पाऊलखुणा मंदिरांच्या 2 : माण गावातील स्मृतीशिल्प देतायेत इतिहासाची साक्ष (व्हिडिओ) पिंपरी : मुळशी तालुक्‍यातील हिंजवडीनजीक असलेल्या माण गावातील प्राचीन शिवमंदिर मोडकळीस आले आहे. मात्र, प्राचीन मंदिराशेजारी जुन्या अवस्थेत असलेले अवशेष या परिसरात मोठ्या प्रमाणावर आहेत. तब्बल 17 वीरगळ, स्मृतीशिळा, नागशिळा ही स्मृतीशिल्पे या मंदिर परिसरात आहेत. या अवशेषांवरून इतिहासाच्या पाऊलखुणा व प्राचीन इतिहास आजही डोळ्यांसमोर उभा राहत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    हेही वाचा- पाऊलखुणा मंदिरांच्या 1 : स्मृतीशिल्पांनी जपला यौद्ध्यांचा इतिहास (व्हिडिओ) या वीरगळांवर लढाईतील मृत व्यक्ती दर्शविलेल्या आहेत. यावर ढाल, तलवार घेऊन वीर लढताना दिसत आहेत. हा वीरगळ अद्यापही चांगल्या अवस्थेत आहे. त्यावर मृत पावलेला वीर कैलासात गेलेला दाखविला आहे. त्यातील दुसऱ्या कप्प्यात शिवलिंगाची पूजा करताना शेजारी साधू आहे. त्यावर मंगलकलश दाखविलेला आहे. पूर्वजांच्या स्मरणार्थ बनविलेल्या या शिळा यावरून हा इतिहास आठशे ते हजार वर्ष जुना असल्याचे समजते. येथे शेजारीच मोठी लोकवस्ती देखील आहे. काही प्राचीन स्वरूपातील वीरांच्या समाधी देखील या परिसरात आहेत. या भागात जुनी वडाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत, अशी माहिती अभ्यासक प्रणव पाटील यांनी दिली.  माण जागरूक देवस्थान माण देवीवरूनच गावाला माण असे नाव पडले आहे. या गावातील माणदेवीचे प्राचीन मंदिर पूर्वी ओढ्याकाठी होते. ते विविध कलापूर्ण पद्धतीने बांधले गेले आहे. चैत्र पौर्णिमेला खूप मोठा उत्सव या मंदिरात भरतो. येथील मुख्य ग्रामदैवत श्री भैरवनाथ, माणदेवी व महादेवाचे आहे. बगाडाचा उत्सव येथे आजही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काळभैरवनाथाचे कित्येक शतके जुने मंदिर आहे. या भागातील भाविकांची या ग्रामदैवतावर मोठी श्रद्धा आहे. मंदिरात जोगेश्‍वरीची प्राचीन मूर्ती आहे. यापूर्वी हे मंदिर जुन्या लाकडी स्वरूपात होते. त्यानंतर 2003 मध्ये नव्याने मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले. या गावाचा उत्सव अक्षय तृतीयेला होतो, तर मंदिराचा उत्सव कालाष्टमीला भरतो. या भागातही मोठा बगाड उत्सव भरतो. शिवकालीन पत्रामध्ये देखील या गावाचा उल्लेख आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा हे व्यापारी मार्गावर वसलेले गाव आहे. याच मार्गावर डोंगरात कोरलेली एक मोठी ऐतिहासिक लेणी आहे. व्यापारी मार्गामुळे ही लेणी कोरल्याचा अंदाज बांधला जात आहे. ही लेणी पाहण्यासाठी आजही डोंगरातून पायवाट काढत नागरिक जात आहेत. माण गावाच्या रस्त्यावरून देखील ही लेणी दृष्टीस पडते. News Story Feeds https://ift.tt/2D55HKd - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 3, 2020

पाऊलखुणा मंदिरांच्या 2 : माण गावातील स्मृतीशिल्प देतायेत इतिहासाची साक्ष (व्हिडिओ) पिंपरी : मुळशी तालुक्‍यातील हिंजवडीनजीक असलेल्या माण गावातील प्राचीन शिवमंदिर मोडकळीस आले आहे. मात्र, प्राचीन मंदिराशेजारी जुन्या अवस्थेत असलेले अवशेष या परिसरात मोठ्या प्रमाणावर आहेत. तब्बल 17 वीरगळ, स्मृतीशिळा, नागशिळा ही स्मृतीशिल्पे या मंदिर परिसरात आहेत. या अवशेषांवरून इतिहासाच्या पाऊलखुणा व प्राचीन इतिहास आजही डोळ्यांसमोर उभा राहत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    हेही वाचा- पाऊलखुणा मंदिरांच्या 1 : स्मृतीशिल्पांनी जपला यौद्ध्यांचा इतिहास (व्हिडिओ) या वीरगळांवर लढाईतील मृत व्यक्ती दर्शविलेल्या आहेत. यावर ढाल, तलवार घेऊन वीर लढताना दिसत आहेत. हा वीरगळ अद्यापही चांगल्या अवस्थेत आहे. त्यावर मृत पावलेला वीर कैलासात गेलेला दाखविला आहे. त्यातील दुसऱ्या कप्प्यात शिवलिंगाची पूजा करताना शेजारी साधू आहे. त्यावर मंगलकलश दाखविलेला आहे. पूर्वजांच्या स्मरणार्थ बनविलेल्या या शिळा यावरून हा इतिहास आठशे ते हजार वर्ष जुना असल्याचे समजते. येथे शेजारीच मोठी लोकवस्ती देखील आहे. काही प्राचीन स्वरूपातील वीरांच्या समाधी देखील या परिसरात आहेत. या भागात जुनी वडाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत, अशी माहिती अभ्यासक प्रणव पाटील यांनी दिली.  माण जागरूक देवस्थान माण देवीवरूनच गावाला माण असे नाव पडले आहे. या गावातील माणदेवीचे प्राचीन मंदिर पूर्वी ओढ्याकाठी होते. ते विविध कलापूर्ण पद्धतीने बांधले गेले आहे. चैत्र पौर्णिमेला खूप मोठा उत्सव या मंदिरात भरतो. येथील मुख्य ग्रामदैवत श्री भैरवनाथ, माणदेवी व महादेवाचे आहे. बगाडाचा उत्सव येथे आजही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काळभैरवनाथाचे कित्येक शतके जुने मंदिर आहे. या भागातील भाविकांची या ग्रामदैवतावर मोठी श्रद्धा आहे. मंदिरात जोगेश्‍वरीची प्राचीन मूर्ती आहे. यापूर्वी हे मंदिर जुन्या लाकडी स्वरूपात होते. त्यानंतर 2003 मध्ये नव्याने मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास नेले. या गावाचा उत्सव अक्षय तृतीयेला होतो, तर मंदिराचा उत्सव कालाष्टमीला भरतो. या भागातही मोठा बगाड उत्सव भरतो. शिवकालीन पत्रामध्ये देखील या गावाचा उल्लेख आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा हे व्यापारी मार्गावर वसलेले गाव आहे. याच मार्गावर डोंगरात कोरलेली एक मोठी ऐतिहासिक लेणी आहे. व्यापारी मार्गामुळे ही लेणी कोरल्याचा अंदाज बांधला जात आहे. ही लेणी पाहण्यासाठी आजही डोंगरातून पायवाट काढत नागरिक जात आहेत. माण गावाच्या रस्त्यावरून देखील ही लेणी दृष्टीस पडते. News Story Feeds https://ift.tt/2D55HKd


via News Story Feeds https://ift.tt/3gtDCun

No comments:

Post a Comment