कमी असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य शहरांचा मृत्यूदर सहा ते आठ टक्के आल्याचेही त्यांनी नमूद केले. कमी मृत्यू ही खरोखरंच खूप समाधानकारक गोष्ट आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. 

डॉक्‍टरांची भावना 

एका रुग्णाचा मृत्यूसुद्धा दु:खदायक असतो. वायसीएममध्ये शुक्रवारपर्यंत (ता. 3) पिंपरी-चिंचवड शहरातील शहरातील 53 आणि शहराबाहेरील 32 अशा 85 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा उद्रेक होत असताना मृत्यूदराचा आकडा खूप कमी आहे. मार्चमध्ये बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. ते वुहान (चीन) व दुबई येथून आलेले होते. यामुळे सर्व नागरिक घाबरून गेले. मात्र बाराही रुग्ण ठणठणीत बरे करून घरी पाठवले. त्यानंतर नागरिकांच्या चुकांमुळे संख्या वाढत गेली. तरीसुद्धा मरणाच्या दाढेतून रुग्ण बाहेर काढले आहेत. जिवंत राहण्याची काहीच शाश्‍वती नसलेले रुग्ण चालत घरी गेलेले आहेत. गेल्या चार महिन्यांच्या प्रयत्नाने आम्ही अजूनही नियंत्रण ठेवून आहोत, ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. यापुढेही सातत्य राखू आणि कोरोनाला हरवू. 

रुग्णाच्या आनंदासाठी... 

कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाला. त्यापूर्वीच सर्व डॉक्‍टर, नर्स, वॉर्डबॉय यांना प्रशिक्षण दिले होते. रिस्क माहिती असूनही सर्व जण स्वतःला झोकून सेवा देत आहेत. प्रकृती गंभीर असलेला रुग्ण बरा होऊन घरी जातो. त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. त्या आनंदासाठीच आम्ही काम करतोय, अशी भावना वायसीएमच्या अतिदक्षता विभागातील डॉक्‍टरांनी व्यक्त केली. 

अशी आहे व्यवस्था 

वायसीएममध्ये सध्या अतिदक्षता विभागाचे दोन कक्ष आहेत. 33 बेडची व्यवस्था तिथे आहे. रुग्णालयातीलच रुबी अलकेअरचे 20 बेड राखीव ठेवले आहेत. शिवाय, आयसीयूतून बाहेर आलेल्या रुग्णांसाठी 40 बेडची सुविधा आहे. आणखी 30 बेडचा आयसीयू कक्ष सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे. त्यासाठी मनुष्यबळाची व्यवस्था केली जात आहे. 

मृत्यूची कारणे 

प्रतिकार शक्ती कमी असलेले 

फुफ्फूस, हृदयविकार, मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार 

प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही तास अगोदर रुग्णालयात दाखल 

असे झाले मृत्यू 

महिना/वायसीएम/खासगी रुग्णालय 

मार्च/0/0 

एप्रिल/2/1 

मे/3/2 

जून/23/16 

जुलै/5/1 

शुक्रवारी दुपारी एकपर्यंत 

वर्णन/शहरातील/शहराबाहेरील 

एकूण पॉझिटीव्ह/3708/283 

बरे झालेले/2189/197 

उपचार सुरू/1466/86 

एकूण मृत्यू/53/32 

मृत्यूची टक्केवारी 

शहरातील : 1.42 

शहराबाहेरील : 11.30 

उपचार घेऊन : 5 

अन्य आजार व संसर्ग : 95 

शहरनिहाय मृत्यूदर तुलना 

शहर टक्केवारी 

मुंबई 5.81 

नवी मुंबई 2.13 

ठाणे 3.39 

पुणे 3.52 

औरंगाबाद 11.11 

सोलापूर 10.68 

नाशिक 3.57 

मालेगाव 7.33 

पिंपरी-चिंचवड 1.42 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारचे आदेश व वेळोवेळी मिळालेल्या सूचनांचे पालन करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अन्य रुग्णालयांच्या तुलनेत वायसीएमची रचना सुटसुटीत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळता येत आहे. तपासणीसाठी आलेले संशयितांसह पॉझिटीव्ह रुग्णांमध्येही सुरक्षित अंतर ठेवता येत असल्याने क्रॉस इन्फेक्‍शन होत नाही. 90 टक्के रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी गेले आहेत. त्यांना पुन्हा संसर्ग होऊ नये, याची काळजी घेतली. जेवण, औषधे वेळेच्या वेळी देऊन व्यवस्थित मॉनेटरिंग केले जात आहे. 

