Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 2, 2020

पर्ससीन नौकांना दणका, मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले `हे` आदेश

मालवण (सिंधुदुर्ग) - अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलेल्या मागणीची दखल घेत पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्यासाठी पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांचे नूतनीकरण आजपासून न करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 

पारंपरिक मच्छीमारांचे हित जतन करण्यासाठी राज्याच्या जलधी क्षेत्रात पर्ससीन जाळ्यांद्वारे होणाऱ्या मासेमारीचा व तिचा पारंपरिक मासेमारीवर, राज्याच्या सागरी किनाऱ्याच्या पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. व्ही. एस. सोमवंशी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने राज्याच्या सागरी जिल्ह्यात पाहणी करून उपलब्ध मत्स्यसाठ्याचा आढावा, पारंपरिक मच्छीमारांचे हितसंबंध जपणे, शाश्वत सागरी मासेमारी टिकवून ठेवणे याचा अभ्यास केला आणि त्याबाबतचा अहवाल 10 मे 2012 ला शासनाला सादर केला. 

या अहवालातील शिफारशी शासनाने 16 मे 2015 ला स्विकृत केल्या. अहवालानुसार राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात राज्य शासनाने कृषि व पदुम विभागाच्या आदेशान्वये पर्ससीन मासेमारीचे नियमन केले आहे. तसेच पर्ससीन रिंगसीन (मिनी पर्ससीन सह) मासेमारीसाठी नवीन मासेमारी परवाने देण्यास बंदी घातली आहे. प्रचलित/कार्यरत पर्ससीन/रिंगसीन (मिनी पर्ससीन सह) मासेमारी परवान्यांची संख्या टप्याटप्याने कमी करुन 262 वर आणि अंतिम 182 पर्यंत आणावयाचे नमूद केले आहे.

त्या अनुषंगाने आजपासून एकाही पर्ससीन मासेमारी नौकांचे परवाने नुतनीकरण करण्यात येऊ नये असे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले आहेत. शाश्‍वत मासेमारी टिकून राहण्याच्या अनुषंगाने शासन आदेश 5 फेब्रुवारी 2016 मधील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या पर्ससीन मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कठोर कारवाई करून अशा नौकांचे मासेमारी परवाने व नौकेची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. 

कडक कारवाईची इशारा 
या आदेशानंतरही एकाही पर्ससीन नौकांच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याचे निदर्शनास आल्यास, पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्याच्या कार्यवाहीत टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित परवाना अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. पाटणे यांनी दिला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पर्ससीन नौकांना दणका, मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले `हे` आदेश मालवण (सिंधुदुर्ग) - अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलेल्या मागणीची दखल घेत पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्यासाठी पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकांचे नूतनीकरण आजपासून न करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.  पारंपरिक मच्छीमारांचे हित जतन करण्यासाठी राज्याच्या जलधी क्षेत्रात पर्ससीन जाळ्यांद्वारे होणाऱ्या मासेमारीचा व तिचा पारंपरिक मासेमारीवर, राज्याच्या सागरी किनाऱ्याच्या पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. व्ही. एस. सोमवंशी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने राज्याच्या सागरी जिल्ह्यात पाहणी करून उपलब्ध मत्स्यसाठ्याचा आढावा, पारंपरिक मच्छीमारांचे हितसंबंध जपणे, शाश्वत सागरी मासेमारी टिकवून ठेवणे याचा अभ्यास केला आणि त्याबाबतचा अहवाल 10 मे 2012 ला शासनाला सादर केला.  या अहवालातील शिफारशी शासनाने 16 मे 2015 ला स्विकृत केल्या. अहवालानुसार राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात राज्य शासनाने कृषि व पदुम विभागाच्या आदेशान्वये पर्ससीन मासेमारीचे नियमन केले आहे. तसेच पर्ससीन रिंगसीन (मिनी पर्ससीन सह) मासेमारीसाठी नवीन मासेमारी परवाने देण्यास बंदी घातली आहे. प्रचलित/कार्यरत पर्ससीन/रिंगसीन (मिनी पर्ससीन सह) मासेमारी परवान्यांची संख्या टप्याटप्याने कमी करुन 262 वर आणि अंतिम 182 पर्यंत आणावयाचे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने आजपासून एकाही पर्ससीन मासेमारी नौकांचे परवाने नुतनीकरण करण्यात येऊ नये असे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिले आहेत. शाश्‍वत मासेमारी टिकून राहण्याच्या अनुषंगाने शासन आदेश 5 फेब्रुवारी 2016 मधील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या पर्ससीन मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कठोर कारवाई करून अशा नौकांचे मासेमारी परवाने व नौकेची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी.  कडक कारवाईची इशारा  या आदेशानंतरही एकाही पर्ससीन नौकांच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याचे निदर्शनास आल्यास, पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्याच्या कार्यवाहीत टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित परवाना अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री. पाटणे यांनी दिला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iqGdHu
Read More
भ्रष्टाचार प्रकरणी अखेर चौकशी समिती, काय आहे प्रकरण?

