Video : नवख्या गिर्यारोहकांना हा वाटाड्या म्हणतोय, 'ही वाट माझ्या ओळखीची ये...'  पिंपरी : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक गड-किल्ले, कडे, सुळके आणि शिखरे आहेत. त्यामध्ये गिर्यारोहक नेहमीच भटकंती करत असतात. मात्र, अनेकदा त्यांना योग्य वाट दाखविणाऱ्या वाटाड्याचीही गरज भासते. काही गिर्यारोहकांनी एकत्र येत याच वाटाड्यांवर आधारित लघुपटाची निर्मिती केली असून, त्यांनाच तो समर्पित केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    या लघुपटाचे गिर्यारोहक सागर मांडेकर यांनी दिग्दर्शन केले असून, राहुल जाधव हे 'वाटाड्या'च्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासमवेत रोहन मोरे, विनायक आल्हाट यांनी गिर्यारोहकांच्या भूमिका साकारल्या आहेत. खेड तालुक्‍याच्या दक्षिणपट्टयातील वांद्रे गाव आणि त्याच्या परिसरातील कोथळीगडालगत लघुपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. जवळपास 7 मिनिटांचा हा लघुपट आहे. विशेष म्हणजे, यामध्ये कलाकार दिसत असले, तरी त्यांच्यात फारसा संवाद दाखविलेला नाही.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्याबद्दल बोलताना मांडेकर म्हणाले, "सह्याद्री पर्वतरांगांत गड-किल्ले फिरत असताना नेहमीच एक प्रश्‍न असतो. कुठल्या वाटेने जायचे? सह्याद्रीत एक पायवाट कधीच नसते. प्रत्येक पावसाळ्यानंतर ती बदललेली असते. या वाटा कुणीतरी आधीच बनवून ठेवलेल्या असतात. कधी त्या जवळच्याच रहिवाशांनी बनविल्या असतात. तर कधी गिरीप्रेमींनी. आपल्याला फक्त वाट दिसते. ज्या वाटेवर आपण निर्धास्तपणे जातो. ती वाट तयार करण्यासाठी कोणीतरी कष्ट घेतले असतात. आपल्या आयुष्यात असे अनेक वाटाडे भेटतात. जे आपल्याला योग्य रस्ता दाखवित असतात. आपण रस्ता पाहतो आणि चालू लागतो. परंतु, आपल्याला रस्ता दाखविणाऱ्या वाटाड्याचे आभार मानण्यास विसरतो. त्यामुळे आम्ही गिर्यारोहकांना वाट दाखविणाऱ्या वाटाड्यांना लघुपट बनवून समर्पित केला आहे. या लघुपटात शेवट वगळता कुठेच संवाद नाही. त्यात, वाटाड्या नवख्या गिर्यारोहकांना वाट दाखविताना 'ही वाट माझ्या ओळखीची ये...' असे सांगतानाचा एकच संवाद दिसतो. कारण, आम्हाला संवादाची गरज वाटली नाही. नवख्या माणसालाच संवादाची गरज भासते. निसर्गच तुमच्याशी सतत संवाद साधत असतो. या प्रकारे लघुपटाची निर्मिती करण्याचा आमचा पहिलाच प्रयत्न आहे.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चौघेही गिर्यारोहक आणि कलाकारही  या लघुपटात काम केलेले चौघेही गिर्यारोहक कलाकार देखील असून ते नाटकात देखील काम करतात. चाकण येथील वडवानल सांस्कृतिक संस्थेशी हे गिर्यारोहक जोडले गेले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील साह्यकडा ऍडव्हेंचर्स या गिर्यारोहक संस्थेचे ते सदस्य असून त्या संस्थेमार्फतही हे गिर्यारोहक गिरीमोहिमांमध्ये भाग घेत असतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 3, 2020

Video : नवख्या गिर्यारोहकांना हा वाटाड्या म्हणतोय, 'ही वाट माझ्या ओळखीची ये...'  पिंपरी : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक गड-किल्ले, कडे, सुळके आणि शिखरे आहेत. त्यामध्ये गिर्यारोहक नेहमीच भटकंती करत असतात. मात्र, अनेकदा त्यांना योग्य वाट दाखविणाऱ्या वाटाड्याचीही गरज भासते. काही गिर्यारोहकांनी एकत्र येत याच वाटाड्यांवर आधारित लघुपटाची निर्मिती केली असून, त्यांनाच तो समर्पित केला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    या लघुपटाचे गिर्यारोहक सागर मांडेकर यांनी दिग्दर्शन केले असून, राहुल जाधव हे 'वाटाड्या'च्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासमवेत रोहन मोरे, विनायक आल्हाट यांनी गिर्यारोहकांच्या भूमिका साकारल्या आहेत. खेड तालुक्‍याच्या दक्षिणपट्टयातील वांद्रे गाव आणि त्याच्या परिसरातील कोथळीगडालगत लघुपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. जवळपास 7 मिनिटांचा हा लघुपट आहे. विशेष म्हणजे, यामध्ये कलाकार दिसत असले, तरी त्यांच्यात फारसा संवाद दाखविलेला नाही.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा त्याबद्दल बोलताना मांडेकर म्हणाले, "सह्याद्री पर्वतरांगांत गड-किल्ले फिरत असताना नेहमीच एक प्रश्‍न असतो. कुठल्या वाटेने जायचे? सह्याद्रीत एक पायवाट कधीच नसते. प्रत्येक पावसाळ्यानंतर ती बदललेली असते. या वाटा कुणीतरी आधीच बनवून ठेवलेल्या असतात. कधी त्या जवळच्याच रहिवाशांनी बनविल्या असतात. तर कधी गिरीप्रेमींनी. आपल्याला फक्त वाट दिसते. ज्या वाटेवर आपण निर्धास्तपणे जातो. ती वाट तयार करण्यासाठी कोणीतरी कष्ट घेतले असतात. आपल्या आयुष्यात असे अनेक वाटाडे भेटतात. जे आपल्याला योग्य रस्ता दाखवित असतात. आपण रस्ता पाहतो आणि चालू लागतो. परंतु, आपल्याला रस्ता दाखविणाऱ्या वाटाड्याचे आभार मानण्यास विसरतो. त्यामुळे आम्ही गिर्यारोहकांना वाट दाखविणाऱ्या वाटाड्यांना लघुपट बनवून समर्पित केला आहे. या लघुपटात शेवट वगळता कुठेच संवाद नाही. त्यात, वाटाड्या नवख्या गिर्यारोहकांना वाट दाखविताना 'ही वाट माझ्या ओळखीची ये...' असे सांगतानाचा एकच संवाद दिसतो. कारण, आम्हाला संवादाची गरज वाटली नाही. नवख्या माणसालाच संवादाची गरज भासते. निसर्गच तुमच्याशी सतत संवाद साधत असतो. या प्रकारे लघुपटाची निर्मिती करण्याचा आमचा पहिलाच प्रयत्न आहे.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चौघेही गिर्यारोहक आणि कलाकारही  या लघुपटात काम केलेले चौघेही गिर्यारोहक कलाकार देखील असून ते नाटकात देखील काम करतात. चाकण येथील वडवानल सांस्कृतिक संस्थेशी हे गिर्यारोहक जोडले गेले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील साह्यकडा ऍडव्हेंचर्स या गिर्यारोहक संस्थेचे ते सदस्य असून त्या संस्थेमार्फतही हे गिर्यारोहक गिरीमोहिमांमध्ये भाग घेत असतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38qL5rn

No comments:

Post a Comment