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम हॉस्पिटल

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पिंपरी-चिंचवडमधील कोरोना स्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले... पिंपरी : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यूदर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेने सर्वात कमी म्हणजे अवघा 1.42 टक्के राहिला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय प्रशासनाचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कौतुक केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी आढळला. तेव्हापासून आजपर्यंत रुग्णसंख्या वाढतच आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत एकूण रुग्णसंख्या तीन हजार 708 झाली होती. विशेषतः दाट लोकवस्तीत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. जूनमध्ये रुग्णवाढीचा वेग व मृत्यूदर सर्वाधिक राहिला आहे. मात्र, राज्याच्या तुलनेत मृत्यूदर सर्वात कमी आहे. 31 मेपर्यंत केवळ आठ जणांचा मृत्यू झाला होता. जून महिन्यात 39 जणांचा बळी गेला. जुलै महिन्याचा तिसरा दिवस आहे. काल एकाचा मृत्यू झाला. आज (ता. 3) दुपारी एकपर्यंत पाच जणांचा बळी गेला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 53 झाली आहे.  असे केले कौतुक  मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील कोविड रुग्णालयांची माहिती घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यात वायसीएम रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूदर राज्यात सर्वात कमी असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य शहरांचा मृत्यूदर सहा ते आठ टक्के आल्याचेही त्यांनी नमूद केले. कमी मृत्यू ही खरोखरंच खूप समाधानकारक गोष्ट आहे, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.  डॉक्‍टरांची भावना  एका रुग्णाचा मृत्यूसुद्धा दु:खदायक असतो. वायसीएममध्ये शुक्रवारपर्यंत (ता. 3) पिंपरी-चिंचवड शहरातील शहरातील 53 आणि शहराबाहेरील 32 अशा 85 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा उद्रेक होत असताना मृत्यूदराचा आकडा खूप कमी आहे. मार्चमध्ये बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. ते वुहान (चीन) व दुबई येथून आलेले होते. यामुळे सर्व नागरिक घाबरून गेले. मात्र बाराही रुग्ण ठणठणीत बरे करून घरी पाठवले. त्यानंतर नागरिकांच्या चुकांमुळे संख्या वाढत गेली. तरीसुद्धा मरणाच्या दाढेतून रुग्ण बाहेर काढले आहेत. जिवंत राहण्याची काहीच शाश्‍वती नसलेले रुग्ण चालत घरी गेलेले आहेत. गेल्या चार महिन्यांच्या प्रयत्नाने आम्ही अजूनही नियंत्रण ठेवून आहोत, ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. यापुढेही सातत्य राखू आणि कोरोनाला हरवू.  रुग्णाच्या आनंदासाठी...  कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झाला. त्यापूर्वीच सर्व डॉक्‍टर, नर्स, वॉर्डबॉय यांना प्रशिक्षण दिले होते. रिस्क माहिती असूनही सर्व जण स्वतःला झोकून सेवा देत आहेत. प्रकृती गंभीर असलेला रुग्ण बरा होऊन घरी जातो. त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. त्या आनंदासाठीच आम्ही काम करतोय, अशी भावना वायसीएमच्या अतिदक्षता विभागातील डॉक्‍टरांनी व्यक्त केली.  अशी आहे व्यवस्था  वायसीएममध्ये सध्या अतिदक्षता विभागाचे दोन कक्ष आहेत. 33 बेडची व्यवस्था तिथे आहे. रुग्णालयातीलच रुबी अलकेअरचे 20 बेड राखीव ठेवले आहेत. शिवाय, आयसीयूतून बाहेर आलेल्या रुग्णांसाठी 40 बेडची सुविधा आहे. आणखी 30 बेडचा आयसीयू कक्ष सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे. त्यासाठी मनुष्यबळाची व्यवस्था केली जात आहे.  मृत्यूची कारणे  प्रतिकार शक्ती कमी असलेले  फुफ्फूस, हृदयविकार, मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार  प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही तास अगोदर रुग्णालयात दाखल  असे झाले मृत्यू  महिना/वायसीएम/खासगी रुग्णालय  मार्च/0/0  एप्रिल/2/1  मे/3/2  जून/23/16  जुलै/5/1  शुक्रवारी दुपारी एकपर्यंत  वर्णन/शहरातील/शहराबाहेरील  एकूण पॉझिटीव्ह/3708/283  बरे झालेले/2189/197  उपचार सुरू/1466/86  एकूण मृत्यू/53/32  मृत्यूची टक्केवारी  शहरातील : 1.42  शहराबाहेरील : 11.30  उपचार घेऊन : 5  अन्य आजार व संसर्ग : 95  शहरनिहाय मृत्यूदर तुलना  शहर टक्केवारी  मुंबई 5.81  नवी मुंबई 2.13  ठाणे 3.39  पुणे 3.52  औरंगाबाद 11.11  सोलापूर 10.68  नाशिक 3.57  मालेगाव 7.33  पिंपरी-चिंचवड 1.42  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सरकारचे आदेश व वेळोवेळी मिळालेल्या सूचनांचे पालन करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अन्य रुग्णालयांच्या तुलनेत वायसीएमची रचना सुटसुटीत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळता येत आहे. तपासणीसाठी आलेले संशयितांसह पॉझिटीव्ह रुग्णांमध्येही सुरक्षित अंतर ठेवता येत असल्याने क्रॉस इन्फेक्‍शन होत नाही. 90 टक्के रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी गेले आहेत. त्यांना पुन्हा संसर्ग होऊ नये, याची काळजी घेतली. जेवण, औषधे वेळेच्या वेळी देऊन व्यवस्थित मॉनेटरिंग केले जात आहे.  - डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम हॉस्पिटल News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZDlgAi
Read More
मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे?

हिंगणा (नागपूर) : वानाडोंगरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये तहसील कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. या घटनेमुळे क्वारंटाइन असलेल्या रुग्णांमध्ये खळबळ माजली. 

हिंगणा एमआयडीसी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्‍यात 18 कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 94च्या घरात पोहोचली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड केअर सेंटर प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले. अमरनगर व वानाडोंगरी परिसरात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या 562 व्यक्तींना क्वारंटाइन करून या सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. 1 जुलै रोजी 28 जणांना स्वास्थ्यपूर्ण निरोप देण्यात आला. 

तहसील कार्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यानंतर तहसील कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी स्वतःहून होम क्वारंटाइन म्हणून दाखल झाले. 2 जुलै रोजी रात्री 12 वाजतादरम्यान मद्यधुंद अवस्थेत या अधिकाऱ्याने गोंधळ घातल्याचे समजते. वानाडोंगरी कोविड केअर सेंटरमधील साहित्य परिसरात फेकले. 

गोंधळ जास्तच वाढल्याने नोडल अधिकाऱ्याने तालुका कोविड केअर समितीच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. या अधिकाऱ्याने नोडल अधिकाऱ्याला त्यांना समजावून तंबी देण्याची सूचना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्याचा गोंधळ पाहून क्वारंटाइन रुग्णांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले. रात्री एक वाजताच्या दरम्यान गोंधळ शांत झाला. 

हेही वाचा : हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य 

या प्रकरणाची उपविभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी तहसीलदारांना खडे बोल सुनावण्यात आले. तहसीलदारांनी या अधिकाऱ्याला सूचना वजा इशारा देऊन प्रकरण शांत केल्याची चर्चा आहे. कोविड केअर सेंटरमध्ये तहसील कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत असेल तर या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे? हिंगणा (नागपूर) : वानाडोंगरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये तहसील कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातला. या घटनेमुळे क्वारंटाइन असलेल्या रुग्णांमध्ये खळबळ माजली.  हिंगणा एमआयडीसी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्‍यात 18 कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 94च्या घरात पोहोचली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड केअर सेंटर प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले. अमरनगर व वानाडोंगरी परिसरात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या 562 व्यक्तींना क्वारंटाइन करून या सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. 1 जुलै रोजी 28 जणांना स्वास्थ्यपूर्ण निरोप देण्यात आला.  तहसील कार्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यानंतर तहसील कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी स्वतःहून होम क्वारंटाइन म्हणून दाखल झाले. 2 जुलै रोजी रात्री 12 वाजतादरम्यान मद्यधुंद अवस्थेत या अधिकाऱ्याने गोंधळ घातल्याचे समजते. वानाडोंगरी कोविड केअर सेंटरमधील साहित्य परिसरात फेकले.  गोंधळ जास्तच वाढल्याने नोडल अधिकाऱ्याने तालुका कोविड केअर समितीच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. या अधिकाऱ्याने नोडल अधिकाऱ्याला त्यांना समजावून तंबी देण्याची सूचना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्याचा गोंधळ पाहून क्वारंटाइन रुग्णांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले. रात्री एक वाजताच्या दरम्यान गोंधळ शांत झाला.  हेही वाचा : हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य  या प्रकरणाची उपविभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणी तहसीलदारांना खडे बोल सुनावण्यात आले. तहसीलदारांनी या अधिकाऱ्याला सूचना वजा इशारा देऊन प्रकरण शांत केल्याची चर्चा आहे. कोविड केअर सेंटरमध्ये तहसील कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत असेल तर या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dZyAUQ
Read More
सहा महिन्यात गमावले 12 वाघ, या जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू, वाचा स्पेशल रिपोर्ट