ओरोस (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या व्यक्तींना शासकीय नुकसान रक्कम देण्यासाठी पैसे मागितल्याच्या कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयावर झालेल्या आरोपाची दखल जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नियुक्त करीत या समितीला याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या मालकांना शासनाने मंजूर केलेला मोबादला देण्यासाठी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता. आपल्या मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा देत याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर 30 जूनला कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी चौकशी करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली होती.

तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात या प्रकारणाची ऑडियो क्‍लिप आहे. ज्या बॅंकेत हे पैसे जमा होणार होते, तेथील कर्मचाऱ्याने नुकसान रक्कम न मिळण्यात बॅंकेचा दोष नाही. प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पैसे मागत आहेत, असे सांगितले होते, असे नमूद करण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत मंजूलक्ष्मी यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लाभार्थ्यांना केंद्राच्यावतीने चारपट मोबदला देण्यात येत आहे. अनेक बाधितांचा मोबदला देण्यात आलेला आहे. काही बाधितांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे ते नागरिक प्रशासनाकडे ही रक्कम मागत आहेत. ही बाब श्री. नाईक यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी याबाबत आवाज उठविला. त्यावेळी मोबदला मिळण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचे पुढे आले होते. 

अशी आहे चौकशी समिती 
या भ्रष्टाचार आरोप प्रकरणाची जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी गंभीर दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीत भूसंपादन उपजिल्हाधिकारी वर्षा सिंगन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी नितीन सावंत यांचा समावेश करण्यात आला आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भ्रष्टाचार प्रकरणी अखेर चौकशी समिती, काय आहे प्रकरण? ओरोस (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या व्यक्तींना शासकीय नुकसान रक्कम देण्यासाठी पैसे मागितल्याच्या कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयावर झालेल्या आरोपाची दखल जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नियुक्त करीत या समितीला याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या मालकांना शासनाने मंजूर केलेला मोबादला देण्यासाठी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता. आपल्या मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा देत याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर 30 जूनला कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी चौकशी करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली होती. तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात या प्रकारणाची ऑडियो क्‍लिप आहे. ज्या बॅंकेत हे पैसे जमा होणार होते, तेथील कर्मचाऱ्याने नुकसान रक्कम न मिळण्यात बॅंकेचा दोष नाही. प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पैसे मागत आहेत, असे सांगितले होते, असे नमूद करण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत मंजूलक्ष्मी यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लाभार्थ्यांना केंद्राच्यावतीने चारपट मोबदला देण्यात येत आहे. अनेक बाधितांचा मोबदला देण्यात आलेला आहे. काही बाधितांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे ते नागरिक प्रशासनाकडे ही रक्कम मागत आहेत. ही बाब श्री. नाईक यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी याबाबत आवाज उठविला. त्यावेळी मोबदला मिळण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचे पुढे आले होते.  अशी आहे चौकशी समिती  या भ्रष्टाचार आरोप प्रकरणाची जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी गंभीर दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीत भूसंपादन उपजिल्हाधिकारी वर्षा सिंगन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी नितीन सावंत यांचा समावेश करण्यात आला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31HVxJM
Read More
पुण्यात बस सुरू करण्याबाबत आदेशाची प्रतीक्षा; तयारी पूर्ण 

पुणे, - पुणे शहरातील पीएमपी बससेवा या महिन्यात तरी सुरू होण्याची चिन्हे नाहीत. ती ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते, असे पीएमपीतर्फे गुरुवारी (ता. 2) स्पष्ट करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशावरच ते अवलंबून असले तरी, बस सुरू करण्याची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोनामुळे पीएमपीची शहरातील बससेवा 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील सेवाही तेव्हापासून बंद होती. मात्र, राज्य सरकारने पिंपरी चिंचवडला रेडझोनमधून वगळल्यानंतर 26 मेपासून तेथील सेवा सुरू करण्यात आली. मात्र, पुण्यातील सेवा अद्याप सुरू झालेली नाही. ती सुरू करावी, अशी मागणी पीएमपीचे संचालक व नगरसेवक शंकर पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. शहरात रिक्षा वाहतूक सुरू आहे, मग पीएमपी का बंद ठेवली जाते, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केली होता. मात्र, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या वाहतुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी गुरुवारी आगार प्रमुखांची बैठक घेतली. त्यात याबाबत चर्चा झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तीस मार्गांचे नियोजन 
शहरात सध्या अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू आहे. शासकीय कार्यालयांतील उपस्थिती वाढू लागल्याने आता या बसला गर्दी होत आहे. त्यामुळे सध्या 100 ऐवजी आणखी किमान 20 बस गरजेनुसार वाढविण्याचा निर्णय झाला. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये 80 बसची सेवा सुरू आहे. तेथेही प्रवाशांची गर्दी वाढली तर, बस संख्या वाढविण्याचा निर्णय झाला. पुणे महापालिकेने परवानगी दिली तर, शहरातील वाहतूक किमान 30 मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. शहरातील ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र आहे, तेथे बससेवा नसेल. मात्र, अन्य भागात वाहतूक होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सूचना दिल्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरीत अल्प प्रतिसाद 
पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रवासी सेवेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. बसमध्ये प्रवासी घेताना क्षमतेच्या निम्मेच प्रवासी सध्या घेतले जात आहेत. तसेच प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसण्यासाठी परवानगी दिली जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असेही वाघमारे यांनी सांगितले. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात बस सुरू करण्याबाबत आदेशाची प्रतीक्षा; तयारी पूर्ण  पुणे, - पुणे शहरातील पीएमपी बससेवा या महिन्यात तरी सुरू होण्याची चिन्हे नाहीत. ती ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते, असे पीएमपीतर्फे गुरुवारी (ता. 2) स्पष्ट करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशावरच ते अवलंबून असले तरी, बस सुरू करण्याची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    कोरोनामुळे पीएमपीची शहरातील बससेवा 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील सेवाही तेव्हापासून बंद होती. मात्र, राज्य सरकारने पिंपरी चिंचवडला रेडझोनमधून वगळल्यानंतर 26 मेपासून तेथील सेवा सुरू करण्यात आली. मात्र, पुण्यातील सेवा अद्याप सुरू झालेली नाही. ती सुरू करावी, अशी मागणी पीएमपीचे संचालक व नगरसेवक शंकर पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. शहरात रिक्षा वाहतूक सुरू आहे, मग पीएमपी का बंद ठेवली जाते, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केली होता. मात्र, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या वाहतुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी गुरुवारी आगार प्रमुखांची बैठक घेतली. त्यात याबाबत चर्चा झाली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तीस मार्गांचे नियोजन  शहरात सध्या अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू आहे. शासकीय कार्यालयांतील उपस्थिती वाढू लागल्याने आता या बसला गर्दी होत आहे. त्यामुळे सध्या 100 ऐवजी आणखी किमान 20 बस गरजेनुसार वाढविण्याचा निर्णय झाला. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये 80 बसची सेवा सुरू आहे. तेथेही प्रवाशांची गर्दी वाढली तर, बस संख्या वाढविण्याचा निर्णय झाला. पुणे महापालिकेने परवानगी दिली तर, शहरातील वाहतूक किमान 30 मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. शहरातील ज्या भागात प्रतिबंधित क्षेत्र आहे, तेथे बससेवा नसेल. मात्र, अन्य भागात वाहतूक होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सूचना दिल्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पिंपरीत अल्प प्रतिसाद  पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रवासी सेवेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, असेही त्यांनी सांगितले. बसमध्ये प्रवासी घेताना क्षमतेच्या निम्मेच प्रवासी सध्या घेतले जात आहेत. तसेच प्रत्येक आसनावर एकाच प्रवाशाला बसण्यासाठी परवानगी दिली जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असेही वाघमारे यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BWaHQR
Read More
बेशिस्तीला लगाम लावा, पोलिसी खाक्याच हवा!