नागपूर :  मानव-वन्यजीव संघर्ष वाढू लागला असताना आता वाघांच्या वाढत्या मृत्यूनेही राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. त्यात सर्वाधिक सात वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. मध्य प्रदेशात 13 तर महाराष्ट्राने अकरा वाघ या सहा महिन्यांच्या कालावधीत गमावले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत राज्यात सहा वाघांचा जीव गेला. गेल्यावर्षी या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला होता.

वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 7, गडचिरोली दोन, नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात एक, गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील दोन वाघाचा समावेश आहे. गोरेवाड्यात आणलेला वाघ हा चंद्रपूर जिल्ह्यातीलच होता. यामुळे वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातील सहा वाघांची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे.

"व्याघ्रभूमी' म्हणून नागपूरची ओळख आहे. मध्य भारतात सर्वाधिक 70 टक्के वाघ आहे. राज्यात वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे मृत्यूही वाढते आहे. यामुळेच राज्य सरकारने वाघांना इतरत्र हलविण्याचा विचार सुरू केलेला आहे. आठ दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी विभागात पाच मानवाचा हल्ला करून ठार मारणाऱ्या वाघाला जेरबंद करून गोरेवाडा येथे आणले होते. त्याची प्रकृती अतिशय उत्तम असताना अचानक आठ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या शेजारील एका गावात एका वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारला पुन्हा आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे.

Video : शेतकरीपुत्राचा आविष्कार, जुगाड टेक्‍नॉलॉजीने शेतमशागत, वाचा सविस्तर...

वाढलेल्या शिकारीचा विषय वन विभागाने गंभीरपणे घेतला आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वाघाचे अस्तित्व असलेल्या परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली. देशभरात आतापर्यंत 56 वाघ दगावले. त्यात मध्य प्रदेशात सर्वाधिक 13 तर महाराष्ट्र 12 वाघ गमावून दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळा सहा, तमिळनाडू पाच, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम, गोवा प्रत्येकी चार तर उत्तराखंडने दोन वाघ गमावले.

"नियम कठोर व्हावेत'
मानवावर कायम हल्ला करणाऱ्या वाघाला त्या जागेवरून पकडा. हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी असलेले नियम थोडे शिथिल करा. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या शेजारील कोंढेगाव येथे वाघांचा परिवार विष प्रयोगमध्ये संपणे ही घटना दुःखदायक आहे. यामुळे वाघाचे अस्तित्व असलेले व वाघांची भ्रमंती होत असलेल्या परिसरात संरक्षण अधिक कडक करणे गरजेचे आहे. वाघिणीच्या मृत्यूमुळे आपण अनेक पिढ्यांना मुकलो. वाघांना रहिवास क्षेत्र कमी पडत असल्याने वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष वाढत आहे. त्यामुळे जंगलावरील अतिक्रमण, विकासकामांसाठी घेण्यात येणाऱ्या जमिनी, वाघांचे कॉरिडॉर ब्रेक होणार नाही याची काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे.
नितीन देसाई, संचालक मध्य भारत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्‍शन सोसायटी ऑफ इंडिया

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सहा महिन्यात गमावले 12 वाघ, या जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू, वाचा स्पेशल रिपोर्ट नागपूर :  मानव-वन्यजीव संघर्ष वाढू लागला असताना आता वाघांच्या वाढत्या मृत्यूनेही राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. त्यात सर्वाधिक सात वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. मध्य प्रदेशात 13 तर महाराष्ट्राने अकरा वाघ या सहा महिन्यांच्या कालावधीत गमावले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत राज्यात सहा वाघांचा जीव गेला. गेल्यावर्षी या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला होता. वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. गेल्या सहा महिन्यांत 12 वाघांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 7, गडचिरोली दोन, नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात एक, गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील दोन वाघाचा समावेश आहे. गोरेवाड्यात आणलेला वाघ हा चंद्रपूर जिल्ह्यातीलच होता. यामुळे वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातील सहा वाघांची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. "व्याघ्रभूमी' म्हणून नागपूरची ओळख आहे. मध्य भारतात सर्वाधिक 70 टक्के वाघ आहे. राज्यात वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे मृत्यूही वाढते आहे. यामुळेच राज्य सरकारने वाघांना इतरत्र हलविण्याचा विचार सुरू केलेला आहे. आठ दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी विभागात पाच मानवाचा हल्ला करून ठार मारणाऱ्या वाघाला जेरबंद करून गोरेवाडा येथे आणले होते. त्याची प्रकृती अतिशय उत्तम असताना अचानक आठ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या शेजारील एका गावात एका वाघिणीसह दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारला पुन्हा आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात येत आहे. Video : शेतकरीपुत्राचा आविष्कार, जुगाड टेक्‍नॉलॉजीने शेतमशागत, वाचा सविस्तर... वाढलेल्या शिकारीचा विषय वन विभागाने गंभीरपणे घेतला आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वाघाचे अस्तित्व असलेल्या परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली. देशभरात आतापर्यंत 56 वाघ दगावले. त्यात मध्य प्रदेशात सर्वाधिक 13 तर महाराष्ट्र 12 वाघ गमावून दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळा सहा, तमिळनाडू पाच, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम, गोवा प्रत्येकी चार तर उत्तराखंडने दोन वाघ गमावले. "नियम कठोर व्हावेत' मानवावर कायम हल्ला करणाऱ्या वाघाला त्या जागेवरून पकडा. हल्ला करणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी असलेले नियम थोडे शिथिल करा. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाच्या शेजारील कोंढेगाव येथे वाघांचा परिवार विष प्रयोगमध्ये संपणे ही घटना दुःखदायक आहे. यामुळे वाघाचे अस्तित्व असलेले व वाघांची भ्रमंती होत असलेल्या परिसरात संरक्षण अधिक कडक करणे गरजेचे आहे. वाघिणीच्या मृत्यूमुळे आपण अनेक पिढ्यांना मुकलो. वाघांना रहिवास क्षेत्र कमी पडत असल्याने वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष वाढत आहे. त्यामुळे जंगलावरील अतिक्रमण, विकासकामांसाठी घेण्यात येणाऱ्या जमिनी, वाघांचे कॉरिडॉर ब्रेक होणार नाही याची काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे. नितीन देसाई, संचालक मध्य भारत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्‍शन सोसायटी ऑफ इंडिया News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3isvdt9
Read More
Video : नवख्या गिर्यारोहकांना हा वाटाड्या म्हणतोय, 'ही वाट माझ्या ओळखीची ये...' 