कोरोनारूपी महाराक्षसाने समस्त शहरालाच आपला विळखा घालायला सुरवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या एकअंकी संख्येची जागा आता तीन आकड्यांवर येऊन ठेपली आहे. कोरोनासुर दबा धरून बसलेला असूनही शहरातील विविध भागांतील काही रिकामटेकडे नागरिक मात्र हजारोंच्या संख्येने टिवल्याबावल्या करत रस्त्यावर हुंदडत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा सायंकाळी पाचनंतर बंद होत असताना हे रिकामटेकडे नेमके कोणत्या ‘मोहिमे’वर बाहेर हुंदडायला निघतात हा एक संशोधनाचा विषय आहे! परंतु आता मात्र अति होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता अशा रिकामटेकड्यांची कसलीही गय न करता त्यांना पोलिसी खाक्या दाखविणेच गरजेचे आहे. दंडात्मक
कारवाईलाही जे घाबरत नसतील त्यांना ‘थर्ड डिग्री’ उपचाराच हवेत, असा सार्वत्रिक सूर आहे.  
 

कोरोनासुराला हरविण्यासाठी संयमाची आवश्यकता 
कोरोनासुराला हरविण्यासाठी औरंगाबादकरांच्या मदतीची, अनावश्यक घराबाहेर न पडण्याची तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची आणि संयमाचीही तितकीच गरज आहे. कोरोनाला हरविण्याची जबाबदारी केवळ शासन आणि प्रशासनाचीच नव्हे तर आपलेही तितकेच कर्तव्य आहे याचे भान सर्वांनी ठेवायलाच पाहिजे. 
 
किमान कुटुंबीयांचा तरी विचार करा 
मी कोरोनाला घाबरत नाही, कोरोना माझे काहीही वाकडे करू शकणार नाही, अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांनो, आपल्या जिवाची काळजी नसेल, तर किमान आपल्या कुटुंबातील सदस्यांची तरी काळजी करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची तरी काळजी घ्या. विनाकारण बाहेर हुंदडायला पडण्याची खरेच गरज आहे का, हे एकदा आपल्या मनालाच विचारून पाहा. उत्तर तर नाहीच येणार आहे हे माहीत असूनही जिवावर उदार का झालात, असा प्रश्न रस्त्यावरील गर्दीकडे पाहिल्यावर पडतो. 
  
लॉकडाउन करणे गरजेचे 
कोरोनाला अजूनही काही शहरवासी ‘लाईटली’ घेत असतील तर पुन्हा एकदा किमान १५ दिवस कडक लॉकडाउन करणेच औरंगाबादकरांच्या हिताचे ठरेल, यात शंका नाही. पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी आता लॉकडाउन जाहीर करण्यास जास्त ढील न देता तत्काळ १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करावा. मेडिकल, दूध आदी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांनाही घरपोच सेवा देता येईल का, याचाही विचार प्रशासनाने नक्कीच करावा. असे केल्यासच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होऊ शकते आणि शहरवासी कोरोनावर मात करून पुन्हा पूर्वीप्रमाणेच मुक्त श्‍वास घेऊ शकतील. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

बेशिस्तीला लगाम लावा, पोलिसी खाक्याच हवा! कोरोनारूपी महाराक्षसाने समस्त शहरालाच आपला विळखा घालायला सुरवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या एकअंकी संख्येची जागा आता तीन आकड्यांवर येऊन ठेपली आहे. कोरोनासुर दबा धरून बसलेला असूनही शहरातील विविध भागांतील काही रिकामटेकडे नागरिक मात्र हजारोंच्या संख्येने टिवल्याबावल्या करत रस्त्यावर हुंदडत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा सायंकाळी पाचनंतर बंद होत असताना हे रिकामटेकडे नेमके कोणत्या ‘मोहिमे’वर बाहेर हुंदडायला निघतात हा एक संशोधनाचा विषय आहे! परंतु आता मात्र अति होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता अशा रिकामटेकड्यांची कसलीही गय न करता त्यांना पोलिसी खाक्या दाखविणेच गरजेचे आहे. दंडात्मक कारवाईलाही जे घाबरत नसतील त्यांना ‘थर्ड डिग्री’ उपचाराच हवेत, असा सार्वत्रिक सूर आहे.     कोरोनासुराला हरविण्यासाठी संयमाची आवश्यकता  कोरोनासुराला हरविण्यासाठी औरंगाबादकरांच्या मदतीची, अनावश्यक घराबाहेर न पडण्याची तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची आणि संयमाचीही तितकीच गरज आहे. कोरोनाला हरविण्याची जबाबदारी केवळ शासन आणि प्रशासनाचीच नव्हे तर आपलेही तितकेच कर्तव्य आहे याचे भान सर्वांनी ठेवायलाच पाहिजे.    किमान कुटुंबीयांचा तरी विचार करा  मी कोरोनाला घाबरत नाही, कोरोना माझे काहीही वाकडे करू शकणार नाही, अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांनो, आपल्या जिवाची काळजी नसेल, तर किमान आपल्या कुटुंबातील सदस्यांची तरी काळजी करा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची तरी काळजी घ्या. विनाकारण बाहेर हुंदडायला पडण्याची खरेच गरज आहे का, हे एकदा आपल्या मनालाच विचारून पाहा. उत्तर तर नाहीच येणार आहे हे माहीत असूनही जिवावर उदार का झालात, असा प्रश्न रस्त्यावरील गर्दीकडे पाहिल्यावर पडतो.     लॉकडाउन करणे गरजेचे  कोरोनाला अजूनही काही शहरवासी ‘लाईटली’ घेत असतील तर पुन्हा एकदा किमान १५ दिवस कडक लॉकडाउन करणेच औरंगाबादकरांच्या हिताचे ठरेल, यात शंका नाही. पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी आता लॉकडाउन जाहीर करण्यास जास्त ढील न देता तत्काळ १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर करावा. मेडिकल, दूध आदी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांनाही घरपोच सेवा देता येईल का, याचाही विचार प्रशासनाने नक्कीच करावा. असे केल्यासच कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होऊ शकते आणि शहरवासी कोरोनावर मात करून पुन्हा पूर्वीप्रमाणेच मुक्त श्‍वास घेऊ शकतील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3goUkuS
Read More
पुण्यात रेमडेसिव्हिर ‘औषधालाही’मिळेना; कोरोनाबाधीत अत्यवस्थ रुग्णांसाठी इंजेक्शनचा तुटवडा 

पुणे - कोरोनाबाधीत अत्यवस्थ रुग्णांवर प्रभावी ठरत असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुण्यात ‘औषधालाही’ मिळत नाही. खासगी रुग्णालयांमध्येही त्यांच्या गरजेच्या तुलनेत जेमतेम पाच टक्के इंजेक्शन वायल उपलब्ध असल्याची माहिती पुढे येत आहे. 

रेमडेसिव्हिर इंजेक्शन कोरोनोबाधीत रुग्णांवर वापरण्यास ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) मान्यता दिली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्याचा वापर सुरू असल्याने भारतीय रुग्णांमध्ये हे औषध किती प्रभावी ठरत आहे, याचे निष्कर्ष पुढील दोन महिन्यांमध्ये येतील. पण, या दरम्यान हे औषध पुण्यातील रुग्णांना मिळत नाही. या इंजेक्शन खरेदी करण्यासाठी खासगी रुग्णालयांनी आघाडी घेतली असली तरी त्यांनाही त्यांच्या गरजेपेक्षा खूपच कमी ‘वायल’ मिळत असल्याचे शहरातील रुग्णालयांनी सांगितले. शहरातील एका रुग्णालयात या इंजेक्शनच्या १०० वायलची गरज असल्यास त्यांना फक्त ५ मिळत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

इंजेक्शनची पुण्यातील स्थिती 
सिप्ला आणि हेटेरो या दोन औषध निर्माण कंपन्यांमधून उत्पादन होणारे रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन पुण्यातील बाजारपेठेत येते. सध्या बाजारपेठेत या इंजेक्शनचा साठा उपलब्ध नाही. पण, यापूर्वी आलेले इंजेक्शन रुग्णालयांमध्ये पोहोचले आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये इंजेक्शनचा पुरवठा पुण्यात होईल. या इंजेक्शनच्या तपासणीला १४ दिवस लागतात. येत्या ५ आणि ६ जुलै ही तपासणी पूर्ण होत आहे. त्यानंतर ते पुण्यातील रुग्णांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली. 