पिंपरी : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक गड-किल्ले, कडे, सुळके आणि शिखरे आहेत. त्यामध्ये गिर्यारोहक नेहमीच भटकंती करत असतात. मात्र, अनेकदा त्यांना योग्य वाट दाखविणाऱ्या वाटाड्याचीही गरज भासते. काही गिर्यारोहकांनी एकत्र येत याच वाटाड्यांवर आधारित लघुपटाची निर्मिती केली असून, त्यांनाच तो समर्पित केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

या लघुपटाचे गिर्यारोहक सागर मांडेकर यांनी दिग्दर्शन केले असून, राहुल जाधव हे 'वाटाड्या'च्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासमवेत रोहन मोरे, विनायक आल्हाट यांनी गिर्यारोहकांच्या भूमिका साकारल्या आहेत. खेड तालुक्‍याच्या दक्षिणपट्टयातील वांद्रे गाव आणि त्याच्या परिसरातील कोथळीगडालगत लघुपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. जवळपास 7 मिनिटांचा हा लघुपट आहे. विशेष म्हणजे, यामध्ये कलाकार दिसत असले, तरी त्यांच्यात फारसा संवाद दाखविलेला नाही. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याबद्दल बोलताना मांडेकर म्हणाले, "सह्याद्री पर्वतरांगांत गड-किल्ले फिरत असताना नेहमीच एक प्रश्‍न असतो. कुठल्या वाटेने जायचे? सह्याद्रीत एक पायवाट कधीच नसते. प्रत्येक पावसाळ्यानंतर ती बदललेली असते. या वाटा कुणीतरी आधीच बनवून ठेवलेल्या असतात. कधी त्या जवळच्याच रहिवाशांनी बनविल्या असतात. तर कधी गिरीप्रेमींनी. आपल्याला फक्त वाट दिसते. ज्या वाटेवर आपण निर्धास्तपणे जातो. ती वाट तयार करण्यासाठी कोणीतरी कष्ट घेतले असतात. आपल्या आयुष्यात असे अनेक वाटाडे भेटतात. जे आपल्याला योग्य रस्ता दाखवित असतात. आपण रस्ता पाहतो आणि चालू लागतो. परंतु, आपल्याला रस्ता दाखविणाऱ्या वाटाड्याचे आभार मानण्यास विसरतो. त्यामुळे आम्ही गिर्यारोहकांना वाट दाखविणाऱ्या वाटाड्यांना लघुपट बनवून समर्पित केला आहे. या लघुपटात शेवट वगळता कुठेच संवाद नाही. त्यात, वाटाड्या नवख्या गिर्यारोहकांना वाट दाखविताना 'ही वाट माझ्या ओळखीची ये...' असे सांगतानाचा एकच संवाद दिसतो. कारण, आम्हाला संवादाची गरज वाटली नाही. नवख्या माणसालाच संवादाची गरज भासते. निसर्गच तुमच्याशी सतत संवाद साधत असतो. या प्रकारे लघुपटाची निर्मिती करण्याचा आमचा पहिलाच प्रयत्न आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चौघेही गिर्यारोहक आणि कलाकारही 

या लघुपटात काम केलेले चौघेही गिर्यारोहक कलाकार देखील असून ते नाटकात देखील काम करतात. चाकण येथील वडवानल सांस्कृतिक संस्थेशी हे गिर्यारोहक जोडले गेले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील साह्यकडा ऍडव्हेंचर्स या गिर्यारोहक संस्थेचे ते सदस्य असून त्या संस्थेमार्फतही हे गिर्यारोहक गिरीमोहिमांमध्ये भाग घेत असतात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : नवख्या गिर्यारोहकांना हा वाटाड्या म्हणतोय, 'ही वाट माझ्या ओळखीची ये...'  पिंपरी : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक गड-किल्ले, कडे, सुळके आणि शिखरे आहेत. त्यामध्ये गिर्यारोहक नेहमीच भटकंती करत असतात. मात्र, अनेकदा त्यांना योग्य वाट दाखविणाऱ्या वाटाड्याचीही गरज भासते. काही गिर्यारोहकांनी एकत्र येत याच वाटाड्यांवर आधारित लघुपटाची निर्मिती केली असून, त्यांनाच तो समर्पित केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    या लघुपटाचे गिर्यारोहक सागर मांडेकर यांनी दिग्दर्शन केले असून, राहुल जाधव हे 'वाटाड्या'च्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासमवेत रोहन मोरे, विनायक आल्हाट यांनी गिर्यारोहकांच्या भूमिका साकारल्या आहेत. खेड तालुक्‍याच्या दक्षिणपट्टयातील वांद्रे गाव आणि त्याच्या परिसरातील कोथळीगडालगत लघुपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. जवळपास 7 मिनिटांचा हा लघुपट आहे. विशेष म्हणजे, यामध्ये कलाकार दिसत असले, तरी त्यांच्यात फारसा संवाद दाखविलेला नाही.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्याबद्दल बोलताना मांडेकर म्हणाले, "सह्याद्री पर्वतरांगांत गड-किल्ले फिरत असताना नेहमीच एक प्रश्‍न असतो. कुठल्या वाटेने जायचे? सह्याद्रीत एक पायवाट कधीच नसते. प्रत्येक पावसाळ्यानंतर ती बदललेली असते. या वाटा कुणीतरी आधीच बनवून ठेवलेल्या असतात. कधी त्या जवळच्याच रहिवाशांनी बनविल्या असतात. तर कधी गिरीप्रेमींनी. आपल्याला फक्त वाट दिसते. ज्या वाटेवर आपण निर्धास्तपणे जातो. ती वाट तयार करण्यासाठी कोणीतरी कष्ट घेतले असतात. आपल्या आयुष्यात असे अनेक वाटाडे भेटतात. जे आपल्याला योग्य रस्ता दाखवित असतात. आपण रस्ता पाहतो आणि चालू लागतो. परंतु, आपल्याला रस्ता दाखविणाऱ्या वाटाड्याचे आभार मानण्यास विसरतो. त्यामुळे आम्ही गिर्यारोहकांना वाट दाखविणाऱ्या वाटाड्यांना लघुपट बनवून समर्पित केला आहे. या लघुपटात शेवट वगळता कुठेच संवाद नाही. त्यात, वाटाड्या नवख्या गिर्यारोहकांना वाट दाखविताना 'ही वाट माझ्या ओळखीची ये...' असे सांगतानाचा एकच संवाद दिसतो. कारण, आम्हाला संवादाची गरज वाटली नाही. नवख्या माणसालाच संवादाची गरज भासते. निसर्गच तुमच्याशी सतत संवाद साधत असतो. या प्रकारे लघुपटाची निर्मिती करण्याचा आमचा पहिलाच प्रयत्न आहे.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चौघेही गिर्यारोहक आणि कलाकारही  या लघुपटात काम केलेले चौघेही गिर्यारोहक कलाकार देखील असून ते नाटकात देखील काम करतात. चाकण येथील वडवानल सांस्कृतिक संस्थेशी हे गिर्यारोहक जोडले गेले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील साह्यकडा ऍडव्हेंचर्स या गिर्यारोहक संस्थेचे ते सदस्य असून त्या संस्थेमार्फतही हे गिर्यारोहक गिरीमोहिमांमध्ये भाग घेत असतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38qL5rn
Read More
2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