साठा नसल्याने खरेदीस मर्यादा 
पुणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये साडेतीनशे अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण, त्यांच्यावर उपचारांसाठी रेमडेसिव्हिर या इंजेक्शनची खरेदी अद्यापही झालेली नाही. त्यामागे या इंजेक्शनचा तुटवडा, हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. 

राज्याकडून खरेदी नाही 
कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचाराच्या मार्गदर्शिकेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा समावेश केला आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठीच सध्या हे इंजेक्शन वापरण्याचा सल्ला दिला आहे. सरकारी रुग्णालयांकडून किंवा आरोग्य खात्याकडून या इंजेक्शनच्या खरेदीचा कोणताही प्रस्ताव राज्यातील औषध खरेदी करणाऱ्या ‘हाफकिन’ला मिळाला नाही. तसेच, त्याची स्थानिक प्रशासनातर्फेही खरेदी झाल्याची नेमकी माहिती आरोग्य खात्याकडे नाही. 

इंजेक्शन का ठरतंय प्रभावी? 
हे औषध इंजेक्शनमधून थेट शिरेवाटे शरीरात सोडले जाते. त्यामुळे इतर गोळ्यांच्या प्रकारातील औषधांपेक्षा हे जास्त प्रभावी ठरेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

“रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या खरेदी-विक्रीवर बारकाईने ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे औषध फक्त रुग्णालयांनाच विक्री होईल. इतरत्र त्याचा पुरवठा होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत ” 
- एस. बी. पाटील, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग. 

“रेमडेसिव्हिर हे अँटीव्हायरल इंजेक्शन अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ अथवा संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला दिले पाहिजे. योग्य रुग्णाला हे इंजेक्शन वेळेत दिल्यास त्याचा जास्त चांगला परिणाम उपचारात मिळू शकतो. तसेच, त्याचा तुटवडाही टाळता येईल.” 
- डॉ. कपिल झिरपे, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यात रेमडेसिव्हिर ‘औषधालाही’मिळेना; कोरोनाबाधीत अत्यवस्थ रुग्णांसाठी इंजेक्शनचा तुटवडा  पुणे - कोरोनाबाधीत अत्यवस्थ रुग्णांवर प्रभावी ठरत असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुण्यात ‘औषधालाही’ मिळत नाही. खासगी रुग्णालयांमध्येही त्यांच्या गरजेच्या तुलनेत जेमतेम पाच टक्के इंजेक्शन वायल उपलब्ध असल्याची माहिती पुढे येत आहे.  रेमडेसिव्हिर इंजेक्शन कोरोनोबाधीत रुग्णांवर वापरण्यास ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) मान्यता दिली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्याचा वापर सुरू असल्याने भारतीय रुग्णांमध्ये हे औषध किती प्रभावी ठरत आहे, याचे निष्कर्ष पुढील दोन महिन्यांमध्ये येतील. पण, या दरम्यान हे औषध पुण्यातील रुग्णांना मिळत नाही. या इंजेक्शन खरेदी करण्यासाठी खासगी रुग्णालयांनी आघाडी घेतली असली तरी त्यांनाही त्यांच्या गरजेपेक्षा खूपच कमी ‘वायल’ मिळत असल्याचे शहरातील रुग्णालयांनी सांगितले. शहरातील एका रुग्णालयात या इंजेक्शनच्या १०० वायलची गरज असल्यास त्यांना फक्त ५ मिळत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    इंजेक्शनची पुण्यातील स्थिती  सिप्ला आणि हेटेरो या दोन औषध निर्माण कंपन्यांमधून उत्पादन होणारे रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन पुण्यातील बाजारपेठेत येते. सध्या बाजारपेठेत या इंजेक्शनचा साठा उपलब्ध नाही. पण, यापूर्वी आलेले इंजेक्शन रुग्णालयांमध्ये पोहोचले आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये इंजेक्शनचा पुरवठा पुण्यात होईल. या इंजेक्शनच्या तपासणीला १४ दिवस लागतात. येत्या ५ आणि ६ जुलै ही तपासणी पूर्ण होत आहे. त्यानंतर ते पुण्यातील रुग्णांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.  साठा नसल्याने खरेदीस मर्यादा  पुणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये साडेतीनशे अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण, त्यांच्यावर उपचारांसाठी रेमडेसिव्हिर या इंजेक्शनची खरेदी अद्यापही झालेली नाही. त्यामागे या इंजेक्शनचा तुटवडा, हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.  राज्याकडून खरेदी नाही  कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचाराच्या मार्गदर्शिकेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा समावेश केला आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठीच सध्या हे इंजेक्शन वापरण्याचा सल्ला दिला आहे. सरकारी रुग्णालयांकडून किंवा आरोग्य खात्याकडून या इंजेक्शनच्या खरेदीचा कोणताही प्रस्ताव राज्यातील औषध खरेदी करणाऱ्या ‘हाफकिन’ला मिळाला नाही. तसेच, त्याची स्थानिक प्रशासनातर्फेही खरेदी झाल्याची नेमकी माहिती आरोग्य खात्याकडे नाही.  इंजेक्शन का ठरतंय प्रभावी?  हे औषध इंजेक्शनमधून थेट शिरेवाटे शरीरात सोडले जाते. त्यामुळे इतर गोळ्यांच्या प्रकारातील औषधांपेक्षा हे जास्त प्रभावी ठरेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा “रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या खरेदी-विक्रीवर बारकाईने ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे औषध फक्त रुग्णालयांनाच विक्री होईल. इतरत्र त्याचा पुरवठा होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत ”  - एस. बी. पाटील, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग.  “रेमडेसिव्हिर हे अँटीव्हायरल इंजेक्शन अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ अथवा संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला दिले पाहिजे. योग्य रुग्णाला हे इंजेक्शन वेळेत दिल्यास त्याचा जास्त चांगला परिणाम उपचारात मिळू शकतो. तसेच, त्याचा तुटवडाही टाळता येईल.”  - डॉ. कपिल झिरपे, अतिदक्षता विभाग तज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Zyels9
Read More
पाऊलखुणा मंदिरांच्या 1 : स्मृतीशिल्पांनी जपला यौद्ध्यांचा इतिहास (व्हिडिओ)

पिंपरी : ताथवडे या गावाला प्राचीन इतिहास व जुनी परंपरा आहे. ढाल, तलवारी व धनुष्यबाण हातात घेऊन लढणाऱ्या वीरांच्या स्मृतीशिल्पांवरून हा इतिहास प्रकाशझोतात येत आहे. गावाचा रक्षक म्हणून ताथवडे चौकात असलेल्या या स्मृतीशिल्पांची नागरिक पूजा करतात. जवळपास 16 वृंदावन व एकल प्रकारातील मध्ययुगीन काळातील हे स्मृतीशिल्पे आहेत. यातील काही शिल्पांवर शेंदूर लावलेला आहे. मात्र, आजही ती चांगल्या अवस्थेत आढळून आलेली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

ताथवडेमध्ये श्री नरसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. पूर्वीचे लाकडी माडीचे मंदिर होते. विष्णूच्या दशावतारातील हा एक अवतार आहे. मात्र, काही वर्षापूर्वी मूर्तीवरचा शेंदूर काढल्यानंतर तो शांत स्वरूपातील नरसिंह असल्याचे दिसले. सध्याची नरसिंहाची मूर्ती ही पूर्वीची शेंदूर काढलेली मूर्ती आहे. काही अभ्यासकांच्या मते तो वामन अवतारातील देव असावा. चिंचवडगाव देवस्थानाच्या मोरया गोसावीची ही सासरवाडी असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

श्री म्हातोबाचे देखील या गावात मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेला या गावाचा उत्सव, तर वैशाख पौर्णिमेला मंदिराचा उत्सव भरतो. पंचक्रोशीतील सर्वजण बगाडाच्या उत्सवास गर्दी करतात. शहरात नरसिंहाचे हे एकमेव मंदिर आहे. या मंदिराला सोन्याचा कळस आहे. मंदिरांची कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेते. मंदिरातील विविध उत्सवांसाठी भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

संत तुकाराम महाराजांचे या मंदिरात कीर्तन...