2020 के 6 महीने- केवल 50 फिल्में रिलीज, टॉप पर अजय देवगन- पहली बार ऐसा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

July 03, 2020 0 Comments
साल 2020 की शुरुआत में शायद ही किसी ने सोचा होगा कि आने वाले कुछ दिनों में ऐसा वक्त देखने को मिलेगा, जहां घर से निकलना भी दूभर होगा। लगभग ती...
Read More
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते,  ताज्या भाज्यांतून  बनवा फेव्हरेट डिश 

पुणे - "ऍग्रोवन' आणि "सेव्हन मंत्रा'चा घरपोच ताजा भाजीपाला व फळे हा उपक्रम खूपच छान आहे. या बास्केटचे पॅकिंगही चांगले असून तुम्ही तो ऑनलाइनही मागवू शकता आणि तुमच्या आवडीची डिश घरीच बनवू शकता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांकडून थेट तुमच्यापर्यंत हा माल पोचणार आहे. कमी हाताळणीमुळे त्याचा फायदा ग्राहकांनाच होणार आहे. खरंतर माझ्या बास्केटमध्ये खूप साऱ्या ताज्या आणि फ्रेश भाज्या आहेत. तसेच, वेगवेगळ्या प्रकारची फळेही आहेत. याचे मी छानपैकी सलाड बनवणार आहे. तसेच, पुन्हा ऑनलाइन नोंदणीही करणार आहे. तुम्हाही या संधीचे सोने करा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा 
www.sevenmantras.com  
संपर्क : ७७७४०२०७७७ 
डिलिव्हरी : मंगळवार, गुरुवार आणि रविवार 
डिलिव्हरीची वेळ : स. ७ ते दु. १ या वेळेत 

मृण्मयी देशपांडे म्हणते, ताजा भाजीपाला अन् फळे हे फक्त 'सेव्हन मंत्रा'च देऊ शकते

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते,  ताज्या भाज्यांतून  बनवा फेव्हरेट डिश  पुणे - "ऍग्रोवन' आणि "सेव्हन मंत्रा'चा घरपोच ताजा भाजीपाला व फळे हा उपक्रम खूपच छान आहे. या बास्केटचे पॅकिंगही चांगले असून तुम्ही तो ऑनलाइनही मागवू शकता आणि तुमच्या आवडीची डिश घरीच बनवू शकता. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांकडून थेट तुमच्यापर्यंत हा माल पोचणार आहे. कमी हाताळणीमुळे त्याचा फायदा ग्राहकांनाच होणार आहे. खरंतर माझ्या बास्केटमध्ये खूप साऱ्या ताज्या आणि फ्रेश भाज्या आहेत. तसेच, वेगवेगळ्या प्रकारची फळेही आहेत. याचे मी छानपैकी सलाड बनवणार आहे. तसेच, पुन्हा ऑनलाइन नोंदणीही करणार आहे. तुम्हाही या संधीचे सोने करा.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा  www.sevenmantras.com   संपर्क : ७७७४०२०७७७  डिलिव्हरी : मंगळवार, गुरुवार आणि रविवार  डिलिव्हरीची वेळ : स. ७ ते दु. १ या वेळेत  मृण्मयी देशपांडे म्हणते, ताजा भाजीपाला अन् फळे हे फक्त 'सेव्हन मंत्रा'च देऊ शकते News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ipInqO
Read More
पुणेकरांनो, दिवसभरात 807 रुग्ण सापडले; 619 रुग्ण कोरोनामुक्त

पुणे - पुण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा शुक्रवारीही (ता. 3) फारसा कमी झाला नाही. दिवसभरात नवे 807 रुग्ण सापडले असून, 619 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 6 हजार 874 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विविध भागांतील सुमारे सव्वाचार हजार रुग्णांची तपासणी झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपचार घेत असलेल्या 389 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 59 जण व्हेंटिलेटरवर आहेत. मृतांमध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. त्यांचे साधारपणे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोथरूड, वारजे माळवाडी, हडपसर, लोहियानगर, बोपोडी, दांडेकर पूल, टिंगरेनगर, वडगाव बु., धायरी भागांतील रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत 1 लाख 28 हजार 448 नागरिकांचे स्वॅब तपासले आहेत. त्यातील 19 हजार 849 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद आहे. 12 हजार 290 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणेकरांनो, दिवसभरात 807 रुग्ण सापडले; 619 रुग्ण कोरोनामुक्त पुणे - पुण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा शुक्रवारीही (ता. 3) फारसा कमी झाला नाही. दिवसभरात नवे 807 रुग्ण सापडले असून, 619 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 6 हजार 874 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विविध भागांतील सुमारे सव्वाचार हजार रुग्णांची तपासणी झाली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप उपचार घेत असलेल्या 389 रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील 59 जण व्हेंटिलेटरवर आहेत. मृतांमध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. त्यांचे साधारपणे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोथरूड, वारजे माळवाडी, हडपसर, लोहियानगर, बोपोडी, दांडेकर पूल, टिंगरेनगर, वडगाव बु., धायरी भागांतील रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत 1 लाख 28 हजार 448 नागरिकांचे स्वॅब तपासले आहेत. त्यातील 19 हजार 849 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद आहे. 12 हजार 290 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dYpjg3
Read More
पाऊलखुणा मंदिरांच्या 2 : माण गावातील स्मृतीशिल्प देतायेत इतिहासाची साक्ष (व्हिडिओ)

पिंपरी : मुळशी तालुक्‍यातील हिंजवडीनजीक असलेल्या माण गावातील प्राचीन शिवमंदिर मोडकळीस आले आहे. मात्र, प्राचीन मंदिराशेजारी जुन्या अवस्थेत असलेले अवशेष या परिसरात मोठ्या प्रमाणावर आहेत. तब्बल 17 वीरगळ, स्मृतीशिळा, नागशिळा ही स्मृतीशिल्पे या मंदिर परिसरात आहेत. या अवशेषांवरून इतिहासाच्या पाऊलखुणा व प्राचीन इतिहास आजही डोळ्यांसमोर उभा राहत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

हेही वाचा- पाऊलखुणा मंदिरांच्या 1 : स्मृतीशिल्पांनी जपला यौद्ध्यांचा इतिहास (व्हिडिओ)

या वीरगळांवर लढाईतील मृत व्यक्ती दर्शविलेल्या आहेत. यावर ढाल, तलवार घेऊन वीर लढताना दिसत आहेत. हा वीरगळ अद्यापही चांगल्या अवस्थेत आहे. त्यावर मृत पावलेला वीर कैलासात गेलेला दाखविला आहे. त्यातील दुसऱ्या कप्प्यात शिवलिंगाची पूजा करताना शेजारी साधू आहे. त्यावर मंगलकलश दाखविलेला आहे. पूर्वजांच्या स्मरणार्थ बनविलेल्या या शिळा यावरून हा इतिहास आठशे ते हजार वर्ष जुना असल्याचे समजते. येथे शेजारीच मोठी लोकवस्ती देखील आहे. काही प्राचीन स्वरूपातील वीरांच्या समाधी देखील या परिसरात आहेत. या भागात जुनी वडाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत, अशी माहिती अभ्यासक प्रणव पाटील यांनी दिली. 

माण जागरूक देवस्थान

माण देवीवरूनच गावाला माण असे नाव पडले आहे. या गावातील माणदेवीचे प्राचीन मंदिर पूर्वी ओढ्याकाठी होते. ते विविध कलापूर्ण पद्धतीने बांधले गेले आहे. चैत्र पौर्णिमेला खूप मोठा उत्सव या मंदिरात भरतो. येथील मुख्य ग्रामदैवत श्री भैरवनाथ, माणदेवी व महादेवाचे आहे. बगाडाचा उत्सव येथे आजही मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काळभैरवनाथाचे कित्येक शतके जुने मंदिर आहे. या भागातील भाविकांची या ग्रामदैवतावर मोठी श्रद्धा आहे. मंदिरात जोगेश्‍वरीची प्राचीन मूर्ती आहे. यापूर्वी हे मंदिर जुन्या लाकडी स्वरूपात होते. त्यानंतर 2003 मध्ये नव्याने मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले. या गावाचा उत्सव अक्षय तृतीयेला होतो, तर मंदिराचा उत्सव कालाष्टमीला भरतो. या भागातही मोठा बगाड उत्सव भरतो. शिवकालीन पत्रामध्ये देखील या गावाचा उल्लेख आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे व्यापारी मार्गावर वसलेले गाव आहे. याच मार्गावर डोंगरात कोरलेली एक मोठी ऐतिहासिक लेणी आहे. व्यापारी मार्गामुळे ही लेणी कोरल्याचा अंदाज बांधला जात आहे. ही लेणी पाहण्यासाठी आजही डोंगरातून पायवाट काढत नागरिक जात आहेत. माण गावाच्या रस्त्यावरून देखील ही लेणी दृष्टीस पडते.

News Story Feeds https://ift.tt/2D55HKd

पाऊलखुणा मंदिरांच्या 2 : माण गावातील स्मृतीशिल्प देतायेत इतिहासाची साक्ष (व्हिडिओ) पिंपरी : मुळशी तालुक्‍यातील हिंजवडीनजीक असलेल्या माण गावातील प्राचीन शिवमंदिर मोडकळीस आले आहे. मात्र, प्राचीन मंदिराशेजारी जुन्या अवस्थेत असलेले अवशेष या परिसरात मोठ्या प्रमाणावर आहेत. तब्बल 17 वीरगळ, स्मृतीशिळा, नागशिळा ही स्मृतीशिल्पे या मंदिर परिसरात आहेत. या अवशेषांवरून इतिहासाच्या पाऊलखुणा व प्राचीन इतिहास आजही डोळ्यांसमोर उभा राहत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    हेही वाचा- पाऊलखुणा मंदिरांच्या 1 : स्मृतीशिल्पांनी जपला यौद्ध्यांचा इतिहास (व्हिडिओ) या वीरगळांवर लढाईतील मृत व्यक्ती दर्शविलेल्या आहेत. यावर ढाल, तलवार घेऊन वीर लढताना दिसत आहेत. हा वीरगळ अद्यापही चांगल्या अवस्थेत आहे. त्यावर मृत पावलेला वीर कैलासात गेलेला दाखविला आहे. त्यातील दुसऱ्या कप्प्यात शिवलिंगाची पूजा करताना शेजारी साधू आहे. त्यावर मंगलकलश दाखविलेला आहे. पूर्वजांच्या स्मरणार्थ बनविलेल्या या शिळा यावरून हा इतिहास आठशे ते हजार वर्ष जुना असल्याचे समजते. येथे शेजारीच मोठी लोकवस्ती देखील आहे. काही प्राचीन स्वरूपातील वीरांच्या समाधी देखील या परिसरात आहेत. या भागात जुनी वडाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत, अशी माहिती अभ्यासक प्रणव पाटील यांनी दिली.  माण जागरूक देवस्थान माण देवीवरूनच गावाला माण असे नाव पडले आहे. या गावातील माणदेवीचे प्राचीन मंदिर पूर्वी ओढ्याकाठी होते. ते विविध कलापूर्ण पद्धतीने बांधले गेले आहे. चैत्र पौर्णिमेला खूप मोठा उत्सव या मंदिरात भरतो. येथील मुख्य ग्रामदैवत श्री भैरवनाथ, माणदेवी व महादेवाचे आहे. बगाडाचा उत्सव येथे आजही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काळभैरवनाथाचे कित्येक शतके जुने मंदिर आहे. या भागातील भाविकांची या ग्रामदैवतावर मोठी श्रद्धा आहे. मंदिरात जोगेश्‍वरीची प्राचीन मूर्ती आहे. यापूर्वी हे मंदिर जुन्या लाकडी स्वरूपात होते. त्यानंतर 2003 मध्ये नव्याने मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले. या गावाचा उत्सव अक्षय तृतीयेला होतो, तर मंदिराचा उत्सव कालाष्टमीला भरतो. या भागातही मोठा बगाड उत्सव भरतो. शिवकालीन पत्रामध्ये देखील या गावाचा उल्लेख आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा हे व्यापारी मार्गावर वसलेले गाव आहे. याच मार्गावर डोंगरात कोरलेली एक मोठी ऐतिहासिक लेणी आहे. व्यापारी मार्गामुळे ही लेणी कोरल्याचा अंदाज बांधला जात आहे. ही लेणी पाहण्यासाठी आजही डोंगरातून पायवाट काढत नागरिक जात आहेत. माण गावाच्या रस्त्यावरून देखील ही लेणी दृष्टीस पडते. News Story Feeds https://ift.tt/2D55HKd

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gtDCun
Read More
प्रशासनाची दारूविक्रीला परवानगी, मग खेळाडूंच्या प्रॅक्‍टिसला का नाही ! 

नागपूर : शरिरासाठी घातक असूनही केवळ महसुलाच्या मोहापायी प्रशासनाने दारूविक्रीला परवानगी दिली. मात्र त्याच शरिरासाठी "टॉनिक'चे काम करणाऱ्या खेळाडूंच्या सराव व व्यायामाला अद्‌याप हिरवी झेंडी मिळाली नाही. लॉकडाउनमुळे जवळपास साडेतीन महिन्यांपासून उपराजधानीतील क्रीडा जगत पूर्णपणे ठप्प पडले असून, प्रॅक्‍टिसची संधी मिळत नसल्याबद्‌दल खेळाडूंमध्ये नाराजी व खदखद आहे. दारूला परवानगी दिली, मग खेळांना का नाही ? असा संतप्त सवाल शहरातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटकांनी प्रशासनाला विचारला आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर 22 मार्चला लॉकडाउन लागला होता. 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे गेल्या तीन- साडेतीन महिन्यांपासून शहरातील आऊटडोअर व अनडोअर "स्पोर्टस ऍक्‍टिव्हिटीज' पूर्णपणे बंद आहेत. बहूतांश खेळाडू आपापल्या घरांमध्ये कोंडून असल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर विपरित परिणाम होत आहे. नैराश्‍य व चिडचिड वाढत चालली आहे. प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवेत येत नसूनही दारुविक्रीला परवानगी दिली. मात्र खेळ आणि खेळाडूंकडे लक्ष द्‌यायला त्यांना वेळ नाही. दारू विकत घेण्यासाठी अनेक लोक रांगेत एकमेकांना चिकटून उभे राहतात. दुकानांसमोर "सोशल डिस्टन्सिंग'चा पूर्णपणे फज्जा उडविला जातो. प्रशासनाकडून खेळाडू व संघटकांनाही अटींवर सरावाची परवानगी हवी आहे. "सोशल डिस्टन्सिंग'सह मास्क व सॅनिटायझर वापरण्याचीही त्यांनी तयारी दर्शविली आहे. लवकरच शाळा सुरू होणार आहेत. त्याबरोबरच क्रीडा स्पर्धांचीही लगबग आरंभ होणार आहे. पुरेशा सरावाअभावी खेळाडूंना स्पर्धेत उतरणे कठिण जाणार आहे. त्यामुळे सरावासाठी मैदाने खुली करून द्‌यावी, अशी मागणी कराटे प्रशिक्षक विपीन हाडके व अजय मोंढे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

हेही वाचा : आयसीसीतील मनोहर अध्यायाला पूर्णविराम, काय आहे वाचा

प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ 

उन्हाळ्याच्या दिवसांत शहरात विविध खेळांची प्रशिक्षण शिबिरे चालतात. मात्र लॉकडाउनमुळे यंदा सर्वच शिबिरांमध्ये शुकशुकाट होता. या प्रशिक्षण शिबिरांवरच शेकडो प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह चालतो. यावर्षीचा संपूर्ण सीझन वाया गेला. या काळात एका पैशाचीही कमाई न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

प्रशासनाची दारूविक्रीला परवानगी, मग खेळाडूंच्या प्रॅक्‍टिसला का नाही !  नागपूर : शरिरासाठी घातक असूनही केवळ महसुलाच्या मोहापायी प्रशासनाने दारूविक्रीला परवानगी दिली. मात्र त्याच शरिरासाठी "टॉनिक'चे काम करणाऱ्या खेळाडूंच्या सराव व व्यायामाला अद्‌याप हिरवी झेंडी मिळाली नाही. लॉकडाउनमुळे जवळपास साडेतीन महिन्यांपासून उपराजधानीतील क्रीडा जगत पूर्णपणे ठप्प पडले असून, प्रॅक्‍टिसची संधी मिळत नसल्याबद्‌दल खेळाडूंमध्ये नाराजी व खदखद आहे. दारूला परवानगी दिली, मग खेळांना का नाही ? असा संतप्त सवाल शहरातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटकांनी प्रशासनाला विचारला आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर 22 मार्चला लॉकडाउन लागला होता. 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे गेल्या तीन- साडेतीन महिन्यांपासून शहरातील आऊटडोअर व अनडोअर "स्पोर्टस ऍक्‍टिव्हिटीज' पूर्णपणे बंद आहेत. बहूतांश खेळाडू आपापल्या घरांमध्ये कोंडून असल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर विपरित परिणाम होत आहे. नैराश्‍य व चिडचिड वाढत चालली आहे. प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवेत येत नसूनही दारुविक्रीला परवानगी दिली. मात्र खेळ आणि खेळाडूंकडे लक्ष द्‌यायला त्यांना वेळ नाही. दारू विकत घेण्यासाठी अनेक लोक रांगेत एकमेकांना चिकटून उभे राहतात. दुकानांसमोर "सोशल डिस्टन्सिंग'चा पूर्णपणे फज्जा उडविला जातो. प्रशासनाकडून खेळाडू व संघटकांनाही अटींवर सरावाची परवानगी हवी आहे. "सोशल डिस्टन्सिंग'सह मास्क व सॅनिटायझर वापरण्याचीही त्यांनी तयारी दर्शविली आहे. लवकरच शाळा सुरू होणार आहेत. त्याबरोबरच क्रीडा स्पर्धांचीही लगबग आरंभ होणार आहे. पुरेशा सरावाअभावी खेळाडूंना स्पर्धेत उतरणे कठिण जाणार आहे. त्यामुळे सरावासाठी मैदाने खुली करून द्‌यावी, अशी मागणी कराटे प्रशिक्षक विपीन हाडके व अजय मोंढे यांनी प्रशासनाकडे केली आहे.  हेही वाचा : आयसीसीतील मनोहर अध्यायाला पूर्णविराम, काय आहे वाचा प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ  उन्हाळ्याच्या दिवसांत शहरात विविध खेळांची प्रशिक्षण शिबिरे चालतात. मात्र लॉकडाउनमुळे यंदा सर्वच शिबिरांमध्ये शुकशुकाट होता. या प्रशिक्षण शिबिरांवरच शेकडो प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह चालतो. यावर्षीचा संपूर्ण सीझन वाया गेला. या काळात एका पैशाचीही कमाई न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3imyytE
Read More

Thursday, July 2, 2020

पर्ससीन नौकांना दणका, मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले `हे` आदेश

मालवण (सिंधुदुर्ग) - अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलेल्या मागणीची दखल घेत पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्यासाठी पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांचे नूतनीकरण आजपासून न करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 

पारंपरिक मच्छीमारांचे हित जतन करण्यासाठी राज्याच्या जलधी क्षेत्रात पर्ससीन जाळ्यांद्वारे होणाऱ्या मासेमारीचा व तिचा पारंपरिक मासेमारीवर, राज्याच्या सागरी किनाऱ्याच्या पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. व्ही. एस. सोमवंशी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने राज्याच्या सागरी जिल्ह्यात पाहणी करून उपलब्ध मत्स्यसाठ्याचा आढावा, पारंपरिक मच्छीमारांचे हितसंबंध जपणे, शाश्वत सागरी मासेमारी टिकवून ठेवणे याचा अभ्यास केला आणि त्याबाबतचा अहवाल 10 मे 2012 ला शासनाला सादर केला. 

या अहवालातील शिफारशी शासनाने 16 मे 2015 ला स्विकृत केल्या. अहवालानुसार राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात राज्य शासनाने कृषि व पदुम विभागाच्या आदेशान्वये पर्ससीन मासेमारीचे नियमन केले आहे. तसेच पर्ससीन रिंगसीन (मिनी पर्ससीन सह) मासेमारीसाठी नवीन मासेमारी परवाने देण्यास बंदी घातली आहे. प्रचलित/कार्यरत पर्ससीन/रिंगसीन (मिनी पर्ससीन सह) मासेमारी परवान्यांची संख्या टप्याटप्याने कमी करुन 262 वर आणि अंतिम 182 पर्यंत आणावयाचे नमूद केले आहे.

त्या अनुषंगाने आजपासून एकाही पर्ससीन मासेमारी नौकांचे परवाने नुतनीकरण करण्यात येऊ नये असे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले आहेत. शाश्‍वत मासेमारी टिकून राहण्याच्या अनुषंगाने शासन आदेश 5 फेब्रुवारी 2016 मधील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या पर्ससीन मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कठोर कारवाई करून अशा नौकांचे मासेमारी परवाने व नौकेची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. 

कडक कारवाईची इशारा 
या आदेशानंतरही एकाही पर्ससीन नौकांच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याचे निदर्शनास आल्यास, पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्याच्या कार्यवाहीत टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित परवाना अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. पाटणे यांनी दिला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पर्ससीन नौकांना दणका, मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले `हे` आदेश मालवण (सिंधुदुर्ग) - अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलेल्या मागणीची दखल घेत पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्यासाठी पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांचे नूतनीकरण आजपासून न करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.  पारंपरिक मच्छीमारांचे हित जतन करण्यासाठी राज्याच्या जलधी क्षेत्रात पर्ससीन जाळ्यांद्वारे होणाऱ्या मासेमारीचा व तिचा पारंपरिक मासेमारीवर, राज्याच्या सागरी किनाऱ्याच्या पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. व्ही. एस. सोमवंशी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने राज्याच्या सागरी जिल्ह्यात पाहणी करून उपलब्ध मत्स्यसाठ्याचा आढावा, पारंपरिक मच्छीमारांचे हितसंबंध जपणे, शाश्वत सागरी मासेमारी टिकवून ठेवणे याचा अभ्यास केला आणि त्याबाबतचा अहवाल 10 मे 2012 ला शासनाला सादर केला.  या अहवालातील शिफारशी शासनाने 16 मे 2015 ला स्विकृत केल्या. अहवालानुसार राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात राज्य शासनाने कृषि व पदुम विभागाच्या आदेशान्वये पर्ससीन मासेमारीचे नियमन केले आहे. तसेच पर्ससीन रिंगसीन (मिनी पर्ससीन सह) मासेमारीसाठी नवीन मासेमारी परवाने देण्यास बंदी घातली आहे. प्रचलित/कार्यरत पर्ससीन/रिंगसीन (मिनी पर्ससीन सह) मासेमारी परवान्यांची संख्या टप्याटप्याने कमी करुन 262 वर आणि अंतिम 182 पर्यंत आणावयाचे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने आजपासून एकाही पर्ससीन मासेमारी नौकांचे परवाने नुतनीकरण करण्यात येऊ नये असे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले आहेत. शाश्‍वत मासेमारी टिकून राहण्याच्या अनुषंगाने शासन आदेश 5 फेब्रुवारी 2016 मधील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या पर्ससीन मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कठोर कारवाई करून अशा नौकांचे मासेमारी परवाने व नौकेची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी.  कडक कारवाईची इशारा  या आदेशानंतरही एकाही पर्ससीन नौकांच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याचे निदर्शनास आल्यास, पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्याच्या कार्यवाहीत टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित परवाना अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. पाटणे यांनी दिला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iqGdHu
Read More