वारकरी परंपरेचा इतिहास या गावाला आहे. संत तुकाराम महाराज या मंदिरात कीर्तन करायला येत असल्याच्या नोंदी ठिकठिकाणी सापडलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर सती वृंदावन आहे. त्याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. ग्रामस्थांनाही याबद्दल माहीत नाही. दगडाचा गाभारा मूळ रुपात ठेवून हे नवीन मंदिर बांधले असल्याची माहिती प्राचीन मंदिराचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/3dS2Zo5

पाऊलखुणा मंदिरांच्या 1 : स्मृतीशिल्पांनी जपला यौद्ध्यांचा इतिहास (व्हिडिओ) पिंपरी : ताथवडे या गावाला प्राचीन इतिहास व जुनी परंपरा आहे. ढाल, तलवारी व धनुष्यबाण हातात घेऊन लढणाऱ्या वीरांच्या स्मृतीशिल्पांवरून हा इतिहास प्रकाशझोतात येत आहे. गावाचा रक्षक म्हणून ताथवडे चौकात असलेल्या या स्मृतीशिल्पांची नागरिक पूजा करतात. जवळपास 16 वृंदावन व एकल प्रकारातील मध्ययुगीन काळातील हे स्मृतीशिल्पे आहेत. यातील काही शिल्पांवर शेंदूर लावलेला आहे. मात्र, आजही ती चांगल्या अवस्थेत आढळून आलेली आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    ताथवडेमध्ये श्री नरसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. पूर्वीचे लाकडी माडीचे मंदिर होते. विष्णूच्या दशावतारातील हा एक अवतार आहे. मात्र, काही वर्षापूर्वी मूर्तीवरचा शेंदूर काढल्यानंतर तो शांत स्वरूपातील नरसिंह असल्याचे दिसले. सध्याची नरसिंहाची मूर्ती ही पूर्वीची शेंदूर काढलेली मूर्ती आहे. काही अभ्यासकांच्या मते तो वामन अवतारातील देव असावा. चिंचवडगाव देवस्थानाच्या मोरया गोसावीची ही सासरवाडी असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. श्री म्हातोबाचे देखील या गावात मंदिर आहे. चैत्र पौर्णिमेला या गावाचा उत्सव, तर वैशाख पौर्णिमेला मंदिराचा उत्सव भरतो. पंचक्रोशीतील सर्वजण बगाडाच्या उत्सवास गर्दी करतात. शहरात नरसिंहाचे हे एकमेव मंदिर आहे. या मंदिराला सोन्याचा कळस आहे. मंदिरांची कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेते. मंदिरातील विविध उत्सवांसाठी भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. संत तुकाराम महाराजांचे या मंदिरात कीर्तन... वारकरी परंपरेचा इतिहास या गावाला आहे. संत तुकाराम महाराज या मंदिरात कीर्तन करायला येत असल्याच्या नोंदी ठिकठिकाणी सापडलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर सती वृंदावन आहे. त्याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. ग्रामस्थांनाही याबद्दल माहीत नाही. दगडाचा गाभारा मूळ रुपात ठेवून हे नवीन मंदिर बांधले असल्याची माहिती प्राचीन मंदिराचे अभ्यासक प्रणव पाटील यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/3dS2Zo5

July 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dWP4NJ
Read More
चीन बॉर्डर पर तनाव के बीच आज लेह जाएंगे बिपिन रावत, तैयारियों का लेंगे जायजा https://ift.tt/2C5thWA
कानपुर देहात में बदमाश को पकड़ने गई पुलिस टीम पर फायरिंग, DSP समेत आठ शहीद https://ift.tt/3dWNX0v
Horoscope Today, 3 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3eTvlji
दिल्ली: कार पर बदमाशों ने बरसाईं गोलियां, रिटायर्ड ASI के बेटे की मौत https://ift.tt/31DZD5D
फेयर एंड लवली के नाम बदलने के फैसले पर बोले शेखर कपूर- नीयत साबित करो https://ift.tt/2NSXQ4O
कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ - सहकारमंत्री

कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ - सहकारमंत्री

July 02, 2020 0 Comments
 कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.    from Zee24 Taas: Maharash...
Read More
देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ विधानं अस्वस्थतेतून, शरद पवारांबाबतच्या दाव्यांवर अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण